धुळे जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Dhule District Gk Question in Marathi

धुळे जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Dhule District General Knowledge Questions

धुळे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Dhule District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर धुळे जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Dhule District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Dhule District Important Questions,Dhule District GK,dhule District MCQ, धुळे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,धुळे District General Knowledge,Exam Wise Keywords,Dhule District MCQ for MPSC,Dhule District Questions Police Bharti,Dhule District GK Talathi Exam,Dhule District ZP Exam Questions, धुळे जिल्हा सामान्य ज्ञान, धुळे जिल्हा प्रश्नोत्तरे, धुळे जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

धुळे जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ नाशिक

❷ जळगाव

❸ खानदेश

❹ नंदुरबार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | खानदेश
धुळे जिल्ह्याची निर्मिती खानदेश जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली सविस्तर माहिती :
1906 पूर्वी ब्रिटिश काळात उत्तर महाराष्ट्रात एकच मोठा खानदेश जिल्हा होता . ज्यामध्ये सध्याच्या धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या प्रदेशाचा समावेश होता .
इ.स. 1906 मध्ये प्रशासकीय सोयीसाठी खानदेश जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले : 1) पश्चिम खानदेश 2) पूर्व खानदेश
त्यापैकी पश्चिम खानदेश जिल्ह्याचे नाव “धुळे जिल्हा” करण्यात आले
तर पूर्व खानदेशाचे नाव “जळगाव जिल्हा” असे ठेवण्यात आले
1 जुलै 1998 धुळे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र नंदुरबार जिल्हा तयार करण्यात आला .
त्यामुळे धुळे जिल्ह्याची निर्मिती हि पूर्वीच्या खानदेश जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली आहे


Question : 2

धुळे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ तापी

❷ पांझरा

❸ गिरणा

❹ अरुणावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पांझरा
धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (धुळे शहर) पांझरा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे
पांझरा नदी ही तापी नदीची उपनदी आहे


Question : 3

धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ कृषक

❷ रसनगर

❸ खानदेश

❹ सेऊणदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रसनगर


Question : 4

धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?

❶ जळगाव

❷ नंदुरबार

❸ वाशिम

❹ पालघर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नंदुरबार


Question : 5

धुळे जिल्ह्याचे विभाजन कधी करण्यात आले ?

❶ 1 मे 1999

❷ 1 जुलै 1998

❸ 16 ऑगस्ट 1982

❹ 4 ऑक्टोबर 1990

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 जुलै 1998


Question : 6

'दुधा तुपाचा जिल्हा' म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

❶ पुणे

❷ सोलापूर

❸ धुळे

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धुळे


Question : 7

धुळे जिल्ह्यातील 'शिरपूर' कोणत्या जलसंधारण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे ?

❶ शिरपूर पॅटर्न

❷ पाझर तलाव

❸ विहीर पुनर्भरण

❹ ठिबक सिंचन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शिरपूर पॅटर्न


Question : 8

'राजवाडे संशोधन मंदिर' ही संस्था कोठे आहे ?

❶ पुणे

❷ धुळे

❸ नाशिक

❹ जळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धुळे


Question : 9

धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प आहे ?

❶ शिरपूर

❷ साक्री

❸ शिंदखेडा

❹ धुळे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | साक्री
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यातील ( ब्राह्मणवेल ) ता. साक्री येथे असून पारख ॲग्रो इंडस्ट्रीजने विकसित केला आहे


Question : 10

धुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'अनेर धरण' स्थित आहे ?

❶ साक्री

❷ शिरपूर

❸ शिंदखेडा

❹ पिंपळनेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शिरपूर
अनेर धरण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावाजवळ स्थित आहे . हे मातीचे धरण अनेर नदीवर बांधण्यात आले असून ते शिरपूर-चोपडा राज्य महामार्गाजवळ आहे


Question : 11

धुळे शहर कोणत्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे जंक्शन आहे ?

❶ NH 52 आणि NH 60

❷ NH 44 आणि NH 48

❸ NH 66 आणि NH 53

❹ NH 61 आणि NH 47

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | NH 52 आणि NH 60
धुळे शहर हे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग 52 (NH 52 - जुना क्रमांक 211) (सुरत-नागपूर मार्गे धुळे-सोलापूर) आणि राष्ट्रीय महामार्ग 60 (NH 60 - जुना क्रमांक 3) (मुंबई-आग्रा/दिल्ली) या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे महत्त्वाचे जंक्शन (छेदनबिंदू) आहे


Question : 12

धुळे जिल्ह्यातील 'लळिंग' किल्ला कोणत्या डोंगररांगेत येतो ?

❶ सातपुडा

❷ गाळणा डोंगर

❸ सह्याद्री

❹ अजिंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गाळणा डोंगर


Question : 13

धुळे जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे ?

❶ कातकरी

❷ भिल्ल

❸ कोलाम

❹ माडिया गोंड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भिल्ल


Question : 14

धुळे जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची किती मीटर आहे ?

❶ 100 - 200 मी

❷ 500 - 700 मी

❸ 180 - 215 मी

❹ 400 - 500 मी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 180 - 215 मी


Question : 15

धुळे जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 6250 चौ.किमी

❷ 7195 चौ.किमी

❸ 5400 चौ.किमी

❹ 8540 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 7195 चौ.किमी


Question : 16

धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 1.5%

❷ 2.3%

❸ 3.1%

❹ 4.5%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.3%


Question : 17

क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 10 व्या

❷ 18 व्या

❸ 21 व्या

❹ 28 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 21 व्या


Question : 18

क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ धुळे

❷ साक्री

❸ शिरपूर

❹ शिंदखेडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | साक्री


Question : 19

क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ शिंदखेडा

❷ शिरपूर

❸ धुळे

❹ साक्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शिंदखेडा


Question : 20

धुळे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ शिरपूर

❷ शिंदखेडा

❸ धुळे

❹ साक्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शिरपूर


Question : 21

धुळे जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

❶ शिरपूर

❷ शिंदखेडा

❸ धुळे

❹ साक्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | साक्री


Question : 22

धुळे जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ शिंदखेडा

❷ साक्री

❸ धुळे

❹ शिरपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धुळे


Question : 23

धुळे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ शिरपूर

❷ शिंदखेडा

❸ धुळे

❹ साक्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धुळे


Question : 24

धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ नाशिक

❹ अमरावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाशिक


Question : 25

धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 4
धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा


Question : 26

खालीलपैकी कोणता तालुका धुळे जिल्ह्यात येत नाही ?

❶ साक्री

❷ शिंदखेडा

❸ शहादा

❹ शिरपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शहादा शहादा हा तालुका नंदुरबार जिल्ह्यात येतो.


Question : 27

धुळे जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ मराठवाडा

❷ खानदेश

❸ विदर्भ

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खानदेश


Question : 28

धुळे जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 2

❷ 3

❸ 4

❹ 5

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3
धुळे जिल्ह्याला महाराष्ट्रातील - नंदुरबार, जळगाव, नाशिक या 3 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . तसेच उत्तरेला मध्य प्रदेश आणि पश्चिमेला गुजरात राज्याची सीमा लागते


Question : 29

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा धुळे जिल्ह्याला लागून नाही ?

❶ जळगाव

❷ नाशिक

❸ नंदुरबार

❹ बुलढाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | बुलढाणा


Question : 30

धुळे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ अहमदनगर

❷ नाशिक

❸ जळगाव

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक


Question : 31

धुळे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ पालघर

❷ ठाणे

❸ नंदुरबार

❹ सुरत (गुजरात)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नंदुरबार


Question : 32

धुळे जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ?

❶ बुलढाणा

❷ जळगाव

❸ औरंगाबाद

❹ वाशीम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जळगाव


Question : 33

धुळे जिल्ह्याच्या नैऋत्य दिशेला कोणते राज्य आहे ?

❶ कर्नाटक

❷ तेलंगणा

❸ गुजरात

❹ गोवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गुजरात


Question : 34

2011 च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 18,50,450

❷ 20,50,862

❸ 22,40,100

❹ 19,20,300

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 20,50,862


Question : 35

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या धुळे जिल्ह्याची आहे ?

❶ 1.83%

❷ 2.10%

❸ 2.50%

❹ 1.20%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.83%


Question : 36

2011 च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ साक्री

❷ शिरपूर

❸ धुळे

❹ शिंदखेडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धुळे


Question : 37

2011 च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ साक्री

❷ शिंदखेडा

❸ शिरपूर

❹ धुळे ग्रामीण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शिंदखेडा


Question : 38

धुळे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता (2011 नुसार) किती आहे ?

❶ 250

❷ 285

❸ 310

❹ 220

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 285


Question : 39

धुळे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 930

❷ 946

❸ 955

❹ 941

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 946


Question : 40

धुळे जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 70.5%

❷ 72.8%

❸ 75.2%

❹ 68.9%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 72.8%


Question : 41

2011 च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर असलेला तालुका कोणता ?

❶ धुळे

❷ शिरपूर

❸ शिंदखेडा

❹ साक्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | धुळे


Question : 42

2011 च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे ?

❶ साक्री

❷ शिरपूर

❸ शिंदखेडा

❹ धुळे ग्रामीण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | साक्री


Question : 43

धुळे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 65.21%

❷ 72.16%

❸ 75.15%

❹ 60.19%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 72.16%


Question : 44

धुळे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 27.84%

❷ 32.56%

❸ 20.45%

❹ 35.17%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 27.84%


Question : 45

धुळे जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 880

❷ 910

❸ 898

❹ 905

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 898



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले धुळे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील . हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Dhule District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी धुळे जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post