वाशिम जिल्हा जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) प्रश्न | Washim District Gk Questions

वाशिम  जिल्हा जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) प्रश्न | Washim District Gk Questions

पोलीस पाटील भरती - 2026 वाशिम जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच | Washim District Important Questions Answer

वाशिम जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Washim District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर वाशिम जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

washim District Important Questions,washim District GK, washim District MCQ, वाशिम जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,washim District General Knowledge,Exam Wise Keywords,washim District MCQ for MPSC,washim District Questions Police Bharti,washim District GK Talathi Exam,washim District ZP Exam Questions, वाशिम जिल्हा सामान्य ज्ञान, वाशिम जिल्हा प्रश्नोत्तरे, वाशिम जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

वाशीम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली ?

❶ अकोला

❷ अमरावती

❸ यवतमाळ

❹ बुलढाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अकोला


Question : 2

वाशीम जिल्ह्याची स्थापना कधी झाली ?

❶ 1 मे 1999

❷ 1 जुलै 1998

❸ 15 ऑगस्ट 1947

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 जुलै 1998


Question : 3

वाशीम शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते ?

❶ वैदर्भी

❷ वत्सगुल्म

❸ अमरावती

❹ प्रतिष्ठान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वत्सगुल्म


Question : 4

वत्सगुल्म ही कोणत्या प्राचीन राजघराण्याची राजधानी होती ?

❶ सातवाहन

❷ वाकाटक

❸ राष्ट्रकूट

❹ यादव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वाकाटक


Question : 5

वाकाटक घराण्याच्या कोणत्या शाखेची राजधानी वत्सगुल्म (वाशीम) येथे होती ?

❶ प्रवरपूरा शाखा

❷ कनिष्ठ शाखा

❸ वत्सगुल्म शाखा

❹ नंदिवर्धन शाखा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वत्सगुल्म शाखा


Question : 6

वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ नागपूर

❷ औरंगाबाद

❸ अमरावती

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अमरावती


Question : 7

वाशीम जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

❶ 5

❷ 6

❸ 7

❹ 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 6


Question : 8

खालीलपैकी कोणता तालुका वाशीम जिल्ह्यात येत नाही ?

❶ कारंजा

❷ मालेगाव

❸ रिसोड

❹ दारव्हा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | दारव्हा


Question : 9

वाशीममधील प्रसिद्ध 'पद्मतीर्थ' हे ठिकाण कोणत्या देवाला समर्पित आहे ?

❶ विठ्ठल-रुक्मिणी

❷ भगवान विष्णू

❸ भगवान शिव

❹ कमलजा देवी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भगवान विष्णू


Question : 10

कारंजा लाड हे ठिकाण कोणत्या संताचे जन्मस्थान मानले जाते ?

❶ संत तुकाराम

❷ श्री नृसिंह सरस्वती

❸ संत ज्ञानेश्वर

❹ संत गाडगे बाबा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | श्री नृसिंह सरस्वती


Question : 11

वाशीम जिल्ह्यातून वाहणारी महत्त्वाची नदी कोणती ?

❶ पैनगंगा

❷ तापी

❸ गोदावरी

❹ कृष्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पैनगंगा


Question : 12

वाकाटक राजा प्रवरसेन (दुसरा) याने 'सेतुबंध' हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला ?

❶ संस्कृत

❷ प्राकृत

❸ पाली

❹ अर्धमागधी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | प्राकृत


Question : 13

वाशीम येथील बालाजी मंदिराचे बांधकाम साधारणतः कोणत्या शतकात झाले ?

❶ 12 व्या

❷ 15 व्या

❸ 18 व्या

❹ 20 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 18 व्या
वाशिममधील बालाजी मंदिर हे शहरातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक आहे, जे 1779 मध्ये सबजी भोसले आणि जानोजी भोसले यांचे दिवाण म्हणून काम करणाऱ्या भवानी कालू यांनी बांधले होते


Question : 14

जिल्ह्याच्या सीमा निश्चित करताना वाशीमच्या पूर्वेस कोणता जिल्हा येतो ?

❶ बुलढाणा

❷ अकोला

❸ यवतमाळ

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | यवतमाळ


Question : 15

वाशीम जिल्ह्यातील 'लोणी' हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ सखाराम महाराज संस्थान

❷ औद्योगिक वसाहत

❸ थंड हवेचे ठिकाण

❹ भुईकोट किल्ला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सखाराम महाराज संस्थान
वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील 'लोणी' हे गाव प्रामुख्याने संत सखाराम महाराज यांच्या समाधीस्थान आणि तेथे भरणाऱ्या भव्य यात्रेसाठी (कार्तिक वद्य यात्रा) प्रसिद्ध आहे ‌. या गावाला 139 वर्षांची परंपरा असलेली अध्यात्मिक ओळख असून, येथे नाथ महाराज आणि ब्रह्मदेवाचे मंदिर देखील आहे


Question : 16

मुघल काळात वाशीम हे कोणत्या सुभ्याचा भाग होते ?

❶ खानदेश

❷ वऱ्हाड (बेरार)

❸ औरंगाबाद

❹ अहमदनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वऱ्हाड (बेरार)


Question : 17

वाशीम येथील प्राचीन 'मध्येश्वर मंदिर' हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ स्थापत्यकला

❷ हे पृथ्वीच्या मध्यावर असल्याचे मानले जाते

❸ सर्वात उंच शिखर

❹ सोन्याचा कळस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हे पृथ्वीच्या मध्यावर असल्याचे मानले जाते


Question : 18

1998 मध्ये वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?

❶ शरद पवार

❷ मनोहर जोशी

❸ विलासराव देशमुख

❹ सुशीलकुमार शिंदे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मनोहर जोशी


Question : 19

वाशीम जिल्ह्याचे भौगोलिक स्थान महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ?

❶ उत्तर महाराष्ट्र

❷ विदर्भ

❸ मराठवाडा

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | विदर्भ


Question : 20

वाशीम जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ 19.61° ते 21.16° उत्तर

❷ 18.50° ते 20.10° उत्तर

❸ 19.51° ते 21.15° उत्तर

❹ 20.10° ते 22.15° उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 19.61° ते 21.16° उत्तर


Question : 21

वाशीम जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ 76.50° ते 78.10° पूर्व

❷ 76.07° ते 77.14.° पूर्व

❸ 77.10° ते 79.20° पूर्व

❹ 75.30° ते 77.45° पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 76.07° ते 77.14.° पूर्व


Question : 22

वाशीम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किलोमीटर आहे ?

❶ 5150.32 चौ.किमी.

❷ 6500.11 चौ.किमी.

❸ 4800.15 चौ.किमी.

❹ 4901.19 चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 4901.19 चौ.किमी.


Question : 23

वाशीम जिल्ह्याने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचा सुमारे किती टक्के भाग व्यापला आहे ?

❶ 1.59 %

❷ 2.50 %

❸ 3.12 %

❹ 4.20 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.59 %


Question : 24

क्षेत्रफळाच्या दृष्टीने वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ मालेगाव

❷ कारंजा

❸ रिसोड

❹ वाशीम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मालेगाव
मालेगाव : सर्वात मोठा - अंदाजे (883.15) चौ. किमी


Question : 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने वाशीम जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ मानोरा

❷ मंगरुळपीर

❸ रिसोड

❹ मालेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मंगरुळपीर मंगरूळपीर : (अंदाजे 736.21 चौ. किमी)


Question : 26

वाशीम जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ यवतमाळ

❷ हिंगोली

❸ अकोला

❹ बुलढाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अकोला


Question : 27

वाशीम जिल्ह्याच्या दक्षिण सीमेला लागून कोणता जिल्हा आहे ?

❶ हिंगोली

❷ परभणी

❸ लातूर

❹ नांदेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | हिंगोली


Question : 28

वाशीम जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश आहे ?

❶ 5

❷ 6

❸ 7

❹ 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 6


Question : 29

वाशीम जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे किती आहे ?

❶ 50 किमी

❷ 80 किमी

❸ 102 किमी

❹ 120 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 102 किमी


Question : 30

वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आताे ?

❶ नागपूर

❷ औरंगाबाद

❸ अमरावती

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अमरावती


Question : 31

वाशीम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात 'ऋषी वटिका' प्रसिद्ध आहे ?

❶ कारंजा

❷ रिसोड

❸ वाशीम

❹ मानोरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रिसोड


Question : 32

वाशीम जिल्ह्याचे हवामान मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे आहे ?

❶ दमट

❷ विषम व कोरडे

❸ अतिशय थंड

❹ समशीतोष्ण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | विषम व कोरडे


Question : 33

वाशीम जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 22 व्या

❷ 27 व्या

❸ 31 व्या

❹ 29 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 31 व्या
वाशीम जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 4901 चौ.किमी असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या क्रमवारीत हा जिल्हा खालून (लहान जिल्ह्यांकडून) सहाव्या किंवा एकूण क्रमवारीत 31 व्या स्थानावर येतो


Question : 34

वाशीम जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ वाशीम

❷ कारंजा

❸ मानोरा

❹ मंगरुळपीर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मानोरा


Question : 35

वाशीम जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ रिसोड

❷ मालेगाव

❸ वाशीम

❹ कारंजा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | रिसोड


Question : 36

वाशीम जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ मानोरा

❷ रिसोड

❸ वाशीम

❹ मालेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वाशीम
वाशीम - वाशीम तालुक्याचा दक्षिण भाग हिंगोली जिल्ह्याला लागून आहे


Question : 37

वाशीम जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ कारंजा

❷ मंगरुळपीर

❸ मालेगाव

❹ रिसोड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कारंजा
कारंजा - कारंजा तालुक्याची सीमा अकोला आणि अमरावती जिल्ह्याला लागून आहे


Question : 38

वाशीम जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5
वाशीम जिल्ह्याला एकूण ५ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत . या जिल्ह्यांमध्ये पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो


Question : 39

वाशीम जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर नैसर्गिक सरहद्द म्हणून कोणते डोंगर आहेत ?

❶ सातपुडा रांगा

❷ अजिंठा-सातमाळा रांगा

❸ भामरागड डोंगर

❹ गरमसूर डोंगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अजिंठा-सातमाळा रांगा


Question : 40

वाशीम जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ?

❶ अमरावती

❷ वर्धा

❸ यवतमाळ

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | यवतमाळ


Question : 41

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वाशीम जिल्ह्याला लागत नाही ?

❶ अकोला

❷ अमरावती

❸ परभणी

❹ यवतमाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी


Question : 42

वाशीम जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान किती मिमी आहे ?

❶ 540 मिमी

❷ 900 मिमी

❸ 798 मिमी

❹ 437 मिमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 798 मिमी


Question : 43

वाशीम जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची आणि मुख्य नदी कोणती आहे ?

❶ तापी

❷ पैनगंगा

❸ काटेपूर्णा

❹ अरुणावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पैनगंगा


Question : 44

पैनगंगा नदीचा उगम वाशीम जिल्ह्याच्या सीमेजवळ कोणत्या डोंगररांगांमध्ये होतो ?

❶ सातपुडा

❷ अजिंठा

❸ बालाघाट

❹ सह्याद्री

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अजिंठा


Question : 45

वाशीम जिल्ह्यातील प्रसिद्ध 'एकबुर्जी' धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

❶ अडाण

❷ पूस

❸ चंद्रभागा

❹ निर्गुणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | चंद्रभागा
वाशीम जिल्ह्यातील प्रसिद्ध 'एकबुर्जी' धरण चंद्रभागा नदीवर बांधलेले आहे . हे धरण वाशीम शहराच्या जवळ (केकत उमरा , वाशिम) स्थित असून, वाशीम शहराची तहान भागवणारा एक मुख्य जलस्रोत आहे


Question : 46

'काटेपूर्णा' नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होतो ?

❶ मालेगाव

❷ वाशीम

❸ कारंजा

❹ रिसोड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वाशीम
काटेपूर्णा नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील वाशीम तालुक्यात, वाशिम जिल्ह्यातील काटा गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत (कंटकतीर्थ) होतो वाशिम तालुक्यातील काटा या गावी श्री शिवशक्ती मंदिराच्या जवळ ही नदी उगम पावते आणि तेथून अकोला जिल्ह्याच्या दिशेने वाहते


Question : 47

वाशीम जिल्ह्यातील 'अडाण' नदीवर असलेला अडाण जलसिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ मंगरुळपीर

❷ मानोरा

❸ कारंजा

❹ मालेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कारंजा
वाशीम जिल्ह्यातील 'अडाण' नदीवर असलेले अडाण धरण कारंजा (लाड) तालुक्यात आहे। हे धरण कारंजा शहराजवळील मानसी गावाजवळ असून, ते 1977 मध्ये पूर्ण झालेले मातीचे आणि दगडाचे धरण आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते


Question : 48

'सोनाला' धरण वाशीम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थित आहे ?

❶ रिसोड

❷ वाशीम

❸ मानोरा

❹ मालेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | मालेगाव
सोनल (किंवा सोनाला) धरण हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरजवळ, आरण/आडाण नदीवर (गोदावरी नदीची उपनदी) बांधलेले एक मातीचे धरण आहे, जे 1981 मध्ये आसपासच्या ग्रामीण भागांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बांधले


Question : 49

पैनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातून वाहताना पुढे कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते ?

❶ हिंगोली

❷ यवतमाळ

❸ नांदेड

❹ अकोला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | यवतमाळ


Question : 50

'बेंबळा' नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होतो ?

❶ कारंजा

❷ मालेगाव

❸ मानोरा

❹ वाशीम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कारंजा
बेंबला नदीचा उगम वाशीम जिल्ह्यात कारंजा लाड या शहरातून होतो . कापशी ही बेंबला नदीची उपनदी आहे



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले वाशिम जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post