पोलीस पाटील भरती - Beed District GK Questions in Marathi | बीड जिल्हा सामान्य ज्ञान

पोलीस पाटील भरती - 2026 बीड जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच | Beed District Important Questions Answer

बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Beed District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर बीड जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Beed District MCQ Questions for Police Patil Bharti - 2026

खाली दिलेले MCQ प्रश्न पोलीस पाटील भरतीच्या विविध परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा नक्की सराव करावा

beed District Important Questions,beed District GK,Hingoli District MCQ,बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,beed District General Knowledge,Exam Wise Keywords,beed District MCQ for MPSC,beed District Questions Police Bharti,beed District GK Talathi Exam,beed District ZP Exam Questions,बीड जिल्हा सामान्य ज्ञान,बीड जिल्हा प्रश्नोत्तरे,बीड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न

1 ) बीड जिल्ह्यातील कोणत्या नदीवर 'सौताडा' येथे धबधबा आहे ?

1 ) बिंदुसरा

2 ) विंचरणा

3 ) वाण

4 ) सरस्वती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | विंचरणा


2 ) बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण (क्षेत्रफळानुसार) कोणते आहे ?

1 ) मोहखेड धरण

2 ) कुंडलिका धरण

3 ) माजलगाव धरण

4 ) वाण धरण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | माजलगाव धरण


3 ) सिंधफणा नदीचा उगम बीड जिल्ह्यात कोठे होतो ?

1 ) सावरगाव (पाटोदा)

2 ) धारूर किल्ला

3 ) आष्टी घाट

4 ) चिंचोली (अंबाजोगाई)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | चिंचोली (अंबाजोगाई)


4 ) 'मेहकरी' हा प्रकल्प बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

1 ) आष्टी

2 ) पाटोदा

3 ) शिरूर

4 ) बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | आष्टी


5 ) सौताडा धबधब्यामुळे 400 फूट उंचीवरून कोणत्या नदीचा उगम झाला ?

1 ) कुंडलिका

2 ) विंचूर्णा

3 ) बिंदुसरा

4 ) सिंदफणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | विंचूर्णा


6 ) बीड जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचे प्रमाण साधारण किती टक्के आहे ?

1 ) 3.54%

2 ) 4.05%

3 ) 2.77%

4 ) 1.47%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 2.77%


7 ) बीड जिल्ह्यातील 'नायगाव' अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ?

1 ) फ्लेमिंगो

2 ) माळढोक

3 ) पोपट

4 ) मोर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | मोर


8 ) नायगाव-मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

1 ) पाटोदा

2 ) गेवराई

3 ) माजलगाव

4 ) शिरूर कासार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पाटोदा


9 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

1 ) 2585049

2 ) 2475625

3 ) 2687984

4 ) 2388457

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 2585049


10 ) महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या बीड जिल्ह्याची आहे ?

1 ) 3.23%

2 ) 2.94%

3 ) 1.75%

4 ) 2.30%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 2.30%


11 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

1 ) अंबेजोगाई

2 ) माजलगाव

3 ) बीड

4 ) आष्टी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | बीड


12 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

1 ) गेवराई

2 ) शिरूर कासार

3 ) केज

4 ) वडवणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | वडवणी


13 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे ?

1 ) 242 प्रति चौ.किमी.

2 ) 325 प्रति चौ.किमी.

3 ) 276 प्रति चौ.किमी.

4 ) 303 प्रति चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 242 प्रति चौ.किमी.


14 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

1 ) 940

2 ) 916

3 ) 807

4 ) 1024

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 916


15 ) बीड जिल्ह्याचा साक्षरता दर साधारण किती टक्के आहे ?

1 ) 60.50%

2 ) 76.99%

3 ) 85.00%

4 ) 90.00%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 76.99%


16 ) 2011 च्या जनगणनेनुसार, बीड जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर असलेला तालुका कोणता ?

1 ) अंबेजोगाई

2 ) माजलगाव

3 ) परळी

4 ) बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | बीड


17 ) 2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे ?

1 ) धारुर

2 ) केज

3 ) गेवराई

4 ) आष्टी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | धारुर


18 ) बीड जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

1 ) 70.33 %

2 ) 64.20 %

3 ) 80.10 %

4 ) 85.60 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 80.10 %


19 ) बीड जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

1 ) 19.90 %

2 ) 30.10 %

3 ) 36.57 %

4 ) 15.40 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 19.90 %


20 ) बीड जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर (Child Sex Ratio) किती आहे ?

1 ) 914

2 ) 863

3 ) 807

4 ) 972

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 807


21 ) 2001 ते 2011 या दशकात बीड जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता ?

1 ) 15.70 %

2 ) 19.65 %

3 ) 10.50 %

4 ) 25.20 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 19.65 %


22 ) बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?

1 ) 5

2 ) 7

3 ) 6

4 ) 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 6
बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी असून बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 👉 गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज (अनुसूचित जातीसाठी आरक्षित) आणि परळी यांचा समावेश होतो


23 ) बीड लोकसभा मतदारसंघात एकूण किती विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो ?

1 ) 6

2 ) 4

3 ) 5

4 ) 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 6


24 ) खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्यात येत नाही ?

1 ) गेवराई

2 ) माजलगाव

3 ) घनसावंगी

4 ) आष्टी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | घनसावंगी


25 ) बीड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण आहेत ?

1 ) पंकजा मुंडे

2 ) धनंजय मुंडे

3 ) सुरेश धस

4 ) बजरंग सोनवणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | बजरंग सोनवणे


26 ) बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी कोणता मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहे ?

1 ) केज

2 ) माजलगाव

3 ) गेवराई

4 ) बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | केज


27 ) बीड जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती/नगरपालिका (स्थानिक स्वराज्य संस्था) कार्यरत आहेत ?

1 ) 3

2 ) 6

3 ) 8

4 ) 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 11
बीड जिल्ह्यात एकूण 11 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका आणि नगरपंचायती) कार्यरत आहेत ‌. यामध्ये प्रामुख्याने बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, धारूर या नगरपालिका/नगरपरिषद असून, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी, कैज या नगरपंचायतींचा समावेश होतो


28 ) बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण किती जागा (गट) आहेत ?

1 ) 57

2 ) 61

3 ) 70

4 ) 55

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 61


29 ) बीड जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती आहेत ?

1 ) 7

2 ) 5

3 ) 3

4 ) 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 5


30 ) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रचनेत जिल्हा परिषदेचा मतदारसंघ खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ?

1 ) गण

2 ) गट

3 ) प्रभाग

4 ) वॉर्ड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गट


31 ) जिल्हा परिषदेच्या सर्वात महत्त्वाच्या समितीचे (स्थायी समिती) पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

1 ) मुख्य कार्यकारी अधिकारी

2 ) जिल्हा परिषद अध्यक्ष

3 ) जिल्हा परिषद उपाध्यक्ष

4 ) जिल्हाधिकारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | जिल्हा परिषद अध्यक्ष


32 ) जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

1 ) जिल्हाधिकारी

2 ) ग्रामविकास मंत्री

3 ) विभागीय आयुक्त

4 ) मुख्य कार्यकारी अधिकारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | विभागीय आयुक्त


33 ) जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो ?

1 ) तहसीलदार

2 ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

3 ) मुख्य कार्यकारी अधिकारी

4 ) जिल्हा परिषद अध्यक्ष

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | उपमुख्य कार्यकारी अधिकारी


34 ) बीड जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या कार्यरत आहेत ?

1 ) 11

2 ) 9

3 ) 7

4 ) 5

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 11


35 ) पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?

1 ) सभापती

2 ) मुख्य कार्यकारी अधिकारी

3 ) विस्तार अधिकारी

4 ) गट विकास अधिकारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | गट विकास अधिकारी


36 ) बीड जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत ?

1 ) 1035

2 ) 1037

3 ) 1034

4 ) 1036

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 1034
ही माहिती फक्त अभ्यास व सरावाच्या उद्देशाने देण्यात आली असून, कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकृत अधिसूचना, शासन निर्णय (GR) व मूळ स्रोत तपासणे आवश्यक आहे


37 ) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ?

1 ) ग्रामसेवक

2 ) सरपंच

3 ) तलाठी

4 ) गट विकास अधिकारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | ग्रामसेवक


38 ) ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे ?

1 ) 1000

2 ) 750

3 ) 1500

4 ) 500

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 600


39 ) बीड जिल्ह्यात किती नगरपरिषदा आहेत ?

1 ) 9

2 ) 6

3 ) 5

4 ) 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 6


40 ) नगरपरिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यांना काय म्हटले जाते ?

1 ) नगरसेवक

2 ) पंच

3 ) सभासद

4 ) सदस्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | नगरसेवक


41 ) बीड जिल्ह्यात सध्या किती महानगरपालिका (Municipal Corporations) आहेत ?

1 ) 1

2 ) 2

3 ) 0 (एकही नाही)

4 ) 3

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 0 (एकही नाही)


42 ) बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत ?

1 ) सुरेश धस

2 ) धनंजय मुंडे

3 ) प्रकाश सोळंके

4 ) सुनेत्रा पवार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे . 3 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत . दिवंगत अजित पवार यांच्यानंतर पुणे आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे


43 ) अंबाजोगाई येथील कोणत्या देवीची यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ?

1 ) तुळजाभवानी

2 ) रेणुका माता

3 ) योगेश्वरी देवी

4 ) सप्तशृंगी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | योगेश्वरी देवी


44 ) बीड जिल्ह्यातील 'भगवानगड' हे कोणत्या समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते ?

1 ) वंजारी

2 ) धनगर

3 ) मराठा

4 ) माळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | वंजारीबीड जिल्ह्यातील 'भगवानगड' हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील वंजारी समाज (ऊसतोडणी मजूर) आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. हे ठिकाण सर्वधर्म समभावाचे प्रतीक असून, संत भगवानबाबा यांनी विकसित केलेला हा गड मराठवाड्यातील लाखो भाविकांचे प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे
भगवानगडाबाबत महत्त्वाचे मुद्दे
🌍 स्थान : भगवानगड बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव येथे आहे
संस्थापक : या गडाचे प्रणेते वारकरी संप्रदायातील संत भगवानबाबा आहेत, ज्यांचा जन्म सावरगाव येथे झाला होता
📍महत्त्व : दसरा मेळावा आणि परंपरेमुळे हे वंजारी समाजाचे सर्वात मोठे श्रद्धास्थान आहे
🚩वारकरी वारी : संत भगवानबाबांच्या परंपरेनुसार, पंढरपूरच्या वारीमध्ये भगवानगडाची दिंडी एक प्रमुख दिंडी मानली जाते . भगवानगड हे वारकरी आणि मराठवाड्यातील ऊसतोडणी कामगार समाजाचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते


45 ) बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात 'मोहरी'चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते ?

1 ) अंबाजोगाई

2 ) आष्टी

3 ) केज

4 ) माजलगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | आष्टी


46 ) बीड जिल्ह्यातील कापूस व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले केंद्र कोणते ?

1 ) पाटोदा

2 ) शिरूर

3 ) केज

4 ) गेवराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | गेवराई


47 ) मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोठे स्थित आहे ?

1 ) परळी (बीड)

2 ) पैठण (छ.संभाजी नगर)

3 ) उदगीर (लातूर)

4 ) किनवट (नांदेड)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | परळी (बीड)


48 ) बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ?

1 ) NH 4

2 ) NH 8

3 ) NH 52

4 ) NH 17

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | NH 52


49 ) NH 52 (सोलापूर-धुळे) हा महामार्ग बीड जिल्ह्यातील कोणत्या प्रमुख शहरांना जोडतो ?

1 ) परळी आणि अंबाजोगाई

2 ) बीड आणि गेवराई

3 ) आष्टी आणि पाटोदा

4 ) केज आणि धारूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बीड आणि गेवराई


50 ) बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची अंदाजे एकूण लांबी किती आहे ?

1 ) 150 किमी पेक्षा जास्त

2 ) 400 किमी पेक्षा कमी

3 ) 50 किमी

4 ) 200 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 150 किमी पेक्षा जास्त



पुढील प्रश्नसंच - येथे क्लिक करा

महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील . हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Beed District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बीड जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

2 Comments

  1. Palakmantri Beed jilha Sunetra AjitDada Pawar

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या विनंतीनुसार उत्तरांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत . सहकार्याबद्दल धन्यवाद 😊

      Delete
Previous Post Next Post