बैठक व्यवस्था प्रश्नसंच | Seating Arrangement Reasoning Questions with Answers in Marathi
Seating Arrangement बैठक व्यवस्था बुद्धीमत्ता चाचणी मधील अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा विचार करायला लावणारा घटक आहे . या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काही व्यक्ती ठराविक अटी व शर्तींनुसार रांगेत, वर्तुळात किंवा विशिष्ट दिशेला तोंड करून बसलेल्या असतात. दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची योग्य जागा ओळखणे हे या प्रश्नांचे मुख्य उद्दिष्ट असते
बैठक व्यवस्था प्रश्न MPSC, Talathi, Police Bharti, PSI, SSC, Bank (IBPS, SBI), ZP Bharti अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात . सुरुवातीला हे प्रश्न अवघड वाटले तरी योग्य पद्धतीचा सराव केल्यास ते सहज सोडवता येतात
बैठक व्यवस्था प्रश्न सोडवताना दिलेल्या अटी एकामागोमाग एक लिहून घेणे, साधी आकृती (Rough Diagram) काढणे आणि प्रत्येक अटीचा योग्य वापर करणे फार महत्त्वाचे असते. यामुळे गोंधळ न होता संपूर्ण व्यवस्था स्पष्ट होते
उदाहरण :
A, B, C, D आणि E हे पाच जण एका रांगेत अशा प्रकारे बसले आहेत -
- A हा B च्या डावीकडे आहे
- C हा D च्या उजवीकडे आहे
- E हा मधोमध बसलेला आहे
👉 वरील अटींनुसार A च्या त्वरित उजवीकडे कोण बसला आहे ?
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकमध्ये प्रामुख्याने खालील प्रकारचे बैठक व्यवस्था प्रश्न येतात ;- सरळ रांगेतील बैठक व्यवस्था
- वर्तुळाकार (Circular) बैठक व्यवस्था
- दिशा आधारित बैठक व्यवस्था
- मिश्र अटी असलेली बैठक व्यवस्था
- काही जण बाहेर/आत तोंड करून बसलेले प्रश्न
या घटकावर खाली दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी तयारी अधिक भक्कम करा
1) 5 मुले उत्तरेकडे तोंड करून एका बाकावर बसली आहेत. अ हा ब च्या शेजारी बसला आहे, क हा ड च्या डाव्या बाजूला बसला आहे. ड हा ई च्या जवळ बसलेला नाही. जर अ आणि ड टोकाला बसले असतील, तर क च्या शेजारी उजव्या बाजूला कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ड
2) सहा व्यक्ती (A, B, C, D, E, F) एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. B हा F आणि C च्या मध्ये आहे. A हा E आणि D च्या मध्ये आहे. F हा D च्या डावीकडे आहे. तर A आणि F च्या मध्ये कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | D
3) P, Q, R, S आणि T हे पाच मित्र एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. S हा P आणि T च्या मध्ये आहे. Q हा R च्या त्वरित डावीकडे आहे. P हा T च्या उजवीकडे आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | P
4) एका गोलाकार मेजाभोवती सहा मित्र बसले आहेत. प्रकाश हा समीरच्या उजवीकडे आहे. गीता ही समीर आणि अनिलच्या मध्ये आहे. तर अनिलच्या त्वरित उजवीकडे कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | गीता
5) पाच मुली एका रांगेत बसल्या आहेत. रीना ही सुनिताच्या डावीकडे व विनीताच्या उजवीकडे आहे. अनु ही सुनिताच्या उजवीकडे आहे. रमा ही विनीताच्या त्वरित डावीकडे आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | रीना
6) सहा जण एका रांगेत बसले आहेत. P, Q, R, S, T, U. T हा P आणि R च्या मध्ये आहे. Q हा S च्या उजवीकडे पण U च्या डावीकडे आहे. जर P हा टोकाला असेल, तर मध्यभागी कोणती जोडी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | R आणि S
7) पाच मित्र A, B, C, D आणि E उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. B हा A च्या डावीकडे 5 व्या क्रमांकावर आहे. जर C हा B आणि D च्या मध्ये असेल, तर मध्यभागी कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | D
8) पाच मैत्रिणी (A, B, C, D, E) एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. 1) C ही A आणि E च्या बरोबर मध्यभागी बसली आहे. 2) B ही E च्या त्वरित उजवीकडे बसली आहे. 3) D ही डाव्या टोकाला बसली आहे. तर रांगेच्या मध्यभागी कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | C
9) चार मुले एका चौरसाकृती कॅरम बोर्डभोवती बसली आहेत. राहुल हा राजच्या समोर आहे. राज हा समीरच्या डावीकडे आहे. विनोद हा राजच्या त्वरित डावीकडे आहे. तर राहुलच्या उजवीकडे कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | समीर
10) सहा मित्र (A,B,C,D,E,F) उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. A हा उजव्या टोकाला बसला आहे. B हा C च्या त्वरित उजवीकडे आहे. C हा D च्या उजवीकडे आहे. D हा E च्या उजवीकडे आहे. जर E डाव्या टोकाला असेल, तर उजव्या टोकाकडून दुसरा कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | F
11) सहा व्यक्ती A, B, C, D, E, F एका ओळीत बसल्या आहेत. E आणि F मध्यभागी आहेत. A आणि B टोकाला आहेत. C हा A च्या डावीकडे बसला आहे. तर B च्या उजवीकडे कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | D
12) पाच मुले एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसली आहेत. अजय हा विजयच्या डावीकडे आहे. संजय हा अजय आणि सुनीलच्या मध्ये आहे. तर विजयच्या त्वरित उजवीकडे कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | अनिल
13) सहा मित्र P, Q, R, S, T आणि U एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. S हा T आणि Q च्या मध्ये आहे. U हा Q च्या त्वरित उजवीकडे आहे. P हा टोकाला असून तो R च्या डावीकडे आहे. तर मध्यभागी कोणती जोडी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | T आणि S
14) चार मुली फोटो काढण्यासाठी एका बाकावर बसल्या आहेत. श्वेता ही राणीच्या डावीकडे आहे. नीता ही राणीच्या उजवीकडे आहे. रिता ही राणी आणि नीता यांच्या मध्ये आहे. तर डाव्या बाजूकडून दुसरी मुलगी कोण ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | राणी
15) एका षटकोनी टेबलाभोवती सहा जण बसले आहेत. अ हा ब च्या समोर आहे. ब हा क आणि ड च्या मध्ये आहे. ई हा अ आणि फ च्या मध्ये आहे. जर ड हा अ च्या त्वरित डावीकडे असेल, तर क च्या समोर कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | फ
16) पाच व्यक्ती A, B, C, D, E एका बाकावर बसल्या आहेत. C हा D च्या उजवीकडे आहे. B हा E च्या डावीकडे आहे पण A च्या उजवीकडे आहे. जर D हा A च्या डावीकडे असेल, तर सर्वात उजवीकडे कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | E
17) सात व्यक्ती एका रांगेत बसल्या आहेत. मध्यभागी बसलेली व्यक्ती कोण, जर अ हा ब च्या उजवीकडे, क हा ड च्या डावीकडे आणि ई हा मध्यभागी असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ई
18) एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून पाच मित्र बसले आहेत. रोहित हा मोहितच्या उजवीकडे दुसरा आहे. सोहम हा रोहित आणि मोहितच्या मध्ये नाही. जर राहुल हा मोहितच्या त्वरित डावीकडे असेल, तर उरलेला मित्र विजय कोठे असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | रोहित आणि मोहितच्या मध्ये
19) सहा मुले P, Q, R, S, T, U दोन ओळीत समोरासमोर बसली आहेत (प्रत्येक ओळीत तीन). Q हा कोणत्याही ओळीच्या टोकाला नाही. U हा R च्या डावीकडे दुसरा आहे. S हा Q च्या समोर आहे. तर T कोठे असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | टोकाला
20) पाच मित्र एका बाकावर बसले आहेत. अ हा ब च्या डावीकडे पण क च्या उजवीकडे आहे. ड हा ब च्या उजवीकडे पण ई च्या डावीकडे आहे. तर टोकाला कोण बसले आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | क आणि ई
21) एका वर्तुळाकार बागेत सहा मुली (गीता, सीता, रिता, मिता, अनिता आणि सुनिता) केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. 1) गीता ही सीताच्या समोर आहे, 2) सीता ही रिताच्या उजवीकडे आहे, 3) मिता ही गीताच्या त्वरित डावीकडे नाही, 4) सुनिता ही रिताच्या समोर आहे. तर मिताच्या समोर कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | अनिता
22) सहा जण उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. अ आणि ब हे टोकाला आहेत. क हा अ च्या शेजारी आहे. ड हा ब च्या उजव्या बाजूला आहे. ई आणि फ मध्यभागी आहेत. तर अ च्या बाजूने मोजल्यास चौथ्या क्रमांकावर कोण आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | ई
23) पाच व्यक्ती (A, B, C, D, E) एका रांगेत बसल्या आहेत. A आणि C यांची तोंडे दक्षिणेकडे आहेत, तर उरलेल्या तिघांची तोंडे उत्तरेकडे आहेत. B हा D च्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर बसला आहे. E हा B च्या त्वरित डावीकडे बसला आहे. C हा B च्या उजवीकडे बसला आहे. तर रांगेच्या दोन्ही टोकांना कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | D व A
24) पाच विषयांची पुस्तके (मराठी, गणित, विज्ञान, इतिहास आणि इंग्रजी) एकावर एक ठेवली आहेत. विज्ञानाचे पुस्तक सर्वात वर आहे. मराठी आणि गणित यांच्या दरम्यान इंग्रजीचे पुस्तक आहे. इतिहासाचे पुस्तक हे गणिताच्या त्वरित खाली आहे. तर सर्वात खाली कोणते पुस्तक आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | इतिहास
25) एका वर्तुळात 6 जण बसले आहेत. अ हा ब च्या डावीकडे तिसरा आहे. ब हा क च्या त्वरित उजवीकडे आहे. तर अ आणि क च्या मध्ये किती जण बसले आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 1
26) दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. तर मधोमध कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | दिपा
27) एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो. तर ज्योतीजवळ कोण राहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | अमन व मेरी
28) पाच विद्यार्थी एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. L हा M च्या उजवीकडे आहे. P हा N च्या डावीकडे आहे. M हा N आणि L च्या मध्ये आहे. तर डाव्या टोकाकडून दुसरा कोण ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | N
29) चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूंच्या मध्यबिंदूवर आठ जण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस व राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे अगदी तिच्यासमोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही, तर उर्मिलाच्या समोर कोण बसले आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | राजू
30) मिली, दीप, डेविड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार टेबलाच्या प्रत्येक बाजूला उभे आहेत. डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर आहेत. पिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिच्या डावा हाताला नाही. टेबलावर भारताचा नकाशा आहे. दीपने नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटिवत (Anti-clockwise) काटकोनात फिरवला. मिली आणि पिनी यांनी जागा बदलल्या तर आता मिलीच्या बाजूला नकाशातील कोणता भाग असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बंगालचा उपसागर
