Wardha District Kotwal Bharti Question Paper | वर्धा जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
वर्धा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ अमरावती
❷ नागपूर
❸ यवतमाळ
❹ भंडारा
वर्धा जिल्ह्याचे प्राचीन नाव किंवा या भागाला कोणत्या ऐतिहासिक नावाने ओळखले जाई ?
❶ पालकवाडी
❷ अपरान्त
❸ दक्षिण कोशल
❹ वत्सगुल्म
क्षेत्रफळाच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
❶ वर्धा
❷ समुद्रपूर
❸ हिंगणघाट
❹ कारंजा
महात्मा गांधींनी 1936 मध्ये वर्धा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता ?
❶ सेवाग्राम
❷ पवनार
❸ सेलु
❹ हिंगणघाट
आचार्य विनोबा भावे यांनी वर्धा जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या काठावर 'परंधाम' आश्रमाची स्थापना केली ?
❶ वर्धा नदी
❷ धाम नदी
❸ यशोदा नदी
❹ वेणा नदी
वर्धा जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ आदिवासी जिल्हा
❷ संत्र्यांचा जिल्हा
❸ गांधी जिल्हा
❹ तलावांचा जिल्हा
वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ अमरावती विभाग
❷ नागपूर विभाग
❸ नाशिक विभाग
❹ पुणे विभाग
वर्धा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 4,510 चौ.किमी
❷ 5,210 चौ.किमी
❸ 6,310 चौ.किमी
❹ 7,200 चौ.किमी
वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?
❶ वर्धा नदी
❷ पैनगंगा नदी
❸ निर्गुडा नदी
❹ वेणा नदी
2011 च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
❶ 10,20,500
❷ 13,00,774
❸ 15,12,300
❹ 11,85,400
पाण्याचा गोठणबिंदू किती अंश सेल्सिअस आहे ?
❶ 100°C
❷ 0°C
❸ 4°C
❹ -4°C
स्वाइन फ्लू हा आजार कशामुळे होतो ?
❶ विषाणू
❷ जिवाणू
❸ कवक
❹ प्रोटोजोआ
भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?
❶ रोहिणी
❷ भास्कर-1
❸ आर्यभट्ट
❹ इनसॅट-1A
ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात ?
❶ 5 ते 15
❷ 7 ते 17
❸ 9 ते 19
❹ 11 ते 21
महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ?
❶ क्रांतिसिंह नाना पाटील
❷ किसन वीर
❸ यशवंतराव चव्हाण
❹ कर्मवीर भाऊराव पाटील
कोणत्या नावाचा डास चावल्याने हत्तीरोग होतो ?
❶ ॲनोफिलीस
❷ एडिस इजिप्ती
❸ क्युलेक्स
❹ मनसोनिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली होती ?
❶ छत्रपती शाहू महाराज
❷ सयाजीराव गायकवाड
❸ कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
❹ महाराज सवाई जयसिंग
पाण्याची खोली कशामध्ये मोजतात ?
❶ नॉट
❷ फॅदम
❸ नॉटिकल माईल
❹ बॅरल
स्वाईन फ्लू मधील स्वाईन हा शब्द कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे ?
❶ घोडा
❷ गाय
❸ कुत्रा
❹ डुक्कर
जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
❶ ॲमेझॉन
❷ नाईल
❸ यांगत्से
❹ मिसिसिपी
पश्चिम घाटात कोणते सर्वाधिक उंचीचे शिखर आहे ?
❶ डोडाबेट्टा
❷ महाबळेश्वर
❸ कळसूबाई
❹ अनामुडी
मोहमेडन ॲग्लो ओरियंटल कॉलेजची स्थापना कोणी केली ?
❶ सर सय्यद अहमद खान
❷ मौलाना अबुल कलाम आझाद
❸ बॅरिस्टर महंमद अली जिना
❹ डॉ. झाकीर हुसेन
दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला ?
❶ इल्तुतमिश
❷ अलाउद्दीन खिलजी
❸ कुतुबुद्दीन ऐबक
❹ फिरोजशाह तुघलक
केशवसुत हे कोणाचे टोपण नाव आहे ?
❶ त्र्यंबक बापूजी ठोंबरे
❷ कृष्णाजी केशव दामले
❸ राम गणेश गडकरी
❹ नारायण सूर्याजी ठोसर
दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
❶ देवगिरी
❷ धारूर
❸ शिवनेरी
❹ रायगड
मराठी भाषा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
❶ 1 मे
❷ 27 फेब्रुवारी
❸ 15 ऑगस्ट
❹ 26 जानेवारी
खालीलपैकी कोणता वर्ण 'स्वर' आहे ?
❶ क
❷ आ
❸ च
❹ त
'विद्या + अर्थी' या शब्दांची संधी होऊन कोणता शब्द तयार होतो ?
❶ विदयार्थी
❷ विद्यार्थी
❸ विद्यर्थी
❹ विद्याथी
खालीलपैकी 'विशेषनाम' कोणते आहे ?
❶ शहर
❷ मुलगा
❸ नदी
❹ मुंबई
'मी अभ्यास करतो.' या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे ?
❶ मी
❷ अभ्यास
❸ करतो
❹ यांपैकी नाही
'हिरवे रान' या शब्दसमूहात 'हिरवे' हा शब्द काय दर्शवतो ?
❶ नाम
❷ विशेषण
❸ क्रियापद
❹ सर्वनाम
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ?
❶ नाम
❷ सर्वनाम
❸ क्रियापद
❹ विशेषण
'आंबा' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
❶ आंबे
❷ आंब्या
❸ आंब्यांना
❹ आंब्यांचे
'ने, ए, शी' हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ?
❶ प्रथमा
❷ द्वितीया
❸ तृतीया
❹ चतुर्थी
'घर' या शब्दाला 'ला' प्रत्यय लावताना त्याचे योग्य रूप काय होईल ?
❶ घरला
❷ घराला
❸ घरेला
❹ घरीला
7, 11, 19, 35, 67, ? या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
❶ 129
❷ 131
❸ 135
❹ 141
एका सांकेतिक भाषेत यदि 'TEACHER' हा शब्द 'VGCEJGT' असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUDENT' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ UVWFGPU
❷ UVWFGOT
❸ UVWFGPV
❹ TVWFHOU
एका रांगेत राहुलचा डावीकडून 18 वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 25 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 42
❷ 43
❸ 44
❹ 41
एका फोटोकडे बोट दाखवून अनिता म्हणाली, "हा माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे", तर फोटोतील मुलाचे अनिताशी नाते काय ?
❶ भाऊ
❷ पुतण्या
❸ मुलगा
❹ काका
घड्याळात दुपारी 3 वाजून 40 मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन तयार होईल ?
❶ 120°
❷ 140°
❸ 135°
❹ 130°
जर 15 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार होता, तर 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार असेल ?
❶ बुधवार
❷ गुरुवार
❸ शुक्रवार
❹ मंगळवार
अजय त्याच्या घरापासून उत्तरेकडे 12 मीटर चालत गेला. त्यानंतर उजवीकडे वळून 9 मीटर चालला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
❶ 21 मीटर
❷ 18 मीटर
❸ 16 मीटर
❹ 15 मीटर
दोन भावांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे तर मोठ्या भावाचे वय किती ?
❶ 10 वर्षे
❷ 15 वर्षे
❸ 20 वर्षे
❹ 25 वर्षे
त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8° व 53.5° आहे तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती ?
❶ 119.3°
❷ 12.3°
❸ 60.7°
❹ 85.9°
250 चे 5% म्हणजे किती ?
❶ 12.5
❷ 13.5
❸ 10.5
❹ 14.5
एका हौदात 2025 लिटर पाणी होते. त्यापैकी 1265 लिटर पाणी शेतीसाठी वापरले आणि 98 लिटर पाणी गळून गेले तर हौदात किती पाणी शिल्लक राहिले ?
❶ 858 लिटर
❷ 662 लिटर
❸ 764 लिटर
❹ 658 लिटर
एका व्यापाऱ्याने काही माल 7200 रुपयांना विकल्यामुळे त्यांना 10% तोटा झाला तर त्या मालाची खरेदी किंमत किती होती ?
❶ 7800 रुपये
❷ 8000 रुपये
❸ 8200 रुपये
❹ 9000 रुपये
एका बागेत झाडांच्या जितक्या रांगा आहेत, तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 729 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे असतील ?
❶ 17
❷ 47
❸ 37
❹ 27
एक बिलियन म्हणजे किती ?
❶ 10 लाख
❷ 1 कोटी
❸ 100 कोटी
❹ 1000 कोटी
10 तास 50 मिनिटे म्हणजे किती सेकंद ?
❶ 36,000 सेकंद
❷ 38,000 सेकंद
❸ 39,000 सेकंद
❹ 40,000 सेकंद
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Next test kevha yeil
ReplyDelete