छत्रपती संभाजीनगर जिल्हा जनरल नॉलेज प्रश्न | Sambhajinagar District Gk Question in Marathi

छत्रपती संभाजीनगर जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Chhatrapati Sambhajinagar District General Knowledge Questions

छत्रपती संभाजीनगर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न ( Sambhajinagar District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Chhatrapati Sambhajinagar District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Chhatrapati Sambhajinagar District Important Questions,Chhatrapati Sambhajinagar District GK,Chhatrapati Sambhajinagar District MCQ,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Chhatrapati Sambhajinagar District General Knowledge,Exam Wise Keywords,Chhatrapati Sambhajinagar District MCQ for MPSC,Chhatrapati Sambhajinagar District Questions Police Bharti,Chhatrapati Sambhajinagar District GK Talathi Exam,Chhatrapati Sambhajinagar District ZP Exam Questions,छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य ज्ञान,छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रश्नोत्तरे,छत्रपती संभाजीनगर जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न

1 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली ?

❶ जालना

❷ अहमदनगर

❸ नाशिक

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | यापैकी नाही
छत्रपती संभाजीनगर जिल्हा (औरंगाबाद जिल्हा) हा इतर कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नाही . 1 मे 1981 रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
🔹 छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा निजाम राजवटीपासून अस्तित्वात होता
🔹 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर तो मुंबई राज्यात समाविष्ट झाला . आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर तो महाराष्ट्रातील स्वतंत्र जिल्हा म्हणून कायम राहिला . त्यामुळे हा एक 'मूळ' जिल्हा मानला जातो ज्यातून पुढे नवीन जिल्हे तयार झाले


2 ) छत्रपती संभाजी नगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्याची पुनर्रचना कधी झाली ?

❶ 1 मे 1960

❷ 1 मे 1981

❸ 15 ऑगस्ट 1947

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1 मे 1981
छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्याची पुनर्रचना 1 मे 1981 रोजी झाली . औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला
◾या विभाजनापूर्वी जालना हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका आणि महत्त्वाची व्यापारी पेठ होती


3 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (संभाजीनगर शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ गोदावरी

❷ खाम

❸ पूर्णा

❹ तापी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | खाम


4 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते ?

❶ खुलदाबाद

❷ खडकी

❸ त्रिकंटक

❹ सिंदखेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | खडकी


5 ) कोणत्या मुघल सम्राटाने फतेहनगर शहराचे नाव बदलून औरंगाबाद केले होते ?

❶ औरंगजेब

❷ अकबर

❸ शहाजहान

❹ जहांगीर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | औरंगजेब


6 ) निजामशाही काळात मलिक अंबरने औरंगाबाद या शहराची स्थापना कोणत्या नावाने केली होती ?

❶ फत्तेपूर

❷ खडकी

❸ पैठण

❹ दौलताबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | खडकी


7 ) खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे ?

❶ पुणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ कोल्हापूर

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | छत्रपती संभाजीनगर


8 ) खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ?

❶ पुणे

❷ कोकण

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आहे .
या विभागात एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो, ज्यामुळे तो आकारमानाने आणि जिल्ह्यांच्या संख्येने राज्यातील सर्वात मोठा विभाग ठरतो .
◾औरंगाबाद प्रशासकीय विभागात समाविष्ट जिल्हे : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव
◾मुख्यालय : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
👉क्षेत्रफळानुसार हा विभाग सर्वात मोठा असून, कोकण विभाग सर्वात लहान आहे


9 ) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?

❶ 6

❷ 7

❸ 9

❹ 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 8


10 ) छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे या पूर्वीचे नाव काय होते ?

❶ उस्मानाबाद

❷ औरंगाबाद

❸ अहमदनगर

❹ भाग्यनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | औरंगाबाद


11 ) 'महाराष्ट्राची पर्यटन राजधानी' म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

❶ सिंधुदुर्ग

❷ नागपूर

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) या जिल्ह्याला ओळखले जाते
◾अजिंठा-वेरूळ लेणी आणि बीबी का मकबरा यांसारख्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांमुळे, ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे
🔹प्रमुख आकर्षणे : अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी (दौलताबाद) किल्ला
🔹वैशिष्ट्ये : हे शहर '52 दरवाजांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते


12 ) जगप्रसिद्ध 'बिबी का मकबरा' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ पुणे

❷ नागपूर

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ अहमदनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजीनगर


13 ) पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

❶ नाथसागर

❷ यशवंतसागर

❸ प्रीतीसंगम

❹ शिवसागर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | नाथसागर


14 ) अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे ?

❶ गोदावरी

❷ वाघूर

❸ तापी

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वाघूर


15 ) ऐतिहासिक 'दौलताबादचा किल्ला' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ नाशिक

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ रायगड

❹ जळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | छत्रपती संभाजीनगर


16 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक 'दौलताबाद' किल्ल्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ देवगिरी

❷ प्रतापगड

❸ पन्हाळा

❹ जंजीरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | देवगिरी


17 ) मराठवाडा हा भाग हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन महाराष्ट्रात कधी सामील झाला ?

❶ 15 ऑगस्ट 1947

❷ 17 सप्टेंबर 1948

❸ 1 मे 1960

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 17 सप्टेंबर 1948
17 सप्टेंबर 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील 'ऑपरेशन पोलो' अंतर्गत निजामाने शरणागती पत्करली आणि मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. आणि 1 मे 1960 रोजी नव्याने तयार झालेल्या महाराष्ट्र राज्यात सामील झाला .
त्यापूर्वी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा भाग भाषिक आधारावर मुंबई राज्यात सामील करण्यात आला होता
◾ या भागाच्या मुक्तीच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' साजरा केला जातो


18 ) कोणत्या सातवाहन राजाची राजधानी पैठण (प्रतिष्ठान) ही होती ?

❶ सिमुक

❷ गौतमीपुत्र सातकर्णी

❸ कान्हा

❹ हाल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गौतमीपुत्र सातकर्णी


19 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ 19° 18' उत्तर ते 20° 40' उत्तर

❷ 18° 18' उत्तर ते 19° 40' उत्तर

❸ 20° 18' उत्तर ते 21° 40' उत्तर

❹ 17° 18' उत्तर ते 18° 40' उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 19° 18' उत्तर ते 20° 40' उत्तर


20 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ 73° 40' पूर्व ते 74° 40' पूर्व

❷ 74° 40' पूर्व ते 76° 40' पूर्व

❸ 76° 40' पूर्व ते 78° 40' पूर्व

❹ 72° 40' पूर्व ते 73° 40' पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 74° 40' पूर्व ते 76° 40' पूर्व


21 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 140 किमी

❷ 120 किमी

❸ 172 किमी

❹ 201 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 201 किमी


22 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 201 किमी

❷ 161 किमी

❸ 80 किमी

❹ 120 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 161 किमी


23 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 10,137 चौ. किमी.

❷ 8,100 चौ. किमी.

❸ 11,100 चौ. किमी.

❹ 9,100 चौ. किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 10,137 चौ. किमी.


24 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 2.28 %

❷ 3.28 %

❸ 4.28 %

❹ 5.28 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 3.28 %


25 ) छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर आता येतो ?

❶ 8 व्या

❷ 11 व्या

❸ 13 व्या

❹ 9 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 13 व्या


26 ) क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ सिल्लोड

❷ वैजापूर

❸ कन्नड

❹ पैठण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | कन्नड


27 ) क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ सोयगाव

❷ खुलताबाद

❸ फुलंब्री

❹ पैठण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | खुलताबाद


28 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ सिल्लोड

❷ सोयगाव

❸ पैठण

❹ गंगापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | सिल्लोड


29 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ वैजापूर

❷ कन्नड

❸ गंगापूर

❹ खुलताबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | वैजापूर


30 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ गंगापूर

❷ पैठण

❸ वैजापूर

❹ छत्रपती संभाजी नगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पैठण


31 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ कन्नड

❷ सिल्लोड

❸ सोयगाव

❹ वैजापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सोयगाव


32 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ पैठण

❷ सिल्लोड

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ वैजापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजीनगर


33 ) छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ छत्रपती संभाजी नगर

❸ नाशिक

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | छत्रपती संभाजी नगर


34 ) छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ खानदेश

❸ मराठवाडा

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | मराठवाडा


35 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 8

❷ 9

❸ 10

❹ 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 9


36 ) खालीलपैकी कोणता तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत नाही ?

❶ सोयगाव

❷ फुलंब्री

❸ परतूर

❹ वैजापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | परतूर


37 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 5

❷ 6

❸ 4

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 6


38 ) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून नाही ?

❶ जळगाव

❷ नाशिक

❸ सोलापूर

❹ अहिल्यानगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सोलापूर


39 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ जालना

❷ बीड

❸ नाशिक

❹ जळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बीड


40 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ?

❶ सिल्लोड

❷ वैजापूर

❸ पैठण

❹ खुलताबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | खुलताबाद


41 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगररांग विस्तारलेली आहे ?

❶ सातपुडा

❷ सातमाळा-अजिंठा

❸ हरिश्चंद्र-बालाघाट

❹ शंभू-महादेव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सातमाळा-अजिंठा


42 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते ?

❶ तापी

❷ कृष्णा

❸ गोदावरी

❹ भीमा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | गोदावरी


43 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा नैसर्गिक सीमा म्हणून जोडलेला आहे ?

❶ बीड

❷ नाशिक

❸ जालना

❹ जळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जालना


44 ) कोणत्या नदीमुळे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांची सीमा विभागली गेली आहे ?

❶ प्रवरा

❷ गोदावरी

❸ सिना

❹ मुळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गोदावरी


45 ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ?

❶ जळगाव

❷ नाशिक

❸ धुळे

❹ नंदुरबार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | जळगाव


46 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 37,01,282

❷ 47,01,282

❸ 25,01,282

❹ 57,01,282

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 37,01,282


47 ) महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची आहे ?

❶ 4.16 %

❷ 3.02 %

❸ 1.29 %

❹ 2.15 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 3.02 %


48 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ सिल्लोड

❷ वैजापूर

❸ छत्रपती संभाजी नगर

❹ पैठण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजी नगर


49 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ खुलताबाद

❷ सोयगाव

❸ फुलंब्री

❹ कन्नड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सोयगाव


50 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) प्रति चौरस किमी किती आहे ?

❶ 256

❷ 456

❸ 366

❹ 566

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 366


51 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 933

❷ 923

❸ 943

❹ 929

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 923


52 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 79.02 %

❷ 82.02 %

❸ 75.02 %

❹ 85.02 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 79.02 %


53 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?

❶ 85.35 %

❷ 88.44 %

❸ 79.35 %

❹ 83.35 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 88.44 %


54 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 60.12 %

❷ 74.09 %

❸ 72.35 %

❹ 55.47 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 74.09 %


55 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर असलेला तालुका कोणता ?

❶ सिल्लोड

❷ पैठण

❸ छत्रपती संभाजी नगर

❹ गंगापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | छत्रपती संभाजी नगर


56 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे ?

❶ सोयगाव

❷ वैजापूर

❸ कन्नड

❹ खुलताबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | सोयगाव


57 ) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 45.36 %

❷ 68.05 %

❸ 65.36 %

❹ 75.36 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 68.05 %


58 ) 2011 च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 900

❷ 858

❸ 919

❹ 883

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 858



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले छत्रपती संभाजीनगर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Sambhajinagar District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर आधारित सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post