चंद्रपूर जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Chandrapur District Gk Question in Marathi

चंद्रपूर जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Chandrapur District General Knowledge Questions

चंद्रपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Chandrapur District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Chandrapur District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Chandrapur District Important Questions,Chandrapur District GK,Chandrapur Chandrapur District MCQ, चंद्रपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Chandrapur District General Knowledge,Exam Wise Keywords,Chandrapur District MCQ for MPSC,Chandrapur District Questions Police Bharti,Chandrapur District GK Talathi Exam,Chandrapur District ZP Exam Questions, चंद्रपूर जिल्हा सामान्य ज्ञान, चंद्रपूर जिल्हा प्रश्नोत्तरे, चंद्रपूर जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ गडचिरोली

❷ नागपूर

❸ वर्धा

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
👉 चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती ही कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून झालेली नाही,चंद्रपूर जिल्हा स्वतः मूळचा मध्यप्रांत व बेरार चा भाग होता, जो 1956 मध्ये बॉम्बे स्टेटमध्ये आणि नंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
◾ लक्षात ठेवा - चंद्रपूर हे नाव प्रचलित असलेला हा जिल्हा प्राचीन काळी “लोकापूरा” या नावाने ओळखला जात असे . याचेच नामांतर काही काळानंतर “इंद्रपूर” आणि त्यानंतर “ चंद्रपूर ” असे झाले .
ब्रिटिश कारकिर्दीत हा जिल्हा 'चांदा' या नावाने ओळखले जात असे . 1964 मध्ये याचे नाव अधिकृतपणे 'चंद्रपूर' करण्यात आले
चंद्रपूरला 'काळ्या सोन्याची भूमी' (Land of Black Gold) असेही म्हणतात, कारण येथे मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत.
तसेच, येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखला जातो


Question : 2

चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (चंद्रपूर शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ वैनगंगा

❷ इरई

❸ कन्हान

❹ वर्धा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | इरई


Question : 3

चंद्रपूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ चांदा

❷ नंदीवर्धन

❸ वैरागढ

❹ भनारा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चांदा
चंद्रपूर जिल्ह्याचे प्राचीन नाव 'चांदा' होते . 1964 च्या सुमारास हे नाव अधिकृतपणे बदलून 'चंद्रपूर' करण्यात आले
या भागाला लोकापूर, इंद्रपूर आणि नंतर चांदा अशी नावे होती
13 व्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळशहा यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केली
26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली


Question : 4

चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 10,210 चौ.किमी.

❷ 11,443 चौ.किमी.

❸ 12,520 चौ.किमी.

❹ 14,100 चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 11,443 चौ.किमी.


Question : 5

चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 2.5 %

❷ 3.2 %

❸ 4.5 %

❹ 5.5 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.2 %


Question : 6

चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 9 व्या

❷ 12 व्या

❸ 15 व्या

❹ 18 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 9 व्या


Question : 7

क्षेत्रफळाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ चंद्रपूर

❷ वरोरा

❸ राजुरा

❹ मूल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चंद्रपूर


Question : 8

क्षेत्रफळाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ जिवती

❷ बल्लारपूर

❸ कोरपना

❹ सावली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बल्लारपूर


Question : 9

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ वरोरा

❷ चंद्रपूर

❸ बल्लारपूर

❹ राजुरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | चंद्रपूर


Question : 10

चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ अमरावती

❷ नागपूर

❸ नाशिक

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर


Question : 11

चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ मराठवाडा

❸ खानदेश

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | विदर्भ


Question : 12

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 12

❷ 15

❸ 14

❹ 16

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 15


Question : 13

खालीलपैकी कोणता तालुका चंद्रपूर जिल्ह्यात येत नाही ?

❶ चिमूर

❷ कोरपना

❸ मुलचेरा

❹ सिंदेवाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मुलचेरा
मुलचेरा हा गडचिरोली जिल्ह्यातील तालुका आहे
◾ जिल्ह्यातील 15 तालुके : 1. चंद्रपूर, 2. वरोरा, 3. भद्रावती, 4. चिमूर, 5. नागभीड, 6. ब्रह्मपुरी, 7. सिंदेवाही, 8. सावली, 9. मूल, 10. पोंभुर्णा, 11. बल्लारपूर, 12. गोंडपिपरी, 13. राजुरा, 14. कोरपना, 15. जिवती
◾ महानगरपालिका : चंद्रपूर शहर महानगरपालिका
विशेष ओळख : हा जिल्हा 'काळ्या सोन्याची भूमी' (कोळसा खाणींमुळे) म्हणून ओळखला जातो


Question : 14

चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5
चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत
◾ उत्तर : नागपूर आणि भंडारा
◾ पश्चिम : वर्धा आणि यवतमाळ
◾ पूर्व : गडचिरोली (वैनगंगा नदीची नैसर्गिक सीमा)
◾ दक्षिण : तेलंगणा राज्य
वर्धा नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर (यवतमाळ सोबत) आणि वैनगंगा नदी पूर्व सीमेवर (गडचिरोली सोबत) नैसर्गिक सीमा तयार करते
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 रोजी 'गडचिरोली' हा नवीन जिल्हा निर्माण झाला


Question : 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याला लागून नाही ?

❶ वर्धा

❷ यवतमाळ

❸ भंडारा

❹ वाशिम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वाशिम


Question : 16

2011 च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 20,51,200

❷ 22,04,307

❸ 18,10,450

❹ 25,15,600

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 22,04,307


Question : 17

2011 च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे ?

❶ 150

❷ 193

❸ 210

❹ 175

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 193


Question : 18

चंद्रपूर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 945

❷ 950

❸ 961

❹ 970

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 961


Question : 19

चंद्रपूर जिल्ह्याची पश्चिम नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

❶ वैनगंगा

❷ वर्धा

❸ पैनगंगा

❹ इरई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वर्धा


Question : 20

चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर गडचिरोली जिल्ह्याला चंद्रपूर पासून नैसर्गिकरीत्या वेगळी करणारी नदी कोणती ?

❶ वर्धा

❷ कन्हान

❸ वैनगंगा

❹ अंधारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वैनगंगा


Question : 21

चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर कोणत्या टेकड्यांची रांग आढळते ?

❶ चिमूर-नागभीड टेकड्या

❷ सातपुडा रांगा

❸ भामरागड डोंगर

❹ सातमाळा डोंगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चिमूर-नागभीड टेकड्या


Question : 22

चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमेवर वर्धा नदीला येऊन मिळणारी महत्त्वाची नदी कोणती ?

❶ इरई

❷ पैनगंगा

❸ झरपट

❹ मूल नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पैनगंगा


Question : 23

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या चंद्रपूर जिल्ह्याची आहे ?

❶ 1.96%

❷ 2.50%

❸ 3.10%

❹ 1.20%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.96%


Question : 24

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ वरोरा

❷ राजुरा

❸ चंद्रपूर

❹ ब्रह्मपुरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | चंद्रपूर


Question : 25

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ पोंभुर्णा

❷ जिवती

❸ कोरपना

❹ सावली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पोंभुर्णा


Question : 26

चंद्रपूर जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 75%

❷ 80%

❸ 82%

❹ 70%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 80%


Question : 27

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 55%

❷ 64%

❸ 70%

❹ 45%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 64%


Question : 28

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 25%

❷ 35%

❸ 40%

❹ 30%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 35%


Question : 29

चंद्रपूर जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 930

❷ 940

❸ 953

❹ 920

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 953



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले चंद्रपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post