Police Bharti 100 Marks Online Test | पोलीस भरती विशेष 100 गुणांची सराव टेस्ट सिरीज
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यासाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 100
🔰 गुण : 100
⏲️ वेळ : 90 मिनिटे
'नीलकंठ' या शब्दाचा अर्थ ओळखा ?
❶ परशुराम
❷ राम
❸ शंकर
❹ श्रीकृष्ण
'संहार' हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?
❶ सामासिक
❷ सिद्ध
❸ उपसर्गयुक्त
❹ अभ्यस्त
'पिकलेला' हे कोणते विशेषण आहे ?
❶ गुणविशेषण
❷ संख्याविशेषण
❸ अधिविशेषण
❹ विधिविशेषण
'धोंडा' या शब्दाचा प्रकार कोणता आहे ?
❶ तत्सम
❷ तद्भव
❸ परभाषिक
❹ देशी
'तुम्ही गप्प बसा' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ प्रश्नार्थी
❷ उद्गारार्थी
❸ आज्ञार्थी
❹ संकेतार्थी
'सुरेश अहोरात्र काम करतो' या वाक्यातील विधेय विभाग ओळखा ?
❶ सुरेश काम करतो
❷ सुरेश अहोरात्र काम करतो
❸ अहोरात्र काम करतो
❹ काम करतो
'आपण त्यांच्याकडे जायला नको का ?' (विधानार्थी वाक्य करा)
❶ आपण त्यांच्याकडे जायला नको
❷ आपण त्यांच्याकडे का जावे
❸ आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे
❹ आपण त्यांच्याकडे जाऊ या
'बस आली तर मी जाईन' वाक्याचा प्रकार ओळखा ?
❶ प्रश्नार्थी
❷ विध्यर्थी
❸ विधानार्थी
❹ आज्ञार्थी
सीता वनवासात खूप दिवस राहिली – 'राहिली' या शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा ?
❶ उद्देश
❷ उद्देश विस्तार
❸ कर्म
❹ क्रियापद
कोणत्या शब्दास तत्सम म्हणावे ?
❶ मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल न झालेला शब्द
❷ मूळ संस्कृत रूपात बदल झालेला शब्द
❸ मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागलेला शब्द
❹ मूळ संस्कृत शब्दाची संधी झालेला शब्द
भारतीय राज्यघटनेने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान केले आहे ?
❶ दुहेरी नागरिकत्व
❷ एकेरी नागरिकत्व
❸ बहुविध नागरिकत्व
❹ तात्पुरते नागरिकत्व
संसदेचे 'कनिष्ठ सभागृह' कोणते आहे ?
❶ राज्यसभा
❷ विधानपरिषद
❸ लोकसभा
❹ विधानसभा
भारताचे 'नियंत्रक व महालेखापरीक्षक' (CAG) यांची नियुक्ती कोण करतो ?
❶ वित्त मंत्री
❷ पंतप्रधान
❸ राष्ट्रपती
❹ संसद
राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात ?
❶ मुख्यमंत्री
❷ राष्ट्रपती
❸ मुख्य न्यायाधीश
❹ विधानसभा अध्यक्ष
मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास कोठे दाद मागता येते ?
❶ केवळ पोलीस स्टेशनमध्ये
❷ केवळ संसदेत
❸ सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात
❹ राष्ट्रपतींकडे
भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली ?
❶ 26 नोव्हेंबर 1949
❷ 26 जानेवारी 1950
❸ 15 ऑगस्ट 1947
❹ 26 जानेवारी 1949
भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ?
❶ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ डॉ. राजेंद्र प्रसाद
❹ सरदार वल्लभभाई पटेल
भारतीय राज्यघटनेतील 'कलम 370' कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
❶ सिक्कीम
❷ नागालँड
❸ जम्मू आणि काश्मीर
❹ आसाम
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ पंतप्रधान
❸ उपराष्ट्रपती
❹ लोकसभा सभापती
भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणास मानले जाते ?
❶ संसद
❷ राष्ट्रपती
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ पंतप्रधान
'एक गाव एक पाणवठा' ही मोहीम कोणी सुरू केली होती ?
❶ महात्मा गांधी
❷ बाबा आमटे
❸ डॉ. बाबा आढाव
❹ साने गुरुजी
बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी केली ?
❶ 26 जानेवारी 1952
❷ 16 जानेवारी 1957
❸ 10 जानेवारी 1958
❹ 15 जानेवारी 1959
पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 3 वर्षे
❷ 4 वर्षे
❸ 5 वर्षे
❹ 6 वर्षे
ग्रामपंचायतीचा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
❶ तहसीलदार
❷ ग्रामसेवक
❸ सरपंच
❹ जिल्हाधिकारी
महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 5 वर्षे
❷ 6 वर्षे
❸ 3 वर्षे
❹ 4 वर्षे
संत गाडगे बाबांचे पूर्ण नाव काय होते ?
❶ डेबूजी झिंगराजी जाणोरकर
❷ माणिक बंडोजी इंगळे
❸ रामजी सापाजी जाणोरकर
❹ यांपैकी नाही
'अमृत बाजार पत्रिका' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
❶ शिशिर कुमार घोष
❷ लोकमान्य टिळक
❸ मोतीलाल नेहरू
❹ लाला लजपत राय
भारताचे 'मार्टिन ल्यूथर किंग' कोणाला म्हणतात ?
❶ स्वामी विवेकानंद
❷ महात्मा जोतिराव फुले
❸ राजर्षी शाहू महाराज
❹ डॉ. बी. आर. आंबेडकर
सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कशाने झाली ?
❶ दांडी यात्रा
❷ वैयक्तिक सत्याग्रह
❸ असहकार ठराव
❹ सायमन गो बॅक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'धम्मचक्र प्रवर्तन' कोठे केले ?
❶ मुंबई
❷ नागपूर
❸ महाड
❹ येवला
मुघलांच्या काळात 'जहांगीर' कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होता ?
❶ वास्तुकला
❷ संगीत
❸ चित्रकला
❹ साहित्य
बीबी का मकबरा कोणी बांधला ?
❶ अकबर
❷ शाहजहान
❸ आझम शाह
❹ बहादुर शाह प्रथम
प्राचीन भारतातील 16 महाजनपदांमध्ये दक्षिणेकडील एकमेव महाजनपद कोणते होते ?
❶ अवंती
❷ वत्स
❸ अश्मक
❹ मगध
'पाटलीपुत्र' शहराचा संस्थापक कोण होता ?
❶ बिंबिसार
❷ अजातशत्रु
❸ उदयिन
❹ धनानंद
सिकंदराने पोरास राजाला कोणत्या लढाईत हरवले ?
❶ तराईनची लढाई
❷ झेलमची लढाई
❸ चनवाळची लढाई
❹ बक्सारची लढाई
'नागपूर' हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
❶ द्राक्षे
❷ संत्री
❸ चिकू
❹ आंबा
महाराष्ट्रातील 'मिठागरांचा जिल्हा' कोणता ?
❶ रत्नागिरी
❷ सिंधुदुर्ग
❸ रायगड
❹ मुंबई
भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ तामिळनाडू
❸ गुजरात
❹ आंध्र प्रदेश
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त वने आहेत ?
❶ गडचिरोली
❷ चंद्रपूर
❸ गोंदिया
❹ रत्नागिरी
'जगाचे छप्पर' कोणास म्हणतात ?
❶ हिमालय
❷ पामीरचे पठार
❸ सह्याद्री
❹ अरवली
भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ?
❶ 80° पू.
❷ 82.5° पू.
❸ 85° पू.
❹ 90° पू.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती ?
❶ अजिंठा
❷ वेरूळ
❸ पितळखोरे
❹ कार्ला-भाजे
महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता ?
❶ मुंबई उपनगर
❷ मुंबई शहर
❸ हिंगोली
❹ वाशीम
जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
❶ ॲमेझॉन
❷ नाईल
❸ मिसिसिपी
❹ गंगा
'पोंगल' हा सण प्रामुक्ताने कोणत्या राज्यात साजरा होतो ?
❶ केरळ
❷ तमिळनाडू
❸ कर्नाटक
❹ तेलंगणा
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य द्रव अवस्थेत आढळते ?
❶ सोडियम
❷ मॅग्नेशियम
❸ ब्रोमीन
❹ गंधक
सूर्यप्रकाशाचा कोणता भाग उष्णता निर्माण करतो ?
❶ अतिनील किरणे
❷ दृश्य प्रकाश
❸ इन्फ्रारेड (अवरक्त) किरणे
❹ क्ष-किरण
रक्तातील गुठळ्या शोधण्यासाठी कोणत्या आयसोतोपचा वापर करतात ?
❶ कोबाल्ट-60
❷ सोडियम-24
❸ आयोडीन-131
❹ कार्बन-14
'मायोपिया' (Myopia) म्हणजे काय ?
❶ दूरदृष्टीता
❷ निकटदृष्टीता
❸ तिरळेपणा
❹ मोतिबिंदू
तागाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?
❶ भारत
❷ बांगलादेश
❸ चीन
❹ ब्राझील
बटाट्यावर पडणारा 'ब्लॅक हार्ट' हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
❶ नायट्रोजन
❷ पोटॅशियम
❸ ऑक्सिजन
❹ तांबे
हायड्रोजनचा शोध कोणी लावला ?
❶ हेन्री कॅव्हेंडिश
❷ प्रीस्टले
❸ लॅव्हायझिए
❹ डाल्टन
मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती ?
❶ महाधमनी
❷ पल्मोनरी धमनी
❸ कॅरोटीड धमनी
❹ कोरोनरी धमनी
फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?
❶ मिथेन
❷ इथिलीन
❸ ऑक्सिजन
❹ कार्बन डायऑक्साइड
मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?
❶ 1000 ग्रॅम
❷ 1300 ते 1400 ग्रॅम
❸ 500 ग्रॅम
❹ 2000 ग्रॅम
भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1872
❷ 1881
❸ 1901
❹ 1951
'मानव विकास निर्देशांक' (HDI) ही संकल्पना कोणी मांडली ?
❶ अमर्त्य सेन
❷ महबूब-उल-हक
❸ मनमोहन सिंग
❹ अरविंद पणगारीया
बँकांच्या चेकवर असणारा 9 अंकी क्रमांक कशाशी संबंधित असतो ?
❶ IFSC
❷ MICR
❸ SWIFT
❹ PAN
'शेषाद्री समिती' कशाशी संबंधित आहे ?
❶ बँकिंग सुधारणा
❷ विमा क्षेत्र
❸ कृषी सुधारणा
❹ कर सुधारणा
भारतात सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती ?
❶ बँक ऑफ बडोदा
❷ स्टेट बँक ऑफ इंडिया
❸ पंजाब नॅशनल बँक
❹ एचडीएफसी बँक
'फेमा' हा कायदा कशाशी संबंधित आहे ?
❶ कामगार कायदे
❷ विदेशी चलन व्यवस्थापन
❸ बँकिंग सुधारणा
❹ कृषी उत्पन्न
भारतात 'आर्थिक वर्ष' कोणत्या कालावधीत असते ?
❶ 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
❷ 1 मार्च ते 28 फेब्रुवारी
❸ 1 एप्रिल ते 31 मार्च
❹ 1 मे ते 30 एप्रिल
जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
❶ लंडन
❷ वॉशिंग्टन डी.सी.
❸ रोम
❹ टोकियो
अर्थशास्त्रामध्ये 'मागणीचा नियम' काय सांगतो ?
❶ किंमत वाढली की मागणी वाढते
❷ किंमत वाढली की मागणी घटते
❸ किमतीचा मागणीवर परिणाम होत नाही
❹ मागणी वाढली की किंमत कमी होते
'अर्थशास्त्राचे जनक' कोणाला म्हटले जाते ?
❶ कार्ल मार्क्स
❷ अॅडम स्मिथ
❸ जे. एम. केन्स
❹ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पोलीस प्रशासनाच्या प्रशासकीय कारभारासाठी राज्याची किती परिक्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे
❶ 8
❷ 13
❸ 36
❹ 19
भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे
❶ CCTNS
❷ CCAAS
❸ CCNST
❹ CNSET
राज्य राखीव पोलीस दलाच्या परिक्षेत्राच्या प्रमुखपदी कोणत्या दर्जाचे अधिकारी असतात
❶ पोलीस महासंचालक
❷ पोलीस अधीक्षक
❸ पोलीस महानिरीक्षक
❹ विशेष पोलीस महानिरीक्षक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) चे मुख्यालय कोठे आहे
❶ नाशिक
❷ पुणे
❸ मुंबई (कफ परेड)
❹ नागपूर
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही
❶ जालना
❷ नांदेड
❸ अकोला
❹ धुळे
एका संख्येचा 25% जर 75 असेल, तर ती संख्या कोणती ?
❶ 150
❷ 300
❸ 200
❹ 400
5, 8, 12, 17, 23, ? या मालिकेतील पुढील संख्या ओळखा .
❶ 30
❷ 28
❸ 35
❹ 32
₹ 5000 वर द.सा.द.शे. 10% दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती होईल ?
❶ ₹ 800
❷ ₹ 500
❸ ₹ 1000
❹ ₹ 1250
एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 24 चौ.सेमी.
❷ 48 चौ.सेमी.
❸ 121 चौ.सेमी.
❹ 144 चौ.सेमी.
150 चे 40% किती ?
❶ 50
❷ 60
❸ 70
❹ 80
8 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 5 मजूर किती दिवसात करतील ?
❶ 32 दिवस
❷ 25 दिवस
❸ 40 दिवस
❹ 30 दिवस
दोन संख्यांचा गुणाकार 720 आहे आणि त्यांचा म.सा.वि. 6 असल्यास ल.सा.वि. किती ?
❶ 120
❷ 100
❸ 60
❹ 180
0.5 × 0.5 × 0.5 = ?
❶ 0.25
❷ 1.25
❸ 0.125
❹ 0.0125
एका आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 8 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
❶ 18 सेमी
❷ 80 सेमी
❸ 36 सेमी
❹ 40 सेमी
एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द DBU असा लिहिला जातो, तर DOG हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ EPH
❷ EOH
❸ FPH
❹ ENH
मालिका पूर्ण करा : 2, 4, 8, 16, 32 ------------
❶ 48
❷ 60
❸ 64
❹ 72
एका रांगेत अजयचा क्रमांक दोन्ही बाजूंकडून 15 वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 30
❷ 29
❸ 31
❹ 28
घड्याळात 3:00 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?
❶ 45°
❷ 60°
❸ 90°
❹ 180°
नातेसंबंध ओळखा : 'A' हा 'B' चा भाऊ आहे, 'C' ही 'A' ची आई आहे, तर 'C' चे 'B' शी नाते काय ?
❶ मुलगा
❷ मुलगी
❸ आई
❹ भाऊ
गाळलेली संख्या भरा : 5, 10, 17, 26, ?
❶ 35
❷ 37
❸ 39
❹ 41
जर 'लाल'ला 'हिरवा' म्हटले, 'हिरव्या'ला 'निळा' म्हटले आणि 'निळ्या'ला 'पांढरा' म्हटले, तर आकाशाचा रंग कोणता ?
❶ निळा
❷ हिरवा
❸ लाल
❹ पांढरा
दिशा ओळखा : एक व्यक्ती उत्तरेकडे 5 किमी चालत गेली, नंतर उजवीकडे वळून 4 किमी चालली, तर ती आता कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे ?
❶ उत्तर
❷ दक्षिण
❸ पूर्व
❹ पश्चिम
मालिका पूर्ण करा : ABC : ZYX :: DEF : ---------------
❶ WVU
❷ WUV
❸ UVW
❹ VUT
एका सांकेतिक भाषेत 73541 म्हणजे 'DELHI', आणि 82589662 म्हणजे CALCUTTA तर 8251896 हा कोणत्या शब्दाचा संकेत असू शकतो ?
❶ CULUTT
❷ CULCTA
❸ CALCUT
❹ CALCTA
आज सोमवार आहे, तर 61 दिवसांनंतर कोणता वार असेल ?
❶ मंगळवार
❷ शनिवार
❸ रविवार
❹ शुक्रवार
एका गावाची लोकसंख्या सुरुवातीस 1000 होती. दरवर्षी त्यात 10% वाढ झाल्यास तीन वर्षांनी लोकसंख्या किती होईल ?
❶ 1300
❷ 1331
❸ 1400
❹ 1210
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौ.से.मी. आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती ?
❶ 64 से.मी.
❷ 60 से.मी.
❸ 16 से.मी.
❹ 32 से.मी.
एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
❶ 75
❷ 50
❸ 25
❹ 20
'अ' हा 'ब' पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 30 वर्षे असल्यास 'अ' चे वय किती ?
❶ 25 वर्षे
❷ 5 वर्षे
❸ 10 वर्षे
❹ 15 वर्षे
सकाळी 7:00 ला घड्याळ बरोबर लावले, तर तासाला 2 मिनिटे पुढे जाणाऱ्या घड्याळात सकाळी 11:00 ला किती वाजले असतील ?
❶ 11:04
❷ 11:10
❸ 11:08
❹ 11:02
एक दुकानदार 10 रुपयांना एक पेन विकून 100% नफा कमावतो, तर 650 रुपये नफा कमविण्यासाठी त्याने किती पेन विकले पाहिजेत ?
❶ 65
❷ 130
❸ 100
❹ 150
90 मी. लांबीची रेल्वे एक खांब 8 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती ?
❶ 45.5 कि.मी./तास
❷ 40.5 कि.मी./तास
❸ 35.5 कि.मी./तास
❹ 50.5 कि.मी./तास
8 से.मी. बाजू असणाऱ्या घनाचे प्रत्येकी 2 से.मी. बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील ?
❶ 16
❷ 32
❸ 64
❹ 128
GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा ?
❶ गुगल पॅकेट रेडिओ सर्विस
❷ जनरल पोलार रेडिएशन सर्विस
❸ जनरल प्रायमरी रेडिओ सर्विस
❹ जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
पर्यावरणाच्या दृष्टीने '3 आर' म्हणजे काय ?
❶ Read, Record, Recall
❷ Reduce, Reuse, Recycle
❸ Remove, Repair, Replace
❹ Rapid, Real, Right
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Question : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questios -
0
Wrong Questions -
0
Your Score : 0 / 0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|

57273200
ReplyDelete789657
ReplyDelete15399200
ReplyDelete57273201
ReplyDelete