सातारा जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न-उत्तर | Satara District General Knowledge Questions
सातारा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (satara District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर सातारा जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 250+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Satara District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
सातारा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
सातारा जिल्हा हा कोणत्याही इतर जिल्ह्याच्या विभाजनातून तयार करण्यात आलेला नाही
🔹 इ.स. १८४८ मध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळात सातारा स्वतंत्र प्रशासकीय जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला
🔹 त्यावेळी सातारा संस्थान ब्रिटिशांनी जप्त केल्यानंतर (Doctrine of Lapse नुसार) त्याचे जिल्ह्यात रूपांतर करण्यात आले.
म्हणूनच, सातारा जिल्हा हा थेट कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झालेला नाही, तर तो स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आला होता
सातारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वेण्णा
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी कोणत्या छत्रपतींच्या काळात झाली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | छत्रपती शाहू महाराज
1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर आपला राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी घोषित केली .
◾ रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी होती .
मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 मध्ये रायगडला त्यांच्या साम्राज्याची राजधानी बनवली
सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची (पत्री सरकार) स्थापना कोणी केली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | क्रांतिसिंह नाना पाटील
साताऱ्याचे शेवटचे राजे म्हणून कोणाला ओळखले जाते , ज्यांचे राज्य इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर करून खालसा केले ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | प्रतापसिंह महाराज
साताऱ्याचे शेवटचे राजे म्हणून छत्रपती प्रतापसिंह महाराज (आणि त्यांच्या पश्चात दत्तक वारस शाहू महाराज/अप्पासाहेब) ओळखले जातात. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीने 'दत्तक विधान नामंजूर' (Doctrine of Lapse) धोरणाचा वापर करून साताऱ्याची गादी खालसा केली आणि राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात घेतले
कोणत्या वर्षी इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | १८४८
इंग्रजांनी १८४८ (काही संदर्भात १८४९) मध्ये 'व्यपगत सिद्धांत' (Doctrine of Lapse) चा वापर करून सातारा संस्थान खालसा केले आणि ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले .
◾ लॉर्ड डलहौसीने तत्कालीन सातारा संस्थानाचा दत्तक वारस नामंजूर करून हे राज्य खालसा केले होते
सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला 'दक्षिण काशी' असे म्हटले जाते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | श्री क्षेत्र माहुली
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची समाधी सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कराड
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमावर आहे . हे समाधीस्थळ 'प्रीतीसंगम' या नावाने ओळखले जाते
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगररांगेत आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सह्याद्री
'शूरवीरांचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातारा
ऐतिहासिक 'प्रतापगड' किल्ला सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जावळी
सातारा जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 17° 05' उत्तर ते 18° 11' उत्तर
सातारा जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 73° 33' पूर्व ते 74° 54' पूर्व
सातारा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | १०,४८० चौ.किमी
सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ३.४%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | १२ व्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | पाटण
सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत - सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, पाटण, जावळी (मेढा) आणि खंडाळा
◾क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका पाटण आहे . पाटण तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे 1320.92 चौ. किमी. आहे, जे जिल्ह्यतील इतर 10 तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | महाबळेश्वर
सातारा जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | माण (दहिवडी)
सातारा जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वरीलपैकी सर्व
सातारा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कराड
सातारा जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खंडाळा
सातारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातारा
सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पुणे
सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 11
खालीलपैकी कोणता तालुका सातारा जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | कर्जत
सातारा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पश्चिम महाराष्ट्र
सातारा जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ५ सातारा जिल्ह्याला पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि रायगड या 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सातारा जिल्ह्याला लागून नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोल्हापूर
सातारा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी स्पर्श करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | रायगड
सातारा जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सातारा
सातारा आणि कोरेगाव हे तालुके जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने त्यांना इतर जिल्ह्यांच्या सीमा लागत नाहीत
सह्याद्री पर्वताची सातारा जिल्ह्यातील एकूण लांबी सुमारे किती कि.मी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 93 कि.मी
सह्याद्री पर्वताची (मुख्य रांग) सातारा जिल्ह्यातील लांबी साधारणपणे 93 किलोमीटर इतकी आहे
◾ सातारा जिल्ह्याची पश्चिम सीमा पूर्णपणे सह्याद्रीच्या मुख्य रांगेने व्यापलेली असून, या डोंगराळ भागाला 'घाटमाथा' असेही म्हणतात.
✅ या पर्वतरांगेची सातारा जिल्ह्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
🔹विस्तार : सातारा जिल्ह्यात सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि कास पठार यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे याच रांगेत येतात
🔹प्रमुख शिखरे : महाबळेश्वर हे या रांगेतील जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण १४३८ मीटर आहे
🔹उपरांगा : सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून जिल्ह्यात शंभू महादेव ही प्रमुख उपरांग पूर्व दिशेला विस्तारते, जी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून पुढे जाते
सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला कोणती डोंगररांग नैसर्गिक सीमा तयार करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | शंभू महादेव डोंगररांग
सातारा जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सांगली
सातारा जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पुणे
कोकण आणि देश यांना विभागणारी सातारा जिल्ह्यातील कोणती डोंगररांग आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सह्याद्री डोंगररांग
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | रत्नागिरी
सातारा जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | सोलापूर
सातारा आणि पुणे जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने काही प्रमाणात निश्चित केली आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नीरा नदी
खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वारणा नदी
कोणत्या नदीमुळे सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांची सीमा विभागली गेली आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वारणा नदी
2011 च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 30,03,741
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या सातारा जिल्ह्याची आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.89%
2011 च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कराड
2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | महाबळेश्वर
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 287
सातारा जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 988
सातारा जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 82.87%
सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 81.01%
सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 18.99%
सातारा जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 895
महत्त्वाची सुचना 🔊
या पेजवर दिलेले सातारा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे
विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे
Satara District Important Gk Questions PDF Download
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सातारा जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
👉 PDF Download Link : Download Now
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
