बीड जिल्हा जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न | Beed District MCQ for Police Patil Bharti

beed District Important Questions,beed District GK,beed District MCQ,बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,beed District General Knowledge,Exam Wise Keywords,beed District MCQ for MPSC,beed District Questions Police Bharti,beed District GK Talathi Exam,beed District ZP Exam Questions,बीड जिल्हा सामान्य ज्ञान,बीड जिल्हा प्रश्नोत्तरे,बीड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न

Beed District Important Questions Answer | बीड जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच - 01

बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Beed District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर बीड जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

beed District Important Questions,beed District GK,beed District MCQ,बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,beed District General Knowledge,Exam Wise Keywords,beed District MCQ for MPSC,beed District Questions Police Bharti,beed District GK Talathi Exam,beed District ZP Exam Questions,बीड जिल्हा सामान्य ज्ञान,बीड जिल्हा प्रश्नोत्तरे,बीड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ चंपावतीनगर

❷ इंद्रपूर

❸ येवती

❹ लत्तलूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | " चंपावती-नगरी " किंवा "दुर्गावतीनगर"


Question : 2

--------------- यांच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडले

❶ बाजीराव पेशवा

❷ छत्रपती शिवाजी महाराज

❸ महंमद तुघलक

❹ औरंगजेब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | महंमद तुघलक


Question : 3

बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली ?

❶ 1 मे 1960

❷ 15 ऑगस्ट 1947

❸ 17 सप्टेंबर 1948

❹ 26 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1 मे 1960


Question : 4

निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता ?

❶ मराठा साम्राज्य

❷ हैद्राबाद स्टेट

❸ बॉम्बे प्रेसिडेन्सी

❹ मध्य प्रांत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हैद्राबाद स्टेट


Question : 5

स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?

❶ वासुदेव बळवंत फडके

❷ सदाशिव नीलकंठ जोशी

❸ स्वातंत्र्यवीर सावरकर

❹ भाई श्रीपाद अमृत डांगे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सदाशिव नीलकंठ जोशी


Question : 6

निजाम व पेशवे यांच्यामधील इतिहास प्रसिद्ध लढाई जेथे घडून गेली ते राक्षस भूवन बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे

❶ माजलगाव

❷ वडवणी

❸ पाटोदा

❹ गेवराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गेवराई


Question : 7

बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात स्थित आहे ?

❶ कोकण

❷ विदर्भ

❸ मराठवाडा

❹ खान्देश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मराठवाडा


Question : 8

बीड जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे ?

❶ 18°28' उत्तर ते 19°28' उत्तर

❷ 15°30' उत्तर ते 16°30' उत्तर

❸ 20°00' उत्तर ते 21°00' उत्तर

❹ 17°10' उत्तर ते 18°10' उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 18°28' उत्तर ते 19°28' उत्तर


Question : 9

बीड जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे ?

❶ 70° ते 72° पूर्व

❷ 74°54' पूर्व ते 76°57' पूर्व

❸ 78° ते 80° पूर्व

❹ 73° ते 75° पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 74°54' पूर्व ते 76°57' पूर्व


Question : 10

बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे ?

❶ 10,693 चौ.कि.मी.

❷ 12,500 चौ.कि.मी.

❸ 9,500 चौ.कि.मी.

❹ 11,200 चौ.कि.मी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 10,693 चौ.कि.मी.


Question : 11

बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 2.75%

❷ 3.45%

❸ 1.09%

❹ 0.92%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.45%


Question : 12

क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो ?

❶ पाचवा

❷ सातवा

❸ नववा

❹ दहावा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | दहावा


Question : 13

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ आष्टी

❷ गेवराई

❸ बीड

❹ माजलगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीड


Question : 14

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ वडवणी

❷ धारुर

❸ पाटोदा

❹ परळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वडवणी


Question : 15

बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत कोणती प्रमुख डोंगररांग पसरलेली आहे ?

❶ सह्याद्री रांग

❷ बालाघाट रांग

❸ सातपुडा रांग

❹ अजिंठा रांग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बालाघाट रांग


Question : 16

बालाघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या दोन भौगोलिक भागांत विभाजन झाले आहे ?

❶ कोकण आणि देश

❷ सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश

❸ मावळ आणि विदर्भ

❹ पूर्व आणि पश्चिम भाग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश


Question : 17

बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते ?

❶ घाट

❷ माळरान

❸ गंगाथडी

❹ पठार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गंगाथडी


Question : 18

बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात ?

❶ गंगाथडी

❷ घाट किंवा बालाघाट

❸ सखल भाग

❹ तराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | घाट किंवा बालाघाट


Question : 19

बालाघाट डोंगररांगेचा विस्तार बीड जिल्ह्यात कसा आहे ?

❶ उत्तर ते दक्षिण

❷ दक्षिण ते उत्तर

❸ पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत

❹ केवळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत


Question : 20

बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ पाटोदा

❷ केज

❸ शिरूर (कासार)

❹ परळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | परळी


Question : 21

जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ धारुर

❷ आष्टी

❸ वडवणी

❹ माजलगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | आष्टी


Question : 22

जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ अंबेजोगाई

❷ केज

❸ गेवराई

❹ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अंबेजोगाई


Question : 23

जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ माजलगाव

❷ बीड

❸ पाटोदा

❹ गेवराई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गेवराई


Question : 24

बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ अंबेजोगाई

❷ माजलगाव

❸ बीड

❹ परळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बीड


Question : 25

बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ नाशिक

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ अमरावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | छत्रपती संभाजीनगर


Question : 26

बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 9

❷ 10

❸ 11

❹ 12

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 11 | 11


Question : 27

खालीलपैकी कोणता तालुका बीड जिल्ह्यात येत नाही ?

❶ गेवराई

❷ शिरूर कासार

❸ वडवणी

❹ उदगीर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | उदगीर


Question : 28

बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ गोदावरी

❷ सिंदफणा

❸ बिंदुसरा

❹ मांजरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बिंदुसरा


Question : 29

बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण किती जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 6
बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण सहा (6) जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत . या जिल्ह्यांमध्ये उत्तरेस औरंगाबाद आणि जालना, पश्चिमेस अहमदनगर, दक्षिणेस धाराशिव (उस्मानाबाद) आणि पूर्वेस लातूर व परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे


Question : 30

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बीड जिल्ह्याला लागून नाही ?

❶ औरंगाबाद

❷ नांदेड

❸ लातूर

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नांदेड


Question : 31

बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा पश्चिम बाजूने लागून आहे ?

❶ जालना

❷ लातूर

❸ अहमदनगर

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अहमदनगर


Question : 32

बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची सीमा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे ?

❶ गेवराई

❷ वडवणी

❸ धारुर

❹ माजलगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गेवराई
गेवराई तालुक्याची सीमा एकूण 3 जिल्ह्यांना स्पर्श करते - 1) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 2) जालना 3) अहमदनगर


Question : 33

बीड जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ जालना

❷ परभणी

❸ अहमदनगर

❹ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अहमदनगर


Question : 34

बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेला लागून कोणता जिल्हा आहे ?

❶ धाराशिव (उस्मानाबाद)

❷ लातूर

❸ जालना

❹ नांदेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | धाराशिव (उस्मानाबाद)


Question : 35

बीड जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमांपैकी उत्तर सीमेवर कोणती प्रमुख नदी वाहते ?

❶ मांजरा

❷ गोदावरी

❸ बिंदुसरा

❹ सिंधफणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोदावरी


Question : 36

गोदावरी नदी बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळे करते ?

❶ जालना

❷ लातूर

❸ धाराशिव

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | जालना


Question : 37

बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील गोदावरी नदीच्या पलीकडे कोणता जिल्हा आहे ?

❶ जालना

❷ धाराशिव

❸ लातूर

❹ सोलापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | जालना


Question : 38

बीड जिल्ह्यातील 'आष्टी' तालुक्याची सीमा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला लागून आहे ?

❶ परभणी

❷ लातूर

❸ अहमदनगर

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अहमदनगर


Question : 39

'मांजरा' नदी बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या जिल्ह्यासोबत निश्चित करते ?

❶ अहमदनगर

❷ धाराशिव

❸ जालना

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धाराशिव


Question : 40

खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते ?

❶ कृष्णा

❷ गोदावरी

❸ तापी

❹ भीमा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोदावरी


Question : 41

बीड जिल्ह्याची नैसर्गिक सीमा उत्तरेला गोदावरी आणि दक्षिणेला ---------------- या नद्यांनी निश्चित केली आहे ?

❶ सिंदफना

❷ सीना

❸ मांजरा

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मांजरा


Question : 42

खालीलपैकी कोणती डोंगररांग बीड जिल्ह्यातून जाते ?

❶ सह्याद्री

❷ सातपुडा

❸ बालाघाट

❹ हरिश्चंद्रगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बालाघाट


Question : 43

बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी किती मि.मी आहे ?

❶ 407.11 मिमी

❷ 800.05 मिमी

❸ 666.36 मिमी

❹ 375.14 मिमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 666.36 मिमी


Question : 44

मांजरा नदी बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून उगम पावते ?

❶ आष्टी

❷ पाटोदा

❸ धारूर

❹ अंबाजोगाई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पाटोदा
गवळवाडी (बालाघाट डोंगरांग) ता. पाटोदा जि.बीड


Question : 45

बीड शहरातून वाहणारी मुख्य नदी कोणती आहे ?

❶ गोदावरी

❷ बिंदुसरा

❸ मांजरा

❹ सरस्वती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बिंदुसरा


Question : 46

अंबाजोगाई हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ बाणगंगा

❷ जयंती

❸ सिंदफणा

❹ सरस्वती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जयंती


Question : 47

बीड जिल्ह्यातील 'माजलगाव' धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

❶ मांजरा

❷ सिंदफणा

❸ बिंदुसरा

❹ कुंडलिका

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सिंदफणा
'माजलगाव' धरण सिंदफणा नदीवर , तालुका - माजलगाव, जि - बीड


Question : 48

बीड जवळून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचा उगम कोठे झाला ?

❶ अजिंठा डोंगररांग

❷ सातपुडा पर्वत

❸ बालाघाट डोंगरांग

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बालाघाट डोंगरांग
बीड शहराजवळून वाहणाऱ्या बिंदुसरा (बिंदूसरा) नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावाजवळ बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये होतो . ही नदी बीड शहराच्या दक्षिण दिशेला उगम पावते आणि पुढे शहरातून वाहून सिंदफणा नदीला मिळते . या नदीवर पाली (बीड) येथे बिंदुसरा मध्यम प्रकल्प (धरण) बांधण्यात आला आहे


Question : 49

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे ?

❶ माजलगाव धरण

❷ बिंदुसरा धरण

❸ बेंबळी धरण

❹ मांजरा धरण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बिंदुसरा धरण


Question : 50

'सिंधफणा' ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

❶ कृष्णा

❷ भीमा

❸ गोदावरी

❹ तापी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोदावरी



पुढील प्रश्नसंच - येथे क्लिक करा

महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले बीड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post