Hingoli District Kotwal Bharti Question Paper | हिंगोली जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली ?
❶ नांदेड
❷ परभणी
❸ जालना
❹ वाशिम
हिंगोली जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
❶ 4
❷ 7
❸ 6
❹ 5
हिंगोली जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?
❶ 1 मे 1999
❷ 1 मे 1998
❸ 15 ऑगस्ट 1999
❹ 26 जानेवारी 1999
हिंगोली जिल्ह्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
❶ मनोहर जोशी
❷ विलासराव देशमुख
❸ नारायण राणे
❹ शरद पवार
हिंगोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
❹ अमरावती
हिंगोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 4,526 चौ.किमी.
❷ 5,505 चौ.किमी.
❸ 6,505 चौ.किमी.
❹ 3,505 चौ.किमी.
हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
❶ 4
❷ 7
❸ 6
❹ 5
हिंगोली जिल्ह्याचे हवामान साधारणपणे कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ सम आणि दमट
❷ अतिथंड
❸ उष्ण आणि कोरडे
❹ मध्यम पावसाचे
हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे ?
❶ हिंगोली
❷ कळमनुरी
❸ औंढा नागनाथ
❹ वसमत
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख मृदा कोणत्या प्रकारची आहे ?
❶ तांबडी मृदा
❷ रेगूर मृदा
❸ लॅटराईट मृदा
❹ गाळाची मृदा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ अहिल्यानगर जिल्ह्यात कोठे आहे ?
❶ चौंडी
❷ नेवासा
❸ मालेगाव
❹ सासवड
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ तहसीलदार
❷ गटविकास अधिकारी
❸ सभापती
❹ मुख्य कार्यकारी अधिकारी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे ?
❶ पाचव्या
❷ सहाव्या
❸ सातव्या
❹ आठव्या
साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?
❶ अंबवडे
❷ अंमळनेर
❸ कापशी
❹ पालगड
बहिर्जी नाईक शत्रूच्या गोटातून माहिती आणणारा म्हणून प्रसिद्ध होता त्यामुळे त्यास काय संबोधतात ?
❶ अंगरक्षक
❷ गुप्तहेर
❸ तोफची
❹ मुत्सद्दी
शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच काय होय ?
❶ कर्कवृत्त
❷ मकरवृत्त
❸ रेखावृत्त
❹ विषुववृत्त
अमरनाथ यात्रा कोठे होते ?
❶ हिमाचल प्रदेश
❷ उत्तराखंड
❸ जम्मू आणि काश्मीर
❹ सिक्कीम
संगीतात किती स्वर असतात ?
❶ 5
❷ 7
❸ 8
❹ 12
भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
❶ गोदावरी
❷ गंगा
❸ ब्रह्मपुत्रा
❹ सिंधू
भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
❶ डॉ. पंजाबराव देशमुख
❷ महात्मा ज्योतिराव फुले
❸ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
❹ कर्मवीर भाऊराव पाटील
वि. वा. शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात ?
❶ बालकवी
❷ केशवसुत
❸ कुसुमाग्रज
❹ गोविंदाग्रज
स्वाइन फ्लूचा विषाणू कोणता ?
❶ H5N1
❷ H1N1
❸ HIV
❹ SARS-CoV-2
खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो ?
❶ तलाठी
❷ ग्रामसेवक
❸ पोलीस पाटील
❹ सरपंच
सोडियम क्लोराइड यास मराठीत काय म्हणतात ?
❶ साखर
❷ धुण्याचा सोडा
❸ खाण्याचा सोडा
❹ साधे मीठ
शून्याचा आविष्कार कोणी केला ?
❶ भास्कराचार्य
❷ आर्यभट्ट
❸ वराहमिहिर
❹ चरक
'पक्षी आकाशात उडतो.' या वाक्यातील 'कर्ता' कोणता आहे ?
❶ उडतो
❷ पक्षी
❸ आकाशात
❹ आकाश
खालीलपैकी 'शुद्ध शब्द' कोणता आहे ?
❶ आशिर्वाद
❷ आशिरवाद
❸ आशीर्वाद
❹ अशर्वाद
'राजा' या नामाचे सामान्यरूप कोणते होईल ?
❶ राजे
❷ राजास
❸ राजा
❹ राजाला
'तो अभ्यास करतो.' या वाक्याचा काळ ओळखा ?
❶ भूतकाळ
❷ वर्तमानकाळ
❸ भविष्यकाळ
❹ चालू भूतकाळ
दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
❶ अपसरण चिन्ह
❷ संयोगचिन्ह
❸ अर्धविराम
❹ स्वल्पविराम
'हात' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही ?
❶ कर
❷ हस्त
❸ बाहू
❹ पद
'शहाणा' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ हुशार
❷ चतुर
❸ मूर्ख
❹ ज्ञानी
'घोडे बांधण्याची जागा' या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द कोणता ?
❶ पागा
❷ गोठा
❸ खुराडे
❹ पिंजरा
'दगडावरची रेघ' या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ?
❶ कधीही न बदलणारे बोलणे
❷ दगड फोडणे
❸ दगडावर चित्र काढणे
❹ खोटे बोलणे
'वाचा बसणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
❶ भाषण करणे
❷ आवाज बसणे किंवा बोलणे बंद होणे
❸ मोठ्याने ओरडणे
❹ वाचन करणे
एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदाराला 12% नफा होतो, जर वस्तूची मूळ खरेदी किंमत 750 रुपये असेल, तर त्या वस्तूची छापील किंमत किती रुपये असेल ?
❶ 1000
❷ 1050
❸ 1100
❹ 1200
एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. त्यामध्ये वर्गशिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 1 वर्षाने वाढते, तर वर्गशिक्षकांचे वय किती वर्षे असेल ?
❶ 42
❷ 44
❸ 45
❹ 48
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 12 सेमी आणि कर्ण 13 सेमी असल्यास त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल ?
❶ 60
❷ 78
❸ 39
❹ 30
घड्याळात 4 वाजून 40 मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल ?
❶ 90°
❷ 110°
❸ 100°
❹ 120°
A, B आणि C यांनी एका व्यवसायात अनुक्रमे 20000 रुपये, 25000 रुपये आणि 30000 रुपये गुंतवले. वर्षाच्या शेवटी एकूण 45000 रुपये नफा झाला, तर B चा नफ्यातील वाटा किती रुपये असेल ?
❶ 12000
❷ 15000
❸ 18000
❹ 20000
द.सा.द.शे 10% दराने 8000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल ?
❶ 2400
❷ 2548
❸ 2648
❹ 2728
A हा एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो आणि B तेच काम 18 दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली, परंतु काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी A काम सोडून गेला, तर ते संपूर्ण काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागले ?
❶ 7.2
❷ 8.4
❸ 9.6
❹ 10
खालील इंग्रजी अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर गट येईल : BDF, CFI, DHL, EJO, ?
❶ FMR
❷ FLO
❸ FLR
❹ FMS
A, B, C, D आणि E हे पाच मित्र उत्तरेकडे तोंड करून एका बाकावर बसले आहेत. C हा E च्या डावीकडे लागून बसला आहे. B हा D च्या उजवीकडे लागून बसला आहे. A हा C च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी आहे. तर अगदी मध्यभागी कोण बसले आहे ?
❶ A
❷ B
❸ C
❹ D
खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा : 3, 10, 29, 66, 125, 218
❶ 29
❷ 66
❸ 125
❹ 218
एका सांकेतिक भाषेत 'TRAIN' हा शब्द 'WUDLQ' असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत 'BUS' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ EXV
❷ EVX
❸ DWT
❹ EYW
एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. जर त्या सर्वांच्या डोक्यांची एकूण संख्या 48 असेल आणि पायांची एकूण संख्या 140 असेल, तर त्या शेतात एकूण किती गायी आहेत ?
❶ 20
❷ 22
❸ 24
❹ 26
जर एका सांकेतिक भाषेत 'PEN' हा शब्द '35' असा लिहिला जातो आणि 'BOOK' हा शब्द '43' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'NOTE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 48
❷ 50
❸ 52
❹ 54
60 विद्यार्थ्यांच्या एका रांगेत मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. जर राहुलचा डावीकडून 17 वा क्रमांक असेल आणि त्याच्या पुढे 9 मुली असतील, तर त्याच्या मागे रांगेत किती मुले आहेत ?
❶ 11
❷ 12
❸ 13
❹ 14
एक व्यक्ती दक्षिणेकडे 8 km चालत जातो. नंतर तो डावीकडे वळून 6 km चालतो. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ?
❶ 10 किमी, आग्नेय
❷ 10 किमी, नैऋत्य
❸ 14 किमी, आग्नेय
❹ 14 किमी, नैऋत्य
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
