परभणी जिल्हा जनरल नॉलेज प्रश्न | सामान्य ज्ञान प्रश्न | Parbhani District Gk Question

परभणी जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Parbhani District General Knowledge Questions

परभणी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Parbhani District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर परभणी जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Parbhani District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Parbhani District Important Questions,Parbhani District GK, Parbhani District MCQ,परभणी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,परभणी District General Knowledge,Exam Wise Keywords,Parbhani District MCQ for MPSC,Parbhani District Questions Police Bharti,Parbhani District GK Talathi Exam,Parbhani District ZP Exam Questions,परभणी जिल्हा सामान्य ज्ञान,परभणी जिल्हा प्रश्नोत्तरे, परभणी जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

परभणी जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ औरंगाबाद

❷ नांदेड

❸ हिंगोली

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
परभणी जिल्ह्याची निर्मिती ही मुख्यत्वे जुन्या हैदराबाद राज्याचा भाग असलेल्या मराठवाड्यातील भूभागातून झाली असून, हा भाग निजाम राजवटीत 'पाथरी' आणि 'वासिमत' या सरकारांमध्ये (जिल्ह्यांचा पूर्ववर्ती प्रकार) विभागलेला होता
सविस्तर माहिती : 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले
त्यानंतर मराठवाडा भागाची प्रशासकीय पुनर्रचना करण्यात आली
1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार मराठवाडा भाग मुंबई राज्यात (नंतर महाराष्ट्र) समाविष्ट झाला .
त्या काळात परभणी हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात होता .
👉 त्यामुळे परभणी जिल्हा हा कोणत्याही एका जिल्ह्याच्या थेट विभाजनातून तयार झालेला नाही, तर तो हैदराबाद संस्थानातील प्रशासकीय रचनेतूनच स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात होता
अतिरिक्त माहिती :
1 मे 1999 मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्हा निर्माण करण्यात आला


Question : 2

परभणी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ गोदावरी

❷ दुधना

❸ पूर्णा

❹ कयाधू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गोदावरी


Question : 3

परभणी जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ प्रभावतीनगर

❷ प्रतिष्ठान

❸ धाराशिव

❹ चंपावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | प्रभावतीनगर


Question : 4

परभणी जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?

❶ जालना

❷ वाशिम

❸ हिंगोली

❹ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | हिंगोली


Question : 5

परभणी जिल्ह्याचे विभाजन कोणत्या साली करण्यात आले ?

❶ 10 मे 1960

❷ 1 मे 1999

❸ 15 ऑगस्ट 1947

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 मे 1999


Question : 6

'वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ' कोठे आहे ?

❶ अमरावती

❷ हिंगोली

❸ परभणी

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी


18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक सरकारने मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली . 2013 मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलले आणि त्याचे नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले

Question : 7

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?

❶ 17 मे 1975

❷ 18 मे 1972

❸ 19 मे 1956

❹ 20 मे 1960

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 18 मे 1972


Question : 8

संत जनाबाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले 'गंगाखेड' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ नाशिक

❷ परभणी

❸ वाशीम

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | परभणी


Question : 9

साईबाबा यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला ?

❶ पाथरी

❷ गंगाखेड

❸ जिंतूर

❹ सोनपेठ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पाथरी


Question : 10

परभणी जिल्ह्यातील 'नेमगिरी' हे प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ सेलु

❷ मानवत

❸ जिंतूर

❹ पालम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जिंतूर


Question : 11

परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

❶ जायकवाडी

❷ येलदरी

❸ सिद्धेश्वर

❹ इसापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | येलदरी
परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प "येलदरी जलविद्युत प्रकल्प" आहे
◾ नदी - पूर्णा
◾ तालुका - जिंतूर जिल्हा - परभणी


Question : 12

येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

❶ गोदावरी

❷ दुधना

❸ पूर्णा

❹ कयाधू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पूर्णा


Question : 13

परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ लातूर

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ नाशिक

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | छत्रपती संभाजीनगर


Question : 14

स्वातंत्र्यपूर्व काळात परभणी जिल्हा कोणत्या राजवटीचा भाग होता ?

❶ मराठा साम्राज्य

❷ निजाम संस्थान

❸ मुघल साम्राज्य

❹ आदिलशाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | निजाम संस्थान


Question : 15

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 133

❷ 105

❸ 170

❹ 156

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 105


Question : 16

परभणी जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती महत्त्वाची नदी वाहते ?

❶ भीमा

❷ गोदावरी

❸ वैनगंगा

❹ नर्मदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोदावरी


Question : 17

परभणी शहरातील प्रसिद्ध दर्गा कोणाची आहे ?

❶ हजरत बाबा

❷ हजरत शाह तुराबुल हक

❸ कादर अली शाह

❹ मलिक अंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हजरत शाह तुराबुल हक


Question : 18

परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे ?

❶ 4,525 चौ.किमी

❷ 6,250 चौ.किमी

❸ 8,240 चौ.किमी

❹ 5,300 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 6,250 चौ.किमी


Question : 19

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 1.05%

❷ 2.03%

❸ 3.05%

❹ 4.02%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.03%


Question : 20

क्षेत्रफळाच्या दृष्टीने परभणी जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 10 व्या

❷ 18 व्या

❸ 25 व्या

❹ 28 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 25 व्या


Question : 21

क्षेत्रफळाच्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ परभणी

❷ गंगाखेड

❸ जिंतूर

❹ सेलू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जिंतूर


Question : 22

क्षेत्रफळाच्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ पालम

❷ सोनपेठ

❸ मानवत

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सोनपेठ


Question : 23

परभणी जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ पूर्णा

❷ पालम

❸ जिंतूर

❹ गंगाखेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पूर्णा


Question : 24

परभणी जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

❶ पाथरी

❷ सेलू

❸ मानवत

❹ जिंतूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पाथरी


Question : 25

परभणी जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ गंगाखेड

❷ पालम

❸ सोनपेठ

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गंगाखेड


Question : 26

परभणी जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ सेलू

❷ जिंतूर

❸ परभणी

❹ मानवत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जिंतूर


Question : 27

परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ गंगाखेड

❷ परभणी

❸ सेलू

❹ जिंतूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | परभणी


Question : 28

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 126

❷ 105

❸ 170

❹ 133

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 170


Question : 29

परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ नाशिक

❷ पुणे

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | छत्रपती संभाजीनगर


Question : 30

परभणी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 7

❷ 8

❸ 9

❹ 10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 9


Question : 31

खालीलपैकी कोणता तालुका परभणी जिल्ह्यात येत नाही ?

❶ मानवत

❷ पालम

❸ सोनपेठ

❹ सेनगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | सेनगाव सेनगाव तालुका 👉 हिंगोली जिल्हा


Question : 32

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ पश्चिम महाराष्ट्र

❷ मराठवाडा

❸ विदर्भ

❹ खानदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मराठवाडा


Question : 33

परभणी जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5 परभणी जिल्ह्याला हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि जालना या 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात


Question : 34

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 60

❷ 95

❸ 54

❹ 81

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 95


Question : 35

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही ?

❶ जालना

❷ बुलढाणा

❸ लातूर

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बुलढाणा


Question : 36

परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ लातूर

❷ बीड

❸ नांदेड

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लातूर


Question : 37

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 60

❷ 95

❸ 54

❹ 72

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 60


Question : 38

परभणी जिल्ह्यातील कोणता तालुका इतर कोणत्याही जिल्ह्याला स्पर्श करत नाही ?

❶ परभणी

❷ मानवत

❸ पालम

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मानवत
परभणी जिल्ह्याच्या नकाशाचे निरीक्षण केल्यास असे दिसते की मानवत तालुका हा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात आहे . त्याच्या सभोवताली पाथरी, सेलू, परभणी, सोनपेठ, हे जिल्ह्यातीलच तालुके असल्याने त्याला इतर जिल्ह्यांची सीमा लागत नाही


Question : 39

परभणी जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ बुलढाणा

❷ वाशीम

❸ हिंगोली

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | हिंगोली


Question : 40

परभणी जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ लातूर

❷ धाराशिव

❸ बीड

❹ सोलापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लातूर


Question : 41

परभणी जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा सीमा सामायिक करतो ?

❶ बुलढाणा

❷ नांदेड

❸ जालना

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नांदेड


Question : 42

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 81

❷ 94

❸ 54

❹ 60

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 94


Question : 43

परभणी जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ जालना

❷ बीड

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बीड


Question : 44

परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर कोणती डोंगररांग पसरलेली आहे ?

❶ बालाघाट डोंगररांग

❷ सातपुडा डोंगररांग

❸ अजिंठा डोंगररांग

❹ सह्याद्री डोंगररांग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अजिंठा डोंगररांग


Question : 45

परभणी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून कोणती महत्त्वाची नदी वाहते ?

❶ गोदावरी

❷ पूर्णा

❸ मांजरा

❹ दुधना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गोदावरी


Question : 46

परभणी जिल्ह्याच्या वायव्य दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ बुलढाणा

❷ वाशीम

❸ जालना

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जालना


Question : 47

कोणती नदी परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहते ?

❶ तापी नदी

❷ पूर्णा नदी

❸ वर्धा नदी

❹ भीमा नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पूर्णा नदी


Question : 48

परभणी जिल्ह्याची आग्नेय सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे ?

❶ लातूर

❷ नांदेड

❸ धाराशिव

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नांदेड


Question : 49

परभणी जिल्ह्याचा बहुतांश भाग कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो ?

❶ कृष्णा नदीचे खोरे

❷ भीमा नदीचे खोरे

❸ तापी नदीचे खोरे

❹ गोदावरी नदीचे खोरे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गोदावरी नदीचे खोरे


Question : 50

2011 च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 15,20,400

❷ 18,36,086

❸ 20,12,500

❹ 17,40,200

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 18,36,086


Question : 51

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या परभणी जिल्ह्याची आहे ?

❶ 1.63%

❷ 2.10%

❸ 1.25%

❹ 0.95%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.63%


Question : 52

2011 च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ जिंतूर

❷ गंगाखेड

❸ परभणी

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी


Question : 53

2011 च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ पालम

❷ सोनपेठ

❸ मानवत

❹ सेलू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सोनपेठ


Question : 54

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 54

❷ 94

❸ 81

❹ 56

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 81


Question : 55

2011 च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?

❶ 210

❷ 295

❸ 280

❹ 310

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 295


Question : 56

परभणी जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 930

❷ 940

❸ 947

❹ 955

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 947


Question : 57

2011 च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण किती होते ?

❶ 70.5%

❷ 73.3%

❸ 75.2%

❹ 68.9%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 73.3%


Question : 58

परभणी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 65.2%

❷ 70.5%

❸ 68.98%

❹ 75.4%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 68.98%


Question : 59

परभणी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 25.5%

❷ 31.02%

❸ 35.4%

❹ 28.0%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 31.02%


Question : 60

परभणी जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 900

❷ 910

❸ 884

❹ 895

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 884


Question : 61

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात किती गावे आहेत ?

❶ 81

❷ 72

❸ 56

❹ 94

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 56



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले परभणी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Parbhani District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परभणी जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post