Kotwal Bharti Question Paper | कोतवाल भरती सराव प्रश्नसंच - 07
🎯 महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Kotwal Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
भारतीय संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश कोणत्या भागात आहे ?
❶ भाग II
❷ भाग III
❸ भाग IV
❹ भाग V
भारताच्या निवडणूक आयोगाचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे ?
❶ कलम 280
❷ कलम 324
❸ कलम 356
❹ कलम 368
ग्रामपंचायतीचा सामान्य कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 3 वर्षे
❷ 4 वर्षे
❸ 5 वर्षे
❹ 6 वर्षे
पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोच्च स्तर कोणता आहे ?
❶ ग्रामपंचायत
❷ पंचायत समिती
❸ जिल्हा परिषद
❹ ग्रामसभा
सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये प्रामुख्याने कोणती लिपी वापरली गेली ?
❶ देवनागरी
❷ ब्राह्मी
❸ मोडी
❹ गुरुमुखी
राज्यसभेमध्ये खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात ?
❶ 288
❷ 78
❸ 250
❹ 48
1857 च्या उठावातील झाशीच्या राणीचे नाव काय होते ?
❶ राणी लक्ष्मीबाई
❷ राणी ताराबाई
❸ राणी दुर्गावती
❹ राणी अहिल्याबाई
महात्मा गांधींनी असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले ?
❶ 1915
❷ 1919
❸ 1920
❹ 1930
कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकांचे टोपण नाव काय आहे ?
❶ कुसुमाग्रज
❷ केशवसुत
❸ केशवकुमार
❹ दिवाकर
कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ महाबळेश्वर
❸ भीमाशंकर
❹ माथेरान
सुंदरबन प्रदेश कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात आहे ?
❶ गंगा
❷ नर्मदा
❸ गोदावरी
❹ कावेरी
पश्चिम घाटाला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ अरवली
❷ सह्याद्री
❸ सातपुडा
❹ निलगिरी
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात ?
❶ महात्मा गांधी
❷ लोकमान्य टिळक
❸ सुभाष चंद्र बोस
❹ सरदार पटेल
वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे ?
❶ दिवा घाट
❷ थळघाट
❸ आंबेनळी
❹ पसरणी
‘रेपो दर’ कोण ठरवते ?
❶ RBI
❷ SEBI
❸ संसद
❹ NITI आयोग
सोन्याचे रासायनिक चिन्ह कोणते आहे ?
❶ Ag
❷ Fe
❸ Au
❹ Cu
महाराष्ट्रात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते ?
❶ 2
❷ 4
❸ 5
❹ 3
प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू वातावरणातून घेतात ?
❶ ऑक्सिजन
❷ नायट्रोजन
❸ कार्बन डायऑक्साइड
❹ हायड्रोजन
एल-निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय ?
❶ समुद्र
❷ बाळ
❸ संकट
❹ त्सुनामी
URL चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Uniform Resource Locator
❷ Universal Record Link
❸ Uniform Reading Line
❹ United Resource Location
कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते ?
❶ 42 वी घटना दुरुस्ती
❷ 44 वी घटना दुरुस्ती
❸ 73 वी घटना दुरुस्ती
❹ 61 वी घटना दुरुस्ती
मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे या राज्यात आढळते ?
❶ ओडिशा
❷ झारखंड
❸ महाराष्ट्र
❹ मध्य प्रदेश
2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत ?
❶ चीन
❷ भारत
❸ जपान
❹ दक्षिण कोरिया
महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत ?
❶ 34
❷ 35
❸ 36
❹ 38
महाराष्ट्रातील ‘पन्हाळा किल्ला’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ सातारा
❷ कोल्हापूर
❸ सांगली
❹ पुणे
महाराष्ट्रातील ‘हापूस आंबा’ कोणत्या जिल्ह्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे ?
❶ रत्नागिरी
❷ जळगाव
❸ नागपूर
❹ अमरावती
महाराष्ट्रातील ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ अमरावती
❷ नाशिक
❸ पुणे
❹ रायगड
महाराष्ट्रातील ‘पोवाडा’ हा कोणत्या प्रकारचा कलाप्रकार आहे ?
❶ वीरकाव्यात्मक लोककला
❷ शास्त्रीय नृत्य
❸ चित्रकला
❹ वास्तुकला
एका बाटलीमध्ये 125 मिली दूध याप्रमाणे अडीच लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील ?
❶ 10 बाटल्या
❷ 15 बाटल्या
❸ 20 बाटल्या
❹ 25 बाटल्या
5³ × 5² = किती ?
❶ 125
❷ 625
❸ 3125
❹ 15625
7² + 7² + 7 = किती ?
❶ 98
❷ 105
❸ 112
❹ 119
2 डझन पेरूची किंमत 24 रुपये आहे तर पाच पेरूची किंमत किती ?
❶ 4 रुपये
❷ 5 रुपये
❸ 6 रुपये
❹ 8 रुपये
तीन कोटी पाच हजार तीनशे सतरा ही संख्या अंकात कशी लिहावी ?
❶ 3,05,317
❷ 30,05,317
❸ 3,00,05,317
❹ 30,00,05,317
एका वर्गात मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर 2 : 3 आहे. मुलांची संख्या 12 असल्यास मुलींची संख्या किती ?
❶ 15
❷ 18
❸ 20
❹ 24
एका शेतकऱ्याने 5000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्याला 10% नफा मिळाला. तर नफा किती रुपये झाला ?
❶ 500 रुपये
❷ 600 रुपये
❸ 750 रुपये
❹ 1000 रुपये
एक मुलगा 1 मिनिटात 20 मीटर धावतो. तर 5 मिनिटांत तो किती अंतर धावेल ?
❶ 80 मीटर
❷ 90 मीटर
❸ 100 मीटर
❹ 120 मीटर
‘कमळासारखे सुंदर मुख’ या वाक्यांशात कोणता अलंकार आहे ?
❶ उपमा अलंकार
❷ रूपक अलंकार
❸ अनुप्रास अलंकार
❹ यमक अलंकार
‘तो हळूहळू चालतो.’ या वाक्यातील ‘हळूहळू’ हा कोणता शब्दप्रकार आहे ?
❶ नाम
❷ विशेषण
❸ क्रियाविशेषण
❹ सर्वनाम
‘अति तिथे माती’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ अतिरेक केल्यास नुकसान होते
❷ मेहनत केल्यास यश मिळते
❸ वेळेचे महत्त्व ओळखावे
❹ नेहमी सत्य बोलावे
‘विद्या + आलय = विद्यालय’ येथे कोणती संधी झाली आहे ?
❶ व्यंजनसंधी
❷ विसर्गसंधी
❸ स्वरसंधी
❹ यणसंधी
‘मुलगा खेळतो.’ या वाक्याचे भूतकाळातील योग्य रूप कोणते ?
❶ मुलगा खेळेल.
❷ मुलगा खेळत आहे.
❸ मुलगा खेळला.
❹ मुलगा खेळतो आहे.
‘देवाने भक्ताला आशीर्वाद दिला.’ या वाक्यात ‘देवाने’ कोणती विभक्ती आहे ?
❶ प्रथमा
❷ तृतीया
❸ चतुर्थी
❹ षष्ठी
एक मोटरसायकल 5 तासात 200 कि.मी. अंतर जात असेल तर तीच मोटरसायकल 7 तासांमध्ये किती कि.मी. अंतर जाईल ?
❶ 240 कि.मी.
❷ 260 कि.मी.
❸ 280 कि.मी.
❹ 300 कि.मी.
रोमन संख्या चिन्हात 'L' म्हणजे किती ?
❶ 50
❷ 100
❸ 500
❹ 1000
मोहन हा सोहनचा वडील आहे. सोहन हा रोहनचा भाऊ आहे. तर मोहनचा रोहनशी काय संबंध आहे ?
❶ मामा
❷ वडील
❸ काका
❹ भाऊ
राहुल उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ पश्चिम
❷ पूर्व
❸ दक्षिण
❹ उत्तर
एका रांगेत सीमा डावीकडून 6 व्या क्रमांकावर आहे. तिच्या डावीकडे किती मुले आहेत ?
❶ 4
❷ 5
❸ 6
❹ 7
खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने निःशेष भाग जाईल ?
❶ 3115
❷ 5513
❸ 691
❹ 3832
1236, 2346, 3456, 4566, __________ या मालिकेतील पुढील संख्या कोणती
❶ 5676
❷ 5678
❸ 5686
❹ 6786
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द CDU असा लिहिला जातो. त्याच नियमानुसार PEN हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ QFO
❷ PFO
❸ QEN
❹ RGP
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
