Buldhana District Kotwal Bharti Question Paper | बुलढाणा जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
बुलढाणा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 8,430 चौ.किमी
❷ 9,661 चौ.किमी
❸ 7,550 चौ.किमी
❹ 10,320 चौ.किमी
बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
❶ 3.14%
❷ 2.51%
❸ 4.22%
❹ 5.58%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
❶ 10 व्या
❷ 22 व्या
❸ 18 व्या
❹ 15 व्या
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील तापीच्या पूर्णा उपनदीच्या खोऱ्याला काय म्हटले जाते ?
❶ बाला घाट
❷ पयान घाट
❸ वरघाट
❹ मावळ
उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव क्षारयुक्त पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोठे आहे ?
❶ नांदुरा
❷ शेगाव
❸ लोणार
❹ खामगाव
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
❶ चिखली
❷ खामगाव
❸ संग्रामपूर
❹ मेहकर
बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
❶ 11
❷ 12
❸ 14
❹ 13
बुलढाणा जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
❶ 6
❷ 5
❸ 4
❹ 7
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बुलढाणा जिल्ह्याला लागून नाही ?
❶ वाशिम
❷ हिंगोली
❸ परभणी
❹ जळगाव
2011 च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
❶ 24,15,400
❷ 25,86,258
❸ 22,10,500
❹ 28,12,000
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे ?
❶ पद्मभूषण
❷ भारतरत्न
❸ पद्मविभूषण
❹ परमवीर चक्र
भार भारतातील प्रसिद्ध 'सौर वेधशाळा' खालीलपैकी कोठे आहे ?
❶ कोडाईकनाल
❷ पुणे
❸ बेंगळुरू
❹ उटी
वाहनांमध्ये पर्यावरणपूरक इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'CNG' चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Common Natural Gas
❷ Compressed Natural Gas
❸ Central Nitrogen Gas
❹ Combined Nuclear Gas
'आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस' हा रोग प्रामुख्याने कोणत्या परजीवीमुळे होतो ?
❶ प्लाझमोडियम
❷ ट्रीपॅनोसोमा
❸ लेशमानिया
❹ एन्टामिबा
महाराष्ट्रात होमरूल चळवळ प्रामुख्याने कोणाच्या नेतृत्वाखाली चालवली गेली ?
❶ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ स्वातंत्र्यवीर सावरकर
❹ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
आपल्या अक्षाभोवती फिरताना पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते ?
❶ पूर्वेकडून पश्चिमेकडे
❷ पश्चिमेकडून पूर्वेकडे
❸ उत्तरेकडून दक्षिणेकडे
❹ दक्षिणेकडून उत्तरेकडे
मुघल राजवटीमध्ये कोणत्या मुघल बादशहाला त्याच्या अत्यंत साध्या व कठोर जीवनशैलीमुळे 'जिंदा पीर' म्हटले जात असे ?
❶ अकबर
❷ बाबर
❸ औरंगजेब
❹ शाहजहान
प्रकाशाचा वेग निर्वातामध्ये साधारण किती असतो ?
❶ 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद
❷ 3 × 10⁶ मीटर प्रति सेकंद
❸ 3 × 10⁴ मीटर प्रति सेकंद
❹ 3 × 10² मीटर प्रति सेकंद
संगणकाचा 'CPU' हा शब्द कशासाठी वापरला जातो ?
❶ Central Processing Unit
❷ Central Printing Unit
❸ Computer Primary Unit
❹ Central Program Utility
ओझोन थर मुख्यतः वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो ?
❶ क्षोभमंडल
❷ समतापमंडल
❸ मध्यमंडल
❹ आयनमंडल
भारतीय संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश कोणत्या भागात आहे ?
❶ भाग II
❷ भाग III
❸ भाग IV
❹ भाग VI
महाराष्ट्रातील पंचायत समिती कोणत्या स्तरावर कार्य करते ?
❶ गाव
❷ तालुका
❸ जिल्हा
❹ विभाग
महाराष्ट्रातील 'सिंहगड' किल्ल्याचे ऐतिहासिक नाव कोणते होते ?
❶ कोंढाणा
❷ तोरणा
❸ राजगड
❹ विशाळगड
महाराष्ट्रातील 'लोकमान्य टिळक' यांचे पूर्ण नाव काय होते ?
❶ गंगाधर बाळकृष्ण टिळक
❷ बाळ गंगाधर टिळक
❸ केशव गंगाधर टिळक
❹ गंगाधर बाळकृष्ण टिळक
भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या किती भाषा आहेत ?
❶ 18
❷ 20
❸ 24
❹ 22
'मनोरथ' या शब्दाचा योग्य संधी-विग्रह कोणता ?
❶ मन + रथ
❷ मनः + रथ
❸ मनो + रथ
❹ मन् + रथ
'आईस्क्रीम थंड असते.' या वाक्यातील 'थंड' हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने काय आहे ?
❶ नाम
❷ विशेषण
❸ क्रियापद
❹ सर्वनाम
'वाघ' या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ?
❶ वाघीण
❷ वाघी
❸ वाघ्या
❹ वाघीन
'पर्वत' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
❶ शैल
❷ अचल
❸ गिरी
❹ सरिता
'आदर' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ प्रेम
❷ अनादर
❸ सन्मान
❹ दया
'हातभार लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?
❶ मदत करणे
❷ हात वर करणे
❸ वजन उचलणे
❹ टाळाटाळ करणे
'तो उद्या गावाला जाईल.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
❶ साधा वर्तमानकाळ
❷ साधा भूतकाळ
❸ साधा भविष्यकाळ
❹ चालू भविष्यकाळ
आईने बाळाला उचलले. या वाक्यातील 'बाळाला' या शब्दाची विभक्ती कोणती आहे ?
❶ तृतीया
❷ द्वितीया
❸ पंचमी
❹ सप्तमी
'दगडापेक्षा .....' ही म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा
❶ माती बरी
❷ वीट मऊ
❸ पाणी मऊ
❹ लोणी मऊ
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ औषध
❷ औषद
❸ औशध
❹ अवषध
AM, BN, CO, DP __________
❶ EP
❷ ER
❸ EQ
❹ FQ
पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा - 2, 8, 27, 64, 125 ?
❶ 2
❷ 8
❸ 27
❹ 64
जर BED = 4108, तर MED = ?
❶ 26104
❷ 1354
❸ 2658
❹ 26108
20 विद्यार्थ्यांच्या एका स्पर्धेत प्रत्येकाने दुसऱ्या प्रत्येक स्पर्धकाशी एक-एक बुद्धिबळाचा सामना खेळला, तर एकूण किती सामने खेळवले जातील ?
❶ 200
❷ 190
❸ 380
❹ 180
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 5, 11, 23, 47, ?
❶ 93
❷ 94
❸ 95
❹ 96
जर आज गुरुवार असेल, तर आजपासून 45 व्या दिवशी कोणता वार असेल ?
❶ रविवार
❷ शनिवार
❸ सोमवार
❹ मंगळवार
अनिल हा बबितापेक्षा उंच आहे, पण गितापेक्षा ठेंगू आहे. दिनेश हा अनिलपेक्षा उंच आहे पण गितापेक्षा ठेंगू आहे, तर सर्वात उंच कोण ?
❶ अनिल
❷ दिनेश
❸ बबिता
❹ गिता
एक व्यक्ती 1000 रुपये महिना कमी होतो त्यातील 4/5 भाग खर्च करतो तर त्याची बचत किती रुपये आहे ?
❶ 200 रुपये
❷ 250 रुपये
❸ 150 रुपये
❹ 300 रुपये
5² × 5³ = ?
❶ 625
❷ 15625
❸ 3125
❹ 125
एका आयताची लांबी 24 मी आहे जर आयताचे क्षेत्रफळ 480 चौ.मीटर आहे तर आयताची रुंदी किती ?
❶ 18 मी
❷ 22 मी
❸ 25 मी
❹ 20 मी
340 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी 3 हा अंक किती वेळा वापरावा लागेल ?
❶ 110 वेळा
❷ 115 वेळा
❸ 120 वेळा
❹ 105 वेळा
70 ÷ 70 × 70 = ?
❶ 70
❷ 1
❸ 4900
❹ 0
एका वस्तूची छापील किंमत 800 रुपये आहे. ती वस्तू 15% सूट देऊन विकल्यावर दुकानदाराला 20 रुपये तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये ?
❶ 680
❷ 700
❸ 720
❹ 660
दसादशे 10% दराने 6000 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल ?
❶ 1200
❷ 1320
❸ 1260
❹ 1440
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

