मुंबई शहर 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Mumbai City General Knowledge Questions
मुंबई शहर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Mumbai City District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर मुंबई शहर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Mumbai City District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
मुंबई शहर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | बृहन्मुंबई
मुंबई शहर जिल्ह्याची निर्मिती ही 'बृहन्मुंबई' या मूळ जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली .
1 ऑक्टोबर 1990 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन नवीन जिल्हे अस्तित्वात आले
मुंबई शहर जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1 ऑक्टोबर 1990
मुंबई शहर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मुंबापुरी
मुंबई हे शहर मूळ किती बेटांचा समूह होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 7
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मुंबई शहर
मुंबई शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | फोर्ट
'गेटवे ऑफ इंडिया' हे भारताचे प्रवेशद्वार मुंबईच्या कोणत्या भागात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुलाबा
'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' (CSMT) इमारतीची वास्तुकला कोणत्या शैलीतील आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | व्हिक्टोरियन गोथिक शैली
मुंबादेवी मंदिर, ज्यावरून शहराचे नाव पडले, ते कोणत्या भागात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | काळबादेवी
आशियातील सर्वात जुने शेअर बाजार (BSE) मुंबईत कोणत्या रस्त्यावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दलाल स्ट्रीट
मुंबईमधील प्रसिद्ध 'हाजी अली दर्गा' कोणत्या ठिकाणी समुद्रात स्थित आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वरळी
कोणाच्या स्वागतासाठी 'गेटवे ऑफ इंडिया' बांधण्यात आले होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | राजा जॉर्ज V
1661 मध्ये ब्रिटनचा राजा चार्ल्स II याला मुंबई बेट कोणाकडून हुंडा म्हणून मिळाले होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पोर्तुगीज
महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा) मुंबईतील कोणत्या भागात स्थित आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नरिमन पॉईंट
'छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम
मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 157 चौ.किमी
मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 0.05%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 36 व्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात लहान म्हणजेच शेवटच्या (36 व्या) क्रमांकावर येतो .
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ फक्त 157 चौरस किमी आहे
मुंबई शहर जिल्ह्याच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कुलाबा
मुंबई शहर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोकण
मुंबई शहर जिल्ह्याला एकूण किती कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 80 किमी
मुंबई शहर जिल्ह्याला एकूण 80 कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर (बृहन्मुंबई) या दोन्ही जिल्ह्यांची एकत्रित किनारपट्टी विचारात घेतल्यास, मुंबईला सुमारे 114 कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे
महाराष्ट्राला एकूण 720 कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे
मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 0
मुंबई शहर हा पूर्णपणे नागरी जिल्हा असल्याने येथे ग्रामीण भागासारखी तालुका रचना अस्तित्वात नाही
प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे विभाग पाडलेले आहेत
खालीलपैकी कोणता भाग मुंबई शहर जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | कुर्ला
कुर्ला हा भाग मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो
मुंबई शहर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कोकण
मुंबई शहर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1
मुंबई शहर जिल्ह्याला जमिनीवरून केवळ मुंबई उपनगर या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे . इतर तिन्ही बाजूंनी हा जिल्हा अरबी समुद्राने वेढलेला आहे
मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्हा यांना कोणती खाडी वेगळी करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | माहीमची खाडी
2011 च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 30,85,411
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्याची आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.7%
मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 19,652
मुंबई शहर जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 89.21%
मुंबई शहर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 832
महत्त्वाची सुचना 🔊
या पेजवर दिलेले मुंबई शहर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे
विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे
Mumbai City District Important Gk Questions PDF Download
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
👉 PDF Download Link : Download Now
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
