Bhandara District Kotwal Bharti Question Paper | भंडारा जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
भंडारा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ नागपूर
❷ गोंदिया
❸ चंद्रपूर
❹ यापैकी नाही
भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ वर्धा
❷ कन्हान
❸ वैनगंगा
❹ बावनथडी
भंडारा जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ भनारा
❷ वैरागढ
❸ नंदीग्राम
❹ चंदा
भंडारा जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी करण्यात आली ?
❶ गडचिरोली
❷ गोंदिया
❸ वाशिम
❹ हिंगोली
'तलावांचा जिल्हा' म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?
❶ ठाणे
❷ भंडारा
❸ सातारा
❹ कोल्हापूर
भंडारा जिल्ह्यावर कोणत्या राजघराण्याचे प्रदीर्घ काळ राज्य होते ?
❶ सातवाहन
❷ मोगल
❸ गोंड राजे
❹ निजाम
भंडारा जिल्ह्यातील 'पवनी' हे प्राचीन शहर कोणत्या धर्माच्या स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे ?
❶ जैन धर्म
❷ पारशी धर्म
❸ शिख धर्म
❹ बौद्ध धर्म
भंडारा जिल्ह्यातील 'अंबागड किल्ला' कोणत्या तालुक्यात आहे ?
❶ पवनी
❷ तुमसर
❸ मोहाडी
❹ लाखनी
भंडारा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 3,895 चौ.किमी.
❷ 5,125 चौ.किमी.
❸ 4,087 चौ.किमी.
❹ 6,120 चौ.किमी.
भंडारा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?
❶ 3
❷ 5
❸ 7
❹ 4
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू कोण होते ?
❶ लोकमान्य टिळक
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ फिरोजशाह मेहता
❹ दादाभाई नौरोजी
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये खालीलपैकी कोठे सुरू झाला ?
❶ प्रवरानगर
❷ कोपरगाव
❸ बारामती
❹ वालचंदनगर
खालीलपैकी भारतामधील 'सात बेटांचे शहर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
❶ कोलकाता
❷ चेन्नई
❸ मुंबई
❹ कोची
पूर्वोत्तर भारतातील आसाम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
❶ गुवाहाटी
❷ दिसपूर
❸ शिलाँग
❹ इटानगर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संस्था म्हणजेच 'इंटरपोल' चे जागतिक मुख्यालय कोठे स्थित आहे ?
❶ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
❷ लंडन (इंग्लंड)
❸ लिऑन (फ्रान्स)
❹ न्यूयॉर्क (अमेरिका)
पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याची घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वाधिक असते ?
❶ 0°C
❷ 100°C
❸ 4°C
❹ -4°C
भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय' राबवून कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या 451 वर्षांच्या राजवटीतून मुक्त केला ?
❶ 1947
❷ 1950
❸ 1961
❹ 1971
महाराष्ट्राच्या विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या 'विधान परिषदेची' एकूण सदस्यसंख्या किती आहे ?
❶ 288
❷ 78
❸ 48
❹ 19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याच्या छत्रपतीपदावर खालीलपैकी कोण विराजमान झाले ?
❶ छत्रपती संभाजी महाराज
❷ छत्रपती राजाराम महाराज
❸ छत्रपती शाहू महाराज
❹ महाराणी ताराबाई
आकाशातील खगोलीय पिंडांचे निरीक्षण करण्यासाठी पहिल्यांदा 'दुर्बिणीचा' वैज्ञानिक वापर कोणी केला ?
❶ गॅलिलिओ गॅलीली
❷ हॅन्स लिपरशी
❸ सर आयझॅक न्यूटन
❹ निकोलस कोपर्निकस
भारतामध्ये परंपरेने आणि ऐतिहासिकदृष्ट्या कोणता खेळ 'राष्ट्रीय खेळ' म्हणून ओळखला जातो ?
❶ क्रिकेट
❷ कबड्डी
❸ फुटबॉल
❹ हॉकी
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची नवी दिल्लीतील बिर्ला हाउस येथे कोणत्या दिवशी हत्या झाली होती ?
❶ 15 ऑगस्ट 1947
❷ 30 जानेवारी 1948
❸ 23 मार्च 1931
❹ 2 ऑक्टोबर 1948
1857 च्या उठावाला पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्ययुद्ध मानणारा '1857 चे स्वातंत्र्यसमर' हा अजरामर ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ विनायक दामोदर सावरकर
❷ बाळ गंगाधर टिळक
❸ बिपिन चंद्र पाल
❹ दादाभाई नौरोजी
1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते ?
❶ सी. राजगोपालाचारी
❷ श्री प्रकाश
❸ डॉ. पी. व्ही. चेरियन
❹ अली यावर जंग
भारतीय राज्यघटनेनुसार 'शिक्षण' हा विषय सध्या कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
❶ केंद्र सूची
❷ राज्य सूची
❸ समवर्ती सूची
❹ उर्वरित/शेषाधिकार सूची
'खाई त्याला खवखवे' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?
❶ वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात धास्ती असते
❷ जास्त खाणाऱ्याचे पोट बिघडते
❸ उपकाराची जाणीव नसणे
❹ मनात नसताना काम करणे
मराठी वर्णमालेतील 'य, र, ल, व' या वर्णांना काय म्हणतात ?
❶ अर्धस्वर
❷ उष्मे
❸ महाप्राण
❹ अनुनासिके
'त्याने आज खूप परिश्रम केले.' या वाक्यातील 'परिश्रम' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ आळस
❷ कष्ट
❸ विश्रांती
❹ नशीब
'खरेदी-विक्री' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ इतरतर द्वंद्व समास
❷ वैकल्पिक द्वंद्व समास
❸ समाहार द्वंद्व समास
❹ तत्पुरुष समास
'कपिलाषष्ठीचा योग' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय होतो ?
❶ शुभ दिवस
❷ दुर्मिळ घटना
❸ अशुभ दिवस
❹ फुटके नशीब
'चिमणी घरटे बांधत आहे.' या वाक्यातील काळ कोणता आहे ?
❶ साधा वर्तमानकाळ
❷ चालू वर्तमानकाळ
❸ पूर्ण वर्तमानकाळ
❹ रीती वर्तमानकाळ
'कवि' या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ?
❶ कवयित्री
❷ कवीत्री
❸ कवियत्री
❹ कवीयत्री
'मला आता थोडे चालवते.' या वाक्यातील 'चालवते' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
❶ प्रयोजक क्रियापद
❷ अकर्मक क्रियापद
❸ शक्य क्रियापद
❹ भावकर्तृक क्रियापद
'कृतज्ञ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ दयाळू
❷ कृतघ्न
❸ नम्र
❹ उपकारी
वाक्यातील एखादा विचार अर्धवट राहिल्यास किंवा बोलता बोलता मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
❶ संयोगचिन्ह
❷ अपसारणचिन्ह
❸ अर्धविराम
❹ लोपचिन्ह
जर WATER ला 12345 आणि FIRE ला 6754 असे लिहिले, तर TEAR हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 3452
❷ 3425
❸ 3245
❹ 3524
जर 1 जानेवारी 2007 रोजी सोमवार होता, तर 31 डिसेंबर 2007 रोजी कोणता वार असेल ?
❶ सोमवार
❷ मंगळवार
❸ रविवार
❹ बुधवार
एका सांकेतिक भाषेत NEPAL = 48 , ENGLAND = 57 तर AMERICA = ?
❶ 48
❷ 52
❸ 50
❹ 54
जर डोळे म्हणजे पाय, पाय म्हणजे नाक, नाक म्हणजे कान, कान म्हणजे हात, तर ऐकण्यासाठी काय वापराल ?
❶ नाक
❷ कान
❸ पाय
❹ हात
MA, LB, KC, JD ___________
❶ IF
❷ IE
❸ HE
❹ JE
जर एका सांकेतिक भाषेत 'CLEAR' हा शब्द 'XOVZI' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'HEART' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ SVZIG
❷ SWZIG
❸ SVYIG
❹ TVZIG
'A + B' म्हणजे A हे B चे वडील आहेत; 'A - B' म्हणजे A ही B ची बहीण आहे; 'A × B' म्हणजे A हा B चा भाऊ आहे. तर 'P + Q × R - S' या समीकरणात P चे S शी काय नाते आहे ?
❶ भाऊ
❷ काका
❸ आजोबा
❹ वडील
पाच मित्र A, B, C, D आणि E एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. C हा A च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. B हा C च्या लगतच डावीकडे बसला आहे. D हा A आणि B यांच्यामध्ये बसला आहे. तर E च्या लगतच उजवीकडे कोण बसले आहे ?
❶ C
❷ D
❸ A
❹ B
अजयला 26 दिवसांची मजुरी 2860 रुपये मिळते तर त्याला 21 दिवसांची मजुरी किती मिळेल ?
❶ 2200 रुपये
❷ 2310 रुपये
❸ 2420 रुपये
❹ 2150 रुपये
एका दुकानदाराने एक सायकल 2400 रुपयांना खरेदी करून 20% नफ्याने विकली, तर सायकलची विक्री किंमत किती रुपये असेल ?
❶ 2880
❷ 2760
❸ 2920
❹ 2640
72 किमी/तास वेगाने धावणारी एक 150 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला किती सेकंदात ओलांडेल ?
❶ 7.5 सेकंद
❷ 8.5 सेकंद
❸ 6.5 सेकंद
❹ 9.0 सेकंद
एका आयताची लांबी 18 सेमी आणि रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल ?
❶ 196 चौ.सेमी
❷ 216 चौ.सेमी
❸ 240 चौ.सेमी
❹ 224 चौ.सेमी
एका संख्येला 24 ने भागल्यास भागाकार 15 आणि बाकी 7 येते. ती संख्या किती आहे ?
❶ 357
❷ 367
❸ 377
❹ 387
√1296 + √625 = किती ?
❶ 49
❷ 51
❸ 53
❹ 55
2⁵ × 2³ ÷ 2⁴ = किती ?
❶ 8
❷ 16
❸ 32
❹ 64
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
