रत्नागिरी जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Ratnagiri District Gk Question in Marathi

रत्नागिरी जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Ratnagiri District General Knowledge Questions

रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Ratnagiri District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Ratnagiri District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Ratnagiri District Important Questions,Ratnagiri District GK,Ratnagiri District MCQ, रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Ratnagiri District General Knowledge,Exam Wise Keywords,Ratnagiri District MCQ for MPSC,Ratnagiri District Questions Police Bharti,Ratnagiri District GK Talathi Exam,Ratnagiri District ZP Exam Questions, रत्नागिरी जिल्हा सामान्य ज्ञान, रत्नागिरी जिल्हा प्रश्नोत्तरे, रत्नागिरी जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?

❶ रायगड

❷ सिंधुदुर्ग

❸ पालघर

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सिंधुदुर्ग
1 मे 1981 रोजी 'अब्दुल रहमान अंतुले' मुख्यमंत्री असताना रत्‍नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग तर त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली


Question : 2

रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (रत्नागिरी शहर) कोणत्या नदीच्या मुखाशी किंवा काठावर वसलेले आहे ?

❶ शास्त्री नदी

❷ काजळी नदी

❸ मुचकुंदी नदी

❹ वशिष्ठी नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | काजळी नदी


Question : 3

रत्नागिरीतील कोणते प्रसिद्ध ठिकाण ब्रह्मदेशाच्या 'थिबा राजा' च्या वास्तव्यासाठी आणि नजरकैदेसाठी ओळखले जाते ?

❶ गणपतीपुळे

❷ थिबा पॅलेस

❸ पूर्णगड

❹ रत्नदुर्ग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | थिबा पॅलेस


Question : 4

लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेला 'चिखली' हा गाव कोणत्या जिल्ह्यात येतो ?

❶ रायगड

❷ रत्नागिरी

❸ सिंधुदुर्ग

❹ ठाणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रत्नागिरी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे मूळ गाव चिखली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे


Question : 5

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

❶ कुंडलिका

❷ काळ

❸ सावित्री

❹ जगबुडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सावित्री


Question : 6

डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी असलेल्या काहीशा सपाट आणि पठारी भागाला काय म्हणतात ?

❶ खलाटी

❷ वलाटी

❸ देश

❹ मावळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वलाटी


Question : 7

वलाटीच्या पश्चिमेला असलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

❶ वलाटी

❷ पठार

❸ खलाटी

❹ घाटमाथा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | खलाटी


Question : 8

रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो ?

❶ बेसाल्ट

❷ ग्रॅनाइट

❸ जांभा

❹ चुनखडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जांभा


Question : 9

रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते खनिज पदार्थ मिळतात ?

❶ लोह आणि कोळसा

❷ बॉक्साइट, चिनी माती आणि सिलिका

❸ मॅग्नेशियम आणि लोह

❹ खनिज तेल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बॉक्साइट, चिनी माती आणि सिलिका


Question : 10

डोलोमाइट हे खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

❶ धुळे

❷ रत्नागिरी

❸ जालना

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रत्नागिरी


Question : 11

रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते ?

❶ वशिष्ठी

❷ सावित्री

❸ शास्त्री

❹ तेरेखोल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सावित्री


Question : 12

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

❶ कुंडलिका

❷ काळ

❸ शुक (वाघोटन)

❹ जगबुडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शुक (वाघोटन)


Question : 13

रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्र वनाखाली आहे ?

❶ 11.29 चौ. किमी.

❷ 49.61 चौ. किमी.

❸ 25.50 चौ. किमी.

❹ 60.12 चौ. किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 49.61 चौ. किमी.


Question : 14

रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र अरण्यांनी व्यापलेले आहे ?

❶ 1.50%

❷ 0.95%

❸ 1.22%

❹ 2.10%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 1.22%


Question : 15

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे ?

❶ गहू

❷ भात

❸ ज्वारी

❹ मका

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भात


Question : 16

रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते खनिज सापडत नाही ?

❶ मँगॅनीज

❷ क्रोमाइट

❸ इल्मेनाइट

❹ युरेनियम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | युरेनियम


Question : 17

रत्नागिरी जिल्ह्याला अंदाजे किती किमी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे ?

❶ 100 किमी.

❷ 150 किमी.

❸ 167 किमी.

❹ 200 किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 167 किमी.


Question : 18

मुंबई–कोकण–गोवा या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता आहे ?

❶ 48

❷ 66

❸ 212

❹ 44

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 66
मुंबई–कोकण–गोवा या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक राष्ट्रीय महामार्ग 66 (NH 66) आहे हा महामार्ग पूर्वी NH 17 या नावाने ओळखला जात असे, ज्याचे नंतर 66 असे नामकरण करण्यात आले . पनवेलपासून सुरू होऊन सिंधुदुर्ग, पणजी मार्गे कन्याकुमारीपर्यंत जाणारा हा रस्ता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे


Question : 19

चिनी मातीचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळतात ?

❶ रत्नागिरी

❷ बीड

❸ सोलापूर

❹ अकोला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | रत्नागिरी


Question : 20

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

❶ 7

❷ 8

❸ 9

❹ 10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 9
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर


Question : 21

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ?

❶ राष्ट्रीय महामार्ग 44

❷ राष्ट्रीय महामार्ग 48

❸ राष्ट्रीय महामार्ग 66

❹ राष्ट्रीय महामार्ग 50

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | राष्ट्रीय महामार्ग 66


Question : 22

चिपळूण-कराड मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे ?

❶ आंबा घाट

❷ कुंभार्ली घाट

❸ फोंडा घाट

❹ थळ घाट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कुंभार्ली घाट


Question : 23

रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो ?

❶ पुणे विभाग

❷ नाशिक विभाग

❸ कोकण विभाग

❹ कोल्हापूर विभाग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोकण विभाग


Question : 24

रत्नागिरी जिल्ह्यातील 'गणपतीपुळे' हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ लांजा

❷ रत्नागिरी

❸ संगमेश्वर

❹ गुहागर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रत्नागिरी


Question : 25

रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभली आहे ?

❶ बंगालचा उपसागर

❷ अरबी समुद्र

❸ हिंदी महासागर

❹ भूमध्य समुद्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अरबी समुद्र


Question : 26

कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

❶ रत्नागिरी आणि कोल्हापूर

❷ मुंबई आणि पुणे

❸ कराड आणि चिपळूण

❹ कोल्हापूर आणि पणजी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कराड आणि चिपळूण


Question : 27

रत्नागिरी जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी (सरासरी) किती किमी आहे ?

❶ 40 किमी

❷ 64 किमी

❸ 90 किमी

❹ 110 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 64 किमी


Question : 28

रत्नागिरी जिल्ह्याची दक्षिण-उत्तर लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 150 किमी

❷ 180 किमी

❸ 225 किमी

❹ 220 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 225 किमी


Question : 29

रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ ५,८४० चौ.किमी

❷ ८,२०८ चौ.किमी

❸ ६,५०८ चौ.किमी

❹ ७,४१० चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ८,२०८ चौ.किमी


Question : 30

रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ १.९%

❷ २.७%

❸ ३.५%

❹ ४.२%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | २.७%


Question : 31

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ १० व्या

❷ १७ व्या

❸ २२ व्या

❹ २८ व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | १७ व्या


Question : 32

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ रत्नागिरी

❷ चिपळूण

❸ खेड

❹ संगमेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | संगमेश्वर


Question : 33

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ गुहागर

❷ मंडणगड

❸ लांजा

❹ दापोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मंडणगड


Question : 34

रत्नागिरीहून कोल्हापूरला जाताना कोणता घाट लागतो ?

❶ कुंभार्ली घाट

❷ ताम्हिणी घाट

❸ आंबा घाट

❹ बोर घाट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | आंबा घाट


Question : 35

कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते ?

❶ कापूस

❷ नाचणी

❸ भात

❹ सोयाबीन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | भात


Question : 36

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ राजापूर

❷ लांजा

❸ रत्नागिरी

❹ संगमेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | राजापूर


Question : 37

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ दापोली

❷ खेड

❸ मंडणगड

❹ चिपळूण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मंडणगड


Question : 38

रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ चिपळूण

❷ रत्नागिरी

❸ राजापूर

❹ खेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रत्नागिरी


Question : 39

रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ कोकण

❸ नाशिक

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कोकण


Question : 40

खालीलपैकी कोणता तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही ?

❶ लांजा

❷ गुहागर

❸ वैभववाडी

❹ मंडणगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वैभववाडी


Question : 41

रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ पश्चिम महाराष्ट्र

❷ मराठवाडा

❸ कोकण

❹ विदर्भ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोकण


Question : 42

रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ ३

❷ ५

❸ ७

❹ ९

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5
रत्नागिरी जिल्ह्याला रायगड, सातारा, सांगली , कोल्हापूर , आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला 167 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे


Question : 43

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रत्नागिरी जिल्ह्याला लागून नाही ?

❶ सातारा

❷ सांगली

❸ कोल्हापूर

❹ पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | पुणे


Question : 44

रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ कोल्हापूर

❷ रायगड

❸ सांगली

❹ सिंधुदुर्ग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सांगली


Question : 45

रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

❶ सिंधुदुर्ग

❷ रायगड

❸ सातारा

❹ ठाणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रायगड


Question : 46

रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा नैसर्गिक सीमा तयार करतो ?

❶ कोल्हापूर

❷ गोवा राज्य

❸ सिंधुदुर्ग

❹ सांगली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सिंधुदुर्ग


Question : 47

रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणती प्रमुख डोंगररांग दक्षिणोत्तर पसरलेली आहे ?

❶ सह्याद्री डोंगररांग

❷ सातपुडा डोंगररांग

❸ बालाघाट रांग

❹ अजिंठा रांग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सह्याद्री डोंगररांग


Question : 48

रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणती नैसर्गिक जलसीमा आहे ?

❶ ठाणे खाडी

❷ अरबी समुद्र

❸ सावित्री नदी

❹ वशिष्ठी नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अरबी समुद्र


Question : 49

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती महत्त्वाची नदी वाहते ?

❶ शास्त्री नदी

❷ काजळी नदी

❸ सावित्री नदी

❹ तेरेखोल नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सावित्री नदी


Question : 50

रत्नागिरी जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ सांगली

❷ सातारा

❸ कोल्हापूर

❹ बेळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोल्हापूर


Question : 51

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर कोणती नदी नैसर्गिक सरहद्द तयार करते ?

❶ शुक नदी

❷ वशिष्ठी नदी

❸ जगबुडी नदी

❹ मुचकुंदी नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शुक नदी


Question : 52

रत्नागिरी जिल्ह्याच्या ईशान्य दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ सांगली

❷ सातारा

❸ पुणे

❹ अहमदनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातारा


Question : 53

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता प्रसिद्ध घाट आहे ?

❶ बोर घाट

❷ कुंभार्ली घाट

❸ आंबा घाट

❹ आंबोली घाट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कुंभार्ली घाट


Question : 54

रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणारी आणि चिपळूण शहराच्या जवळ असलेली महत्त्वाची नदी कोणती ?

❶ वशिष्ठी नदी

❷ बाणकोट नदी

❸ अर्जुना नदी

❹ गड नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वशिष्ठी नदी


Question : 55

2011 च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 14,15,400

❷ 16,15,069

❸ 18,20,500

❹ 15,25,000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 16,15,069


Question : 56

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या रत्नागिरी जिल्ह्याची आहे ?

❶ 1.44%

❷ 2.10%

❸ 0.90%

❹ 1.10%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.44%


Question : 57

2011 च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ चिपळूण

❷ रत्नागिरी

❸ संगमेश्वर

❹ राजापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रत्नागिरी


Question : 58

2011 च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ मंडणगड

❷ गुहागर

❸ लांजा

❹ खेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मंडणगड


Question : 59

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता (2011 नुसार) किती आहे ?

❶ 150

❷ 190

❸ 197

❹ 215

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 197


Question : 60

रत्नागिरी जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 1036

❷ 1122

❸ 1080

❹ 1150

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1122


Question : 61

रत्नागिरी जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 80.5%

❷ 82.1%

❸ 85.4%

❹ 78.9%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 82.1%


Question : 62

2011 च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे?

❶ 88.5%

❷ 90.9%

❸ 92.4%

❹ 85.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 90.9%


Question : 63

रत्नागिरी जिल्ह्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण 2011 नुसार किती टक्के आहे?

❶ 70.2%

❷ 74.5%

❸ 68.9%

❹ 76.4%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 74.5%


Question : 64

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 75%

❷ 84%

❸ 90%

❹ 85%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 84%


Question : 65

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 16.3%

❷ 20.5%

❸ 25.4%

❹ 10.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 16.3%


Question : 66

रत्नागिरी जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 940

❷ 950

❸ 961

❹ 930

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 961



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post