आर्थिक मूल्याची देवाणघेवाण करून नफा मिळवण्याच्या किंवा उपजीविका भागवण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीला काय म्हणतात ?
❶ आर्थिक कृती
❷ आर्थिकेतर कृती
❸ सामाजिक कृती
प्रेम, आपुलकी, दया किंवा कर्तव्यभावनेतून केलेल्या आणि ज्यामागे नफा मिळवण्याचा उद्देश नसतो अशा कृतीस काय म्हणतात ?
❶ व्यापार
❷ उत्पादन
❸ आर्थिकेतर कृती
उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकणाऱ्या व्यापाऱ्याला काय म्हणतात ?
❶ आयातदार
❷ घाऊक व्यापारी
❸ निर्यातक
घाऊक व्यापाऱ्याकडून आवश्यकतेनुसार माल खरेदी करून तो थेट अंतिम ग्राहकाला विकणाऱ्या व्यापाऱ्याला काय म्हणतात ?
❶ किरकोळ व्यापारी
❷ उत्पादक
❸ मध्यस्थ
दुसऱ्या देशातून स्वतःच्या देशात वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
❶ पुनर्निर्यात व्यापार
❷ निर्याती व्यापार
❸ आयात व्यापार
आपल्या देशातील वस्तू व सेवा दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
❶ निर्याती व्यापार
❷ आयात व्यापार
❸ अंतर्गत व्यापार
एका देशातून मालाची आयात करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता अथवा प्रक्रिया करून तो माल तिसऱ्याच देशात विकण्याच्या व्यापाराला काय म्हणतात ?
❶ स्वदेशी व्यापार
❷ पुनर्निर्यात व्यापार
❸ किरकोळ व्यापार
वस्तू आणि सेवांच्या खरेदी-विक्रीतील सर्व अडथळे दूर करून व्यापार सुलभतेने चालण्यास मदत करणाऱ्या घटकांना काय म्हणतात ?
❶ व्यापाराची आनुषंगिक साधने
❷ उद्योग
❸ निर्मिती क्षेत्र
नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री करणे म्हणजेच काय होय ?
❶ वाणिज्य
❷ व्यापार
❸ उत्पादन
व्यापार आणि व्यापारास मदत करणाऱ्या सर्व आनुषंगिक साधनांचा किंवा सेवांचा एकत्रित समावेश कशात होतो ?
❶ व्यवसाय
❷ उद्योग
❸ वाणिज्य
प्रकृतीवर किंवा निसर्गावर थेट अवलंबून असणाऱ्या आणि निसर्गातून थेट संसाधने मिळवणाऱ्या उद्योगांना काय म्हणतात ?
❶ सेवा उद्योग
❷ प्राथमिक उद्योग
❸ दुय्यम उद्योग
प्राथमिक उद्योगांतून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या उद्योगांना काय म्हणतात ?
❶ दुय्यम उद्योग
❷ जैविक उद्योग
❸ निष्कर्षण उद्योग
वनस्पती आणि प्राण्यांच्या पुनरुत्पादन व निर्मितीशी संबंधित असलेल्या उद्योगांना काय म्हणतात ?
❶ बांधकाम उद्योग
❷ प्रक्रिया उद्योग
❸ जैविक उद्योग
व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे
❶ बरोबर
❷ चूक
प्रत्येक पेशा हा पैसा मिळविण्यासाठी केला जातो
❶ बरोबर
❷ चूक
प्राथमिक व्यवसाय हे निसर्गाशी संबंधित असतात
❶ बरोबर
❷ चूक
वाणिज्यामध्ये व्यापाराचा समावेश होतो
❶ बरोबर
❷ चूक
गोदामामुळे वेळेची समस्या दूर होते
❶ बरोबर
❷ चूक
व्यापारामध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी व विक्रींचा समावेश होतो
❶ बरोबर
❷ चूक
नफ्यामुळे व्यवसायाची एकूणच कार्यक्षमता वाढते
❶ बरोबर
❷ चूक
रोपवाटिका ही उत्खनन उद्योगात येतात
❶ बरोबर
❷ चूक
उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते
❶ बरोबर
❷ चूक
किरकोळ व्यापार हा उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्यातील दुवा आहे
❶ बरोबर
❷ चूक
आर्थिक कृती अशी कृती की जी ----- मिळविण्यासाठी केली जाते
❶ मानसिक समाधान
❷ पैसा
❸ सामाजिक प्रतिष्ठा
वस्तू व सेवांचे वितरण म्हणजे ----- होय
❶ उद्योग
❷ वाणिज्य
❸ उपभोग
व्यवसाय ही ----- कृती आहे
❶ आर्थिक
❷ आर्थिकेतर
❸ सामाजिक
नफा मिळविणे हा ----- चा मुख्य हेतू असतो
❶ नोकरी
❷ व्यवसाय
❸ पेशा
तज्ञ सेवेच्या मोबदल्यात व्यावसायिक ----- आकारतात
❶ फी
❷ पगार
❸ नफा
----- ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना काम देते
❶ रोजगार देणारा
❷ ग्राहक
❸ मध्यस्थ
व्यवसायातील अनेक धोके स्वीकारल्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यास ----- म्हणतात
❶ वेतन
❷ नफा
❸ व्याज
उद्योगामुळे ----- निर्माण होते
❶ रूप उपयोगिता
❷ समय उपयोगिता
❸ स्थळ उपयोगिता
----- व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणावर चालते
❶ किरकोळ
❷ घाऊक
❸ पुनर्निर्यात
----- हा घाऊक व्यापारी व ग्राहकामधील दुवा आहे
❶ उत्पादक
❷ किरकोळ व्यापारी
❸ आयातदार
वकील हा ----- असतो
❶ पेशा स्वीकारणारा
❷ व्यावसायिक
❸ कर्मचारी
कच्च्या मालाचे तयार मालात रूपांतर करण्याचे काम ----- उद्योग करतो
❶ जैविक उद्योग
❷ निष्कर्षण उद्योग
❸ उत्पादक उद्योग
वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी विक्री म्हणजेच ----- होय
❶ पेशा
❷ व्यापार
❸ उद्योग
राष्ट्रीय स्तरावरील आचार संहिता ----- साठी बनविलेली असते
❶ पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्ती
❷ व्यावसायिक
❸ कर्मचारी
धरण बांधण्यासाठीचे काम ----- उद्योग अंतर्गत केले जाते
❶ प्राथमिक
❷ दुय्यम
❸ तृतीय
अंतराची समस्या ----- मुळे सोडवली जाते
❶ बँक
❷ वाहतूक
❸ गोदाम
वाणिज्य ही ----- शाखा आहे
❶ व्यवसायाची
❷ उद्योगाची
❸ व्यापाराची
व्यवसायातील परताव्याला ----- म्हणतात
❶ फी
❷ पगार
❸ नफा
व्यवसायातील उत्पादन विक्रीसाठी ----- अवलंबून असतात
❶ उद्योगावर
❷ समाजावर
❸ संस्थेवर
गुदामामुळे वस्तूमध्ये ----- उपयोगिता निर्माण होते
❶ ठिकाण
❷ समय
❸ रूप
नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण संबंधित नियमितपणे केली जाणारी कृती म्हणजे -
❶ उद्योग
❷ व्यवसाय
❸ वाणिज्य
जी कृती मानवाकडून पैसा मिळविण्यासाठी केली जाते त्यास काय म्हणतात ?
❶ आर्थिक कृती
❷ आर्थिकेतर कृती
❸ सामाजिक कृती
पैसा आणि पैशाचे मूल्य असलेल्या मोबदल्यात केलेली वस्तूंची खरेदी विक्री म्हणजेच काय होय ?
❶ पेशा
❷ व्यापार
❸ नोकरी
अशी कृती जी व्यापारातील अडचणी दूर करते तिला काय म्हणतात ?
❶ उद्योग
❷ निर्मिती
❸ व्यापाराची आनुषंगिक साधने
स्थिर प्रकारची संपत्ती निर्माण करणारे उद्योग म्हणजे कोणता उद्योग होय ?
❶ बांधकाम
❷ निष्कर्षण
❸ जैविक
वस्तू व सेवेच्या उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिक कृतीचे नाव काय आहे ?
❶ वाणिज्य
❷ उद्योग
❸ व्यापार
वस्तू व सेवेच्या वितरणाशी संबंधित असलेल्या व्यवसाय कृतीचे नाव काय आहे ?
❶ वाणिज्य
❷ उद्योग
❸ उत्पादन
व्यक्ति व साधनसंपत्तीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या हालचाली संबंधीची कृती म्हणजेच काय होय ?
❶ गोदाम
❷ बँक
❸ वाहतूक
समय उपयोगिता निर्माण करणारे व्यापारी आनुषंगिक साधन कोणते आहे ?
❶ गोदाम
❷ वाहतूक
❸ विमा
व्यवसायाची अशी कृती ज्यामध्ये एखादी व्यक्ती फी घेऊन उत्तम तज्ञ सेवा देण्याचे मान्य करते त्यास काय म्हणतात ?
❶ नोकरी
❷ पेशा
❸ व्यापार
प्राणी व वनस्पती यांच्या पुनरुत्पादनाशी संबंधित असलेला व्यवसाय कोणता उद्योग म्हणून ओळखला जातो ?
❶ निष्कर्षण
❷ प्रक्रिया
❸ जैविक
दोन देशांमधील व्यापारी व्यवहाराला काय म्हणतात ?
❶ विदेशी व्यापार
❷ अंतर्गत व्यापार
❸ किरकोळ व्यापार
नफ्याने प्रेरित असणारी कृती म्हणजे काय -
❶ आर्थिकेतर कृती
❷ व्यवसाय
❸ सेवाभाव
ज्या प्रकारच्या व्यापारात वस्तू मोठ्या प्रमाणावर विक्री केल्या जातात त्यास काय म्हणतात ?
❶ घाऊक व्यापार
❷ किरकोळ व्यापार
❸ पुनर्निर्यात व्यापार
एकाच देशाच्या हद्दीत चालणाऱ्या व्यापारास काय म्हणतात ?
❶ विदेशी व्यापार
❷ अंतर्गत व्यापार
❸ आयात व्यापार
अशा प्रकारचा उद्योग किंवा व्यापार ज्यामध्ये वस्तू थेट ग्राहकांना विक्री केल्या जातात त्यास काय म्हणतात ?
❶ घाऊक व्यापार
❷ किरकोळ व्यापार
❸ आयात व्यापार
पेशा स्वीकारलेल्या व्यक्तीस तज्ञ सेवेच्या बदल्यात मिळणारा आर्थिक मोबदला म्हणजे काय -
❶ पगार
❷ फी
❸ नफा
भूगर्भातून संपत्ती मिळवणारा उद्योगाचा प्रकार म्हणजे काय -
❶ निष्कर्षण उद्योग
❷ जैविक उद्योग
❸ बांधकाम उद्योग
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
