जालना जिल्हा जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न | Jalana District MCQ for Police Patil Bharti

jalana District Important Questions,jalana District GK,jalana District MCQ, जालना जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Jalana District General Knowledge,Exam Wise Keywords,jalana District MCQ for MPSC,jalana District Questions Police Bharti,jalana District GK Talathi Exam,jalana District ZP Exam Questions, जालना जिल्हा सामान्य ज्ञान, जालना जिल्हा प्रश्नोत्तरे, जालना जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न

Jalana District Important Questions Answer | जालना जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच - 01

जालना जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Jalana District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर जालना जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

jalana District Important Questions,jalana District GK,jalana District MCQ, जालना जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Jalana District General Knowledge,Exam Wise Keywords,jalana District MCQ for MPSC,jalana District Questions Police Bharti,jalana District GK Talathi Exam,jalana District ZP Exam Questions, जालना जिल्हा सामान्य ज्ञान, जालना जिल्हा प्रश्नोत्तरे, जालना जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

जालना जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?

❶ 1 मे 1960

❷ 1 मे 1981

❸ 15 ऑगस्ट 1982

❹ 26 जानेवारी 1999

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 मे 1981


Question : 2

जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ बीड

❷ नांदेड

❸ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

❹ बुलढाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 |
जालना जिल्हा स्वतंत्र जिल्हा होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्याचा एक भाग होता .
प्रशासकीय सोयीसाठी आणि विकासाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यांचे विभाजन करून जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद व अंबड हे 4 तालुके तसेच परभणी जिल्ह्यातील परतूर तालुका असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समाविष्ट करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
पुढील काळात तालुक्यांचे टप्प्याटप्प्याने विभाजन करण्यात येऊन नवीन (मंठा, बदनापूर, घनसावंगी ) तालुके तयार झाले .


Question : 3

जालना जिल्ह्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?

❶ वसंतराव नाईक

❷ शरद पवार

❸ ए.आर.अंतुले

❹ बाबासाहेब भोसले

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ए.आर.अंतुले


Question : 4

जालना जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ कुंडलिका

❷ गोदावरी

❸ दुधना

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुंडलिका


Question : 5

जालना शहराचे प्राचीन नाव काय होते असे मानले जाते ?

❶ जनकपूर

❷ प्रतिष्ठान

❸ नंदीग्राम

❹ मूक्तेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | जनकपूर


Question : 6

ऐतिहासिक काळात जालना हे शहर कोणत्या साम्राज्याचा भाग होते ?

❶ मौर्य साम्राज्य

❷ निजाम

❸ सातवाहन

❹ राष्ट्रकूट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | निजाम


Question : 7

जालना जिल्ह्याचा अक्षांशीय विस्तार किती आहे ?

❶ 19.01' उत्तर ते 21.03' उत्तर

❷ 18.05' उत्तर ते 20.02' उत्तर

❸ 17.01' उत्तर ते 19.05' उत्तर

❹ 20.01' उत्तर ते 22.05' उत्तर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 19.01' उत्तर ते 21.03' उत्तर


Question : 8

जालना जिल्ह्याचा रेखांशीय विस्तार किती आहे ?

❶ 75.04' पूर्व ते 76.04' पूर्व

❷ 74.05' पूर्व ते 75.08' पूर्व

❸ 76.01' पूर्व ते 77.05' पूर्व

❹ 73.05' पूर्व ते 74.05' पूर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 75.04' पूर्व ते 76.04' पूर्व


Question : 9

जालना जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 7,118 चौ.किमी

❷ 6,500 चौ.किमी

❸ 8,200 चौ.किमी

❹ 5,900 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 7,118 चौ.किमी
काही शासकीय संदर्भ व उपलब्ध आकडेवारीनुसार जालना जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 7612 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 2.47% इतके आहे
तथापि, विविध शासकीय अहवाल, संदर्भग्रंथ, वर्षानुसार अद्ययावत माहिती किंवा परीक्षा मंडळाच्या अधिकृत उत्तरसूचीत किंचित फरक आढळू शकतो .
म्हणून, परीक्षेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी शासकीय/अधिकृत संदर्भाशी सुसंगत असलेले उत्तर योग्य मानावे


Question : 10

जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 2.01 %

❷ 2.51 %

❸ 3.10 %

❹ 1.50 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2.51 %


Question : 11

जालना जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 15 व्या

❷ 20 व्या

❸ 19 व्या

❹ 10 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 19 व्या


Question : 12

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ भोकरदन

❷ अंबड

❸ जालना

❹ परतूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भोकरदन


Question : 13

केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील कोणत्या ठिकाणी 'उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र' (Satellite Monitoring Earth Station) उभारले आहे ?

❶ जांब

❷ राजूर

❸ इंदेवाडी

❹ दहेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | इंदेवाडी
अवकाशातील उपग्रहांकडून येणाऱ्या लहरींवर लक्ष ठेवणे आणि रेडिओ लहरींच्या फ्रिक्वेन्सीमध्ये होणारी ढवळाढवळ तपासणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे . हे केंद्र जालना शहरापासून अगदी जवळ असलेल्या इंदेवाडी शिवारात स्थित आहे


Question : 14

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जालना जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ बदनापूर

❷ घनसावंगी

❸ जाफ्राबाद

❹ मंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | जाफ्राबाद


Question : 15

जालना जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ मंठा

❷ परतूर

❸ अंबड

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मंठा


Question : 16

जालना जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ बदनापूर

❷ भोकरदन

❸ घनसावंगी

❹ अंबड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | बदनापूर


Question : 17

जालना जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ घनसावंगी

❷ अंबड

❸ परतूर

❹ मंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | घनसावंगी


Question : 18

जालना जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ भोकरदन

❷ जाफ्राबाद

❸ जालना

❹ मंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भोकरदन


Question : 19

जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ भोकरदन

❷ जालना

❸ अंबड

❹ परतूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जालना


Question : 20

जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ नाशिक

❸ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

❹ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


Question : 21

जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 7

❷ 8

❸ 9

❹ 10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 8


Question : 22

खालीलपैकी कोणता तालुका जालना जिल्ह्यात येत नाही ?

❶ मंठा

❷ घनसावंगी

❸ पाथरी

❹ बदनापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पाथरी


Question : 23

जालना जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ कुंडलिका

❷ गोदावरी

❸ पूर्णा

❹ दूधना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुंडलिका


Question : 24

जालना जिल्ह्याला कोणत्या पिकाचे कोठार किंवा महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले जाते ?

❶ कापूस

❷ संत्री

❸ मोसंबी

❹ गहू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मोसंबी


Question : 25

1803 मध्ये जालना जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध 'असाईची लढाई' झाली होती ?

❶ भोकरदन

❷ जाफ्राबाद

❸ परतूर

❹ अंबड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जाफ्राबाद
असाईची लढाई (23 सप्टेंबर 1803) ही दुसर्‍या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान मराठा साम्राज्य (शिंदे व भोसले) आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली एक महत्त्वपूर्ण लढाई होती .
जालना जिल्ह्यातील (महाराष्ट्र) असाई येथे झालेल्या या युद्धात मेजर जनरल आर्थर वेलेस्लीच्या नेतृत्वाखालील लहान इंग्रज सैन्याने 50,000 हून अधिक मराठा सैन्याचा पराभव केला . या पराभवाने मराठा सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात केली


Question : 26

जालना येथील 'मोती तलाव' कोणी बांधला होता ?

❶ अहिल्याबाई होळकर

❷ जमशेद खान

❸ दौलतराव शिंदे

❹ समर्थ रामदास स्वामी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जमशेद खान


Question : 27

खालीलपैकी कोणता तालुका जालना जिल्ह्यात समाविष्ट नाही ?

❶ घनसावंगी

❷ बदनापूर

❸ पैठण

❹ मंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पैठण


Question : 28

जालना जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5
जालना जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत .
उत्तरेस : जळगाव , पूर्वेस : बुलढाणा आणि परभणी , दक्षिणेस : बीड , पश्चिमेस : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
◾हा जिल्हा मराठवाडा प्रदेशातील असून, याच्या सीमा जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांनी वेढलेल्या आहेत


Question : 29

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला लागून नाही ?

❶ बुलढाणा

❷ परभणी

❸ जळगाव

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | नाशिक


Question : 30

जालना जिल्ह्याच्या उत्तर दिशेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ?

❶ बीड

❷ बुलढाणा

❸ परभणी

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बुलढाणा


Question : 31

जालना जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे ?

❶ परभणी

❷ बीड

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ बुलढाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बीड


Question : 32

जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?

❶ बुलढाणा

❷ जळगाव

❸ बीड

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जळगाव


Question : 33

जालना जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ?

❶ घनसावंगी

❷ अंबड

❸ जालना

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही


Question : 34

जालना जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

❶ बीड

❷ जळगाव

❸ परभणी

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | परभणी


Question : 35

जालना आणि बीड जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

❶ कुंडलिका

❷ गोदावरी

❸ दुधना

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोदावरी


Question : 36

जालना जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगररांग पसरलेली आहे ?

❶ बालाघाट

❷ सातपुडा

❸ अजिंठा (सातमाळा)

❹ हरिश्चंद्रगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अजिंठा (सातमाळा)


Question : 37

जालना जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या नदीने व्यापलेली आहे ?

❶ गोदावरी

❷ सिंदफणा

❸ मांजरा

❹ प्रवरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गोदावरी


Question : 38

जालना आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या सरहद्दीवर उत्तर भागात कोणती डोंगररांग आहे ?

❶ सह्याद्री

❷ अजिंठा

❸ बालाघाट

❹ निर्मल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अजिंठा


Question : 39

दक्षिण दिशेला गोदावरी नदीमुळे जालना जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी होते ?

❶ परभणी

❷ बीड

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ अहमदनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बीड


Question : 40

जालना आणि परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर खालीलपैकी कोणत्या नदीचा प्रवाह आढळतो ?

❶ दुधना व दक्षिण पूर्णा

❷ वैनगंगा

❸ मुळा-मुठा

❹ कृष्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | दुधना व दक्षिण पूर्णा


Question : 41

दक्षिण पूर्णा नदीचा उगम कोठे होतो ?

❶ अजिंठा डोंगररांगा

❷ बालाघाट रांगा

❸ सह्याद्री पर्वत

❹ महाबळेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अजिंठा डोंगररांगा
दक्षिण पूर्णा नदीचा उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात अजिंठा डोंगर रांगेत होतो


Question : 42

जालना जिल्ह्यातील 'निम्न दुधना' प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ घनसावंगी

❷ परतूर

❸ बदनापूर

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | परतूर
'निम्न दुधना' प्रकल्प जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आहे . हा प्रकल्प दुधना नदीवर असून, याच्या अंतर्गत जलाशयाचा काही भाग मंठा तालुक्याशीही जोडलेला आहे, आणि तो जालना व परभणी जिल्ह्यांच्या सीमाभागात स्थित आहे


Question : 43

दुधना नदीचा उगम कोठे होतो ?

❶ खल्ताबाद जवळील डोंगर

❷ अजिंठा लेणी

❸ विंध्य पर्वत

❹ हरिश्चंद्रगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | खल्ताबाद जवळील डोंगर
दुधना नदीचा उगम छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद - म्हैसमाळ - सारोळा या अर्धवर्तुळाकार डोंगररांगांमध्ये होतो .
ही नदी मराठवाड्यातील प्रमुख नदी असून, ती पुर्व वाहिनी आहे आणि पुढे परभणी शहराच्या ईशान्येला दक्षिण पूर्णा नदीला जाऊन मिळते


Question : 44

जालना जिल्ह्यातून वाहणारी 'गिरजा' ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?

❶ गोदावरी

❷ पूर्णा

❸ तापी

❹ मुळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पूर्णा


Question : 45

'खेळणा' नदीचा उगम कोठे होतो ?

❶ अजिंठा रांगा

❷ बालाघाट

❸ वेरुळ डोंगर

❹ गाविलगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अजिंठा रांगा
खेळणा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केळगाव मुर्डेश्वर (अजिंठा डोंगररांगा) येथे होतो . जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे खेळणा नदी पूर्णा नदीला मिळते


Question : 46

जालना जिल्ह्यातील 'जाफ्राबाद' शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

❶ पूर्णा

❷ खेळणा

❸ दुधना

❹ गिरजा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | पूर्णा


Question : 47

'गल्हाटी' मध्यम प्रकल्प जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ मंठा

❷ अंबड

❸ बदनापूर

❹ भोकरदन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अंबड


Question : 48

पूर्णा आणि खेळणा नद्यांचा संगम कोठे होतो ?

❶ जाफ्राबाद

❷ भोकरदन

❸ मंठा

❹ परतूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | जाफ्राबाद


Question : 49

'धामना' जलसिंचन प्रकल्प जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ भोकरदन

❷ बदनापूर

❸ जालना

❹ अंबड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भोकरदन
भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे धामणा नदीवर हा जलसिंचन प्रकल्प स्थित आहे


Question : 50

जालना जिल्ह्यातील कोणत्या नदीला 'मराठवाड्याची जीवनवाहिनी' असणाऱ्या गोदावरीची महत्त्वाची उपनदी मानले जाते ?

❶ दक्षिण पूर्णा

❷ कुंडलिका

❸ गिरजा

❹ खेळणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | दक्षिण पूर्णा


महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले जालना जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post