पुणे जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Pune District General Knowledge Questions
पुणे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Pune District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर पुणे जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Pune District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
पुणे जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | यापैकी नाही
पुणे जिल्हा हा काळात कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नाही .
पुणे जिल्ह्याची निर्मिती ही थेट ब्रिटिश काळात प्रशासनिक सोयीसाठी करण्यात आली होती .
त्यामुळे तो एखाद्या दुसऱ्या जिल्ह्याचे विभाजन करून तयार झालेला जिल्हा नाही
पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (पुणे शहर) कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | मुळा व मुठा
पुणे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पुनवडी
पुणे हे शहर 18 व्या शतकात कोणत्या सत्तेचे अधिकृत सत्ताकेंद्र बनले होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पेशवा
पुणे जिल्ह्यातील 'शिवनेरी' किल्ला कोणत्या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
पुणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पुणे विभाग
पुणे जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 15,643 चौ.किमी
पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 5.1%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 2 ऱ्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | जुन्नर
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पुणे शहर
पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | इंदापूर
पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पुणे
पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 14
पुणे शहर, हवेली, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड
खालीलपैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | कर्जत
कर्जत हा तालुका अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात आहे
पुणे जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पश्चिम महाराष्ट्र
पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 5
पुणे जिल्ह्याला एकूण 5 (पाच) जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत
◾वायव्य - ठाणे | ◾उत्तर - अहिल्यानगर | ◾आग्नेय - सोलापूर | ◾दक्षिण - सातारा | ◾नैॠत्य - रायगड
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्याला लागून नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | नाशिक
पुणे जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | ठाणे
पुणे जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | हवेली
हवेली तालुका पूर्णपणे पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जुन्नर
पुणे जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | अहमदनगर
पुणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणती महत्त्वाची नदी आणि डोंगररांग नैसर्गिक सीमा तयार करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | नीरा नदी आणि महादेव डोंगररांग
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणती मोठी डोंगररांग आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सह्याद्री डोंगररांग
पुणे जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | इंदापूर
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता ऐतिहासिक घाट आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | बोर घाट
पुणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सातारा
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | रायगड
2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 94,29,408
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या पुणे जिल्ह्याची आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 8.3%
2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पुणे शहर
2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वेल्हा
पुणे जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 603
पुणे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 915
पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 86.15%
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 38.97%
पुणे जिल्ह्यातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 61.03%
पुणे जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 873
महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले पुणे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
