बुलढाणा जिल्हा जनरल नॉलेज प्रश्न-उत्तर | Buldhana District General Knowledge Questions
बुलढाणा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Buldhana District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Buldhana District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
बुलढाणा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 9661 चौ.किमी
बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.14%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 15 व्या
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील तापीच्या पूर्णा उपनदीच्या खोऱ्याला काय म्हटले जाते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पयान घाट
उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव क्षारयुक्त पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | लोणार
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खामगाव
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मलकापूर
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध 'लोणार सरोवर' कोणत्या प्रकारच्या आघाताने तयार झाले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | उल्कापात
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान 'सिंदखेड राजा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बुलढाणा
संत गजानन महाराज यांची समाधी असलेले 'शेगाव' हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बुलढाणा
बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अमरावती विभाग
१८ व्या शतकात बुलढाणा जिल्ह्याचा बहुतांश भाग कोणत्या सत्तेच्या अधिपत्याखाली होता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | निजाम
बुलढाणा जिल्हा प्रामुख्याने कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तापी व गोदावरी
बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बाला घाट
बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील 'शेगाव' हे ठिकाण कोणत्या संतांच्या वास्तव्यामुळे पावन झाले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | संत गजानन महाराज
बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 13
खालीलपैकी कोणता तालुका बुलढाणा जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | अकोट (अकोट हा अकोला जिल्ह्यात येतो)
बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | विदर्भ
बुलढाणा जिल्ह्यातील प्राचीन इतिहासाच्या संदर्भात कोणती दोन ठिकाणे महत्त्वाची मानली जातात ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लोणार व मेहेकर
सत् युगात 'लोणार सरोवर' कोणत्या नावाने ओळखला जात असे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बैरज तीर्थ
'बैरज तीर्थ' या नावाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या संदर्भात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पुराणे
बुलढाणा जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 6
बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, जळगाव आणि अमरावती या 6 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तसेच उत्तरेला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागते
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बुलढाणा जिल्ह्याला लागून नाही?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणत्या राज्याची सीमा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मध्य प्रदेश
बुलढाणा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | हिंगोली
दक्षिण-पूर्व भागात हिंगोली जिल्ह्याची सीमा बुलढाणा जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रमाणात स्पर्श करते
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर दिशेला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मध्य प्रदेश
बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जालना
बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व दिशेला खालीलपैकी कोणते दोन जिल्हे आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अकोला आणि वाशीम
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात कोणती महत्त्वाची डोंगररांग नैसर्गिक सीमा तयार करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातपुडा डोंगररांग
बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोणती डोंगररांग पसरलेली आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अजिंठा डोंगररांग
बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर प्रामुख्याने कोणते अभयारण्य आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | अंबाबरवा
2011 च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 25,86,258
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या बुलढाणा जिल्ह्याची आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 2.3%
2011 च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बुलढाणा
2011 च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | देऊळगाव राजा
बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 268
बुलढाणा जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 934
बुलढाणा जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 83.4%
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 79%
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 21%
बुलढाणा जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 855
महत्त्वाची सुचना 🔊
या पेजवर दिलेले बुलढाणा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे
विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे
Buldhana District Important Gk Questions PDF Download
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
👉 PDF Download Link : Download Now
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
