वेग - वेळ आणि अंतर गणित उदाहरणे | Time Speed and Distance Questions in Marathi

वेग - वेळ आणि अंतर गणित उदाहरणे | Time Speed and Distance Questions in Marathi

वेग-वेळ-अंतर गणित प्रश्नसंच

वेग-वेळ-अंतर (Speed-Time-Distance) हा गणितातील स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. रेल्वे, वाहनं किंवा प्रवासाशी संबंधित प्रश्नांमध्ये हा टॉपिक वारंवार विचारला जातो. MPSC, SSC, Talathi, IBPS, PSI, Police Bharti अशा सर्व परीक्षांमध्ये Speed Time Distance Questions येतात.

वेग-वेळ-अंतर म्हणजे काय ? प्रवास करताना वेग, लागणारी वेळ आणि चाललेले अंतर यांचा परस्पर संबंध या टॉपिकमध्ये अभ्यासला जातो. प्रवासाशी संबंधित प्रश्न सोडवताना खालील Speed - Time - Distance Formula उपयोगी पडतात :
वेग (Speed) = अंतर ÷ वेळ
वेळ (Time) = अंतर ÷ वेग
अंतर (Distance) = वेग × वेळ

सापेक्ष वेग (Relative Speed) = दोन वेगांची बेरीज किंवा वजाबाकी (स्थितीनुसार)

वेग-वेळ-अंतर गणित सूत्र लक्षात ठेवल्यास आणि वेग-वेळ-अंतर क्वेश्चन चा नियमित सराव केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवान आणि अचूक गणना करता येते

Question : 1

एका गाडीचा वेग 54 km/hr आहे, तर त्या गाडीचा वेग किती m/sec असेल ?

❶ 10

❷ 15

❸ 20

❹ 25


Question : 2

एका व्यक्तीने 600 मीटर लांबीचा पूल 5 मिनिटांत ओलांडला, तर त्याचा ताशी वेग किती ?

❶ 7.2 km/hr

❷ 8.4 km/hr

❸ 9.6 km/hr

❹ 10 km/hr


Question : 3

400 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती ?

❶ 60 km/hr

❷ 70 km/hr

❸ 72 km/hr

❹ 80 km/hr


Question : 4

ताशी 60 किमी वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची मालगाडी एका बोगद्याला 45 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती ?

❶ 400 मीटर

❷ 450 मीटर

❸ 500 मीटर

❹ 750 मीटर


Question : 5

दोन गाड्यांच्या वेगाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर एका ठराविक अंतरासाठी पहिल्या गाडीला 20 मिनिटे लागतात, तर दुसऱ्या गाडीला किती वेळ लागेल ?

❶ 15 मिनिटे

❷ 25 मिनिटे

❸ 18 मिनिटे

❹ 22 मिनिटे


Question : 6

एक सायकलस्वार 12 किमी अंतर 40 मिनिटांत कापतो, तर त्याचा ताशी वेग किती ?

❶ 15 km/hr

❷ 18 km/hr

❸ 20 km/hr

❹ 24 km/hr


Question : 7

ताशी 45 किमी वेगाने गेल्यास एका गावाला पोहोचायला 8 तास लागतात. जर तोच प्रवास 6 तासात पूर्ण करायचा असेल, तर गाडीचा वेग किती वाढवावा लागेल ?

❶ 15 km/hr

❷ 60 km/hr

❸ 10 km/hr

❹ 20 km/hr


Question : 8

250 मीटर लांबीच्या दोन गाड्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी ताशी 50 किमी आणि ताशी 40 किमी वेगाने येत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील ?

❶ 15 सेकंद

❷ 25 सेकंद

❸ 20 सेकंद

❹ 30 सेकंद


Question : 9

एका प्रवासाचा 1/3 भाग ताशी 25 किमी वेगाने, 1/4 भाग ताशी 30 किमी वेगाने आणि उर्वरित भाग ताशी 50 किमी वेगाने पूर्ण केला, तर सरासरी वेग किती ?

❶ 33.33 km/hr

❷ 30 km/hr

❸ 35 km/hr

❹ 37.5 km/hr


Question : 10

एक चोर ताशी 10 किमी वेगाने पळत आहे. एका पोलिसाने ताशी 12 किमी वेगाने त्याचा पाठलाग सुरू केला. जर चोर पोलिसाच्या 200 मीटर पुढे असेल, तर पोलीस चोराला किती वेळात पकडेल ?

❶ 5 मिनिटे

❷ 10 मिनिटे

❸ 6 मिनिटे

❹ 12 मिनिटे


Question : 11

180 मीटर लांबीची रेल्वे ताशी 54 किमी वेगाने जाताना एका खांबाला किती वेळात ओलांडेल ?

❶ 10 सेकंद

❷ 12 सेकंद

❸ 15 सेकंद

❹ 18 सेकंद


Question : 12

ताशी 72 किमी म्हणजे प्रति सेकंद किती मीटर ?

❶ 20 m/sec

❷ 25 m/sec

❸ 30 m/sec

❹ 15 m/sec


Question : 13

एका विमानाचा वेग 240 km/hr असून ते 5 तासात ठराविक अंतर कापते. तेच अंतर 1 आणि 2/3 तासात कापण्यासाठी विमानाचा वेग किती असावा ?

❶ 600 km/hr

❷ 720 km/hr

❸ 360 km/hr

❹ 480 km/hr


Question : 14

जर एक माणूस ताशी 10 किमी ऐवजी 14 किमी वेगाने चालला असता, तर त्याने 20 किमी अंतर जास्त कापले असते. तर त्याने कापलेले वास्तविक अंतर किती ?

❶ 50 किमी

❷ 60 किमी

❸ 70 किमी

❹ 80 किमी


Question : 15

एक रेल्वे ताशी 40 किमी वेगाने गेल्यास नियोजित ठिकाणी 11 मिनिटे उशिरा पोहोचते, पण ताशी 50 किमी वेगाने गेल्यास फक्त 5 मिनिटे उशिरा पोहोचते. तर प्रवासाचे एकूण अंतर किती ?

❶ 15 किमी

❷ 20 किमी

❸ 25 किमी

❹ 30 किमी


Question : 16

150 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किमी वेगाने धावत आहे. तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 6 किमी वेगाने धावणाऱ्या माणसाला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल ?

❶ 7.2 सेकंद

❷ 8.18 सेकंद

❸ 9 सेकंद

❹ 10 सेकंद


Question : 17

अ आणि ब एकाच वेळी अनुक्रमे ताशी 40 किमी आणि ताशी 50 किमी वेगाने एकाच दिशेने निघाले. 4 तासानंतर त्यांच्यातील अंतर किती असेल ?

❶ 20 किमी

❷ 40 किमी

❸ 10 किमी

❹ 30 किमी


Question : 18

दोन शहरांमधील अंतर 330 किमी आहे. एक गाडी 'अ' मधून सकाळी 8 ला 60 च्या वेगाने निघाली. दुसरी 'ब' मधून सकाळी 9 ला 75 च्या वेगाने निघाली. त्या किती वाजता भेटतील ?

❶ सकाळी 10 वाजता

❷ सकाळी 10:30 वाजता

❸ सकाळी 11 वाजता

❹ सकाळी 11:30 वाजता


Question : 19

एका चाकाचा व्यास 70 सेमी आहे. ते चाक 100 फेऱ्यात किती अंतर कापेल ?

❶ 220 मीटर

❷ 440 मीटर

❸ 110 मीटर

❹ 330 मीटर


Question : 20

100 मीटर लांबीची रेल्वे ताशी 30 किमी वेगाने जात असताना एका माणसाला किती वेळात ओलांडेल ?

❶ 10 सेकंद

❷ 12 सेकंद

❸ 15 सेकंद

❹ 18 सेकंद


Question : 21

एक गाडी 2 तासात 120 किमी जाते आणि पुढच्या 3 तासात 180 किमी जाते. तर गाडीचा सरासरी वेग किती ?

❶ 50 km/hr

❷ 55 km/hr

❸ 60 km/hr

❹ 65 km/hr


Question : 22

300 मीटर लांबीची गाडी ताशी 90 किमी वेगाने 200 मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल ?

❶ 15 सेकंद

❷ 20 सेकंद

❸ 25 सेकंद

❹ 30 सेकंद


Question : 23

ताशी 48 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती ?

❶ 100 मीटर

❷ 120 मीटर

❸ 140 मीटर

❹ 150 मीटर


Question : 24

दोन गाड्यांच्या वेगाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या अंतराचे गुणोत्तर 5:4 आहे, तर वेळेचे गुणोत्तर काय असेल ?

❶ 10:12

❷ 15:8

❸ 8:15

❹ 5:6


Question : 25

एक बस विनाथांबा ताशी 54 किमी वेगाने जाते आणि थांब्यासह ताशी 45 किमी वेगाने जाते. तर बस तासाला किती मिनिटे थांबते ?

❶ 8 मिनिटे

❷ 10 मिनिटे

❸ 12 मिनिटे

❹ 15 मिनिटे


Question : 26

ताशी 63 किमी वेगाने जाणारी 280 मीटर लांबीची रेल्वे एका झाडाला किती वेळात ओलांडेल ?

❶ 15 सेकंद

❷ 16 सेकंद

❸ 18 सेकंद

❹ 20 सेकंद


Question : 27

एक मुलगा शाळेत ताशी 3 किमीने जातो आणि 2 किमीने परत येतो. एकूण 5 तास लागत असल्यास घर ते शाळा अंतर किती ?

❶ 5 किमी

❷ 6 किमी

❸ 7 किमी

❹ 8 किमी


Question : 28

240 मीटरची रेल्वे ताशी 60 च्या वेगाने धावते. त्याच दिशेने ताशी 6 च्या वेगाने जाणाऱ्या माणसाला ती किती वेळात ओलांडेल ?

❶ 15 सेकंद

❷ 16 सेकंद

❸ 18 सेकंद

❹ 20 सेकंद


Question : 29

एका धावपटूने 200 मीटरचे अंतर 24 सेकंदात पार केले, तर त्याचा ताशी वेग किती ?

❶ 25 km/hr

❷ 27 km/hr

❸ 30 km/hr

❹ 32 km/hr


Question : 30

जर ताशी वेग 5 मीटर प्रति सेकंद असेल, तर 1 तासात किती अंतर कापले जाईल ?

❶ 15 किमी

❷ 18 किमी

❸ 20 किमी

❹ 22 किमी

Post a Comment

Previous Post Next Post