Pune District Kotwal Bharti Question Paper | पुणे जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 1 तास 30 मिनिटे
पुणे जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ सातारा
❷ अहमदनगर
❸ सोलापूर
❹ यापैकी नाही
पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (पुणे शहर) कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
❶ इंद्रायणी व भीमा
❷ मुळा व मुठा
❸ नीरा व कऱ्हा
❹ कृष्णा व कोयना
पुणे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ पुनवडी
❷ अपरान्त
❸ कुंतल
❹ अश्मक
पुणे हे शहर 18 व्या शतकात कोणत्या सत्तेचे अधिकृत सत्ताकेंद्र (राजधानी) बनले होते ?
❶ मुघल
❷ पोर्तुगीज
❸ निजाम
❹ पेशवा
पुणे जिल्ह्यातील 'शिवनेरी' किल्ला कोणत्या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे ?
❶ पानिपतचे युद्ध
❷ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
❸ साल्हेरची लढाई
❹ पुरंदरचा तह
पुणे जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 15,643 चौ.किमी
❷ 12,358 चौ.किमी
❸ 18,210 चौ.किमी
❹ 16,400 चौ.किमी
पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
❶ 12
❷ 13
❸ 15
❹ 14
खालीलपैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यात येत नाही ?
❶ जुन्नर
❷ आंबेगाव
❸ कर्जत
❹ दौंड
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता ऐतिहासिक आणि महत्त्वाचा घाट आहे ?
❶ बोर घाट
❷ थळ घाट
❸ फोंडा घाट
❹ कुंभारली घाट
पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
❶ 4
❷ 5
❸ 6
❹ 7
बंगालची फाळणी कोणी जाहीर केली ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ लॉर्ड कर्झन
❸ लॉर्ड रिपन
❹ लॉर्ड माउंटबॅटन
जगाचे भूपृष्ठावरील किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ?
❶ 65%
❷ 71%
❸ 78%
❹ 80%
प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक काय ?
❶ ॲंगस्ट्रॉम
❷ पास्कल
❸ ल्युमेन
❹ कॅंडेला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला ?
❶ नाशिक
❷ महाड
❸ नागपूर
❹ पुणे
झाडाच्या खोडामध्ये असलेल्या वलयांच्या संख्येवरून काय ठरवतात ?
❶ झाडाची उंची
❷ झाडाचे वय
❸ झाडाचे नाव
❹ झाडाची मुळांची खोली
उपरा हे पुस्तक कोणाचे आहे ?
❶ दया पवार
❷ उत्तम कांबळे
❸ लक्ष्मण माने
❹ नामदेव ढसाळ
अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे ?
❶ अजिंठा लेणी
❷ वेरूळ लेणी
❸ एलिफंटा लेणी
❹ कार्ले लेणी
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
❶ 1 मे 1960
❷ 1 मे 1962
❸ 15 ऑगस्ट 1947
❹ 26 जानेवारी 1950
लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?
❶ 21 वर्षे
❷ 25 वर्षे
❸ 30 वर्षे
❹ 35 वर्षे
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
❶ दादासाहेब फाळके पुरस्कार
❷ ज्ञानपीठ पुरस्कार
❸ साहित्य अकादमी पुरस्कार
❹ पद्मविभूषण
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
❶ गलगंड
❷ मधुमेह
❸ रक्तक्षय
❹ फुफ्फुस दाह
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोठे आहे ?
❶ अमरावती
❷ चंद्रपूर
❸ नागपूर
❹ गोंदिया
भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले ?
❶ राहुल गांधी
❷ बाबा आमटे
❸ अण्णा हजारे
❹ सुंदरलाल बहुगुणा
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो ?
❶ जीवनसत्व ब-1 (थायमिन)
❷ जीवनसत्व ब-3 (नियासिन)
❸ जीवनसत्व क (ॲस्कॉर्बिक ॲसिड)
❹ जीवनसत्व ड (कॅल्सिफेरॉल)
ऊस उत्पादनात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ कर्नाटक
❸ उत्तर प्रदेश
❹ तामिळनाडू
एक रेल्वेगाडी एका तासात 108 कि.मी. जात असेल तर त्या गाडीचा वेग प्रतिसेकंद किती मीटर असेल ?
❶ 20 मीटर/सेकंद
❷ 25 मीटर/सेकंद
❸ 30 मीटर/सेकंद
❹ 35 मीटर/सेकंद
एका 42.5 मीटर लांबीच्या बांबूमधून 85 cm चे किती तुकडे बनवू शकतो ?
❶ 50
❷ 45
❸ 40
❹ 55
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 cm² असेल तर सदर वर्तुळाची परिमिती किती ?
❶ 22 cm
❷ 44 cm
❸ 66 cm
❹ 88 cm
एका व्यापाऱ्याने 680 रुपये किमतीवर 15 टक्के सूट दिली तर ती वस्तू किती रुपयास पडेल ?
❶ 872 रुपये
❷ 972 रुपये
❸ 578 रुपये
❹ 672 रुपये
12, 15 व 20 चा ल.सा.वी. काढा ?
❶ 20
❷ 40
❸ 60
❹ 80
सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
❶ 23/47
❷ 15/31
❸ 19/39
❹ 13/27
5 डझन संत्र्यांची किंमत 300 रुपये आहे तर एका संत्र्याची किंमत किती ?
❶ 4 रुपये
❷ 5 रुपये
❸ 6 रुपये
❹ 8 रुपये
एका वर्गाची बाजू 9 cm आहे. त्या वर्गाचे क्षेत्रफळ किती ?
❶ 72 चौ. सेमी
❷ 81 चौ. सेमी
❸ 90 चौ. सेमी
❹ 99 चौ. सेमी
'मुलांनी शांत बसावे.' या वाक्यातील 'बसावे' या क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
❶ स्वार्थ
❷ आज्ञार्थ
❸ विध्यर्थ
❹ संकेतार्थ
'आई-वडील' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?
❶ द्वंद्व समास
❷ तत्पुरुष समास
❸ बहुव्रीही समास
❹ अव्ययीभाव समास
'तो शाळेत गेला.' या वाक्याचा काळ कोणता ?
❶ वर्तमानकाळ
❷ भूतकाळ
❸ भविष्यकाळ
❹ रीती काळ
'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा' या ओळीत कोणता अलंकार आहे ?
❶ व्यतिरेक
❷ उपमा
❸ रूपक
❹ यमक
अक्षरगणवृत्तात अक्षरांचा लघु-गुरू क्रम ठरवण्यासाठी किती अक्षरांचा एक गण बनवला जातो ?
❶ 2
❷ 3
❸ 4
❹ 5
'तो आला आणि तो बसला.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ केवल वाक्य
❷ मिश्र वाक्य
❸ संयुक्त वाक्य
❹ प्रश्नार्थी वाक्य
वाक्यात क्रिया करणारा जो असतो, त्याला काय म्हणतात ?
❶ कर्म
❷ कर्ता
❸ क्रियापद
❹ विशेषण
'नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?
❶ अंगण खूप सुंदर असणे
❷ स्वतःच्या दोषाचे खापर दुसऱ्यावर फोडणे
❸ चांगले नृत्य करणे
❹ अंगणात कचरा असणे
'हात टेकणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
❶ हात जमिनीवर ठेवणे
❷ मदत करणे
❸ पराभव मान्य करणे / नाईलाज होणे
❹ नमस्कार करणे
'शाळा' हा शब्द मूळ कोणत्या प्रकारचा आहे ?
❶ तत्सम
❷ तद्भव
❸ देशी
❹ परदेशी
2, 9, 28, 65, 126, ? या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
❶ 215
❷ 216
❸ 217
❹ 220
एका सांकेतिक भाषेत जर 'PEN' हा शब्द '35' असा लिहिला जातो आणि 'BOOK' हा शब्द '43' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'NOTE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 48
❷ 50
❸ 52
❹ 54
एका आयताकृती मैदानावर 6 मित्र (P,Q,R,S,T,U) वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. P हा Q च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. R हा P आणि S च्या मध्ये बसला आहे. T हा Q च्या लगतच डावीकडे बसला आहे. तर S च्या समोर कोण बसले आहे ?
❶ Q
❷ U
❸ P
❹ R
महेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (दक्षिणावर्त) 90° वळतो, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने (वामावर्त) 135° वळतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ ईशान्य
❷ आग्नेय
❸ वायव्य
❹ नैऋत्य
50 मुलांच्या एका वर्गात सचिनचा वरून 15 वा क्रमांक आहे, तर त्याचा खालून कितवा क्रमांक असेल ?
❶ 34 वा
❷ 35 वा
❸ 36 वा
❹ 37 वा
एका सांकेतिक भाषेत जर 4 × 5 = 41 आणि 3 × 6 = 45 लिहिले जात असेल, तर त्याच नियमानुसार 2 × 7 = किती ?
❶ 53
❷ 51
❸ 49
❹ 55
एका प्राणी संग्रहालयात काही हरणे आणि काही बदके आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 60 आहे आणि पायांची एकूण संख्या 180 आहे, तर त्या प्राणी संग्रहालयात बदकांची एकूण संख्या किती ?
❶ 30
❷ 25
❸ 35
❹ 40
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
