Sambhaji Nagar Kotwal Bharti Question Paper | छत्रपती संभाजी नगर कोतवाल भरती पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली ?
❶ जालना
❷ अहमदनगर
❸ नाशिक
❹ यापैकी नाही
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ गोदावरी
❷ खाम
❸ पूर्णा
❹ तापी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
❶ 6
❷ 7
❸ 8
❹ 9
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते ?
❶ खडकी
❷ खुलताबाद
❸ त्रिकंटक
❹ सिंदखेड
कोणत्या मुघल सम्राटाने फतेहनगर शहराचे नाव बदलून औरंगाबाद केले होते ?
❶ अकबर
❷ शहाजहान
❸ औरंगजेब
❹ जहांगीर
जगप्रसिद्ध 'बिबी का मकबरा' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ पुणे
❷ नागपूर
❸ छत्रपती संभाजीनगर
❹ अहमदनगर
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ नाथसागर
❷ यशवंतसागर
❸ प्रीतीसंगम
❹ शिवसागर
अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे ?
❶ गोदावरी
❷ वाघूर
❸ तापी
❹ पूर्णा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 10,137 चौ. किमी.
❷ 8,100 चौ. किमी.
❸ 11,100 चौ. किमी.
❹ 9,100 चौ. किमी.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ?
❶ सिल्लोड
❷ वैजापूर
❸ पैठण
❹ खुलताबाद
भारतात पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठपर्यंत धावली ?
❶ मुंबई ते पुणे
❷ मुंबई ते ठाणे
❸ ठाणे ते कल्याण
❹ हावडा ते हुगळी
खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी 'जागतिक लोकसंख्या दिवस' म्हणून पाळला जातो ?
❶ 11 जुलै
❷ 5 जून
❸ 1 डिसेंबर
❹ 16 सप्टेंबर
मानवी शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ?
❶ गलगंड
❷ स्कर्व्ही
❸ मुडदूस
❹ रक्तक्षय
'कूचिपुडी' हा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?
❶ केरळ
❷ तामिळनाडू
❸ आंध्र प्रदेश
❹ कर्नाटक
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियमितपणे प्रकाशित केले जाणारे अधिकृत मासिक कोणते ?
❶ लोकराज्य
❷ योजना
❸ शेतकरी
❹ कुरुक्षेत्र
वर्ष 2011 च्या अधिकृत जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे ?
❶ 74.04%
❷ 82.34%
❸ 88.50%
❹ 76.88%
शिखांचे सर्वोच्च आणि अत्यंत पवित्र धर्मस्थळ 'सुवर्ण मंदिर' कोठे स्थित आहे ?
❶ आनंदपूर साहिब
❷ पटियाला
❸ अमृतसर
❹ चंदीगढ
1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
❶ वसंतराव नाईक
❷ पंडित नेहरू
❸ शंकरराव चव्हाण
❹ यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ?
❶ पुणे महानगरपालिका
❷ नागपूर महानगरपालिका
❸ बृहन्मुंबई महानगरपालिका
❹ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
गावातील ग्रामपंचायतीच्या 'ग्रामसभेचे' अधिकृत अध्यक्षपद कोण भूषवितो ?
❶ सरपंच
❷ ग्रामसेवक
❸ पोलीस पाटील
❹ तलाठी
प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा - YASHADA) कोठे आहे ?
❶ मुंबई
❷ नागपूर
❸ पुणे
❹ नाशिक
भार भारतातील चार धामांपैकी एक असलेले प्रसिद्ध 'रामेश्वरम' हे तीर्थस्थळ कोणत्या राज्यात आहे ?
❶ आंध्र प्रदेश
❷ केरळ
❸ तामिळनाडू
❹ कर्नाटक
महाराष्ट्रात उत्कृष्ट दुधाळ क्षमतेसाठी खालीलपैकी कोणती शेळ्यांची जात विशेष प्रसिद्ध आहे ?
❶ जमनापारी
❷ उस्मानाबादी
❸ बारबेरी
❹ बीटल
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ (आई जिजाऊंचे माहेर - सिंदखेडराजा) कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ जालना
❷ परभणी
❸ वाशिम
❹ बुलढाणा
अंतराळात प्रवास करणारे स्वतंत्र भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते ?
❶ राकेश शर्मा
❷ सतीश धवन
❸ कल्पना चावला
❹ विक्रम साराभाई
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीत लिहिली जाते ?
❶ देवनागरी
❷ मोडी
❸ रोमन
❹ गुरुमुखी
खालीलपैकी 'नाम' दर्शवणारा शब्द कोणता आहे ?
❶ आम्ही
❷ सुंदर
❸ आंबा
❹ धावणे
'घोडा' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते होईल ?
❶ घोडे
❷ घोड्या
❸ घोड्यांना
❹ घोडी
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ?
❶ सर्वनाम
❷ विशेषण
❸ अव्यय
❹ क्रियापद
'रात्र' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ निशा
❷ दिवस
❸ रजनी
❹ काळोख
'हात जोडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?
❶ नमस्कार करणे
❷ भांडण करणे
❸ काम करणे
❹ टाळ्या वाजवणे
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
❶ रवी
❷ चंद्र
❸ वारा
❹ पाणी
वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
❶ स्वल्पविराम
❷ प्रश्नचिन्ह
❸ पूर्णविराम
❹ उद्गारचिन्ह
'गाय' या शब्दाचे योग्य विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे ?
❶ वासरू
❷ बैल
❸ शेळी
❹ म्हैस
'अति तेथे...' ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द कोणता ?
❶ माती
❷ पाणी
❸ सोने
❹ भीती
सीमा ही गीतापेक्षा वयाने मोठी आहे, पण सीतापेक्षा लहान आहे. पूजा ही गीतापेक्षा लहान आहे, तर या सर्वांमध्ये सर्वात लहान कोण आहे ?
❶ सीता
❷ गीता
❸ पूजा
❹ सीमा
खालीलपैकी विसंगत अक्षर गट कोणता आहे : BD, EG, HJ, KM ?
❶ BD
❷ EG
❸ HJ
❹ KM
40 व्यक्तींच्या एका समूहामध्ये प्रत्येक व्यक्तीने उर्वरित प्रत्येकाशी एक-एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?
❶ 800
❷ 780
❸ 760
❹ 820
जर A = 1, B = 2, C = 3 याप्रमाणे अक्षरांना मूल्य दिले, तर WORD या शब्दाचे एकूण मूल्य किती होईल ?
❶ 60
❷ 58
❸ 62
❹ 64
एका परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. एका विद्यार्थ्याने सर्व 60 प्रश्न सोडवले आणि त्याला 190 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ?
❶ 45
❷ 48
❸ 50
❹ 52
प्रकाशचा जन्म 15 ऑगस्ट 2005 रोजी झाला. तो दिवस सोमवार होता. तर त्याचा 5 वा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
❶ शनिवार
❷ रविवार
❸ सोमवार
❹ मंगळवार
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 11, 13, 17, 19, 23, ?
❶ 29
❷ 27
❸ 26
❹ 31
AFD , BGE , CHF , DIG .......... ?
❶ EHI
❷ EIK
❸ FJH
❹ EJH
खालीलपैकी विसंगत अक्षर गट कोणता आहे : BD, EG, HJ, KN ?
❶ BD
❷ EG
❸ HJ
❹ KN
विनू ने 340 रुपयांची वस्तू खरेदी केली. दुकानदाराने त्याला शेकडा 15 रुपये सूट दिली तर विनोदला त्यासाठी किती किंमत द्यावी लागली ?
❶ 295 रुपये
❷ 279 रुपये
❸ 305 रुपये
❹ 289 रुपये
40 चे 25 % + 80 चे 20 % = ?
❶ 26
❷ 28
❸ 24
❹ 30
18 व 24 यांचा मसावी किती ?
❶ 3
❷ 12
❸ 6
❹ 8
एका संख्येत तिची निमपट मिळविल्यास बेरीज 123 होते तर ती संख्या कोणती ?
❶ 78
❷ 82
❸ 84
❹ 86
5000 रुपयांचे द.सा.द.शे 5 % दराने 3 वर्षात किती रुपये व्याज होईल ?
❶ 750 रुपये
❷ 650 रुपये
❸ 800 रुपये
❹ 700 रुपये
एक काम 12 माणसे 10 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील ?
❶ 6 दिवस
❷ 10 दिवस
❸ 9 दिवस
❹ 8 दिवस
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
