Beed District Important Questions in Marathi | बीड जिल्हा MCQ प्रश्नोत्तरे

beed District Important Questions,beed District GK,beed District MCQ,बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,beed District General Knowledge,Exam Wise Keywords,beed District MCQ for MPSC,beed District Questions Police Bharti,beed District GK Talathi Exam,beed District ZP Exam Questions,बीड जिल्हा सामान्य ज्ञान,बीड जिल्हा प्रश्नोत्तरे,बीड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न

Beed District Important Questions Answer | बीड जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच - 03

बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Beed District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर बीड जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

beed District Important Questions,beed District GK,beed District MCQ,बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,beed District General Knowledge,Exam Wise Keywords,beed District MCQ for MPSC,beed District Questions Police Bharti,beed District GK Talathi Exam,beed District ZP Exam Questions,बीड जिल्हा सामान्य ज्ञान,बीड जिल्हा प्रश्नोत्तरे,बीड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 101

'अहमदनगर-बीड-परळी' या रेल्वे मार्गाची अंदाजे लांबी किती कि.मी आहे ?

❶ 100 किमी

❷ 261 किमी

❸ 580 किमी

❹ 152 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 261 किमी


Question : 102

बीड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होऊन पहिली ट्रायल ट्रेन कधी धावली ?

❶ 17 सप्टेंबर 2024

❷ 17 सप्टेंबर 2025

❸ 17 सप्टेंबर 2026

❹ 17 सप्टेंबर 2023

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 17 सप्टेंबर 2023


Question : 103

बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध 'कंकालेश्वर मंदिर' आहे ?

❶ परळी

❷ गेवराई

❸ बीड शहर

❹ अंबाजोगाई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीड शहर


Question : 104

बीड शहरातील ऐतिहासिक 'खजाना विहीर' कोणत्या सुभेदाराने बांधली होती ?

❶ सलाबत खान

❷ राजा भास्कर

❸ मुहम्मद बिन तुघलक

❹ राजा मुर्तुजा खान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सलाबत खान
बीड शहरातील ऐतिहासिक 'खजाना विहीर' किंवा बावडी निजामशाही काळातील जहागीरदार सलाबत खान याने 1572 मध्ये बांधली .
या विहिरीच्या उभारणीत 'राजा भास्कर' नावाच्या स्थापत्यशास्त्रज्ञाचा मुख्य वाटा होता .
निजामशाही काळात बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या विहिरीची निर्मिती करण्यात आली होती


Question : 105

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध 'परळी वैजनाथ' हे मंदिर कोणत्या देवाचे ज्योतिर्लिंग आहे ?

❶ विष्णू

❷ गणेश

❸ शिव

❹ विठ्ठल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शिव


Question : 106

बीड जिल्ह्यातील 'सौताडा' येथील धबधबा कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ आष्टी

❷ पाटोदा

❸ शिरूर कासार

❹ धारूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पाटोदा
सौताडा धबधबा बीड जिल्ह्यातील विंचरणा नदीवर पाटोदा तालुक्यातील सौताडा गावाजवळ आहे


Question : 107

'योगेश्वरी देवी'चे प्रसिद्ध मंदिर कोणत्या शहरात आहे ?

❶ बीड

❷ अंबाजोगाई

❸ परळी

❹ गेवराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अंबाजोगाई
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे .
हे क्षेत्र देवीचे मुळस्थान म्हणून ओळखले जाते.
देवीच्या शक्तीपिठापैकी हे मुळपीठ म्हणून प्रसिद्ध आहे


Question : 108

'कपिलधार' धबधबा बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ पाटोदा

❷ आष्टी

❸ बीड

❹ केज

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीड
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध 'कपिलधार' (कपिलधारा) धबधबा बीड तालुक्यात, मांजरसुंबा घाटाच्या सुरुवातीला स्थित आहे । हे ठिकाण बीड शहरापासून सुमारे 20-25 किलोमीटर अंतरावर असून, येथे मन्मथ स्वामींची संजीवन समाधी व निसर्गरम्य शिवलिंग मंदिर आहे, ज्याला बीडचे मिनी महाबळेश्वर मानले जाते


Question : 109

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी कितवे ज्योतिर्लिंग मानले, जाते ?

❶ पाचवे

❷ सातवे

❸ नववे

❹ दहावे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पाचवे
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 वे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, "वैद्यनाथ" (वैद्यांचा राजा) म्हणून ओळखले जाते


Question : 110

बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावातील ऐतिहासिक शिवमंदिराचे नाव काय आहे ?

❶ सोमेश्‍वर

❷ कंकालेश्‍वर

❸ पापणेश्‍वर

❹ निळकंठेश्‍वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कंकालेश्‍वर


Question : 111

'मराठी भाषेचे आद्यकवी' मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे ?

❶ अंबाजोगाई

❷ केज

❸ धारूर

❹ परळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अंबाजोगाई
मराठी भाषेचे आद्यकवी श्री.मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस 5 कि.मी अंतरावर आहे .
त्यांनी विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लिहला


Question : 112

बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'मन्मथ स्वामी' यांची समाधी असून तेथे मोठी यात्रा भरते ?

❶ सौताडा

❷ कपिलधार

❸ गहिनीनाथ गड

❹ सावरगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कपिलधार


Question : 113

'मराठी भाषेचे आद्यकवी' हा मान बीडमधील कोणत्या महान व्यक्तीला जातो ?

❶ श्री चक्रधर स्वामी

❷ मुकुंदराज

❸ संत तुकाराम महाराज

❹ दासोपंत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मुकुंदराज


Question : 114

'योगेश्वरी देवी'चे प्रसिद्ध मंदिर बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ माजलगाव

❷ अंबाजोगाई

❸ वडवणी

❹ शिरूर कासार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अंबाजोगाई


Question : 115

'गहिनीनाथ गड' हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे केंद्र कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ पाटोदा

❷ आष्टी

❸ शिरूर कासार

❹ गेवराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पाटोदा
गहिनीनाथ गड' हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे केंद्र बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात चिंचोली येथे वसलेले आहे.
हे नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि संत वामनभाऊ महाराज यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे


Question : 116

बीड जिल्ह्यातील 'नारायणगड' हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ शिरूर-कासार

❷ गेवराई

❸ वडवणी

❹ अंबेजोगाई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शिरूर-कासार
धाकली पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र संस्थान नारायणगड हे पौंडुळ गाव, शिरूर-कासार तालुका येथे असलेले विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची स्थापना श्री संत नारायणबाबा यांनी केली


Question : 117

अंबाजोगाई येथील 'खोलेश्वर मंदिर' कोणत्या ऐतिहासिक राजवटीच्या काळातील आहे ?

❶ मुघल

❷ यादव

❸ निजाम

❹ ब्रिटिश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | यादव
अंबाजोगाई येथील ऐतिहासिक 'खोलेश्वर मंदिर' (रामनारायण मंदिर) हे 13 व्या शतकातील असून, ते यादव राजवटीच्या काळातील आहे
हे मंदिर यादव राजा सिंघणदेवाचा सेनापती 'खोलेश्वर' याची मुलगी लक्ष्मी हिने उभारले असून, ते हेमाडपंथी शैलीचे उदाहरण आहे.


Question : 118

बीडमधील 'शहेनशाह वली दर्गा' कोणत्या ऐतिहासिक काळात बांधला गेला ?

❶ तुघलक काळ

❷ मुघल काळ

❸ बहमनी काळ

❹ निजाम काळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तुघलक काळ


Question : 119

परळी वैजनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ बीड

❷ बुलढाणा

❸ अमरावती

❹ नांदेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | बीड


Question : 120

'मराठी भाषेचे आद्यकवी' मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे ?

❶ बीड

❷ धारूर

❸ अंबाजोगाई

❹ माजलगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अंबाजोगाई


Question : 121

प्रसिद्ध 'कविराज' समाधी अंबाजोगाई येथे आहे, ते कोणाचे गुरु होते ?

❶ चक्रधर स्वामी

❷ दासोपंत

❸ मुकुंदराज

❹ नामदेव महाराज

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दासोपंत


Question : 122

'लोकनेते' म्हणून ओळखले जाणारे बीडमधील कोणते नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत ?

❶ विलासराव देशमुख

❷ गोपीनाथराव मुंडे

❸ आर. आर. पाटील

❹ जयदत्त क्षीरसागर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोपीनाथराव मुंडे


Question : 123

'एकनाथ महाराजांचे समकालीन आणि बीडमधील प्रसिद्ध संत ज्यांनी 'पासोडी' लिहिली, ते कोण ?

❶ संत नामदेव

❷ दासोपंत

❸ संत एकनाथ

❹ संत चोखामेळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दासोपंत
प्रसिद्ध 'पंचीकरण पासोडी' 16 व्या शतकातील संत-कवी दासोपंत यांनी लिहिली आहे. ही रचना अंबेजोगाईतील 'थोरल्या देवघर' येथे कापडावर (पासोडीवर) लिहून जतन करण्यात आली आहे.


Question : 124

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते ?

❶ बीड

❷ सातारा

❸ कोल्हापूर

❹ सांगली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | बीड


Question : 125

'खजाना विहीर' ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे ?

❶ लातूर

❷ नांदेड

❸ बीड

❹ धाराशिव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीड


Question : 126

'अंबाजोगाई'चे नाव बदलून निजाम काळात काय ठेवण्यात आले होते ?

❶ मोमिनाबाद

❷ फैजाबाद

❸ औरंगाबाद

❹ उस्मानाबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मोमिनाबाद


Question : 127

बीड मधील 'जामा मशीद' कोणाच्या काळात बांधली गेली ?

❶ अकबर

❷ औरंगजेब

❸ जहांगीर

❹ कुतुबशहा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जहांगीर
बीडमधील ऐतिहासिक 'जामा मशीद' मुघल बादशाह जहांगीर याच्या कारकिर्दीत, त्याचा अधिकारी जान सिपार खान याने 1627 मध्ये बांधली


Question : 128

'स्वामी रामानंद तीर्थ' यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद मुक्ती संग्रामात बीडच्या कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाने मोठे योगदान दिले ?

❶ बाबूजीराव कदम

❷ सुंदरराव सोळंके

❸ रामराव अवधूत

❹ वरील सर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वरील सर्व


Question : 129

बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेले 'शांतीवन' हे प्रकल्प कोणाचे आहे ?

❶ दीपक नागरगोजे

❷ प्रकाश आमटे

❸ अभय बंग

❹ अण्णा हजारे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | दीपक नागरगोजे
अनाथ, वंचित आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथे शांतीवन आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे


Question : 130

श्री मन्मथ स्वामी यांनी 1535 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी संजीवन समाधी बीड जिल्ह्यात कोठे घेतली ?

❶ अंबेजोगाई

❷ कपिलधारा

❸ मानुर

❹ परळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कपिलधारा


Question : 131

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बीड जिल्ह्यात कोणत्या मंदिराचा जिर्णोद्धार केला ?

❶ कंकालेश्वर

❷ परळी वैजनाथ

❸ अंबेजोगाई

❹ राक्षसभूवन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | परळी वैजनाथ
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 18 व्या शतकात परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराची भव्य पुनर्रचना केली



पुढील प्रश्नसंच - येथे क्लिक करा

महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post