Jalgaon District Kotwal Bharti Question Paper | जळगाव जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला ?
❶ नाडगाव
❷ वडगाव (बु)
❸ निमगाव
❹ अमळगाव
जळगाव जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ नाशिक
❷ अहिल्यानगर
❸ खानदेश
❹ छत्रपती संभाजी नगर
जळगाव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (जळगाव शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ तापी नदी
❷ गिरणा नदी
❸ वाघूर नदी
❹ अंजनी नदी
प्राचीन काळी जळगाव आणि आसपासच्या खानदेशाच्या प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जात असे ?
❶ ऋषिका
❷ कुंतल
❸ अश्मक
❹ विदर्भ
जळगाव जिल्ह्यातील कोणते ऐतिहासिक ठिकाण 'प्राचीन व्यापारी केंद्र' म्हणून प्रसिद्ध होते ?
❶ चाळीसगाव
❷ बहादरपूर
❸ जामनेर
❹ एरंडोल
जळगाव जिल्ह्यातील 'पाल' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे ?
❶ सातपुडा
❷ सह्याद्री
❸ विंध्य
❹ अरवली
1936 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी भरले होते ?
❶ पाचोरा
❷ फैजपूर
❸ भुसावळ
❹ चोपडा
जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ पुणे विभाग
❷ अमरावती विभाग
❸ नाशिक विभाग
❹ छत्रपती संभाजीनगर विभाग
जळगाव जिल्ह्यातील 'चांगदेव' येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ?
❶ तापी आणि गिरणा
❷ तापी आणि पूर्णा
❸ गिरणा आणि अंजनी
❹ तापी आणि पांझरा
जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 9450 चौ.किमी
❷ 11765 चौ.किमी
❸ 7500 चौ.किमी
❹ 12530 चौ.किमी
महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कधी झाली ?
❶ 26 जानेवारी 1950
❷ 1 मे 1960
❸ 1 मे 1962
❹ 2 ऑक्टोबर 1959
मानवी कान सर्वसाधारणपणे खालीलपैकी किती वारंवारितेपेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो ?
❶ 20 Hz
❷ 200 Hz
❸ 2000 Hz
❹ 20,000 Hz
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वार्षिक पर्जन्यमान नोंदवणारे 'आंबोली' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ कोल्हापूर
❷ रत्नागिरी
❸ रायगड
❹ सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
❶ चंद्रपूर
❷ गडचिरोली
❸ गोंदिया
❹ यवतमाळ
शेतीमधील 'बोंडअळी' हा उपद्रवी कीटक प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
❶ सोयाबीन
❷ ऊस
❸ कापूस
❹ तूर
'सिक्कीम' या राज्याची राजधानी कोणती आहे ?
❶ गंगटोक
❷ शिलाँग
❸ अगरतळा
❹ ऐझॉल
ॲल्युमिनियम हा धातू प्रामुख्याने कोणत्या खनिजापासून मिळवला जातो ?
❶ मॅग्नेटाईट
❷ बॉक्साईट
❸ हेमॅटाईट
❹ डोलोमाईट
खालीलपैकी कोणता पदार्थ घनरूपातून वितळताना (द्रव होताना) प्रसरण न पावता आकुंचन पावतो ?
❶ मेण
❷ तांबे
❸ बर्फ
❹ लोखंड
महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले 'मेळघाट व्याघ्र प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ नागपूर
❷ अमरावती
❸ चंद्रपूर
❹ यवतमाळ
ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व लाभलेल्या कोणत्या जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' असे म्हटले जाते ?
❶ नागपूर
❷ वर्धा
❸ बुलढाणा
❹ अकोला
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात करून त्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि ऐक्य कोणी जागृत केले ?
❶ गोपाळ गणेश आगरकर
❷ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
❸ स्वातंत्र्यवीर सावरकर
❹ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
भारतीय संघराज्याचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ?
❶ मुंबई
❷ कोलकाता
❸ नवी दिल्ली
❹ चेन्नई
अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावर झालेला ऐतिहासिक 'पुणे करार' कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला ?
❶ महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू
❸ महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
'एक ब्रास' म्हणजे किती घनमीटर असते ?
❶ सुमारे 1.50 घनमीटर
❷ सुमारे 2.83 घनमीटर
❸ सुमारे 3.75 घनमीटर
❹ सुमारे 4.20 घनमीटर
रोग आणि त्याच्या सूक्ष्मजीवाचा प्रकार दर्शवणारी चुकीची जोडी कोणती आहे ?
❶ फुफ्फुसदाह - विषाणू
❷ हिवताप - आदिजीव
❸ कुष्ठरोग - जिवाणू
❹ पोलिओ - विषाणू
खालीलपैकी 'संयुक्त व्यंजन' कोणते आहे ?
❶ क्ष
❷ क
❸ ख
❹ ग
'मुलांनी शांत बसावे.' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ कर्मणी प्रयोग
❸ भावे प्रयोग
❹ संकीर्ण प्रयोग
'पांढरा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल ?
❶ पांढरे
❷ पांढरी
❸ पांढरेपणा
❹ पांढऱ्या
'जमिनीवर राहणारे प्राणी' या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता ?
❶ जलचर
❷ खेचर
❸ उभयचर
❹ भूचर
'अंगाची लाही लाही होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?
❶ संताप होणे
❷ थंडी वाजणे
❸ आंघोळ करणे
❹ भूक लागणे
'हात' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
❶ कर
❷ हस्त
❸ बाहू
❹ नयन
'तो प्रामाणिक आहे म्हणून सर्वांना आवडतो.' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते अव्यय आहे ?
❶ केवलप्रयोगी अव्यय
❷ उभयान्वयी अव्यय
❸ शब्दयोगी अव्यय
❹ क्रियाविशेषण अव्यय
'पिकते तिथे .......' ही म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा
❶ मिळत नाही
❷ भाव नाही
❸ विकत नाही
❹ यापैकी नाही
'शत्रू' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ वैरी
❷ मित्र
❸ रिपू
❹ विरोधी
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ विहीर
❷ विहिर
❸ विहीरी
❹ विहिरि
एका सांकेतिक भाषेत 'TRAIN' हा शब्द 'USBJO' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'BUS' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ BVT
❷ CVT
❸ CWS
❹ DVT
ACE : 135 :: LOQ : ?
❶ 121417
❷ 111517
❸ 121516
❹ 121517
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 8, 12, 20, 32, 48, ?
❶ 68
❷ 64
❸ 66
❹ 72
जर एका सांकेतिक भाषेत 'MAN' हा शब्द 28 असा लिहिला, तर त्याच भाषेत 'BOY' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 40
❷ 44
❸ 42
❹ 38
52 विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रणीतचा क्रमांक खालून 19 वा आहे, तर वरून त्याचा क्रमांक कितवा असेल ?
❶ 33 वा
❷ 34 वा
❸ 35 वा
❹ 32 वा
एका महिलेकडे निर्देश करत विजय म्हणाला, "तिची आई ही माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे." तर त्या महिलेचे विजयशी काय नाते आहे ?
❶ मुलगी
❷ बहीण
❸ भाची
❹ सून
गणेश पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो घड्याळाच्या दिशेने 45 अंश वळतो आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंश वळतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ ईशान्य
❷ नैऋत्य
❸ वायव्य
❹ आग्नेय
जर '+' म्हणजे '÷', '-' म्हणजे '×', '×' म्हणजे '+', आणि '÷' म्हणजे '-' असेल, तर 36 + 6 - 3 × 5 ÷ 4 चे मूल्य काय होईल ?
❶ 17
❷ 18
❸ 19
❹ 21
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्याचा लसावी किती ?
❶ 240
❷ 260
❸ 280
❹ 320
4913 या घन संख्येचे घनमूळ किती ?
❶ 17
❷ 13
❸ 19
❹ 23
साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 gm ची एक पिशवी याप्रमाणे किती पिशव्या भरता येतील ?
❶ 32 पिशव्या
❷ 36 पिशव्या
❸ 30 पिशव्या
❹ 34 पिशव्या
72 मीटर लांबीचे कापड 9 ठिकाणी सारखे अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?
❶ 8 मीटर
❷ 7.2 मीटर
❸ 8.1 मीटर
❹ 6.8 मीटर
468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे ?
❶ 0.005
❷ 0.05
❸ 0.0005
❹ 50
12 आणि 30 चे तृतीय प्रमाण पद काढा ?
❶ 60
❷ 90
❸ 75
❹ 45
एका आयताची परिमिती 54 cm आहे व त्याची लांबी 15 cm आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 150 cm²
❷ 165 cm²
❸ 210 cm²
❹ 180 cm²
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
