1000+ General Knowledge Questions For Kids in Marathi | लहान मुलांसाठी सामान्य ज्ञान प्रश्न


100+ General Knowledge Questions for Kids in Marathi

लहान मुलांसाठी 100+ सामान्य ज्ञानाचे मजेदार प्रश्न


आपण दररोज कितीतरी गोष्टी पाहतो, ऐकतो, शिकतो पण आपण त्या खरोखर लक्षात ठेवतो का ? 🤔

📚 सामान्य ज्ञान General Knowledge म्हणजे पुस्तकातली नुसती माहिती नाही, तर ते आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या आणि दिसणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचं गंमतीशीर ज्ञान !

🤔 तुम्ही कधी विचार केला आहे का — फुलं वेगवेगळ्या रंगांची का असतात ? किंवा आकाशात ढग कसे तयार होतात ? किंवा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

🎲 म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत “लहान मुलांसाठी सामान्य ज्ञानाचे मजेदार प्रश्न” – जिथे शिकणे म्हणजे खेळ, आणि प्रश्न म्हणजे कोडी

🚀 चला तर मग, आज आपण अशाच काही मजेदार, सोप्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नांची एक धमाल यात्रा सुरू करूया .............

General Knowledge Questions For Kids in Marathi

1 ) जंगलचा राजा कोणाला म्हणतात ? 
उत्तर - सिंह (Lion)

2 ) कोणत्या प्राण्याला लांब सोंड असते ? 
उत्तर - हत्ती (Elephant)

3 ) कोणता पक्षी सर्वात उंच उडतो ? 
उत्तर - गरुड (Eagle)

4 ) कोणता प्राणी 'वाळवंटातील जहाज' म्हणून ओळखला जातो ? 
उत्तर - उंट (Camel)

5 ) कोणत्या प्राण्याला लांब मान असते ? 
उत्तर - जिराफ (Giraffe)

6 ) कोणता प्राणी आपल्याला दूध देतो ? 
उत्तर - गाय (Cow)

7 ) कोणत्या पक्ष्याला 'शांततेचे प्रतीक' मानले जाते  
उत्तर - कबूतर (Pigeon)

8 ) मध गोळा करणारा कीटक कोणता ? 
उत्तर - मधमाशी (Honey Bee)

9 ) कोणता प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो ? 
उत्तर - बेडूक (Frog)

10 ) कोणत्या पक्ष्याच्या डोक्यावर तुरा असतो ? 
उत्तर - मोर (Peacock)

11 ) मांजरीच्या बाळाला काय म्हणतात ? 
उत्तर - पिल्लू (Kitten)

12 ) सर्वात मोठा सागरी प्राणी कोणता ? 
उत्तर - ब्लू व्हेल (Blue Whale)

13 ) कोणता प्राणी नेहमी हसल्यासारखा दिसतो ? 
उत्तर - डॉल्फिन (Dolphin)

14 ) कोणता प्राणी सर्वात वेगाने धावतो ? 
उत्तर - चित्ता (Cheetah)

15 ) कोणत्या प्राण्याचे रक्त लाल नसून पांढरे असते ? उत्तर - झुरळ (Cockroach)

16 ) कोणता पक्षी उडत नाही ? 
उत्तर - शहामृग (Ostrich) आणि पेंग्विन (Penguin)

17 ) सापाच्या घराला काय म्हणतात ? 
उत्तर - बीळ (Burrow)

18 ) कोणत्या प्राण्याला त्याच्या पाठीवर मोठा कूबड असतो ? 
उत्तर - उंट (Camel)

19 ) कोणता पक्षी रंग बदलू शकतो ? 
उत्तर - ह्युमिंगबर्ड 

20 ) कोणत्या प्राण्याचे दात आयुष्यभर वाढतच राहतात ? 
उत्तर - उंदीर (Mouse)

21 ) आपल्या शरीरात एकूण किती हाडे (Bones) असतात ? 
उत्तर - 206

22 ) आपण कोणत्या अवयवाने ऐकतो ? 
उत्तर - कान (Ears)

23 ) आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ? 
उत्तर - त्वचा (Skin)

24 ) आपण श्वास घेण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतो ? 
उत्तर - ऑक्सिजन (Oxygen)

25 ) आपल्या शरीरात रक्त पंप करण्याचे काम कोण करते ? 
उत्तर - हृदय (Heart)

26 ) आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कुठे होते ? 
उत्तर - पोट (Stomach)

27 ) आपल्या शरीराच्या कोणत्या भागात केस सर्वात जास्त वेगाने वाढतात ? 
उत्तर - डोक्यावरचे केस

28 ) आपल्या शरीराचे 'नियंत्रण कक्ष' कोणाला म्हणतात ? 
उत्तर - मेंदू (Brain)

29 ) आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे ? 
उत्तर - जबड्याचा स्नायू (Masseter)

30 ) आपण एका मिनिटात किती वेळा श्वास घेतो ? 
उत्तर - सुमारे 15 ते 20 वेळा

31 ) इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात ? 
उत्तर - सात (7)

32 ) आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ? 
उत्तर - चंद्र (Moon)

33 ) सूर्यापासून आपल्याला काय मिळते ? 
उत्तर - उष्णता आणि प्रकाश (Heat & Light)

34 ) कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणतात ? 
उत्तर - मंगळ (Mars)

35 ) सर्वात मोठा खंड कोणता ? 
उत्तर - आशिया (Asia)

36 ) समुद्राचे पाणी कसे असते ? 
उत्तर - खारट (Salty)

37 ) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ? 
उत्तर - पाच (5)

38 ) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ? 
उत्तर - माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest)

39 ) कोणत्या रंगाला ' खतरा ' म्हणून ओळखले जाते  
उत्तर - लाल रंग (Red)

40 ) जगातील सर्वात लांब नदी कोणती ? 
उत्तर - नाईल नदी (Nile River)

41 ) कोणत्या ऋतूत झाडांची पाने गळून पडतात ? 
उत्तर - पानगळ (Autumn)

42 ) आपल्या पृथ्वीला 'निळा ग्रह' का म्हणतात ? 
उत्तर - कारण तिच्यावर पाण्याचे प्रमाण जास्त आहे

43 ) पाण्याचे नैसर्गिक गोठणबिंदू तापमान किती आहे ? 
उत्तर - 0° अंश सेल्सिअस (0° Celsius)

44 ) कोणता वायू झाडे आणि वनस्पतींना जगण्यासाठी आवश्यक असतो ? 
उत्तर - कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide)

45 ) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? 
उत्तर - गंगा (Ganga)

46 ) भारताची राजधानी कोणती आहे ? 
उत्तर - नवी दिल्ली (New Delhi)

47 ) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? 
उत्तर - वाघ (Tiger)

48 ) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? 
उत्तर - मोर (Peacock)

49 ) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? 
उत्तर - हॉकी (Hockey)

50 ) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ? 
उत्तर - कमळ (Lotus)

51 ) भारताचे राष्ट्रपिता कोण आहे ? 
उत्तर - महात्मा गांधी (Mahatma Gandhi)

52 ) 'जय हिंद' हा नारा कोणी दिला ? 
उत्तर - नेताजी सुभाषचंद्र बोस

53 ) ताजमहाल कोणत्या शहरात आहे ? 
उत्तर - आग्रा (Agra)

54 ) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ? 
उत्तर - 15 ऑगस्ट 1947

55 ) महाराष्ट्राची राजधानी कोणती ? 
उत्तर - मुंबई (Mumbai)

56 ) भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत ? 
उत्तर - तीन (केशरी, पांढरा, हिरवा)

57 ) महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते ? 
उत्तर - ताम्हण (Jarul)

58 ) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? 
उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू

59 ) 2 ऑक्टोबर हा दिवस कोणत्या दोन महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे ? 
उत्तर - महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री

60 ) भारतीय चलनाचे नाव काय आहे ? 
उत्तर - रुपया (Rupee)

61 ) एक डझनमध्ये किती वस्तू असतात ? 
उत्तर - 12

62 ) सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती ? 
उत्तर - 10

63 ) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? 
उत्तर - मोर (Peacock)

64 ) 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ? 
उत्तर - 1000 मीटर

65 ) 'वर्षातील सर्वात मोठा दिवस' कोणता आहे ? 
उत्तर - 21 जून

66 ) प्रकाशाचा मुख्य स्त्रोत कोणता ? 
उत्तर - सूर्य (Sun)

67 ) बर्फ कोणत्या अवस्थेत असतो ? 
उत्तर - स्थायू (Solid)

68 ) झाडांना फळे कोणत्या क्रियेमुळे लागतात ? 
उत्तर - प्रकाश संश्लेषण (Photosynthesis)

69 ) कोणत्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ? 
उत्तर - सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton)

70 ) आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ? 
उत्तर - 8

71 ) आपल्या तोंडात किती दात असतात ? 
उत्तर - 32 दात

72 ) मी नेहमी तुमच्यासमोर असतो, पण तुम्ही मला पाहू शकत नाही. सांगा पाहू मी कोण ? 
उत्तर - भविष्य (Future)

73 ) क्रिकेटमध्ये 100 धावा करणाऱ्यास काय म्हणतात ? 
उत्तर - शतक (Century)

74 ) आठवड्यात एकूण किती दिवस असतात ? 
उत्तर - सात (7)

75 ) वर्षात (Year) एकूण किती महिने असतात ? 
उत्तर - 12

76 ) कोणत्या फळाला 'फळांचा राजा' म्हणतात ? 
उत्तर - आंबा (Mango)

77 ) कोणत्या रंगाचे मिश्रण केल्यास हिरवा रंग मिळतो ? 
उत्तर - पिवळा (Yellow) आणि निळा (Blue)

78 ) कोणत्या ऋतूत तुम्ही स्वेटर घालता ? 
उत्तर - हिवाळा (Winter)

79 ) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ? 
उत्तर - पूर्व (East)

80 ) तुमच्या आईच्या भावाला तुम्ही काय म्हणता ? 
उत्तर - मामा

81 ) तुम्ही कोणत्या अवयवाने वस्तूंचा वास घेतो ? 
उत्तर - नाक (Nose)

82 ) आंब्याचा राजा म्हणून कोण ओळखला जातो ? 
उत्तर - हापूस (Alphonso Mango)

83 ) जगातील सर्वात मोठे फूल कोणते ? 
उत्तर - रॅफ्लेशिया (Rafflesia)

84 ) 1 वर्षात किती महिने असतात ? 
उत्तर - 12 महिने (12 Months)

85 ) प्राणवायू (Oxygen) कोण देतात ? 
उत्तर - झाडे (Trees)

86 ) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ? 
उत्तर - शहामृग (Ostrich)

87 ) 'Jungle Book’ मधील मुख्य पात्र कोण ? 
उत्तर - मोगली (Mowgli)

88 ) कोणता खेळ 'किंग ऑफ गेम्स' म्हणून ओळखला जातो ? 
उत्तर - बुद्धिबळ (Chess)

89 ) कोणता प्राणी "जंगलाचा राजा" म्हणून ओळखला जातो ? 
उत्तर - सिंह (Lion)

90 ) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ? 
उत्तर - हमिंगबर्ड (Hummingbird)

91 ) तुमच्या एका हाताला किती बोटे आहेत ? 
उत्तर - पाच (5)

92 ) कोणत्या फळाचा रंग पिवळा असतो ? 
उत्तर - केळी (Banana)

93 ) भारताचे राष्ट्रगीत कोणते ? 
उत्तर - जन गण मन (Jana Gana Mana)

94 ) दूरची वस्तू बघण्यासाठी आपण काय वापरतो ? 
उत्तर - दुर्बीण (Telescope)

95 ) सर्वात जास्त काळ जगणारा सजीव कोणता ? 
उत्तर - कछुआ / कासव (Tortoise)

96 ) जगातील सर्वात लहान देश कोणता ? 
उत्तर - व्हॅटिकन सिटी (Vatican City)

97 ) पृथ्वीवर किती खंड आहेत ? 
उत्तर - 7 खंड (Seven Continents)

98 ) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ? 
उत्तर - माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest)

99 ) सर्वात वेगवान प्राणी कोणता ? 
उत्तर - चित्ता (Cheetah)

100 ) कोणती वस्तू पाण्यामध्ये तरंगते ? 
उत्तर - लाकूड (Wood)

101 ) कोणती वस्तू नेहमी खाली पडते पण कधीच वर जात नाही ? 
उत्तर - पाऊस (Rain)

102 ) आपल्या देशाचे नाव काय आहे ? 
उत्तर - भारत (India)

103 ) आपण चहामध्ये कोणता पदार्थ टाकतो, ज्यामुळे तो गोड लागतो ? 
उत्तर - साखर (Sugar)

104 ) आपण कोणत्या अवयवाने चव घेतो ? 
उत्तर - जीभ (Tongue)

105 ) वर्षातील कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात ? 
उत्तर - फेब्रुवारी (February)

Gk for Kids in Marathi : लहान मुलांना नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात आणि सामान्य ज्ञान त्यांना जगाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करते. हे त्यांच्या उत्सुकतेला चालना देते आणि त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान मिळवून देते

सामान्य ज्ञान केवळ शाळेतील अभ्यासातच नाही, तर दैनंदिन जीवनातही खूप उपयुक्त ठरते. यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते आणि ते अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात

General Knowledge For Kids : सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी अनेक सोपे मार्ग आहेत. मुलांनी पुस्तके वाचणे, टीव्हीवरील माहितीपट पाहणे, आणि आपल्या आसपासच्या लोकांशी गप्पा मारणे हे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्यास आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रोत्साहित करावे. यामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते

बाहेरील जगात फिरताना, विविध ठिकाणी भेट देताना मुलांना तिथल्या गोष्टींबद्दल माहिती द्या. उदाहरणार्थ, ऐतिहासिक ठिकाणे, प्राणीसंग्रहालय किंवा विज्ञान केंद्रे अशा ठिकाणी भेट दिल्याने त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो

शेवटी, सामान्य ज्ञान वाढवणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लावा. रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यास प्रवृत्त करा. यामुळे त्यांचे ज्ञान वाढेल आणि ते अधिक आत्मविश्वासू बनतील. सामान्य ज्ञान केवळ माहिती गोळा करणे नाही, तर ती माहिती समजून घेणे आणि तिचा योग्य वापर करणे हे देखील महत्त्वाचे आहे

हे प्रश्न खास करून लहान मुलांच्या वयोगटानुसार निवडले गेले आहेत, जेणेकरून ते शिकताना त्यांचा उत्साह टिकून राहील आणि त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल

या प्रश्नांच्या माध्यमातून मुलांचे सर्वसामान्य ज्ञान वाढेलच, पण त्यांचं आत्मविश्वासही बळकट होईल. प्रश्न विविध विषयांशी संबंधित आहेत – जसे की इतिहास, भूगोल, विज्ञान, भारताविषयीची माहिती आणि बरंच काही

मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे आणि शिकण्याची आवड निर्माण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे . म्हणूनच आम्ही ही प्रश्नमंजुषा सुलभ, रंगीत आणि मजेदार स्वरूपात सादर केली आहे

तुम्हाला ही प्रश्नमंजुषा कशी वाटली ? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तुमचे विचार, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत
ते आम्हाला भविष्यात अजून चांगली आणि उपयुक्त माहिती तयार करण्यासाठी मदत करतील

© MPSC Battle — General Knowledge Questions For Kids in Marathi | Gk for kids in Marathi

Post a Comment

Previous Post Next Post