Mathematics Test in Marathi | गणित ऑनलाईन टेस्ट - 03
Mathematics Mock Test | गणित सराव टेस्ट क्रमांक - 03
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - Maths Practice Test Series
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Mathematics Test in Marathi, Ganit Online Test, गणित ऑनलाईन टेस्ट, Mathematics Online Test Series, Mathematics Mock Test, Ganit Question in Marathi, Mathematics Question in Marathi Online Test, गणित टेस्ट मराठी, Online Ganit Test Marathi, Mathematics MCQ Marathi, Ganit Practice Test Marathi, Competitive Mathematics Test Marathi, Chapter Wise Mathematics Test Marathi, गणित सराव टेस्ट, गणित Mock Test Marathi, गणित प्रश्नसंच मराठी, गणित Online Quiz Marathi, Quantitative Aptitude Test Marathi, Banking Mathematics Test Marathi, SSC Mathematics Test Marathi, MPSC Mathematics Test Marathi, Police Bharti Mathematics Test, Talathi Mathematics Test, RRB Mathematics Test, गणित ऑनलाईन सराव टेस्ट, Mathematics Questions with Answers Marathi, गणित टेस्ट सिरीज मराठी, गणित Mock Test Online Marathi
एक दूधवाला ₹ 25 प्रति लीटर दराने दूध खरेदी करतो. त्यामध्ये तो काही प्रमाणात पाणी मिसळतो आणि ते मिश्रण ₹ 20 प्रति लीटर दराने विकतो. तरीही त्याला 25% नफा होतो, तर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल ?
❶ 16 : 9
❷ 4 : 1
❸ 5 : 4
❹ 25 : 4
A, B आणि C यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर 2 : 3 : 5 आहे. तिघे मिळून एक काम 6 दिवसांत पूर्ण करू शकतात. तर एकट्या A ला त्या कामाचा 20% भाग पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
❶ 3 दिवस
❷ 5 दिवस
❸ 6 दिवस
❹ 10 दिवस
एका परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो जर त्याने सर्व 60 प्रश्न सोडवले आणि त्याला एकूण 130 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्नांची अचूक उत्तरे दिली ?
❶ 40
❷ 38
❸ 35
❹ 42
दोन नळ A आणि B अनुक्रमे 12 मिनिटे आणि 15 मिनिटांत एक टाकी भरू शकतात. जर दोन्ही नळ एकत्र चालू केले आणि 3 मिनिटांनंतर नळ A बंद केला, तर टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी नळ B ला आणखी किती वेळ लागेल ?
❶ 8 मिनिटे 15 सेकंद
❷ 8 मिनिटे 45 सेकंद
❸ 9 मिनिटे
❹ 7 मिनिटे 30 सेकंद
एका घड्याळाची छापील किंमत ₹ 1,600 आहे. एक दुकानदार त्यावर लागोपाठ दोन सवलती देऊन ते घड्याळ ₹ 1,224 मध्ये विकतो. जर पहिली सवलत 10% असेल, तर दुसरी सवलत किती टक्के असेल ?
❶ 10%
❷ 12%
❸ 20%
❹ 15%
एका जारमध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 7 : 5 आहे. जेव्हा त्यातून 9 लीटर मिश्रण काढून तेवढेच पाणी ओतले जाते, तेव्हा हे गुणोत्तर 7 : 9 होते. तर सुरुवातीला जारमध्ये किती लीटर दूध होते ?
❶ 15 लीटर
❷ 24 लीटर
❸ 21 लीटर
❹ 18
₹ 12,000 मुद्दलावर 10% प्रतिवर्ष दराने 1 आणि 1/2 (दीड) वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल, जर व्याज दर सहा महिन्यांनी आकारले जात असेल ?
❶ ₹ 1,891.50
❷ ₹ 1,800
❸ ₹ 1,986
❹ ₹ 2,000
एका त्रिकोणाच्या बाजू 3 : 4 : 5 या प्रमाणात आहेत. जर क्षेत्रफळ 24 चौरस सेमी असेल, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती सेमी असेल ?
❶ 12 सेमी
❷ 24 सेमी
❸ 36 सेमी
❹ 48 सेमी
A, B आणि C यांच्या सरासरीचे वजन 45 किलो आहे. जर A आणि B चे सरासरी वजन 40 किलो असेल आणि B आणि C चे सरासरी वजन 43 किलो असेल, तर B चे वजन किती किलो असेल ?
❶ 20 किलो
❷ 31 किलो
❸ 40 किलो
❹ 35 किलो
एका समद्विभुज चौकोनाची समांतर बाजू अनुक्रमे 20 सेमी आणि 10 सेमी आहेत. जर त्या दोन बाजूंमधील लंब अंतर (उंची) 8 सेमी असेल, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?
❶ 150
❷ 240
❸ 120
❹ 100
एक रेल्वेगाडी 60 किमी/तास वेगाने एका बोगद्याला 2 मिनिटांत पार करते. जर रेल्वेची लांबी 200 मीटर असेल, तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल ?
❶ 1000 मीटर
❷ 1800 मीटर
❸ 1200 मीटर
❹ 1500 मीटर
2/3, 4/5, 6/7 चा मसावि (HCF) किती होईल ?
❶ 2/105
❷ 12/105
❸ 2/35
❹ 6/105
A ची उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 25% जास्त आहे, तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे ?
❶ 20%
❷ 25%
❸ 16.66%
❹ 15%
एक माणूस स्थिर पाण्यात ताशी 10 किमी वेगाने पोहू शकतो. जर प्रवाहाचा वेग ताशी 4 किमी असेल, तर त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किमी अंतर पोहण्यासाठी किती वेळ लागेल ?
❶ 3 तास
❷ 5 तास
❸ 4 तास
❹ 6 तास
जर a : b = 2 : 3 आणि b : c = 4 : 5 असेल, तर a : b : c ची किंमत किती ?
❶ 8 : 12 : 15
❷ 2 : 4 : 5
❸ 6 : 8 : 10
❹ 8 : 10 : 15
एका वर्तुळाकृती चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे. त्या चाकाला 22 किमी अंतर पार करण्यासाठी एकूण किती फेऱ्या माराव्या लागतील ?
❶ 1,000
❷ 5,000
❸ 20,000
❹ 10,000
जर ₹ 2,500 मुद्दलावर ठराविक दराने 2 वर्षांचे सरळव्याज ₹ 500 होते, तर त्याच दराने ₹ 4,000 मुद्दलावर 3 वर्षांचे सरळव्याज किती रुपये होईल ?
❶ ₹ 1,000
❷ ₹ 1,200
❸ ₹ 800
❹ ₹ 1,500
10 अंबांची खरेदी किंमत 8 आंब्यांच्या विक्री किमतीइतकी आहे, तर या व्यवहारातील शेकडा नफा किती ?
❶ 25%
❷ 20%
❸ 33.33%
❹ 12.5%
एका वर्गात मुलांचे सरासरी वय 16 वर्षे आणि मुलींचे सरासरी वय 12 वर्षे आहे. जर संपूर्ण वर्गाचे सरासरी वय 13.5 वर्षे असेल, तर वर्गातील मुले आणि मुलींचे गुणोत्तर काय असेल ?
❶ 3 : 5
❷ 5 : 3
❸ 2 : 3
❹ 4 : 5
दोन संख्यांचा गुणाकार 2028 आहे आणि त्यांचा मसावि (HCF) 13 आहे, तर अशा संख्यांच्या एकूण किती जोड्या (Pairs) शक्य आहेत ?
❶ 3
❷ 1
❸ 2
❹ 4
जर x = √(30 + √(30 + √(30 + ...))) असेल, तर x ची किंमत किती ?
❶ 2
❷ 5
❸ 3
❹ 6
एका चौरसाकृती शेताची बाजू 20 मीटर आहे. त्या शेताच्या बाहेरून चारी बाजूंनी 2 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर त्या रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल ?
❶ 176
❷ 180
❸ 144
❹ 200
पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती असेल ?
❶ 16
❷ 15
❸ 14
❹ 30
एका निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी एकाला एकूण वैध मतांच्या 55% मते मिळाली आणि 20% मते अवैध ठरली. जर एकूण मते 7500 असतील, तर दुसऱ्या उमेदवाराला किती वैध मते मिळाली ?
❶ 3000
❷ 2900
❸ 2700
❹ 3100
(27)2/3 × (16)3/4 चे सरळरूप काय होईल ?
❶ 75
❷ 54
❸ 36
❹ 72
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा