सिंधुदुर्ग जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Sindhudurg District Gk Question in Marathi

सिंधुदुर्ग जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Sindhudurg District General Knowledge Questions

सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Sindhudurg District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Sindhudurg District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Sindhudurg District Important Questions, Sindhudurg District GK, Sindhudurg District MCQ, सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, Sindhudurg District General Knowledge,Exam Wise Keywords, Sindhudurg District MCQ for MPSC, Sindhudurg District Questions Police Bharti, Sindhudurg District GK Talathi Exam, Sindhudurg District ZP Exam Questions, सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य ज्ञान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्नोत्तरे, सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ रत्नागिरी

❷ कोल्हापूर

❸ रायगड

❹ गोवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली
1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा नवीन स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला


Question : 2

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?

❶ 1 मे 1960

❷ 1 मे 1981

❸ 1 मे 1991

❹ 1 मे 2001

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 मे 1981


Question : 3

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

❶ मालवण

❷ कुडाळ

❸ ओरस

❹ कणकवली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ओरस
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरस (Oras) येथे आहे . हे ठिकाण कुडाळ तालुक्यात असून प्रशासकीय कामांसाठी हे सिंधुदुर्गनगरी म्हणून ओळखले जाते


Question : 4

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

❶ मालवण

❷ दक्षिण रत्नागिरी

❸ ओरस

❹ सिंधुनगरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दक्षिण रत्नागिरी


Question : 5

छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सिंधुदुर्ग' हा जलदुर्ग कोणत्या बेटावर बांधला आहे ?

❶ खांदेरी

❷ कुरटे

❸ जंजिरा

❹ अलिबाग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कुरटे


Question : 6

महाराष्ट्रातील पहिला 'पर्यटन जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे ?

❶ रत्नागिरी

❷ सिंधुदुर्ग

❸ औरंगाबाद

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील पहिला 'पर्यटन जिल्हा' म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे
कोकण विभागातील या जिल्ह्याला 30 एप्रिल 1997 रोजी अधिकृतपणे पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले


Question : 7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'स्कुबा डायव्हिंग' प्रसिद्ध आहे ?

❶ वेंगुर्ला

❷ विजयदुर्ग

❸ मालवण

❹ देवगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मालवण


Question : 8

जगप्रसिद्ध 'देवगड हापूस' आंबा कोणत्या जिल्ह्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे ?

❶ रत्नागिरी

❷ सिंधुदुर्ग

❸ रायगड

❹ ठाणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सिंधुदुर्ग


Question : 9

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे ?

❶ कर्नाटक

❷ गोवा

❸ गुजरात

❹ तेलंगणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोवा


Question : 10

'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाणारे 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ सातारा

❷ कोल्हापूर

❸ सिंधुदुर्ग

❹ पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | सिंधुदुर्ग


Question : 11

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणता किल्ला हा छत्रपती 'शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र' मानले जात असे ?

❶ विजयदुर्ग

❷ रांगणा

❸ मनोहरगड

❹ साळवे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | विजयदुर्ग


Question : 12

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ सावंतवाडी

❷ दोडामार्ग

❸ वेंगुर्ला

❹ कुडाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दोडामार्ग


Question : 13

'लाकडी खेळण्यांसाठी' प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण कोणते ?

❶ कणकवली

❷ सावंतवाडी

❸ मालवण

❹ वैभववाडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सावंतवाडी


Question : 14

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तेरेखोलचा किल्ला' कोणत्या नदीच्या मुखावर आहे ?

❶ कर्ली नदी

❷ गड नदी

❸ तेरेखोल नदी

❹ शुक नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | तेरेखोल नदी


Question : 15

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर (शिवराजेश्वर मंदिर) कोणत्या किल्ल्यावर आहे ?

❶ विजयदुर्ग

❷ सिंधुदुर्ग

❸ प्रतापगड

❹ रायगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध शिवराजेश्वर मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर (मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे स्थित आहे
हे मंदिर महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी इ.स. 1695 मध्ये बांधले असून, याला शिवरायांचे देशातील एकमेव मंदिर मानले जाते


Question : 16

सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

❶ 121 किमी

❷ 160 किमी

❸ 212 किमी

❹ 196 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 121 किमी


Question : 17

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विमानतळ स्थित आहे ?

❶ चिपी विमानतळ

❷ लोहगाव विमानतळ

❸ ओझर विमानतळ

❹ सोनेगाव विमानतळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चिपी विमानतळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग विमानतळ (ज्याला चिपी-परुळे विमानतळ म्हणूनही ओळखले जाते) स्थित आहे
हे विमानतळ वेंगुर्ला तालुक्यातील चिपी-परुळे येथे आहे


Question : 18

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 40 किमी

❷ 62 किमी

❸ 82 किमी

❹ 121 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 62 किमी


Question : 19

सिंधुदुर्ग जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

❶ 80 किमी

❷ 105 किमी

❸ 97 किमी

❹ 140 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 97 किमी


Question : 20

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 4230 चौ.किमी

❷ 5207 चौ.किमी

❸ 6400 चौ.किमी

❹ 3850 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | ५,२०७ चौ.किमी


Question : 21

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 1.7%

❷ 2.5%

❸ 3.2%

❹ 4.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.7%


Question : 22

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 20 व्या

❷ 25 व्या

❸ 30 व्या

❹ 34 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 30 व्या


Question : 23

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ सावंतवाडी

❷ कणकवली

❸ मालवण

❹ कुडाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सावंतवाडी


Question : 24

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ देवगड

❷ वैभववाडी

❸ वेंगुर्ला

❹ दोडामार्ग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वेंगुर्ला


Question : 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ सावंतवाडी

❷ वेंगुर्ला

❸ दोडामार्ग

❹ कुडाळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | दोडामार्ग


Question : 26

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

❶ देवगड

❷ वैभववाडी

❸ कणकवली

❹ मालवण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वैभववाडी


Question : 27

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ मालवण

❷ कुडाळ

❸ ओरोस

❹ सावंतवाडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ओरोस


Question : 28

सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ कोकण

❸ नाशिक

❹ कोल्हापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कोकण


Question : 29

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 5

❷ 7

❸ 8

❹ 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 8
देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग


Question : 30

खालीलपैकी कोणता तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत नाही ?

❶ वैभववाडी

❷ दोडामार्ग

❸ राजापूर

❹ वेंगुर्ला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | राजापूर


Question : 31

सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ पश्चिम महाराष्ट्र

❷ कोकण

❸ मराठवाडा

❹ विदर्भ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कोकण


Question : 32

सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?

❶ 2

❷ 3

❸ 4

❹ 5

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 2
सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील केवळ रत्नागिरी आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात .
याशिवाय दक्षिणेला गोवा राज्य आणि आग्नेयेला कर्नाटक राज्याची सीमा लागते


Question : 33

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला इतर कोणत्याही जिल्ह्याची किंवा राज्याची सीमा स्पर्श करत नाही?

❶ मालवण

❷ कुडाळ

❸ कणकवली

❹ दोडामार्ग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मालवण


Question : 34

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

❶ रायगड

❷ कोल्हापूर

❸ रत्नागिरी

❹ गोवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | रत्नागिरी


Question : 35

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागते ?

❶ कर्नाटक

❷ तेलंगणा

❸ गोवा

❹ गुजरात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोवा


Question : 36

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर कोणती नदी नैसर्गिक सरहद्द तयार करते ?

❶ तेरेखोल नदी

❷ गड नदी

❸ शुक नदी

❹ कर्ली नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | शुक नदी


Question : 37

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर कोणती महत्त्वाची नदी वाहते, जी गोवा राज्याला वेगळे करते ?

❶ तेरेखोल नदी

❷ शास्त्री नदी

❸ सावित्री नदी

❹ वशिष्ठी नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तेरेखोल नदी


Question : 38

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता महत्त्वाचा घाट आहे ?

❶ बोर घाट

❷ थळ घाट

❸ फोंडा घाट

❹ माळशेज घाट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | फोंडा घाट
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत प्रामुख्याने आंबोली घाट आणि गगनबावडा (फोंडा) घाट हे दोन महत्त्वाचे घाट आहेत
यापैकी आंबोली घाट सावंतवाडी-बेळगाव मार्गावर, तर गगनबावडा घाट कोल्हापूरला सिंधुदुर्गशी जोडणारा प्रमुख आणि निसर्गरम्य मार्ग आहे


Question : 39

2011 च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 8,49,651

❷ 10,12,340

❸ 7,50,000

❹ 9,25,400

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 8,49,651


Question : 40

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे ?

❶ 1.20%

❷ 0.76%

❸ 1.50%

❹ 2.10%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 0.76%


Question : 41

2011 च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ कुडाळ

❷ सावंतवाडी

❸ कणकवली

❹ मालवण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कुडाळ


Question : 42

2011 च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ वैभववाडी

❷ दोडामार्ग

❸ देवगड

❹ वेंगुर्ला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दोडामार्ग


Question : 43

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?

❶ 150

❷ 180

❸ 163

❹ 205

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 163


Question : 44

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 990

❷ 1030

❸ 1036

❹ 1015

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 1036


Question : 45

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे?

❶ 80.5%

❷ 85.5%

❸ 90.5%

❹ 88.5%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 85.5%


Question : 46

2011 च्या जनगणनेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर असलेला तालुका कोणता?

❶ वेंगुर्ला

❷ मालवण

❸ कुडाळ

❹ सावंतवाडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कुडाळ


Question : 47

2011 च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे?

❶ दोडामार्ग

❷ वैभववाडी

❸ कणकवली

❹ देवगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | दोडामार्ग


Question : 48

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे?

❶ 75%

❷ 87%

❸ 90%

❹ 82%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 87%


Question : 49

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे?

❶ 12.5%

❷ 20.5%

❸ 15.5%

❹ 18.5%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 12.5%


Question : 50

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे?

❶ 910

❷ 920

❸ 922

❹ 945

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 922



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post