सांगली जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Sangli District Gk Question in Marathi

सांगली जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Sangli District General Knowledge Questions

सांगली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Sangli District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर सांगली जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Sangli District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

sangli District Important Questions,sangali District GK, sangali District MCQ, सांगली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, Sangli District General Knowledge,Exam Wise Keywords,sangli District MCQ for MPSC, Sangli District Questions Police Bharti, Sangli District GK Talathi Exam, Sangli District ZP Exam Questions, सांगली जिल्हा सामान्य ज्ञान, सांगली जिल्हा प्रश्नोत्तरे, सांगली जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

सांगली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या मूळ जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ सातारा

❷ कोल्हापूर

❸ सोलापूर

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
👉 लक्षात ठेवा - सांगली जिल्हा हा कोणत्याही एका जिल्ह्याच्या थेट विभाजनातून तयार झालेला नाही ,तर माजी संस्थानांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला जिल्हा आहे सांगली जिल्ह्याची निर्मिती कशी झाली ?
◾15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली .
◾8 मार्च 1948 रोजी सांगली संस्थान अधिकृतपणे भारतीय संघराज्यात विलीन झाले ( स्वातंत्र्यापूर्वी सांगली संस्थानाचा भाग 'पटवर्धन' घराण्याच्या अंमलाखालील होता ‌)
◾1ऑगस्ट 1949 रोजी प्रशासकीय सोयीसाठी सातारा जिल्ह्यातील 4 तालुके व कर्नाटक सीमेलगतचे 2 तालुक्यांसह सांगली, मिरज, जत, कुरुंदवाड व औंध यांसारख्या विविध संस्थानिकांचे भाग एकत्र करून एक स्वतंत्र जिल्हा तयार करण्यात आला, ज्याचे नाव सुरुवातीला 'दक्षिण सातारा' असे ठेवण्यात आले . (त्याकाळी सध्याचा सातारा जिल्हा 'उत्तर सातारा' म्हणून ओळखला जात असे)
◾1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली . त्याच काळात जिल्ह्यांच्या नावांत सुसूत्रता आणण्यासाठी : 21 नोव्हेंबर 1960 रोजी -
🔹'उत्तर सातारा' जिल्ह्याचे नाव बदलून 'सातारा' करण्यात आले .
🔹'दक्षिण सातारा' जिल्ह्याचे नाव बदलून 'सांगली' करण्यात आले


Question : 2

सांगली जिल्ह्याची (तत्कालीन दक्षिण सातारा) स्थापना कधी करण्यात आली ?

❶ 1 ऑगस्ट 1949

❷ 1 मे 1960

❸ 15 ऑगस्ट 1947

❹ 1 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1 ऑगस्ट 1949


Question : 3

सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (सांगली शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ वारणा नदी

❷ कृष्णा नदी

❸ कोयना नदी

❹ येरळा नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कृष्णा नदी
सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (सांगली शहर) कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे
◾सांगली शहराच्या जवळच कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम हरिपूर येथे होतो .
◾सांगली शहर हे कृष्णा नदीच्या काठावरील महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे, जे आपल्या हळद व्यापार आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे


Question : 4

सांगली जिल्ह्याचे प्राचीन नाव किंवा या भागाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे ?

❶ कुंडल (कौंडिण्यपूर)

❷ अपरान्त

❸ शूर्पारक

❹ दक्षिण काशी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुंडल (कौंडिण्यपूर)


Question : 5

सांगली हे शहर १८ व्या शतकात कोणत्या प्रसिद्ध घराण्याची राजधानी होते ?

❶ भोसले

❷ पटवर्धन

❸ होळकर

❹ शिंदे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पटवर्धन


Question : 6

सांगली जिल्ह्यातील 'कुंडल' हे ठिकाण कोणत्या प्राचीन साम्राज्याची राजधानी होते असे मानले जाते ?

❶ सातवाहन

❷ चालुक्य

❸ यादव

❹ मुघल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | चालुक्य


Question : 7

१९४२ च्या चले जाव आंदोलनात सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'प्रति सरकार' (पत्री सरकार) ची स्थापना झाली होती ?

❶ सांगली

❷ मिरज

❸ कुंडल

❹ तासगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कुंडल


Question : 8

सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ कोकण विभाग

❷ पुणे विभाग

❸ नाशिक विभाग

❹ औरंगाबाद विभाग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पुणे विभाग


Question : 9

सांगली जिल्ह्यातील 'मिरज' हे शहर कशासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे ?

❶ कापड उद्योग

❷ वाद्य निर्मिती

❸ साखर कारखाना

❹ चित्रपट सृष्टी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वाद्य निर्मिती


Question : 10

सांगली जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ 15° 45' उत्तर ते 16° 30' उत्तर

❷ 16° 45' उत्तर ते 17° 33' उत्तर

❸ 18° 20' उत्तर ते 19° 10' उत्तर

❹ 19° 00' उत्तर ते 20° 00' उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 16° 45' उत्तर ते 17° 33' उत्तर


Question : 11

सांगली जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ 73° 42' पूर्व ते 75° 40' पूर्व

❷ 72° 10' पूर्व ते 73° 50' पूर्व

❸ 75° 30' पूर्व ते 77° 15' पूर्व

❹ 76° 00' पूर्व ते 78° 00' पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 73° 42' पूर्व ते 75° 40' पूर्व


Question : 12

सांगली जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 150 किमी

❷ 180 किमी

❸ 205 किमी

❹ 90 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 204 किमी


Question : 13

सांगली जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 50 किमी

❷ 96 किमी

❸ 120 किमी

❹ 150 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 96 किमी


Question : 14

सांगली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 6842 चौ.किमी

❷ 8572 चौ.किमी

❸ 5434 चौ.किमी

❹ 10230 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 8572 चौ.किमी


Question : 15

सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 1.5%

❷ 2.8%

❸ 3.5%

❹ 4.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.8%


Question : 16

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगली जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 10 व्या

❷ 18 व्या

❸ 16 व्या

❹ 30 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 16 व्या


Question : 17

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ मिरज

❷ जत

❸ खानापूर

❹ शिराळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जत


Question : 18

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ कडेगाव

❷ पलुस

❸ तासगाव

❹ कवठे महांकाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पलुस


Question : 19

सांगली जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ कवठे महांकाळ

❷ जत

❸ आटपाडी

❹ मिरज

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जत


Question : 20

सांगली जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

❶ वाळवा

❷ शिराळा

❸ कडेगाव

❹ मिरज

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | शिराळा


Question : 21

सांगली जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ जत

❷ मिरज

❸ तासगाव

❹ वाळवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मिरज


Question : 22

सांगली जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ आटपाडी

❷ कडेगाव

❸ खानापूर

❹ शिराळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | आटपाडी


Question : 23

सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ मिरज

❷ सांगली

❸ विटा

❹ इस्लामपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सांगली


Question : 24

सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ औरंगाबाद

❷ पुणे

❸ नाशिक

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पुणे


Question : 25

सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 8

❷ 10

❸ 11

❹ 12

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 10
मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, जत, वाळवा-इस्लामपूर, शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, पलूस आणि कडेगाव


Question : 26

खालीलपैकी कोणता तालुका सांगली जिल्ह्यात येत नाही ?

❶ जत

❷ कडेगाव

❸ पन्हाळा

❹ शिराळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पन्हाळा


Question : 27

सांगली जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ कोकण

❷ मराठवाडा

❸ पश्चिम महाराष्ट्र

❹ खानदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पश्चिम महाराष्ट्र


Question : 28

सांगली जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 3

❷ 4

❸ 5

❹ 6

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4
सांगली जिल्ह्याला सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . याशिवाय दक्षिणेला कर्नाटक राज्याची मोठी सीमा लागते


Question : 29

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सांगली जिल्ह्याला लागून नाही ?

❶ सातारा

❷ सोलापूर

❸ सिंधुदुर्ग

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सिंधुदुर्ग


Question : 30

सांगली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते?

❶ सोलापूर

❷ सातारा

❸ कोल्हापूर

❹ रत्नागिरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | रत्नागिरी
पश्चिमेकडील सह्याद्रीच्या रांगांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची सीमा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रमाणात स्पर्श करते


Question : 31

2011 च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 25,83,500

❷ 28,22,143

❸ 30,45,200

❹ 22,10,800

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 28,22,143


Question : 32

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे --------------- लोकसंख्या सांगली जिल्ह्याची आहे

❶ 2.51%

❷ 3.10%

❸ 1.85%

❹ 4.20%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 2.51%


Question : 33

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ तासगाव

❷ जट

❸ मिरज

❹ वाळवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मिरज
2011 च्या जनगणनेनुसार, सांगली जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका मिरज आहे .
◾मिरज तालुक्याची एकूण लोकसंख्या 8,54,581 इतकी होती .
(मिरज तालुक्यात मिरज शहर, सांगली शहर आणि कुपवाड परिसर यांचा समावेश होतो)
◾सांगली जिल्हा एकूण लोकसंख्या (2011) : सुमारे - 2822143


Question : 34

2011 च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ कडेगाव

❷ आटपाडी

❸ शिराळा

❹ पलूस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | आटपाडी
2011 च्या जनगणनेनुसार, सांगली जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आटपाडी आहे
◾आटपाडी तालुक्याची लोकसंख्या : 1,38,455


Question : 35

2011 च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे ?

❶ 300

❷ 329

❸ 350

❹ 285

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 329


Question : 36

सांगली जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 945

❷ 966

❸ 955

❹ 960

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 966


Question : 37

सांगली जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 75.2%

❷ 81.48%

❸ 85.6%

❹ 78.9%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 81.48%


Question : 38

सांगली जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 60.5%

❷ 74.5%

❸ 80.2%

❹ 65.0%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 74.5%


Question : 39

सांगली जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 25.49%

❷ 35.2%

❸ 20.4%

❹ 30.8%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 25.49%


Question : 40

सांगली जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर (Child Sex Ratio) किती आहे ?

❶ 900

❷ 867

❸ 885

❹ 910

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 867



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले सांगली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post