भंडारा जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Bhandara District Gk Question in Marathi

भंडारा जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Bhandara District General Knowledge Questions

भंडारा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Bhandara District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर भंडारा जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Bhandara District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

bhandara District Important Questions,bhandara District GK, Bhandara District MCQ, भंडारा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,bhandara District General Knowledge,Exam Wise Keywords, District MCQ for MPSC,bhandara District Questions Police Bharti,bhandara District GK Talathi Exam,bhandara District ZP Exam Questions, भंडारा जिल्हा सामान्य ज्ञान, भंडारा जिल्हा प्रश्नोत्तरे, भंडारा जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

भंडारा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ नागपूर

❷ गोंदिया

❸ चंद्रपूर

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
भंडारा जिल्हा हा जिल्हा मूळतः मध्य प्रांत आणि बेरार काळात अस्तित्वात होता
महत्त्वाचा मुद्दा : भंडारा जिल्ह्याची निर्मिती कोणत्याही इतर जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आलेली नाही. तो ब्रिटिश काळात स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात होता आणि पुढे राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात समाविष्ट झाला
👉 1 मे 1999 साली भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा तयार करण्यात आला


Question : 2

भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ वर्धा

❷ वैनगंगा

❸ कन्हान

❹ बावनथडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वैनगंगा


Question : 3

भंडारा जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ भनारा

❷ वैरागढ

❸ नंदीग्राम

❹ चंदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भनारा


Question : 4

भंडारा जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी करण्यात आली ?

❶ गडचिरोली

❷ गोंदिया

❸ वाशिम

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोंदिया


Question : 5

'तलावांचा जिल्हा' म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

❶ ठाणे

❷ भंडारा

❸ सातारा

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भंडारा


Question : 6

भंडारा जिल्ह्यावर कोणत्या राजघराण्याचे प्रदीर्घ काळ राज्य होते ?

❶ सातवाहन

❷ मोगल

❸ गोंड राजे

❹ निजाम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोंड राजे


Question : 7

भंडारा जिल्ह्यातील 'पवनी' हे प्राचीन शहर कोणत्या धर्माच्या स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे ?

❶ जैन धर्म

❷ बौद्ध धर्म

❸ शिख धर्म

❹ पारशी धर्म

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बौद्ध धर्म
भंडारा जिल्ह्यातील पवनी हे प्राचीन शहर बौद्ध धर्माच्या स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे
हे शहर सम्राट अशोकाच्या काळापासून बुद्ध संस्कृतीचे मुख्य केंद्र मानले जाते, जिथे जगन्नाथ टेकडी, चांदकापूर टेकडी आणि हरदोला टेकडी या ठिकाणी बौद्ध स्तूपांचे अवशेष व उत्खननात प्राचीन बौद्ध शिल्पे सापडली आहेत


Question : 8

ब्रिटीशांनी भंडारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व कधी प्रस्थापित केले ?

❶ 1818

❷ 1853

❸ 1885

❹ 1901

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1818


Question : 9

भंडारा जिल्ह्यातील 'अंबागड किल्ला' कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ पवनी

❷ तुमसर

❸ मोहाडी

❹ लाखनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तुमसर


Question : 10

1956 पूर्वी भंडारा जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता ?

❶ बॉम्बे स्टेट

❷ मध्य प्रदेश

❸ हैदराबाद स्टेट

❹ मद्रास स्टेट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मध्य प्रदेश


Question : 11

भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ अमरावती

❷ नागपूर

❸ पुणे

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर


Question : 12

भंडारा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 3,895 चौ.किमी.

❷ 4,087 चौ.किमी.

❸ 5,210 चौ.किमी.

❹ 6,120 चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4,087 चौ.किमी.


Question : 13

भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे ?

❶ 1.33 %

❷ 2.50 %

❸ 3.12 %

❹ 0.95 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.33 %


Question : 14

भंडारा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 15 व्या

❷ 22 व्या

❸ 34 व्या

❹ 10 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 34 व्या


Question : 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ साकोली

❷ पवनी

❸ तुमसर

❹ लाखांदूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | तुमसर


Question : 16

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ मोहाडी

❷ लाखनी

❸ भंडारा

❹ पवनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | लाखनी


Question : 17

भंडारा जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ साकोली

❷ लाखांदूर

❸ तुमसर

❹ भंडारा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | साकोली


Question : 18

भंडारा जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ भंडारा

❷ मोहाडी

❸ पवनी

❹ साकोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भंडारा


Question : 19

भंडारा जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ तुमसर

❷ मोहाडी

❸ भंडारा

❹ साकोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तुमसर


Question : 20

भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ तुमसर

❷ पवनी

❸ भंडारा

❹ साकोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | भंडारा


Question : 21

भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 5

❷ 7

❸ 8

❹ 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 7


Question : 22

खालीलपैकी कोणता तालुका भंडारा जिल्ह्यात येत नाही ?

❶ मोहाडी

❷ लाखनी

❸ तिरोडा

❹ लाखांदूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | तिरोडा (हा गोंदिया जिल्ह्यात आहे)


Question : 23

भंडारा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?

❶ 3

❷ 5

❸ 7

❹ 4

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 3 (भंडारा, तुमसर, साकोली)


Question : 24

भंडारा जिल्हा कोणत्या लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे ?

❶ नागपूर

❷ भंडारा-गोंदिया

❸ चंद्रपूर

❹ गडचिरोली-चिमूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भंडारा-गोंदिया


Question : 25

भंडारा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या आहेत ?

❶ 6

❷ 7

❸ 8

❹ 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 7


Question : 26

भंडारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 3

❷ 4

❸ 5

❹ 6

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4


Question : 27

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्याला लागून नाही ?

❶ नागपूर

❷ चंद्रपूर

❸ वर्धा

❹ गोंदिया

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वर्धा


Question : 28

भंडारा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी स्पर्श करते ?

❶ नागपूर

❷ चंद्रपूर

❸ गोंदिया

❹ गडचिरोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गडचिरोली


Question : 29

भंडारा जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची किंवा राज्याची सीमा स्पर्श करत नाही ?

❶ लाखनी

❷ साकोली

❸ मोहाडी

❹ तुमसर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लाखनी


Question : 30

भंडारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेला कोणत्या राज्याची सरहद्द लागून आहे ?

❶ छत्तीसगड

❷ मध्य प्रदेश

❸ तेलंगणा

❹ गुजरात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मध्य प्रदेश


Question : 31

भंडारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ गोंदिया

❷ नागपूर

❸ चंद्रपूर

❹ गडचिरोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर


Question : 32

भंडारा जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ गडचिरोली

❷ नागपूर

❸ गोंदिया

❹ चंद्रपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोंदिया


Question : 33

भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ चंद्रपूर

❷ यवतमाळ

❸ वर्धा

❹ वाशिम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चंद्रपूर


Question : 34

भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे ?

❶ तुमसर

❷ मोहाडी

❸ पवनी

❹ लाखनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तुमसर


Question : 35

लाखांदूर या तालुक्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला स्पर्श करत नाही ?

❶ नागपूर

❷ गोंदिया

❸ गडचिरोली

❹ चंद्रपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नागपूर


Question : 36

भंडारा जिल्ह्याची उत्तर नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या डोंगररांगांनी निश्चित केली आहे ?

❶ सातपुडा पर्वतरांगा

❷ अजिंठा रांगा

❸ बालाघाट रांगा

❹ सह्याद्री रांगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सातपुडा पर्वतरांगा


Question : 37

जिल्ह्याच्या मध्यभागातून उत्तर-दक्षिण दिशेने वाहणारी मुख्य नदी कोणती ?

❶ कन्हान

❷ वैनगंगा

❸ चूलबंद

❹ पांगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वैनगंगा


Question : 38

वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यात उत्तर दिशेकडून कोणत्या तालुक्यातून प्रवेश करते ?

❶ तुमसर

❷ साकोली

❸ लाखांदूर

❹ लाखनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तुमसर


Question : 39

भंडारा जिल्ह्याची भौगोलिक रचना प्रामुख्याने कोणत्या खोऱ्याचा भाग आहे ?

❶ तापी खोरे

❷ वैनगंगा खोरे

❸ नर्मदा खोरे

❹ गोदावरी खोरे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वैनगंगा खोरे


Question : 40

2011 च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 10,50,450

❷ 12,00,334

❸ 11,35,835

❹ 14,20,120

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 12,00,334


Question : 41

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या जिल्ह्याची आहे ?

❶ 1.01%

❷ 2.10%

❸ 0.95%

❹ 1.50%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.01%


Question : 42

2011 च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ साकोली

❷ तुमसर

❸ भंडारा

❹ पवनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | भंडारा


Question : 42

2011 च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ लाखांदूर

❷ लाखनी

❸ मोहाडी

❹ पवनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लाखांदूर


Question : 44

भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) प्रति चौरस किमी किती आहे ?

❶ 250

❷ 294

❸ 315

❹ 210

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 294


Question : 45

भंडारा जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 950

❷ 982

❸ 943

❹ 965

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 982


Question : 46

भंडारा जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ?

❶ 75.5%

❷ 83.8%

❸ 88.2%

❹ 70.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 83.8%


Question : 47

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 70%

❷ 81%

❸ 85%

❹ 65%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 81%


Question : 48

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 30%

❷ 19%

❸ 15%

❹ 25%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 19%


Question : 49

भंडारा जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 930

❷ 920

❸ 950

❹ 940

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 950


Question : 50

भंडारा जिल्ह्यात एकूण किती कि.मी लांबीचे लोहमार्ग आहेत ?

❶ 180 कि.मी

❷ 120 कि.मी

❸ 140 कि.मी

❹ 210 कि.मी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 140 कि.मी



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले भंडारा जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post