लातूर जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Latur District Gk Question in Marathi

लातूर जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Latur District General Knowledge Questions

लातूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Latur District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर लातूर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Latur District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

latur District Important Questions,latur District GK,latur District MCQ, लातूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,latur District General Knowledge,Exam Wise Keywords,latur District MCQ for MPSC,latur District Questions Police Bharti,latur District GK Talathi Exam,latur District ZP Exam Questions, लातूर जिल्हा सामान्य ज्ञान,latur जिल्हा प्रश्नोत्तरे, लातूर जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ बीड

❷ नांदेड

❸ धाराशिव

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | धाराशिव
लातूर जिल्ह्याची निर्मिती उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली .
१६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला


Question : 2

लातूर जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?

❶ 15 ऑगस्ट 1947

❷ 16 ऑगस्ट 1982

❸ 1 मे 1960

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 16 ऑगस्ट 1982


Question : 3

लातूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ मांजरा

❷ तावरजा

❸ तेरणा

❹ घरणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मांजरा


Question : 4

लातूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते असे मानले जाते ?

❶ लत्तालूर

❷ हस्तिनापूर

❸ कुरिग्राम

❹ चंपावतीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लत्तालूर


Question : 5

लातूर जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ १८°०५' उत्तर ते १९°१५' उत्तर अक्षांश

❷ १७°०५' उत्तर ते १७°५२' उत्तर अक्षांश

❸ १९°०५' उत्तर ते १९°५२' उत्तर अक्षांश

❹ १६°०५' उत्तर ते १६°५२' उत्तर अक्षांश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | १८°०५' उत्तर ते १९°१५' उत्तर अक्षांश


Question : 6

लातूर जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ ७५°१८' पूर्व ते ७७°१२' पूर्व रेखांश

❷ ७३°१८' पूर्व ते ७५°१२' पूर्व रेखांश

❸ ७६°२५' पूर्व ते ७७°३५' पूर्व रेखांश

❹ ७४°१८' पूर्व ते ७६°१२' पूर्व रेखांश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ७६°२५' पूर्व ते ७७°३५' पूर्व रेखांश


Question : 7

लातूर जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ १०० किमी

❷ १२० किमी

❸ ११२ किमी

❹ १६० किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ११२ किमी


Question : 8

लातूर जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

❶ ९० किमी

❷ ११३ किमी

❸ १३० किमी

❹ १५० किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ११३ किमी


Question : 9

लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ ६,१५७ चौ. किमी

❷ ७,१५७ चौ. किमी

❸ ८,१५७ चौ. किमी

❹ ९,१५७ चौ. किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ७,१५७ चौ. किमी
लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ७,१५७ चौरस किलोमीटर आहे .
हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा प्रदेशात स्थित असून, तो १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला


Question : 10

लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ १.३३%

❷ २.४०%

❸ ३.३३%

❹ ४.३३%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | २.४०%


Question : 11

लातूर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ १० व्या

❷ १५ व्या

❸ १६ व्या

❹ २२ व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | २२ व्या
लातूर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात २२ व्या क्रमांकावर येतो .
मराठवाडा विभागातील या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7157 चौरस किमी आहे .
16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला


Question : 12

क्षेत्रफळाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ अहमदपूर

❷ उदगीर

❸ लातूर

❹ औसा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | औसा


Question : 13

क्षेत्रफळाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ रेणापूर

❷ शिरूर अनंतपाळ

❸ देवणी

❹ जळकोट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शिरूर अनंतपाळ


Question : 14

लातूर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ उदगीर

❷ जळकोट

❸ देवणी

❹ अहमदपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | उदगीर


Question : 15

लातूर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

❶ लातूर

❷ रेणापूर

❸ औसा

❹ चाकूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लातूर


Question : 16

लातूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ निलंगा

❷ देवणी

❸ शिरूर अनंतपाळ

❹ औसा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | निलंगा


Question : 17

लातूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ अहमदपूर

❷ जळकोट

❸ चाकूर

❹ रेणापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अहमदपूर


Question : 18

लातूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ नाशिक

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद) हा महाराष्ट्र राज्यातील 6 प्रशासकीय विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग आहे .
क्षेत्रफळानुसार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग असून, यात 8 जिल्हे आणि सर्वाधिक 76 तहसीलांचा समावेश आहे .
या विभागाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे
◾सामाविष्ट जिल्हे - औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव


Question : 19

लातूर येथील प्रसिद्ध 'खरोसा लेणी' कोणत्या तालुक्यात आहेत ?

❶ लातूर

❷ उदगीर

❸ औसा

❹ रेणापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | औसा
खरोसा लेणी (Kharosa Caves) महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात, लातूर शहरापासून सुमारे ४५ किमी अंतरावर स्थित प्राचीन लेणी समूह आहेत .
◾ ६ व्या ते ९ व्या शतकातील (गुप्त काळ) या १२ लेण्या जांभ्या दगडात कोरल्या असून, शिव-पार्वती, नरसिंह, आणि बुद्ध मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत .
हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनासाठी (रेणुका देवी मंदिर जवळ) महत्त्वाचे आहे


Question : 20

ऐतिहासिक 'उदगीरचा किल्ला' कोणत्या दोन सत्तांमधील लढाईसाठी प्रसिद्ध आहे ?

❶ मराठा आणि निजाम

❷ मराठा आणि मुघल

❸ निजाम आणि आदिलशाह

❹ इंग्रज आणि मराठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मराठा आणि निजाम
उदगीरचा किल्ला हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक प्राचीन भुईकोट किल्ला असून तो १२ व्या शतकात बांधला गेला आहे .
सदाशिवराव भाऊ (मराठे) आणि निजाम यांच्यातील १७६० च्या ऐतिहासिक युद्धासाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे .
या किल्ल्याभोवती 40 फूट खोल खंदक असून आतमध्ये काही महाल आणि उदयगिरी महाराजांची समाधी आहे
◾ उदगीरची लढाई : १७६० मध्ये सदाशिवराव भाऊंनी या ठिकाणी निजामाचा पराभव केला आणि येथेच 'उदगीरचा तह' झाला


Question : 21

लातूर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ?

❶ गुजरात

❷ मध्य प्रदेश

❸ तेलंगणा

❹ कर्नाटक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | कर्नाटक


Question : 22

लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'सिद्धेश्वर रत्नेश्‍वर' मंदिर आहे ?

❶ लातूर शहर

❷ रेणापूर

❸ अंधोरी

❹ शिरूर अनंतपाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लातूर शहर


Question : 23

'लातूर पॅटर्न' हा शब्दप्रयोग कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

❶ शेती

❷ शिक्षण

❸ उद्योग

❹ आरोग्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शिक्षण


Question : 24

लातूर जिल्ह्यातील 'रेणापूर' हे ठिकाण कोणत्या देवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ रेणुका माता

❷ खंडोबा

❸ गजानन महाराज

❹ विठ्ठल रुक्मिणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | रेणुका माता


Question : 25

30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यात झालेला भीषण भूकंप कोणत्या नावाने ओळखला जातो ?

❶ औसा भूकंप

❷ किल्लारी भूकंप

❸ उदगीर भूकंप

❹ निलंगा भूकंप

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | किल्लारी भूकंप


Question : 26

ऐतिहासिक काळात लातूर कोणत्या घराण्याची राजधानी असल्याचे मानले जाते ?

❶ राष्ट्रकूट

❷ सातवाहन

❸ वाकाटक

❹ यादव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | राष्ट्रकूट


Question : 27

लातूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ उदगीर

❷ लातूर

❸ अहमदपूर

❹ निलंगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | लातूर


Question : 28

लातूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 14

❷ 10

❸ 12

❹ 13

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 10


Question : 29

खालीलपैकी कोणता तालुका लातूर जिल्ह्यात येत नाही ?

❶ जळकोट

❷ चाकूर

❸ शिरूर अनंतपाळ

❹ कळंब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | कळंब
कळंब हा तालुका धाराशिव जिल्ह्यात आहे


Question : 30

लातूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ मराठवाडा

❸ खानदेश

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मराठवाडा


Question : 31

लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 3

❷ 4

❸ 5

❹ 6

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4
लातूर जिल्ह्याला बीड, धाराशिव, नांदेड, परभणी या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात .
याशिवाय आग्नेय दिशेला कर्नाटक राज्याची सीमा लागते


Question : 32

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लातूर जिल्ह्याला लागून नाही ?

❶ बीड

❷ सोलापूर

❸ नांदेड

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सोलापूर
सोलापूर जिल्ह्याची सीमा लातूरला स्पर्श करत नाही, मध्ये धाराशिव जिल्ह्याचा भाग येतो


Question : 33

लातूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ नांदेड

❷ बीड

❸ परभणी

❹ धाराशिव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी


Question : 34

लातूर जिल्ह्यातील असे कोणते तालुके आहेत ज्यांना इतर कोणत्याही जिल्ह्याची किंवा राज्याची सीमा स्पर्श करत नाही ?

❶ रेणापूर व जळकोट

❷ लातूर व उदगीर

❸ चाकूर व शिरूर अनंतपाळ

❹ औसा व निलंगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 |
लातूर जिल्ह्याच्या नकाशाचे निरीक्षण केल्यास असे दिसते की - चाकूर व शिरुर अनंतपाळ हे दोन्ही तालुके जिल्ह्याच्या अंतर्गत भागात आहेत .
त्यांच्या सभोवताली जिल्ह्याचेच इतर तालुके असल्याने त्याला इतर जिल्ह्यांच्या सीमा लागत नाहीत


Question : 35

लातूर जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

❶ धाराशिव

❷ परभणी

❸ नांदेड

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | परभणी


Question : 36

लातूर आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरून प्रामुख्याने कोणती नदी वाहते ?

❶ गोदावरी

❷ मांजरा

❸ कृष्णा

❹ भीमा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मांजरा


Question : 37

लातूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर प्रामुख्याने कोणती डोंगररांग पसरलेली आहे ?

❶ सह्याद्री डोंगररांग

❷ सातपुडा डोंगररांग

❸ बालाघाट डोंगररांग

❹ अजिंठा डोंगररांग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बालाघाट डोंगररांग


Question : 38

लातूर जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवर कर्नाटक राज्यातील कोणता जिल्हा आहे ?

❶ बेळगाव

❷ विजापूर

❸ बीदर

❹ गुलबर्गा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीदर


Question : 39

लातूर जिल्ह्याची रचना पाहता, जिल्ह्याचा बहुतांश भाग कोणत्या पठारावर वसलेला आहे ?

❶ मांजरा पठार

❷ कास पठार

❸ सासवड पठार

❹ बालाघाट पठार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | बालाघाट पठार


Question : 40

2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 22,45,200

❷ 24,54,196

❸ 20,10,500

❹ 26,30,800

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 24,54,196
2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 24,54,196 इतकी होती .
◾ राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे - ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक
लक्षात ठेवा - 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा झाला आहे, ज्यामुळे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या कमी झाली .
2014 नंतर क्रम - पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक
◾ राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे - सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली


Question : 41

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या लातूर जिल्ह्याची आहे ?

❶ 2.18%

❷ 1.15%

❸ 3.23%

❹ 2.50%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 2.18%
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 2.18 टक्के ( ) लोकसंख्या लातूर जिल्ह्याची आहे .
लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 24,54,196 इतकी असून, ती राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या (सुमारे 11,23,72,972 कोटी) 2.18 टक्के आहे


Question : 42

2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ उदगीर

❷ अहमदपूर

❸ लातूर

❹ निलंगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | लातूर


Question : 43

2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ जळकोट

❷ देवणी

❸ शिरूर अनंतपाळ

❹ रेणापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शिरूर अनंतपाळ


Question : 44

2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे ?

❶ 310

❷ 343

❸ 285

❹ 362

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 343


Question : 45

लातूर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 920

❷ 928

❸ 935

❹ 945

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 928


Question : 46

लातूर जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 75.4%

❷ 77.26%

❸ 80.5%

❹ 72.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 77.26%


Question : 47

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 65.4%

❷ 70.2%

❸ 74.53%

❹ 80.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 74.53%


Question : 48

लातूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 25.47%

❷ 30.5%

❸ 35.2%

❹ 20.4%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 25.47%


Question : 49

लातूर जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 880

❷ 910

❸ 889

❹ 870

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 889



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले लातूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post