Palghar District Kotwal Bharti Question Paper | पालघर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली ?
❶ ठाणे
❷ रायगड
❸ नाशिक
❹ मुंबई उपनगर
पालघर जिल्ह्यातील कोणत्या ऐतिहासिक ठिकाणाचे प्राचीन नाव 'शूर्पारक' होते असे मानले जाते ?
❶ डहाणू
❷ जव्हार
❸ नालासोपारा
❹ केळवे
पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला ?
❶ 34 वा
❷ 35 वा
❸ 33 वा
❹ 36 वा
पालघर जिल्ह्यातील कोणता किल्ला पोर्तुगीजांविरुद्ध चिमाजी आप्पांनी मिळवलेल्या विजयासाठी प्रसिद्ध आहे ?
❶ वसईचा किल्ला
❷ शिरगाव किल्ला
❸ अर्नाळा किल्ला
❹ केळवे किल्ला
पालघर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ पुणे विभाग
❷ नाशिक विभाग
❸ कोकण विभाग
❹ अमरावती विभाग
पालघर जिल्ह्याला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ 72 किमी
❷ 112 किमी
❸ 150 किमी
❹ 102 किमी
पालघर जिल्ह्याची जागतिक स्तरावर ओळख असणारी प्रसिद्ध चित्रकला कोणती ?
❶ वारली चित्रकला
❷ मधुबनी चित्रकला
❸ पिठोरा चित्रकला
❹ गोंड चित्रकला
वारली चित्रकलेसोबतच पालघर जिल्ह्याचा कोणता प्रसिद्ध नृत्याविष्कार ओळखला जातो ?
❶ लावणी नृत्य
❷ गजी नृत्य
❸ लेझिम नृत्य
❹ तारपा नृत्य
पेशवे काळात कोणी पोर्तुगीजांच्या साम्राज्यास सुरुंग लावत वसईवर मराठ्यांचा झेंडा रोवला ?
❶ बाजीराव पेशवे
❷ नानासाहेब पेशवे
❸ चिमाजी आप्पा
❹ माधवराव पेशवे
पालघर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलदुर्ग किल्ला आहे ?
❶ जंजिरा
❷ अर्नाळा
❸ सिंधुदुर्ग
❹ विजयदुर्ग
द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो ?
❶ क्रीडा प्रशिक्षक
❷ क्रीडा पत्रकारिता
❸ सर्वोत्कृष्ट खेळाडू
❹ क्रीडा संघटक
1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यानंतर युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या कोणत्या नवीन मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले होते ?
❶ भूमार्ग
❷ जलमार्ग
❸ हवाई मार्ग
❹ वरील सर्व
बार्डोली सत्याग्रहाशी खालीलपैकी कोणती व्यक्ती संबंधित आहे ?
❶ महात्मा गांधी
❷ सुभाषचंद्र बोस
❸ सरदार वल्लभभाई पटेल
❹ पंडित जवाहरलाल नेहरू
निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असते ?
❶ 35°C
❷ 37°C
❸ 39°C
❹ 98.6°C
42 व्या घटनादुरुस्तीनुसार (1976) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले ?
❶ सार्वभौम, लोकशाही, गणराज्य
❷ न्याय, स्वातंत्र्य, समता
❸ समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता
❹ बंधुता, प्रतिष्ठा, एकता
बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ?
❶ दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेणे
❷ सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या कार्याचे मूल्यमापन करणे
❸ केंद्र-राज्य आर्थिक संबंध सुधारणे
❹ शैक्षणिक सुधारणांची शिफारस करणे
महाराष्ट्रातून संसदेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे ?
❶ 48
❷ 19
❸ 67
❹ 78
जगातील नदीच्या पात्रातील सर्वात मोठे बेट असणारे 'माजुली' हे बेट कोणत्या नदीवर आहे ?
❶ गंगा
❷ सिंधू
❸ नर्मदा
❹ ब्रह्मपुत्रा
नागालँड या ईशान्येकडील राज्याची राजधानी कोणती आहे ?
❶ इंफाळ
❷ कोहिमा
❸ आगरतळा
❹ इटानगर
'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संघटनेची स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा जोतीराव फुले
❷ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ छत्रपती शाहू महाराज
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ कोलकाता
❹ मद्रास
भारताच्या अधिकृत सीमेअंतर्गत असणारे सर्वोच्च पर्वतशिखर कोणते ?
❶ माउंट एव्हरेस्ट
❷ कांचनगंगा
❸ गॉडविन ऑस्टिन (K2)
❹ नंदादेवी
'जागतिक पर्यावरण दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
❶ 22 मार्च
❷ 5 जून
❸ 16 सप्टेंबर
❹ 22 मे
'महाराष्ट्र केसरी' ही मानाची स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
❶ कबड्डी
❷ खो-खो
❸ कुस्ती
❹ वेटलिफ्टिंग
भारतीय संविधानानुसार 'स्थानिक स्वशासन' हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
❶ संघ सूची
❷ राज्य सूची
❸ समवर्ती सूची
❹ उर्वरित अधिकार
मराठी वर्णमालेतील 'श, ष, स' या वर्णांना काय म्हणतात ?
❶ उष्मे
❷ महाप्राण
❸ अर्धस्वर
❹ अनुनासिके
'नदी' या शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप कोणते आहे ?
❶ नद्या
❷ नदी
❸ नद्यांना
❹ नद्यांचे
'पायऱ्या' चढणारा माणूस 'दमला'. या वाक्यातील 'दमला' हे काय आहे ?
❶ विशेषण
❷ क्रियापद
❸ सर्वनाम
❹ उभयान्वयी अव्यय
'अपेक्षा नसताना अचानक झालेला फायदा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
❶ सुवर्णयोग
❷ अनाहूत
❸ अवदसा
❹ पडता काळ
'हात चोळणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय होतो ?
❶ हताश होणे
❷ हात धुणे
❸ थंडी वाजणे
❹ काम करणे
'तो मुलगा हुशार आहे.' या वाक्यातील 'हुशार' हे कोणते विशेषण आहे ?
❶ गुणविशेषण
❷ संख्याविशेषण
❸ सार्वनामिक विशेषण
❹ क्रमवाचक विशेषण
'आईस्क्रीम खाल्ल्यावर दात दुखतात.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
❶ साधा भूतकाळ
❷ साधा भविष्यकाळ
❸ साधा वर्तमानकाळ
❹ चालू भूतकाळ
'टेबल' हा शब्द मराठीत कोणत्या परकीय भाषेतून आला आहे ?
❶ पोर्तुगीज
❷ फारसी
❸ अरबी
❹ इंग्रजी
'शितावरून भाताची परीक्षा' या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
❶ थोडे खाऊन पाहणे
❷ एका लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची पारख करणे
❸ अन्न वाया न घालवणे
❹ स्वयंपाक चांगला करणे
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ गृहपाठ
❷ ग्रुहपाठ
❸ गृहापाठ
❹ ग्रूहपाठ
एका 30 मीटर खोल कोरड्या विहिरीच्या तळाशी एक बेडूक आहे. तो दररोज दिवसा 3 मीटर वर चढतो आणि रात्री झोपेत 2 मीटर खाली घसरतो. तर त्याला विहिरीच्या काठावर पूर्णपणे बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतील ?
❶ 30 दिवस
❷ 28 दिवस
❸ 27 दिवस
❹ 29 दिवस
दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा : 6, 12, 21, 32, 45, 62
❶ 21
❷ 32
❸ 45
❹ 62
जर एका सांकेतिक लिपीमध्ये 'GIVE' हा शब्द '5137' असा लिहिला जातो आणि 'BAT' हा शब्द '924' असा लिहिला जातो, तर त्याच लिपीत 'GATE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 5247
❷ 5274
❸ 5427
❹ 2547
सूर्योदयाच्या वेळी अजय आणि विजय समोरासमोर उभे राहून गप्पा मारत होते. जर विजयची सावली अजयच्या अगदी उजव्या बाजूला पडत असेल, तर अजयचे तोंड कोणत्या दिशेला होते ?
❶ उत्तर
❷ पूर्व
❸ दक्षिण
❹ पश्चिम
जर पाण्याला अन्न म्हटले, अन्नाला झाड म्हटले, झाडाला आकाश म्हटले आणि आकाशाला भिंत म्हटले, तर खालीलपैकी फळे कशावर लागतील ?
❶ झाड
❷ आकाश
❸ अन्न
❹ भिंत
❶ आकृती A
❷ आकृती B
❸ आकृती C
❹ आकृती D
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 1, 2, 6, 24, 120, ?
❶ 600
❷ 620
❸ 720
❹ 840
एका रांगेत मुलांचे तोंड उत्तरेकडे आहे. सचिन डाव्या टोकाकडून 7 वा आहे आणि गौरव उजव्या टोकाकडून 12 वा आहे. जर त्यांच्यामध्ये 4 मुले बसलेली असतील, तर त्या रांगेत जास्तीत जास्त (कमाल) किती मुले असू शकतात ?
❶ 21
❷ 22
❸ 24
❹ 23
84 आणि 126 यांचा मसावि किती आहे ?
❶ 21
❷ 28
❸ 42
❹ 63
एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला 500 पैकी 375 गुण मिळाले. त्याची गुणांची टक्केवारी किती आहे ?
❶ 65%
❷ 70%
❸ 75%
❹ 80%
एका कामासाठी A ला 12 दिवस लागतात, तर B ला तेच काम 18 दिवसांत करता येते. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसांत पूर्ण होईल ?
❶ 6.8 दिवस
❷ 7.2 दिवस
❸ 8 दिवस
❹ 9 दिवस
एका वाहनाचा वेग 60 km/h आहे. ते वाहन 2 तास 30 मिनिटांत किती अंतर पार करेल ?
❶ 120 km
❷ 135 km
❸ 150 km
❹ 180 km
3, 6 आणि 9 या संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान तीन अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?
❶ 144
❷ 324
❸ 196
❹ 256
27 चा घन किती ?
❶ 19683
❷ 17576
❸ 21952
❹ 18453
एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल ?
❶ 124 चौ.सेमी
❷ 196 चौ.सेमी
❸ 144 चौ.सेमी
❹ 169 चौ.सेमी
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

