नफा आणि तोटा गणित प्रश्नसंच
नफा आणि तोटा (Profit and Loss) हा गणितातील एक महत्वाचा टॉपिक आहे
जो व्यापार, खरेदी-विक्री, सवलत आणि दैनंदिन आर्थिक व्यवहार समजून घेण्यासाठी उपयुक्त असतो.
स्पर्धा परीक्षांमध्ये हा टॉपिक गुण मिळवण्यासाठी सोपा पण महत्वाचा मानला जातो.
MPSC, SSC, Talathi, IBPS, PSI, Police Bharti अशा परीक्षांमध्ये
यावरून वारंवार प्रश्न विचारले जातात.
नफा आणि तोटा म्हणजे काय ?
जेव्हा वस्तू विकताना किंमत वाढते तेव्हा नफा (Profit) होतो,
आणि किंमत कमी असल्यास तोटा (Loss) होतो.
गणना करण्यासाठी खालील Profit and Loss Formula वापरले जातात :
▪️ नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
▪️ तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत
▪️ नफा % = (नफा ÷ खरेदी किंमत) × 100
▪️ तोटा % = (तोटा ÷ खरेदी किंमत) × 100
Profit and Loss Examples in Marathi सोडवताना
Cost Price (CP) आणि Selling Price (SP) योग्य ओळखणे महत्वाचे आहे.
सराव करताना नफा आणि तोटा शॉर्ट ट्रिक्स वापरल्यास प्रश्न काही सेकंदात सोडवता येतात आणि वेळही वाचतो
खाली दिलेल्या नफा आणि तोटा प्रश्नसंच चा सराव करा आणि स्पर्धा परीक्षेसाठी तुमची तयारी मजबूत करा
Question : 1
एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असून ती 600 रुपयांना विकली, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत = 600 - 500 = 100 रुपये.
शेकडा नफा = (नफा / खरेदी किंमत) * 100
= (100 / 500) * 100 = 20%.
Question : 2
एका सायकलची खरेदी किंमत 2500 रुपये आहे. ती सायकल 2000 रुपयांना विकली, तर किती टक्के तोटा झाला ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत = 2500 - 2000 = 500 रुपये.
शेकडा तोटा = (500 / 2500) * 100 = 20%.
Question : 3
एक टेबल 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला, तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती ?
❶ 500 रुपये
❷ 550 रुपये
❸ 600 रुपये
❹ 650 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = (विक्री किंमत * 100) / (100 + नफा%)
= (720 * 100) / 120 = 6 * 100 = 600 रुपये.
Question : 4
एका खुर्चीची खरेदी किंमत 450 रुपये आहे. ती 10% तोट्याने विकली, तर तिची विक्री किंमत किती ?
❶ 400 रुपये
❷ 405 रुपये
❸ 410 रुपये
❹ 395 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : विक्री किंमत = खरेदी किंमत * (100 - तोटा%) / 100
= 450 * 90 / 100 = 45 * 9 = 405 रुपये.
Question : 5
12 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमतीइतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : शेकडा नफा = [(खरेदी वस्तू - विक्री वस्तू) / विक्री वस्तू] * 100
= [(12 - 10) / 10] * 100 = (2 / 10) * 100 = 20%.
Question : 6
एका वस्तूची विक्री किंमत 990 रुपये असून त्यावर 10% नफा झाला आहे, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
❶ 900 रुपये
❷ 890 रुपये
❸ 910 रुपये
❹ 800 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = (990 * 100) / 110 = 9 * 100 = 900 रुपये.
Question : 7
एका घड्याळाची विक्री किंमत 1440 रुपये आहे. जर ते विकल्यामुळे 10% तोटा झाला असेल, तर 10% नफा मिळवण्यासाठी ते घड्याळ किती रुपयांना विकावे लागेल ?
❶ 1600 रुपये
❷ 1800 रुपये
❸ 1760 रुपये
❹ 1700 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = (1440 * 100) / 90 = 1600 रुपये.
10% नफ्यासाठी विक्री किंमत = 1600 * 110 / 100 = 1760 रुपये.
Question : 8
एक रेडिओ 510 रुपयांना विकल्याने 15% तोटा होतो, तर 15% नफा मिळवण्यासाठी तो कितीला विकावा ?
❶ 600 रुपये
❷ 690 रुपये
❸ 700 रुपये
❹ 750 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 510 रुपये म्हणजे 85% किंमत आहे.
तर 115% किती? = (510 / 85) * 115 = 6 * 115 = 690 रुपये.
Question : 9
20 वस्तू विकून 5 वस्तूंच्या विक्री किंमतीइतका नफा झाला, तर शेकडा नफा किती ?
❶ 20%
❷ 25%
❸ 33.33%
❹ 15%
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : विक्री 20 वस्तू, नफा 5 वस्तू. म्हणून खरेदी = 20 - 5 = 15 वस्तू.
शेकडा नफा = (5 / 15) * 100 = 33.33%.
Question : 10
एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 80% आहे, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : समजा विक्री किंमत 100 आहे, तर खरेदी किंमत 80 होईल.
नफा = 20. शेकडा नफा = (20 / 80) * 100 = 25%.
Question : 11
एका व्यापाऱ्याने 10 रुपयांना 11 लिंबू खरेदी केले आणि 11 रुपयांना 10 लिंबू विकले, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : सूत्र: [(विक्री किं.चा वर्ग - खरेदी किं.चा वर्ग) / खरेदी किं.चा वर्ग] * 100
= [(11*11 - 10*10) / (10*10)] * 100 = (121 - 100) = 21%.
Question : 12
एका कपाटाची किंमत 15% वाढवून त्यावर 15% सूट दिली, तर या व्यवहारात काय होईल ?
❶ नफा ना तोटा
❷ 2.25% तोटा
❸ 2.25% नफा
❹ 5% तोटा
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो.
तोटा = (दर / 10)^2 = (15 / 10)^2 = 1.5^2 = 2.25%.
Question : 13
एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. त्यावर दुकानदार 10% सूट देतो, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती ?
❶ 1000 रुपये
❷ 1100 रुपये
❸ 1080 रुपये
❹ 1180 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : सूट = 1200 चे 10% = 120 रुपये.
विक्री किंमत = 1200 - 120 = 1080 रुपये.
Question : 14
500 रुपयांची वस्तू 10% नफ्याने एकाला विकली, त्याने ती 20% नफ्याने दुसऱ्याला विकली, तर शेवटची विक्री किंमत किती ?
❶ 600 रुपये
❷ 650 रुपये
❸ 660 रुपये
❹ 700 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : विक्री किंमत = 500 * (110/100) * (120/100)
= 5 * 11 * 12 = 660 रुपये.
Question : 15
जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4:5 असेल, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : खरेदी = 4, विक्री = 5, नफा = 1.
शेकडा नफा = (1 / 4) * 100 = 25%.
Question : 16
800 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकल्यास 25% तोटा होईल ?
❶ 600 रुपये
❷ 500 रुपये
❸ 650 रुपये
❹ 700 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : विक्री किंमत = 800 * 75 / 100 = 8 * 75 = 600 रुपये.
Question : 17
एक शर्टवर 'एक घ्या एक फ्री' ही ऑफर आहे, तर मिळणारी सूट किती टक्के आहे ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : एकूण 2 शर्ट मिळाले त्यापैकी 1 मोफत आहे.
सूट = (1 / 2) * 100 = 50%.
Question : 18
सलग दोन 10% च्या सवलती दिल्यास एकूण एकत्रित सूट किती टक्के होईल ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : सूत्र: x + y - (xy/100)
= 10 + 10 - (100/100) = 20 - 1 = 19%.
Question : 19
एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या 4/3 पट आहे, तर शेकडा नफा किती ?
❶ 33.33%
❷ 25%
❸ 20%
❹ 30%
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : खरेदी = 3, विक्री = 4, नफा = 1.
शेकडा नफा = (1 / 3) * 100 = 33.33%.
Question : 20
एका दुकानदाराल 33 मीटर कापड विकल्यावर 11 मीटर कापडाच्या विक्री किंमतीइतका नफा होतो, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : खरेदी = 33 - 11 = 22 मीटर.
शेकडा नफा = (11 / 22) * 100 = 50%.
Question : 21
16 वस्तूंची खरेदी किंमत 20 वस्तूंच्या विक्री किंमतीइतकी आहे, तर शेकडा तोटा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : शेकडा तोटा = [(विक्री वस्तू - खरेदी वस्तू) / विक्री वस्तू] * 100
= [(20 - 16) / 20] * 100 = (4 / 20) * 100 = 20%.
Question : 22
2400 रुपयांच्या वस्तूवर 20% नफा हवा असल्यास ती कितीला विकावी ?
❶ 2800 रुपये
❷ 2880 रुपये
❸ 2900 रुपये
❹ 2980 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : विक्री किंमत = 2400 * 120 / 100 = 24 * 120 = 2880 रुपये.
Question : 23
छापील किंमतीवर 20% सूट देऊनही 10% नफा होतो, जर छापील किंमत 1100 रुपये असेल तर खरेदी किंमत किती ?
❶ 800 रुपये
❷ 900 रुपये
❸ 850 रुपये
❹ 950 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : विक्री किंमत = 1100 चे 80% = 880 रुपये.
खरेदी किंमत = (880 * 100) / 110 = 800 रुपये.
Question : 24
एका वस्तूची किंमत 10% ने वाढली व नंतर पुन्हा 10% ने कमी झाली, तर मूळ किमतीत काय फरक पडला ?
❶ 1% वाढ
❷ 1% घट
❸ 2% घट
❹ काहीही फरक नाही
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : (x^2 / 100)% नेहमी घट होते.
= (10^2 / 100) = 100 / 100 = 1% घट.
Question : 25
एका व्यवहारात झालेला नफा हा खरेदी किंमतीच्या 1/5 पट आहे, तर शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : शेकडा नफा = (1 / 5) * 100 = 20%.
Question : 26
एका वस्तूची खरेदी किंमत 120 रुपये असून विक्री किंमत 150 रुपये आहे, तर नफा किती रुपये झाला ?
❶ 20 रुपये
❷ 25 रुपये
❸ 30 रुपये
❹ 40 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : नफा = 150 - 120 = 30 रुपये.
Question : 27
20% तोटा सहन करून एक वस्तू 480 रुपयांना विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
❶ 550 रुपये
❷ 600 रुपये
❸ 650 रुपये
❹ 500 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 480 म्हणजे 80% आहे.
खरेदी (100%) = (480 / 80) * 100 = 6 * 100 = 600 रुपये.
Question : 28
दोन सायकली प्रत्येकी 3000 ला विकल्या. एकावर 10% नफा व दुसऱ्यावर 10% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात काय होईल ?
❶ 1% नफा
❷ नफा ना तोटा
❸ 1% तोटा
❹ 2% तोटा
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : जेव्हा विक्री किंमत समान असते आणि नफा-तोटा टक्केवारीही समान असते, तेव्हा नेहमी तोटाच होतो.
तोटा = (10 * 10) / 100 = 1% तोटा.
Question : 29
एका वस्तूची विक्री किंमत 720 रुपये आहे आणि तोटा 25% आहे, तर खरेदी किंमत किती ?
❶ 900 रुपये
❷ 950 रुपये
❸ 960 रुपये
❹ 1000 रुपये
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = (720 * 100) / 75 = 960 रुपये.
Question : 30
600 रुपयांची वस्तू 750 रुपयांना विकल्यास शेकडा नफा किती ?
Show Solution
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : नफा = 150 रुपये.
शेकडा नफा = (150 / 600) * 100 = 25%.