रायगड जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Raigad District General Knowledge Questions
रायगड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Raigad District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर रायगड जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Raigad District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
रायगड जिल्ह्याची निर्मिती कोणत्या मूळ जिल्ह्याचे नामांतर करून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुलाबा
कुलाबा जिल्ह्याचे नामकरण 'रायगड' असे अधिकृतपणे कधी करण्यात आले ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | १ जानेवारी १९८१
१९८१ मध्ये जेव्हा कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून 'रायगड' करण्यात आले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ए. आर. अंतुले
रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (मुख्यालय) कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अलिबाग
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड कोणत्या वर्षी केली होती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1672
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड 1672 मध्ये केली होती, त्यानंतर 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला
रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय सध्या कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अलिबाग
महाड येथील 'चवदार तळे' सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केला होता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1927
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे 'चवदार तळे सत्याग्रह' झाला .
अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा ऐतिहासिक लढा उभारला गेला
रायगड जिल्ह्यातील 'कर्नाळा' हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पक्षी
रायगड जिल्ह्यात असलेल्या अष्टविनायकाच्या दोन स्थानांपैकी 'महड' येथे कोणता गणपती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | श्री वरदविनायक
रायगड जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 17° 51' उत्तर ते 19° 02' उत्तर
रायगड जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 72° 51' पूर्व ते 73° 40' पूर्व
रायगड जिल्ह्याची पूर्व-पश्चिम रुंदी (सरासरी) अंदाजे किती किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ७५ किमी
रायगड जिल्ह्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 122 किमी
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुलाबा
रायगड जिल्ह्याची दक्षिण-उत्तर लांबी अंदाजे किती किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | १६० किमी
रायगड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ७,१५२ चौ.किमी
रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.27%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 23 व्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | महाड
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | उरण
रायगड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कर्जत
रायगड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पोलादपूर
रायगड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पनवेल
रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अलिबाग
रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोकण
रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 15
अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, कर्जत, खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि उरण
खालीलपैकी कोणता तालुका रायगड जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | संगमेश्वर (हा तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो)
रायगड जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कोकण
रायगड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 5
◾ठाणे जिल्हा (उत्तर)
◾मुंबई उपनगर जिल्हा (वायव्य — खाडीमार्गे सीमा)
◾पुणे जिल्हा (पूर्व)
◾सातारा जिल्हा (आग्नेय)
◾रत्नागिरी जिल्हा (दक्षिण)
👉 मुंबई उपनगर जिल्ह्याची सीमा थेट जमिनीवर मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्याला स्पर्श करत नाही, परंतु ठाणे खाडी परिसरात प्रशासकीय सीमा स्पर्श करते . त्यामुळे अधिकृत जिल्हा नकाशानुसार ती सीमा मानली जाते
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रायगड जिल्ह्याला लागून नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोल्हापूर
रायगड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातारा
जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला सातारा जिल्ह्याची सीमा रायगडला (पोलादपूर तालुक्याला) इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रमाणात स्पर्श करते
रायगड जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा नैसर्गिक सीमा सामायिक करतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | रत्नागिरी
रायगड जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणती प्रमुख डोंगररांग पसरलेली आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सह्याद्री डोंगररांग
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती महत्त्वाची नदी वाहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सावित्री नदी
रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता ऐतिहासिक घाट आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बोर घाट
रायगड जिल्ह्याला ठाणे जिल्ह्यापासून विभक्त करणारी नदी कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | उल्हास नदी
2011 च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 26,34,200
2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पनवेल
महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले रायगड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
