Kotwal Bharti Question Paper | कोतवाल भरती सराव प्रश्नसंच - 06
🎯 महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात नमूद केली आहेत ?
❶ कलम 14
❷ कलम 21
❸ कलम 51A
❹ कलम 32
राज्यपालांची नियुक्ती कोण करतो ?
❶ मुख्यमंत्री
❷ राष्ट्रपती
❸ पंतप्रधान
❹ विधानसभा
भारतातील पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला ?
❶ 42 वी घटनादुरुस्ती
❷ 44 वी घटनादुरुस्ती
❸ 73 वी घटनादुरुस्ती
❹ 86 वी घटनादुरुस्ती
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ तहसीलदार
❹ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला ?
❶ बोधगया
❷ सारनाथ
❸ कुशीनगर
❹ लुंबिनी
भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात ?
❶ केवळ लोकसभा सदस्य
❷ केवळ राज्यसभा सदस्य
❸ निर्वाचक मंडळ
❹ सर्वोच्च न्यायालय
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘भारत छोडो आंदोलन’ कोणत्या वर्षी सुरू झाले ?
❶ 1919
❷ 1920
❸ 1930
❹ 1942
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ?
❶ 1919
❷ 1922
❸ 1930
❹ 1942
भारताच्या प्रमाणवेळेसाठी कोणत्या रेखावृत्ताचा आधार घेतला जातो ?
❶ 0°
❷ 82°30' पूर्व
❸ 90° पूर्व
❹ 23°30' उत्तर
कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते ?
❶ 6
❷ 7
❸ 8
❹ 10
भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे ?
❶ गंगा
❷ गोदावरी
❸ नर्मदा
❹ कृष्णा
चिलिका सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ गुजरात
❸ ओडिशा
❹ पश्चिम बंगाल
नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
❶ 2012
❷ 2015
❸ 2017
❹ 2020
मत्स्य उत्पादन वाढीशी संबंधित क्रांतीला काय म्हणतात ?
❶ हरित क्रांती
❷ निळी क्रांती
❸ धवल क्रांती
❹ पिवळी क्रांती
भारतीय अर्थव्यवस्थेत महागाईचा अर्थ काय होतो ?
❶ वस्तूंच्या किमतींच्या सामान्य पातळीत वाढ
❷ बेरोजगारीत घट
❸ उत्पादनात नेहमीची वाढ
❹ निर्यातीत घट
मानवी शरीरात इन्सुलिन कोणता अवयव तयार करतो ?
❶ यकृत
❷ मूत्रपिंड
❸ स्वादुपिंड
❹ फुफ्फुसे
व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
❶ रातांधळेपणा
❷ स्कर्व्ही
❸ मुडदूस
❹ बेरीबेरी
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख अधिकारी कोण असतो ?
❶ ग्रामसेवक
❷ जिल्हाधिकारी
❸ तहसीलदार
❹ तलाठी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ?
❶ रायगड
❷ प्रतापगड
❸ सिंहगड
❹ पन्हाळा
‘गीतांजली’ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
❶ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
❷ रवींद्रनाथ टागोर
❸ प्रेमचंद
❹ हरिवंश राय बच्चन
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
❶ सिंधुदुर्ग
❷ लातूर
❸ गोंदिया
❹ पालघर
कॉलरा हा आजार कशामुळे होतो ?
❶ अमिबा
❷ जीवाणू
❸ विषाणू
❹ बुरशी
राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
❶ 5 सप्टेंबर
❷ 29 ऑगस्ट
❸ 26 जानेवारी
❹ 16 डिसेंबर
महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे ?
❶ जळगाव
❷ रत्नागिरी
❸ सातारा
❹ गडचिरोली
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘शनिवार वाडा’ कोणत्या शहरात आहे ?
❶ मुंबई
❷ पुणे
❸ सातारा
❹ नागपूर
महाराष्ट्रातील ‘माथेरान’ हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ रायगड
❷ नाशिक
❸ कोल्हापूर
❹ वर्धा
इ.स. 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली ?
❶ श्रीहरिकोटा
❷ थुंबा
❸ पोखरण
❹ जैतापूर
वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो ?
❶ M.B.A
❷ D.N.A
❸ N.D.A
❹ D.R.I
खालील संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती : 6, 12, 18, 24, -------
❶ 28
❷ 30
❸ 32
❹ 36
खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षर कोणते : A _ C _ E _ F _ G ____
❶ H
❷ I
❸ J
❹ K
माया ही सीमा ची आई आहे. सीमा ही राधाची बहीण आहे. तर मायाचा राधाशी काय संबंध आहे ?
❶ बहीण
❷ आई
❸ मावशी
❹ आजी
एक मुलगा पूर्वेकडे 4 मीटर चालतो. त्यानंतर उजवीकडे वळून 4 मीटर चालतो. तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?
❶ ईशान्य
❷ आग्नेय
❸ नैऋत्य
❹ वायव्य
एका रांगेत रोहनचा डावीकडून 3 रा क्रमांक आणि उजवीकडून 6 वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 8
❷ 9
❸ 10
❹ 7
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?
❶ मुंबई
❷ पुणे
❸ नागपूर
❹ नाशिक
आज गुरुवार आहे. तर 3 दिवसांनी कोणता दिवस असेल ?
❶ रविवार
❷ सोमवार
❸ शनिवार
❹ मंगळवार
एका सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द CPPL असा लिहिला जातो. त्याच नियमानुसार TREE हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ USFF
❷ UREE
❸ TQDD
❹ VSGG
‘गाय’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
❶ गायन
❷ बैल
❸ गायी
❹ वासरू
‘डोळ्यात धूळ फेकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
❶ फसवणे
❷ मदत करणे
❸ कौतुक करणे
❹ शिक्षा करणे
‘सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
❶ केवल वाक्य
❷ संयुक्त वाक्य
❸ मिश्र वाक्य
❹ प्रश्नार्थक वाक्य
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ थोडे थोडे जमा केल्याने मोठा संचय होतो
❷ जास्त खर्च केल्याने फायदा होतो
❸ मोठे काम लगेच पूर्ण होते
❹ संकटात नेहमी मदत मिळते
‘जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
❶ केवल वाक्य
❷ संयुक्त वाक्य
❸ मिश्र वाक्य
❹ उद्गारार्थी वाक्य
‘राजा सिंहासारखा शूर आहे.’ या वाक्यात कोणता अलंकार आहे ?
❶ रूपक अलंकार
❷ उपमा अलंकार
❸ अनुप्रास अलंकार
❹ यमक अलंकार
2500 या संख्येचा 100 ने भाग केल्यास भागाकार किती येईल ?
❶ 25
❷ 250
❸ 2500
❹ 2.5
एका रकमेवर 1000 रुपयांवर 5% दराने 1 वर्षाचे सरळव्याज किती मिळेल ?
❶ 25 रुपये
❷ 50 रुपये
❸ 75 रुपये
❹ 100 रुपये
एक काम 10 दिवसांत पूर्ण होते. तेच काम 1 दिवसात किती भाग पूर्ण होईल ?
❶ 1/5
❷ 1/8
❸ 1/10
❹ 1/12
एक कार 1 तासात 50 km अंतर जाते. तर 5 तासांत ती किती अंतर जाईल ?
❶ 200 km
❷ 225 km
❸ 250 km
❹ 300 km
एका त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज किती असते ?
❶ 90°
❷ 180°
❸ 270°
❹ 360°
एका पिशवीत 3 लाल आणि 2 निळे चेंडू आहेत. त्यातून डोळे बंद करून 1 चेंडू काढला तर लाल चेंडू मिळण्याची शक्यता किती आहे ?
❶ 2/5
❷ 1/2
❸ 3/5
❹ 4/5
4 कि.मी. + 6 मी. + 500 सें.मी. = किती मीटर
❶ 405 मीटर
❷ 406 मीटर
❸ 4050 मीटर
❹ 456 मीटर
एका आयताची परिमिती 56 cm असून त्याची लांबी 16 cm आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी असेल ?
❶ 160 चौ. सेमी
❷ 324 चौ. सेमी
❸ 192 चौ. सेमी
❹ 256 चौ. सेमी
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
