वर्धा जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Wardha District General Knowledge Questions
वर्धा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Wardha District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर वर्धा जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Wardha District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
वर्धा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नागपूर
स्पष्टीकरण : 1862 मध्ये नागपूर जिल्ह्याच्या विभाजनातून वर्धा जिल्हा तयार झाला.
वर्धा जिल्ह्याचे प्राचीन नाव कोणते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पालकवाडी
स्पष्टीकरण : वर्धा भागाला पूर्वी पालकवाडी म्हणून ओळखले जात असे.
महात्मा गांधींनी 1936 मध्ये वर्धा जिल्ह्यात कुठे आश्रम स्थापन केला ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सेवाग्राम
स्पष्टीकरण :
1936 मध्ये सेवाग्राम येथे गांधीजींनी आश्रम स्थापन केला.
विनोबा भावे यांनी परंधाम आश्रम कोणत्या नदीकाठी स्थापन केला ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धाम नदी
स्पष्टीकरण : धाम नदीच्या काठावर 1934 मध्ये आश्रम स्थापन झाला.
वर्धा जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गांधी जिल्हा
स्पष्टीकरण : गांधीजींच्या कार्यामुळे वर्धा प्रसिद्ध आहे.
वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर विभाग
स्पष्टीकरण : वर्धा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो.
वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ६,३१० चौ.किमी
स्पष्टीकरण : वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ६,३१० चौ.किमी आहे.
वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2%
स्पष्टीकरण : वर्धा जिल्हा महाराष्ट्राच्या सुमारे 2% क्षेत्रफळ व्यापतो.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने वर्धा जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 24 व्या
स्पष्टीकरण : क्षेत्रफळानुसार वर्धा 24 व्या क्रमांकावर आहे.
वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | समुद्रपूर
स्पष्टीकरण : क्षेत्रफळानुसार समुद्रपूर सर्वात मोठा तालुका आहे.
वर्धा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | आष्टी
स्पष्टीकरण : आष्टी हा सर्वात लहान तालुका आहे.
वर्धा जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | समुद्रपूर
स्पष्टीकरण : समुद्रपूर हा पूर्वेकडील तालुका आहे.
वर्धा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हिंगणघाट
स्पष्टीकरण : हिंगणघाट दक्षिणेकडे स्थित आहे.
वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वर्धा
स्पष्टीकरण : वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
वर्धा जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 8
स्पष्टीकरण : वर्धा जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत.
खालीलपैकी कोणता तालुका वर्धा जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वरूड
स्पष्टीकरण : वरूड हा अमरावती जिल्ह्यात येतो.
वर्धा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | विदर्भ
स्पष्टीकरण : वर्धा हा विदर्भ विभागात आहे.
वर्धा जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4
स्पष्टीकरण : वर्धा जिल्ह्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गडचिरोली
स्पष्टीकरण : गडचिरोली जिल्ह्याची सीमा वर्धाला लागत नाही.
वर्धा जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर
स्पष्टीकरण : वर्धाच्या उत्तरेला नागपूर आहे.
वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | यवतमाळ
स्पष्टीकरण : दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आहे.
वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम व वायव्य दिशेला कोणती नदी सीमा बनवते?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वर्धा नदी
स्पष्टीकरण : वर्धा नदी नैसर्गिक सीमा तयार करते.
वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांची सीमा कोणती नदी ठरवते?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वर्धा नदी
स्पष्टीकरण : ही नदी दोन्ही जिल्ह्यांची सीमा आहे.
2011 च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 13,00,774
स्पष्टीकरण : 2011 जनगणनेनुसार ही लोकसंख्या आहे.
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत वर्धा जिल्ह्याचा वाटा किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.15%
स्पष्टीकरण : वर्धाचा लोकसंख्या वाटा सुमारे 1.15% आहे.
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वर्धा
स्पष्टीकरण : वर्धा तालुक्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | आष्टी
स्पष्टीकरण : आष्टी तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे.
वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 206
स्पष्टीकरण : प्रति चौ.कि.मी. 206 लोकसंख्या आहे.
वर्धा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 946
स्पष्टीकरण : 1000 पुरुषांमागे 946 महिला आहेत.
वर्धा जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 86.9%
स्पष्टीकरण : 2011 नुसार साक्षरता 86.9% आहे.
वर्धा जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 67.4%
स्पष्टीकरण : ग्रामीण लोकसंख्या सुमारे 67.4% आहे.
वर्धा जिल्ह्यात शहरी लोकसंख्या किती टक्के आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 32.5%
स्पष्टीकरण : शहरी लोकसंख्या सुमारे 32.5% आहे.
0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर किती आहे?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 919
स्पष्टीकरण : बाल लिंग गुणोत्तर 919 आहे.
महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले वर्धा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
