Nagpur District Kotwal Bharti Question Paper | नागपूर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
नागपूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ वर्धा
❷ चंद्रपूर
❸ अमरावती
❹ यापैकी नाही
नागपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (नागपूर शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ वैनगंगा
❷ कन्हान
❸ नाग
❹ वर्धा
नागपूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ फणींद्रपूर
❷ नंदीवर्धन
❸ चंदा
❹ वैरागढ
कोणत्या प्रसिद्ध प्राचीन कवीचे 'मेघदूत' हे काव्य रामटेक (नागपूर जिल्हा) येथे लिहिले गेले असे मानले जाते ?
❶ संत तुकाराम
❷ कवी कालिदास
❸ संत ज्ञानेश्वर
❹ वामन पंडित
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या 'दीक्षाभूमी' येथे बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली ?
❶ 14 ऑक्टोबर 1956
❷ 26 जानेवारी 1950
❸ 15 ऑगस्ट 1947
❹ 6 डिसेंबर 1956
नागपूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 8,510 चौ.किमी.
❷ 9,892 चौ.किमी.
❸ 10,210 चौ.किमी.
❹ 7,412 चौ.किमी.
खालीलपैकी कोणता तालुका नागपूर जिल्ह्यात येत नाही ?
❶ भिवापूर
❷ कळमेश्वर
❸ आष्टी
❹ पारशिवनी
नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
❶ 7
❷ 5
❸ 6
❹ 4
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?
❶ रामटेक
❷ उमरेड
❸ काटोल
❹ सावनेर
2011 च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
❶ 40,51,200
❷ 46,53,570
❸ 38,20,100
❹ 52,15,450
अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
❶ गुरुशिखर
❷ दोड्डाबेट्टा
❸ धूपगड
❹ अनाईमुडी
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
❶ जवाहरलाल नेहरू
❷ सरदार वल्लभभाई पटेल
❸ आचार्य विनोबा भावे
❹ सी. राजगोपालाचारी
म्यानमार या देशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
❶ यांगून
❷ नेपिडॉ
❸ मांडले
❹ बँकॉॅक
भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात ?
❶ सायमा
❷ प्रावरण
❸ गाभा
❹ सियाल
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
❶ पहिला
❷ दुसरा
❸ तिसरा
❹ चौथा
भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ गुलझारीलाल नंदा
❸ पंडित जवाहरलाल नेहरू
❹ सी. डी. देशमुख
आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
❶ 5 जून
❷ 21 जून
❸ 22 एप्रिल
❹ 11 जुलै
भारतीय संविधानाच्या कलम 154 अन्वये राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे देण्यात आली आहे ?
❶ मुख्यमंत्री
❷ राज्यपाल
❸ उच्च न्यायालय
❹ मुख्य सचिव
क्ष-किरणांचा शोध कोणी लावला ?
❶ विल्हेम रॉन्टजेन
❷ जे. जे. थॉमसन
❸ मायकेल फॅराडे
❹ मॅडम क्युरी
कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते ?
❶ प्रधानमंत्री आवास योजना
❷ प्रधानमंत्री जनधन योजना
❸ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
❹ दीनदयाळ उपाध्याय योजना
भारतात होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
❶ लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट
❷ महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू
❸ लाला लजपत राय व बिपिनचंद्र पाल
❹ गोपाळ कृष्ण गोखले व फिरोजशाह मेहता
विद्युत प्रभाराचे SI एकक कोणते आहे ?
❶ व्होल्ट (Volt)
❷ ॲम्पिअर (Ampere)
❸ ओहम (Ohm)
❹ कुलॉम्ब (Coulomb)
महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते ?
❶ 1 एप्रिल
❷ 1 जून
❸ 1 ऑगस्ट
❹ 1 जानेवारी
भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, कारण काय होते ?
❶ कमिशनने स्वराज्य नाकारले होते
❷ या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता
❸ कमिशनची स्थापना मुदतीपूर्वी करण्यात आली
❹ मुस्लिम लीगने याला पाठिंबा दिला होता
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
❶ संबंधित राज्याचे राज्यपाल
❷ भारताचे पंतप्रधान
❸ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
❹ भारताचे राष्ट्रपती
'सदाचार' या शब्दाचा योग्य संधी प्रकार कोणता ?
❶ स्वरसंधी
❷ व्यंजनसंधी
❸ विसर्गसंधी
❹ पूर्वरूप संधी
'रामाने रावण मारला.' या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कसे होईल ?
❶ रामाकडून रावण मारला गेला.
❷ राम रावण मारतो.
❸ रामाने रावणास मारले.
❹ राम रावणाला मारणार.
'कमळ' या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?
❶ पंकज
❷ सरोज
❸ राजीव
❹ पयोधर
'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या म्हणीचा अचूक अर्थ ओळखा ?
❶ लोकांचे ऐकू नये.
❷ मनात येईल तेच करावे लोकांचे ऐकूच नये.
❸ सर्वांचे ऐकून घ्यावे पण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करावे
❹ लोकांचे ऐकून निर्णय बदलावा.
'आवाहन' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ विसर्जन
❷ आवाहनहीन
❸ तिरस्कार
❹ अनादर
'दशमुख' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ कर्मधारय समास
❷ बहुव्रीहि समास
❸ द्विगु समास
❹ तत्पुरुष समास
'आकाशाला भिडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय ?
❶ आकाशात उडणे
❷ ढगांना स्पर्श करणे
❸ सर्वोच्च पातळी गाठणे
❹ अशक्य गोष्ट करणे
'मुले मैदानावर खेळत आहेत.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
❶ अकर्मक क्रियापद
❷ सकर्मक क्रियापद
❸ संयुक्त क्रियापद
❹ द्विकर्मक क्रियापद
'सासू' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
❶ सास्वा
❷ सासू
❸ सासूबाई
❹ सासवा
'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
❶ द्वितीया
❷ तृतीया
❸ पंचमी
❹ सप्तमी
पूजा राधाला म्हणाली तू माझ्या भावाच्या आईची बहीण आहेस तर ती बहीण पूजाची कोण ?
❶ आत्या
❷ काकू
❸ मावशी
❹ मामी
DG : FI तर BE : ?
❶ DG
❷ DH
❸ CG
❹ EG
जर एका सांकेतिक भाषेत 'DELHI' हा शब्द '73541' असा लिहिला जातो आणि 'CALCUTTA' हा शब्द '82589662' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'CALICUT' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 8251869
❷ 8251986
❸ 8521896
❹ 8251896
एका रांगेत 40 विद्यार्थी उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. नीता ही डाव्या टोकाकडून 11 वी आहे आणि सीमा ही उजव्या टोकाकडून 17 वी आहे, तर नीता आणि सीमा यांच्या दरम्यान एकूण किती विद्यार्थी आहेत ?
❶ 11
❷ 12
❸ 13
❹ 14
जर 'M' म्हणजे '+', 'N' म्हणजे '-', 'P' म्हणजे '×', आणि 'Q' म्हणजे '÷' असेल, तर 20 P 5 Q 10 M 8 N 3 = किती ?
❶ 12
❷ 14
❸ 15
❹ 16
एका बागेत काही बदके आणि काही ससे चरत आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 30 आणि पायांची संख्या 88 आहे, तर त्या बागेत एकूण बदके किती आहेत ?
❶ 16
❷ 14
❸ 18
❹ 12
खालील संख्या मालिकेत विसंगत संख्या ओळखा : 121, 144, 169, 196, 225, 250
❶ 144
❷ 196
❸ 225
❹ 250
सकाळी सूर्योदयानंतर सुमित एका खांबाकडे तोंड करून उभा होता. त्या खांबाची सावली सुमितच्या अगदी उजवीकडे पडत होती, तर सुमितचे तोंड कोणत्या दिशेला होते ?
❶ उत्तर
❷ दक्षिण
❸ पूर्व
❹ पश्चिम
रमेशचे पंधरा वर्षांपूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल ?
❶ 10 वर्षे
❷ 15 वर्षे
❸ 20 वर्षे
❹ 25 वर्षे
एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ सेमी आहे तर त्याची लांबी किती ?
❶ 16 सेमी
❷ 14 सेमी
❸ 22 सेमी
❹ 18 सेमी
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 616 चौ सेमी
❷ 308 चौ सेमी
❸ 528 चौ सेमी
❹ 484 चौ सेमी
825 चे 4% म्हणजे किती ?
❶ 31
❷ 35
❸ 33
❹ 37
एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचावयची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती ?
❶ 196 पाने
❷ 216 पाने
❸ 240 पाने
❹ 270 पाने
60² + 32² = x² तर x = किती ?
❶ 64
❷ 72
❸ 66
❹ 68
अजय एक काम 20 दिवसात पूर्ण करतो , आणि सुजय तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो , जर अजयने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम सुजय किती दिवसात संपवेल ?
❶ 18 दिवस
❷ 15 दिवस
❸ 12 दिवस
❹ 20 दिवस
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
