नंदुरबार जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Nandurbar District General Knowledge Questions
नंदुरबार जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Nandurbar District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Nandurbar District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धुळे
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली
सविस्तर माहिती :
1906 पूर्वी ब्रिटिश काळात उत्तर महाराष्ट्रात एकच मोठा खानदेश जिल्हा होता . ज्यामध्ये सध्याच्या धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या प्रदेशाचा समावेश होता .
इ.स. 1906 मध्ये प्रशासकीय सोयीसाठी खानदेश जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले : 1) पश्चिम खानदेश 2) पूर्व खानदेश
त्यापैकी पश्चिम खानदेश जिल्ह्याचे नाव “धुळे जिल्हा” करण्यात आले
तर पूर्व खानदेशाचे नाव “जळगाव जिल्हा” असे ठेवण्यात आले
1 जुलै 1998 धुळे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र नंदुरबार जिल्हा तयार करण्यात आला
नंदुरबार जिल्ह्याची अधिकृतपणे स्थापना कधी करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 जुलै 1998
नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मनोहर जोशी
नंदुरबार शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तापी नदी
नंदुरबार जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कृषिक
1942 च्या 'छोडो भारत' आंदोलनात नंदुरबार येथे कोणता शालेय विद्यार्थी हुतात्मा झाला ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शिरीष कुमार
नंदुरबार जिल्ह्यातील कोणते ठिकाण 'महाराष्ट्राचे नंदनवन' म्हणून ओळखले जाते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तोरणमाळ
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण 'महाराष्ट्राचे नंदनवन' म्हणून ओळखले जाते
◾ महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांना ओळखले जाते
नंदुरबार जिल्ह्यातील 'प्रकाशे' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तापी व गोमाई
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेले 'प्रकाशे' हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तापी आणि गोमाई नद्यांच्या संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे
हे ठिकाण महाराष्ट्रातील 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते, जिथे तापी नदीच्या काठावर केदारेश्वर मंदिर आणि संगमेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातपुडा
नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 69.38%
नंदुरबार जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5034 चौ.किमी
नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.6%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 26 व्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अक्राणी (धडगाव)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका अक्राणी (धडगाव) हा आहे . अक्राणी तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे 1282 चौरस किलोमीटर आहे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तळोदा
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शहादा
नंदुरबार जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नंदुरबार
नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाशिक
नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ६
नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी आणि नवापूर
खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शिरपूर (शिरपूर हा धुळे जिल्ह्यात आहे)
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नवापूर
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नवापूर
नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खानदेश
नंदुरबार जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1 नंदुरबार जिल्ह्याला महाराष्ट्रातील केवळ धुळे या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे. इतर दिशांना गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा आहेत
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धडगाव (अक्राणी)
नंदुरबार जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त स्पर्श करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गुजरात
नंदुरबार जिल्ह्याला पश्चिमेला आणि उत्तरेला गुजरात राज्याची सीमा सर्वाधिक लाभलेली आहे
नंदुरबार जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची किंवा राज्याची सीमा स्पर्श करत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वरीलपैकी एकही नाही
नंदुरबार हा जिल्हा सीमावर्ती असल्याने येथील सर्वच तालुक्यांना शेजारील राज्यांच्या किंवा जिल्ह्याच्या सीमा लागतात. उदा. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा यांना गुजरात/मध्य प्रदेशच्या सीमा लागतात, तर नंदुरबार आणि नवापूर तालुक्यांना धुळे जिल्हा किंवा गुजरातची सीमा स्पर्श करते
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मध्य प्रदेश
नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण आणि आग्नेय दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धुळे
नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम आणि वायव्य दिशेला कोणत्या राज्याची सीमा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गुजरात
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नर्मदा नदी नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे ५४ किमी वाहते, जी राज्याची नैसर्गिक सीमा तयार करते.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | अस्तंभा अस्तंभा हे सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाचे आणि जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे.
खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तापी नदी
2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 16,48,295
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या या जिल्ह्याची आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 1.47%
2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शहादा
2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | तळोदा
नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 277
नंदुरबार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 978
जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 64.38%
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 83.29%
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 16.71%
नंदुरबार जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 944
महत्त्वाची सुचना 🔊
या पेजवर दिलेले नंदुरबार जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे
विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे
Nandurbar District Important Gk Questions PDF Download
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
👉 PDF Download Link : Download Now
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
