दशांश अपूर्णांक प्रश्नसंच
दशांश अपूर्णांक (Decimal Fractions) हा गणिताचा मूलभूत पण अत्यंत उपयुक्त भाग आहे . या टॉपिकमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत ओळखणे, दशांश अपूर्णांकाचे वाचन आणि त्यांचे Fraction मध्ये रूपांतर शिकतो . स्पर्धा परीक्षांमध्ये हा भाग वारंवार विचारला जातो कारण गणितातील इतर टॉपिक्सचा पाया मजबूत करण्यासाठी Decimal Fractions महत्त्वाचे असतात
दशांश अपूर्णांकावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जसे की
- दशांश अपूर्णांकाची बेरीज
- दशांश अपूर्णांकाची वजाबाकी
- दशांश अपूर्णांकाचा गुणाकार
- दशांश अपूर्णांकाचा भागाकार
- दशांश अपूर्णांकाचा लसावी-मसावी
MPSC, IBPS, Talathi, SSC, PSI, पोलीस भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये Decimal Fractions वरील प्रश्न सोडवणे सोपे व्हावे यासाठी दशांश अपूर्णांक बेरीज , वजाबाकी , गुणाकार व भागाकार आणि इतर सर्व क्रियांचा सराव करणे आवश्यक आहे . खाली दिलेले प्रश्न सोडवा आणि तुमच्या तयारीला गती द्या
0.5 + 0.05 + 0.005 ची बेरीज किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून बेरीज केल्यास : 0.500 + 0.050 + 0.005 = 0.555 येते.
17/100 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहाल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : छेदस्थानी 1 वर दोन शून्य आहेत, म्हणून अंशातील संख्येत उजवीकडून दोन घरे सोडून दशांश चिन्ह द्यावे.
4.5 x 0.2 चा गुणाकार किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : 45 x 2 = 90. दोन्ही संख्यांतील मिळून दशांश चिन्हाची दोन घरे सरकवल्यास 0.90 म्हणजेच 0.9 उत्तर येते.
0.8 ÷ 0.02 चे मूल्य किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 0.8 / 0.02 = 80 / 2 = 40. दशांश स्थळे समान करण्यासाठी वर शून्य वाढवला.
2.5 चे पाऊण पट किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : पाऊण पट म्हणजे 0.75 ने गुणणे. 2.5 x 0.75 = 1.875.
15.75 मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : 5 हा अंक शतांश स्थानी (दशांश चिन्हाच्या उजवीकडे दुसरे घर) आहे, म्हणून त्याची किंमत 0.05 आहे.
3.6 + 4.25 + 0.008 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
स्पष्टीकरण : 3.600 + 4.250 + 0.008 = 7.858.
7.2 ÷ 9 चे उत्तर काय येईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 72 ÷ 9 = 8. एका घरा नंतर दशांश चिन्ह असल्याने उत्तर 0.8 येईल.
3/4 या अपूर्णांकाची दशांश किंमत किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 3 ÷ 4 केल्यास 0.75 येते. (पाऊण भाग).
0.1 x 0.1 x 0.1 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : 1 x 1 x 1 = 1. एकूण तीन दशांश स्थळे असल्याने 0.001.
5.43 ही संख्या खालीलपैकी कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 5.43 हे 5 पेक्षा मोठे आणि 6 पेक्षा लहान आहे.
12.5 च्या निम्मी संख्या कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
स्पष्टीकरण : 12.5 ÷ 2 = 6.25.
2.05 x 100 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 100 ने गुणल्यास दशांश चिन्ह दोन घरे उजवीकडे सरकते.
0.9 ÷ 100 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : 100 ने भागल्यास दशांश चिन्ह दोन घरे डावीकडे सरकते.
4.8 आणि 0.12 यांचा भागाकार किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 4.80 / 0.12 = 480 / 12 = 40.
'पाच दशांश सात दोन' ही संख्या कशी लिहाल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : पाच (5) दशांश (.) सात दोन (72) = 5.72.
0.25 ला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित केल्यास काय मिळेल
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
स्पष्टीकरण : 0.25 = 25 / 100 = 1 / 4.
8.4 - 2.15 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 8.40 - 2.15 = 6.25.
1.1 + 1.11 + 1.111 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 1.100 + 1.110 + 1.111 = 3.321.
5/8 चे दशांश रूप काय होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 5 ÷ 8 केल्यास 0.625 येते.
0.004 x 0.02 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
स्पष्टीकरण : 4 x 2 = 8. एकूण 3+2=5 दशांश स्थळे द्यावी लागतील.
10.01 आणि 1.001 मधील फरक किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 10.010 - 1.001 = 9.009.
0.666... या आवर्ती दशांश अपूर्णांकाची किंमत किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 2 / 3 चा भागाकार 0.666... येतो.
7 पैसे हे रुपयामध्ये दशांश रूपात कसे लिहाल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 1 रुपया = 100 पैसे, म्हणून 7 पैसे = 7 / 100 = 0.07 रुपये.
12.345 मधील '3' या अंकाचे स्थान कोणते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : दशांश चिन्हाच्या लगेच उजवीकडील पहिले घर 'दशांश' असते.
0.5 च्या निम्मी संख्या कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
स्पष्टीकरण : 0.5 ÷ 2 = 0.25.
2.5 x 4 + 1.5 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 2.5 x 4 = 10.0. मग 10.0 + 1.5 = 11.5.
1.2, 0.12, 12.0, 1.02 यांतील सर्वात मोठी संख्या कोणती
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
स्पष्टीकरण : 12.0 ही संख्या इतर सर्व संख्यांपेक्षा पूर्णांक मूल्य अधिक असल्याने मोठी आहे.
1/8 ची किंमत किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
स्पष्टीकरण : 1 ÷ 8 = 0.125.
9.9 + 0.1 = ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
स्पष्टीकरण : 9.9 + 0.1 = 10.0.
महत्त्वाची सूचना 🔊 या सराव प्रश्नसंचामधील सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उपलब्ध शैक्षणिक स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. प्रश्नांची उदाहरणे, आकडेवारी, सूत्रे व सोडवण्याच्या पद्धती यांची शक्य तितकी अचूकता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही प्रश्न तयार करताना किंवा माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो, गणिती मांडणीतील त्रुटी किंवा उत्तरामध्ये फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या गणित प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती, चुकीचे उत्तर किंवा उत्तर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये त्रुटी आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आवश्यक ती दुरुस्ती करता येईल.
