नाशिक जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Nashik District Gk Question in Marathi

नाशिक जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | District General Knowledge Questions

नाशिक जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Nashik District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर नाशिक जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Nashik District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Nashik District Important Questions,nashik District gk,nashik District MCQ, नाशिक जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,nashik District General Knowledge,Exam Wise Keywords,nashik District MCQ for MPSC, District Questions Police Bharti, nashik District GK Talathi Exam, Nashik District ZP Exam Questions, नाशिक नाशिक जिल्हा सामान्य ज्ञान, नाशिक जिल्हा प्रश्नोत्तरे, नाशिक जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

नाशिक जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ ठाणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ अहिल्यानगर

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही


Question : 2

नाशिक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ तापी

❷ गोदावरी

❸ गिरणा

❹ मुळा-मुठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोदावरी


Question : 3

नाशिक जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ पद्मनगर

❷ प्रतिष्ठान

❸ इंद्रप्रस्थ

❹ चंपावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पद्मनगर (इतर प्राचीन नावे: जनस्थान, त्रिकंटक)


Question : 4

नाशिक येथे दर किती वर्षांनी कुंभमेळा भरतो ?

❶ 6 वर्षे

❷ 10 वर्षे

❸ 12 वर्षे

❹ 8 वर्षे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 12 वर्षे


Question : 5

नाशिक जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची किती मीटर आहे ?

❶ 821 मीटर

❷ 565 मीटर

❸ 396 मीटर

❹ 762 मीटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 565 मीटर


Question : 6

नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र प्रामुख्याने किती प्रमुख खोऱ्यांमध्ये विभागले गेले आहे ?

❶ दोन

❷ तीन

❸ चार

❹ पाच

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तीन


Question : 7

नाशिक हे शहर कोणत्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे ?

❶ द्राक्षे

❷ संत्री

❸ कांदा

❹ डाळिंब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | द्राक्षे


Question : 8

नाशिक जिल्ह्याच्या कोणत्या भागाला 'दमणगंगेचे खोरे' असे म्हटले जाते ?

❶ पूर्व भाग

❷ दक्षिण भाग

❸ पश्चिम भाग

❹ उत्तर भाग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पश्चिम भाग


Question : 9

नाशिक जिल्ह्यातील 'लासलगाव' ही बाजारपेठ कशासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ तांदूळ

❷ सोयाबीन

❸ कांदा

❹ कापूस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कांदा


Question : 10

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान 'भगूर' नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ निफाड

❷ सिन्नर

❸ नांदगाव

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | नाशिक


Question : 11

नाशिक जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?

❶ महाराष्ट्राचे मँचेस्टर

❷ मुंबईची परसबाग

❸ भारताचे प्रवेशद्वार

❹ संत्र्यांचा जिल्हा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मुंबईची परसबाग


Question : 12

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर कोणती पर्वतमाला पसरलेली आहे ?

❶ सातपुडा

❷ सह्याद्री

❸ अरवली

❹ विंध्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सह्याद्री


Question : 13

नाशिक जिल्ह्यात 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' (YCMOU) कोठे आहे ?

❶ निफाड

❷ सिन्नर

❸ नाशिक शहर

❹ गंगापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाशिक शहर


Question : 14

'कळसुबाई' हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ?

❶ नाशिक व अहिल्यानगर

❷ नाशिक व पुणे

❸ नाशिक व ठाणे

❹ नाशिक व धुळे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नाशिक व अहिल्यानगर


Question : 15

'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ' (MUHS) चे मुख्यालय कोठे आहे ?

❶ पुणे

❷ मुंबई

❸ नाशिक

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाशिक


Question : 16

महाराष्ट्रात चलनी नोटा छापण्याचा कारखाना कोठे आहे ?

❶ ओझर

❷ नाशिक

❸ देवळाली

❹ येवला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक
महाराष्ट्रात चलनी नोटा छापण्याचा मुख्य कारखाना (Currency Note Press - CNP) नाशिक रोड (नाशिक) येथे आहे
◾ हा कारखाना सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(SPMCIL) च्या अंतर्गत येतो
◾ महत्त्वाची माहिती :
🔹स्थान : नाशिक रोड, महाराष्ट्र
🔹स्थापना : १९२८
महाराष्ट्रात नाशिकव्यतिरिक्त देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर येथे चलनी नोटा छापल्या जातात


Question : 17

'मिग' (MIG) विमानांचा कारखाना नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे ?

❶ ओझर

❷ सटाणा

❸ मालेगाव

❹ दिंडोरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | ओझर
मिग' (MiG) विमानांचा कारखाना महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील ओझर (Ozar) येथे आहे .
हे ठिकाण नाशिक शहरापासून सुमारे 24 किमी अंतरावर असून, येथे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा विमान विभाग कार्यरत आहे .
या कारखान्यात मिग विमानांची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती केली जाते


Question : 18

नाशिक जिल्ह्यातील 'येवला' हे शहर कोणत्या पारंपारिक वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ कांजीवरम साडी

❷ पैठणी साडी

❸ बनारसी शाल

❹ चंदेरी रेशीम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पैठणी साडी


Question : 19

येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती ऐतिहासिक घोषणा केली होती ?

❶ मीठ सत्याग्रह

❷ धर्मांतराची घोषणा

❸ छोडो भारत

❹ स्वदेशीचा नारा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धर्मांतराची घोषणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला (येवला मुक्तीभूमी) येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली .
"मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही," अशी गर्जना त्यांनी येवल्यातील मुक्तीभूमीवर केली होती .
त्यानंतर, सुमारे 20 वर्षांच्या अभ्यासानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला


Question : 20

नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता ?

❶ साने गुरुजी

❷ महात्मा गांधी

❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

❹ लोकमान्य टिळक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर


Question : 21

गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या पर्वतातून होतो ?

❶ ब्रह्मगिरी

❷ सातपुडा

❸ अरवली

❹ विंध्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | ब्रह्मगिरी (त्र्यंबकेश्वर जवळ)


Question : 22

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात 'सप्तशृंगी देवीचे' शक्तिपीठ आहे ?

❶ कळवण

❷ दिंडोरी

❸ नांदगाव

❹ चांदवड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कळवण
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात 'नांदुरी' या गावाजवळ आहे


Question : 23

नाशिक जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ 18° 33' उत्तर ते 20° 53' उत्तर

❷ 19° 35' उत्तर ते 20° 52' उत्तर

❸ 20° 10' उत्तर ते 21° 15' उत्तर

❹ 17° 50' उत्तर ते 19° 10' उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 18° 33' उत्तर ते 20° 53' उत्तर


Question : 24

नाशिक जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ 72° 15' पूर्व ते 73° 45' पूर्व

❷ 73° 16' पूर्व ते 75° 06' पूर्व

❸ 75° 10' पूर्व ते 76° 30' पूर्व

❹ 71° 50' पूर्व ते 72° 55' पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 73° 16' पूर्व ते 75° 06' पूर्व


Question : 25

नाशिक जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 120 किमी

❷ 150 किमी

❸ 200 किमी

❹ 100 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 200 किमी


Question : 26

नाशिक जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 230 किमी

❷ 110 किमी

❸ 160 किमी

❹ 120 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 120 किमी


Question : 27

नाशिक जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ १२,२१० चौ.किमी

❷ १५,५३० चौ.किमी

❸ १८,४८० चौ.किमी

❹ १०,५०० चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | १५,५३० चौ.किमी


Question : 28

नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ ३.५%

❷ ४.२%

❸ ५.४%

❹ ६.१%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ५.४%


Question : 29

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ २ ऱ्या

❷ ३ ऱ्या

❸ ४ थ्या

❹ ५ व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ३ ऱ्या


Question : 30

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ मालेगाव

❷ नांदगाव

❸ नाशिक

❹ दिंडोरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मालेगाव


Question : 31

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ देवळा

❷ पेठ

❸ निफाड

❹ त्र्यंबकेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पेठ


Question : 32

नाशिक जिल्ह्याचे किती महसूल विभाग आहेत ?

❶ 5

❷ 4

❸ 9

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 5


Question : 33

नाशिक जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ येवला

❷ नांदगाव

❸ मालेगाव

❹ चांदवड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नांदगाव


Question : 34

नाशिक जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

❶ त्र्यंबकेश्वर

❷ पेठ

❸ सुरगाणा

❹ वरीलपैकी सर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वरीलपैकी सर्व


Question : 35

नाशिक जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ सिन्नर

❷ इगतपुरी

❸ येवला

❹ निफाड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सिन्नर


Question : 36

नाशिक जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ कळवण

❷ सुरगाणा

❸ बागलाण

❹ मालेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बागलाण


Question : 37

नाशिक जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ मालेगाव

❷ सिन्नर

❸ नाशिक

❹ मनमाड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाशिक


Question : 38

नाशिक जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ नाशिक

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक


Question : 39

नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 12

❷ 13

❸ 15

❹ 18

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 15


Question : 40

खालीलपैकी कोणता तालुका नाशिक जिल्ह्यात येत नाही ?

❶ कळवण

❷ निफाड

❸ संगमनेर

❹ देवळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | संगमनेर संगमनेर तालुका 👉 अहिल्यानगर जिल्हा


Question : 41

नाशिक जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ पश्चिम महाराष्ट्र

❷ खानदेश

❸ कोकण

❹ मराठवाडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खानदेश


Question : 42

नाशिक जिल्हा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे ?

❶ NH - 48

❷ NH - 60

❸ NH - 19

❹ NH - 44

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | NH - 60
नाशिक जिल्हा प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग 60 (NH 60 - जुना क्र. 3 , 50) वर वसलेला आहे, जो मुंबई-आग्रा आणि पुणे-नाशिक या प्रमुख मार्गांना जोडतो


Question : 43

मध्य रेल्वेचा साधारण किती किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज मार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो ?

❶ १५० कि.मी.

❷ २२० कि.मी.

❸ २८७ कि.मी.

❹ ३५० कि.मी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | २८७ कि.मी.


Question : 44

नाशिक जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 6
नाशिक जिल्ह्याला धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे आणि पालघर या 6 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . याशिवाय पश्चिमेला गुजरात राज्याची सीमा लागते


Question : 45

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही ?

❶ ठाणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ पुणे

❹ धुळे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पुणे


Question : 46

नाशिक जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ जळगाव

❷ पालघर

❸ ठाणे

❹ धुळे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ठाणे


Question : 47

महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI) कोठे आहे ?

❶ नाशिक

❷ मुंबई

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नाशिक


Question : 48

नाशिक शहर कोणत्या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर स्थित आहे ?

❶ मुंबई-कलकत्ता व मुंबई-दिल्ली

❷ मुंबई-चेन्नई व मुंबई-बंगलोर

❸ मुंबई-गोवा व मुंबई-अहमदाबाद

❹ मुंबई-हैदराबाद व मुंबई-पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मुंबई-कलकत्ता व मुंबई-दिल्ली


Question : 49

नाशिक जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ धुळे

❷ जळगाव

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ ठाणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | धुळे


Question : 50

नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ?

❶ पुणे

❷ अहिल्यानगर

❸ सोलापूर

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अहिल्यानगर


Question : 51

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागते ?

❶ कर्नाटक

❷ तेलंगणा

❸ गुजरात

❹ मध्य प्रदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गुजरात


Question : 52

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ बुलढाणा

❷ जळगाव

❸ धाराशिव

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जळगाव


Question : 53

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कोणती प्रसिद्ध डोंगररांग आहे ?

❶ बालाघाट

❷ कळसूबाई

❸ अजिंठा

❹ सातमाळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कळसूबाई
येथे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई असून ते अकोले (अहिल्यानगर) आणि इगतपुरी (नाशिक) तालुक्यांच्या सीमेवर येते


Question : 54

नाशिक जिल्ह्याच्या नैऋत्य दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

❶ पालघर

❷ रायगड

❸ रत्नागिरी

❹ ठाणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | ठाणे


Question : 55

2011 च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 52,40,500

❷ 61,07,187

❸ 58,12,000

❹ 65,40,200

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 61,07,187


Question : 56

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या नाशिक जिल्ह्याची आहे ?

❶ 4.53%

❷ 6.21%

❸ 5.44%

❹ 3.89%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 5.44%


Question : 57

लोकसंख्येच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा राज्यात कितवा क्रमांक लागतो ?

❶ 4 था

❷ 6 वा

❸ 5 वा

❹ 3 रा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 4 था


Question : 58

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ मालेगाव

❷ नाशिक

❸ निफाड

❹ सिन्नर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक


Question : 59

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ पेठ

❷ सुरगाणा

❸ देवळा

❹ इगतपुरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पेठ


Question : 60

2011 च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे ?

❶ 350

❷ 393

❸ 410

❹ 320

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 393


Question : 61

नाशिक जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 920

❷ 934

❸ 945

❹ 910

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 934


Question : 62

2011 च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याचा साक्षरता दर किती टक्के आहे ?

❶ 78.51%

❷ 80.14%

❸ 82.31%

❹ 85.43%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 82.31%


Question : 63

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 55.45%

❷ 62.11%

❸ 57.48%

❹ 50.23%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 57.48%


Question : 64

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 42.52%

❷ 35.51%

❸ 48.23%

❹ 40.26%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 42.52%


Question : 65

नाशिक जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 900

❷ 880

❸ 890

❹ 910

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 890


Question : 66

नाशिक जिल्ह्यातील रेल्वेचे प्रमुख 'जंक्शन' स्थानक कोणते आहे ?

❶ इगतपुरी

❷ नाशिक रोड

❸ मनमाड

❹ निफाड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मनमाड



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले नाशिक जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Nashik District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नाशिक जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post