General Knowledge Questions in Marathi
MPSC राज्यसेवा, Group B & C , Talathi , Police Bharti परीक्षांसाठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच
स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर एक ध्येय, एक लढा आणि आत्मविश्वासाचा कस लागणारा प्रवास असतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), तलाठी, पोलीस भरती, ZP परीक्षा, UPSC किंवा कोणतीही इतर सरकारी परीक्षा असो – प्रत्येक परीक्षेत सामान्य ज्ञान (General Knowledge) हा अत्यंत महत्वाचा घटक असतो.
सामान्य ज्ञानाचे सखोल ज्ञान केवळ परीक्षेतील गुण वाढवत नाही, तर एका बुद्धिमान आणि जागरूक नागरिकाचे रूप घडवते. मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि दर्जेदार मराठी GK प्रश्न उपलब्ध असणे हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही या लेखात 100 पेक्षा अधिक मराठी सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे दिली आहेत, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षा Crack करण्यासाठी नक्कीच मदत करतील.
या ब्लॉग पोस्ट मध्ये महाराष्ट्र व भारताच्या इतिहास, भूगोल, संविधान, विज्ञान व चालू घडामोडींसंबंधित परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न व मराठीत स्पष्ट आणि अचूक उत्तरे त्याचबरोबर अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्सचा समावेश करण्यात आला आहे.
जर तुम्ही MPSC, Group B & Group C, Talathi, SSC, Railways, Police Bharti किंवा कोणतीही इतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करत असाल, तर हे प्रश्न तुमच्या तयारीचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
1 ) भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौ.कि.मी आहे ?
उत्तर : 32,87,263 चौ.कि.मी
2 ) क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : 7 वा
3 ) भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर : 7517 किमी
4 ) भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर : K2
5 ) स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?
उत्तर : पंडित नेहरू
6 ) बलवंत राय मेहता समितीच्या शिफारशीवरून राजस्थान मध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पंचायत राज्यव्यवस्था सुरू झाली ?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1959
7 ) भारतात येणारे पहिले युरोपियन लोक कोण होते ?
उत्तर : पोर्तुगीज
8 ) 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला ?
उत्तर : लॉर्ड बेटिंग
9 ) बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले ?
उत्तर : 1832
10 ) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर : पं.जवाहरलाल नेहरू
11 ) भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले ?
उत्तर : 1947
12 ) गांधीजींचा जन्म कोठे झाला ?
उत्तर : पोरबंदर
13 ) राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
14 ) असहकार चळवळ कधी सुरू झाली ?
उत्तर : 1920
15 ) बंगालची फाळणी कोणी केली ?
उत्तर : लॉर्ड कर्झन
16 ) महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह कोणता ?
उत्तर : चंपारण्य सत्याग्रह
17 ) भारतातील पहिली रेल्वे कोणी सुरू केली ?
उत्तर : लॉर्ड डलहौसी
18 ) भारतीय शिक्षणाचे सनद कशास म्हटले जाते ?
उत्तर : चार्ल्स वूडचा खलिता
19 ) "भारतीय राज्यघटनेचे जनक" म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : डॉ.बी.आर.आंबेडकर
20 ) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद
21 ) भारताची पंतप्रधान बनणारी पहिली भारतीय महिला कोण होती ?
उत्तर : इंदिरा गांधी
22 ) 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : महात्मा गांधी
23 ) प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते ?
उत्तर : चंद्रगुप्त मौर्य
24 ) सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला ?
उत्तर : सिंधू नदी
25 ) 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
26 ) प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर : 1757
27 ) भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ?
उत्तर : लॉर्ड माउंटबॅटन
28 ) भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण कधी जाहीर केले ?
उत्तर : 1952
29 ) जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे ?
उत्तर : 2.42%
30 ) भारतातील कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे ?
उत्तर : उत्तर प्रदेश
31 ) भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे ?
उत्तर : 9.28%
32 ) देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : दुसरा
33 ) रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य कोणी लिहिले ?
उत्तर : वाल्मिकी ऋषी
34 ) 1857 च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले, ज्याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध देखील म्हटले जाते ?
उत्तर : मंगल पांडे
35 ) भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला ?
उत्तर : वास्को द गामा
36 ) कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिकाला "नेताजी" म्हणून ओळखले जाते ?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
37 ) दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला ?
उत्तर : शाहजहान
38 ) "भारताचा लोहपुरुष" म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
39 ) भारतात "वंशीय राजवट" कोणी सुरू केली ?
उत्तर : मौर्य घराणे
40 ) 1857 च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरातून झाली ?
उत्तर : मेरठ
41 ) प्लासीची लढाई कधी झाली ?
उत्तर : 23 जून 1757
42 ) भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते ?
उत्तर : वासुदेव बळवंत फडके
43 ) भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात ?
उत्तर : लॉर्ड रिपन
44 ) आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडला ?
उत्तर : दादाभाई नवरोजी
45 ) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात ?
उत्तर : रौलट अॅक्ट
46 ) भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली ?
उत्तर : 1853
47 ) पुढीलपैकी कोणी दत्तक वारसा नामंजूर केला ?
उत्तर : लॉर्ड डलहौसी
48 ) पुणे करार 1932 साली कोणामध्ये घडून आला ?
उत्तर : महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर
49 ) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले
50 ) स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर
51 ) शून्यधारीत अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडण्यात आला होता ?
उत्तर : शंकराव चव्हाण
52 ) शून्यधारीत अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र
53 ) नाबार्ड ची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 12 जुलै 1982
54 ) भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : केसी नियोगी
55 ) प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : मध्य प्रदेश
56 ) ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती ?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी
57 ) नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
58 ) अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण ?
उत्तर : राकेश शर्मा
59 ) "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर : जवाहरलाल नेहरू
60 ) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते ?
उत्तर : सी. राजगोपालाचारी
61 ) पानिपतची लढाई कोणत्या दोन राज्यकर्त्यांमध्ये झाली होती ?
उत्तर : बाबर आणि इब्राहिम लोदी
62 ) आग्रा शहराची स्थापना कोणी केली ?
उत्तर : सिकंदर लोदी
63 ) "नाइटिंगल ऑफ इंडिया" म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : सरोजिनी नायडू
64 ) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
उत्तर : अमृतसर
65 ) कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ?
उत्तर : वीरेंद्र सेहवाग
66 ) वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ?
उत्तर : अभिनव बिंद्रा
67 ) "भारताचे मिसाईल मॅन" म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
68 ) भारत व अफगाणिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे ?
उत्तर : ड्यूरांड रेषा
69 ) आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?
उत्तर : रॅमन मॅगसेसे
70 ) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर : साहित्य
71 ) संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस कोण होते ?
उत्तर : ट्रिग्वेली (नॉर्वे)
72 ) मानवी हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने कधी घोषित केला ?
उत्तर : 10 डिसेंबर 1948
73 ) दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना (SAARC) चे सदस्य किती आहेत ?
उत्तर : 8 (आठ)
74 ) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये किती स्थायी सदस्य आहेत ?
उत्तर : 5 (पाच)
75 ) संयुक्त राष्ट्र (UNO) ही संघटना कधी स्थापन झाली ?
उत्तर : 24 ऑक्टोबर 1945
76 ) भारत व पाकिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे ?
उत्तर : रॅडक्लीफ रेषा
77 ) राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 24 जानेवारी
78 ) जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 10 जानेवारी
79 ) शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर : विज्ञान
80 ) रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर : जिनेव्हा
81 ) पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते ?
उत्तर : नवी दिल्ली
82 ) मराठवाडा मुक्ती संग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 17 सप्टेंबर
83 ) जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 20 मार्च
84 ) डेविस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : टेनिस
85 ) अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर : डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
86 ) भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय व्यक्ती कोण ?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
87 ) देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे ?
उत्तर : परमवीर चक्र
88 ) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
89 ) सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू प्रसिद्ध आहे ?
उत्तर : कविता राऊत
90 ) भारत व बांगलादेश दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे ?
उत्तर : तीन बीघा कॉरिडॉर / ऑपरेशनल बाउंड्री
91 ) बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : कर्नाटक
92 ) लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?
उत्तर : पहिला
93 ) भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते आहे ?
उत्तर : गोवा
94 ) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : उत्तराखंड
95 ) राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : 2 फेब्रुवारी 2006
96 ) भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर : डॉ. एम.एस. स्वामीनाथन
97 ) भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर : डॉ. वर्गीस कुरियन
98 ) भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास करण्यात आला ?
उत्तर : 1904
99 ) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर : 1952
100 ) रिझर्व बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : मुंबई
101 ) वास्को-द-गामा याचे भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आगमन झाले ?
उत्तर : कालिकत
102 ) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 1 मे
103 ) 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर
104 ) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला ?
उत्तर : लाहोर
105 ) भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
106 ) कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला ?
उत्तर : वास्को-द-गामा
107 ) भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले ?
उत्तर : पोर्तुगीज
108 ) 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ?
उत्तर : सर ॲलन ह्यूम
109 ) कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते ?
उत्तर : गोदावरी
110 ) मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : सेनापती बापट
111 ) 'चले जाव' चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
उत्तर : 1942
112 ) वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?
उत्तर : जेम्स वॅट
113 ) मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली ?
उत्तर : बिल गेट्स
114 ) आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर : राजा राम मोहन रॉय
115 ) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?
उत्तर : 1914
116 ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर
117 ) चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ?
उत्तर : नीळ
118 ) लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
उत्तर : 5 वर्ष
119 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली ?
उत्तर : राजपूत (मुख्यत्वे नाही, पण काही संस्थानांनी मराठ्यांना मदत केली. मुख्य विरोधक अफगाण होते)
120 ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : महात्मा फुले
121 ) इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली ?
उत्तर : रासबिहारी बोस
122 ) उस्ताद झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ?
उत्तर : तबला
123 ) मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला ?
उत्तर : स्टुटगार्ड
124 ) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : सरोजिनी नायडू
125 ) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते ?
उत्तर : 15
126 ) अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला ?
उत्तर : ग्रेगोर मेंडेल (डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला)
127 ) हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?
उत्तर : महात्मा गांधी
128 ) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे वाक्य कोणी म्हटले ?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
129 ) फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
130 ) आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?
उत्तर : शाहिद आणि स्वराज्य
131 ) बंगालची फाळणी कोणी केली ?
उत्तर : लॉर्ड कर्झन
132 ) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?
उत्तर : 7-8 टक्के (सरासरी)
133 ) होमरूल लीगची स्थापना कोठे केली ?
उत्तर : पुणे (टिळकांनी) आणि अड्यार (ॲनी बेझंट यांनी)
134 ) होमरूल चळवळ कोणाशी संबंधित आहे ?
उत्तर : ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक
135 ) काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली ?
उत्तर : सुरत (1907)
136 ) भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त केला ?
उत्तर : 19 डिसेंबर 1961
137 ) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : सरोजिनी नायडू
138 ) 'बालकवी' या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : त्र्यंबक बापूजी ठोंबरे
139 ) 'चले जाव' ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
उत्तर : महात्मा गांधी (पंडित नेहरू यांनी अंतिम स्वरूप दिले)
140 ) कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : कुसुमाग्रज
141 ) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले ?
उत्तर : अमृतसर
142 ) झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : नागपूर
143 ) इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली ?
उत्तर : रासबिहारी बोस
144 ) रास्त गोफ्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
उत्तर : दादाभाई नवरोजी
145 ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
उत्तर : ॲलन ह्युम
146 ) 'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर
147 ) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 5 जून
148 ) वास्को द गामा 1498 साली भारतात कोठे पोहोचले ?
उत्तर : कालिकत
149 ) 'सरहद गांधी' या संबोधनाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
150 ) भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते ?
उत्तर : डॉ बी. एन. राव
151 ) ताजमहाल कोणत्या मुघल सम्राटाने बांधला ?
उत्तर : शाहजहान
152 ) भारतातील पहिली जनगणना कधी झाली ?
उत्तर : 1872 (पहिली अधिकृत/नियमित जनगणना 1881)
153 ) भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?
उत्तर : तारापूर
154 ) अरवली या प्राचीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर : गुरुशिखर
155 ) भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?
उत्तर : आर्यभट्ट
156 ) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 10 डिसेंबर
157 ) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ?
उत्तर : 288
158 ) क्ष-किरणांचा शोध कोणी लावला ?
उत्तर : विल्यम रॉटजेन
159 ) कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते ?
उत्तर : 8
160 ) जैन धर्मियांचे प्रथम तिर्थंकर कोण ?
उत्तर : ऋषभदेव
161 ) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे ?
उत्तर : सौदी अरेबिया
162 ) पक्ष्यांसाठीचे प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : राजस्थान
163 ) भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कोठे उभारण्यात आला ?
उत्तर : कुल्टी (पश्चिम बंगाल)
164 ) महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर : रत्नागिरी
165 ) कोयनानगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा तडाखा बसला होता ?
उत्तर : 1967
166 ) देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे ?
उत्तर : गंगापूर (नाशिक)
167 ) महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते ?
उत्तर : नागपूर
168 ) भारत व चीन यांच्यातील सरहद्दीचे नाव काय आहे ?
उत्तर : मॅकमोहन रेषा
169 ) जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?
उत्तर : K-2 (गॉडविन ऑस्टिन)
170 ) पश्चिम घाटातील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे ?
उत्तर : अन्नाईमुडी (अनैमुडी)
171 ) माजुली हे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे ?
उत्तर : ब्रह्मपुत्रा
172 ) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर : गंगा
173 ) भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर : गोदावरी
174 ) भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे ?
उत्तर : नर्मदा
175 ) भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे ?
उत्तर : बॅरन बेट
176 ) धुवाँधार धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : नर्मदा
177 ) भारताची सर्वात मोठी भूसीमा कोणत्या देशाशी आहे ?
उत्तर : बांगलादेश
178 ) भारताची सर्वात लहान भूसीमा कोणत्या देशाशी आहे ?
उत्तर : अफगाणिस्तान
179 ) भारतातील सर्वात लांब पुळण कोणता ?
उत्तर : मरीना (तमिळनाडू)
180 ) सुंदरलाल बहुगुणा यांचे नाव कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ?
उत्तर : चिपको आंदोलन
181 ) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : उपराष्ट्रपती
182 ) रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?
उत्तर : 1 एप्रिल 1935
183 ) 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?
उत्तर : 19 जुलै 1969
184 ) नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर : 15 मार्च 1950
185 ) निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : पंतप्रधान
186 ) अप्पिको आंदोलन कोणत्या राज्यात झाले ?
उत्तर : कर्नाटक
187 ) आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?
उत्तर : प्रवरानगर
188 ) गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले ?
उत्तर : 1911 (पूर्ण 1924)
189 ) महाराष्ट्राचे भरतपूर कोणत्या अभयारण्याला म्हणतात ?
उत्तर : नांदूर मधमेश्वर
190 ) महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोठे सुरू झाली ?
उत्तर : इचलकरंजी
191 ) महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते शहर आहे ?
उत्तर : इचलकरंजी
192 ) कोणत्या विभागात महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे आहेत ?
उत्तर : छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
193 ) एल.टी.टी.ई ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे ?
उत्तर : श्रीलंका
194 ) "ए मेरे वतन के लोगो" या गीताचे गीतकार कोण ?
उत्तर : प्रदीप
195 ) 1 मिलियन म्हणजे किती ?
उत्तर : 10 लाख
196 ) भारताची परदेशातील गुप्तचर संस्था कोणती ?
उत्तर : RAW (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग)
197 ) व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय ऑलिंपिकपटू कोण ?
उत्तर : अभिनव बिंद्रा
198 ) नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
199 ) महाराष्ट्रात जहाज बांधणी उद्योग कोठे आहे ?
उत्तर : माझगाव (मुंबई)
200 ) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर : रायगड
201 ) भारताची सुवर्णकन्या कोण ?
उत्तर : पी. टी. उषा
202 ) जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 1 डिसेंबर
203 ) सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
उत्तर : निळा देवमासा
204 ) आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
उत्तर : हेग
205 ) To the Last Bullet हे पुस्तक कोणावर आधारित आहे ?
उत्तर : अशोक कामटे
206 ) राजा हरिश्चंद्र चित्रपट कधी प्रदर्शित झाला ?
उत्तर : 1913
207 ) कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ?
उत्तर : 1 मे
208 ) क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर : राजस्थान
209 ) भारताचे मँचेस्टर कोणते शहर आहे ?
उत्तर : अहमदाबाद
210 ) नैसर्गिक बंदर व सात बेटांवर वसलेले शहर कोणते ?
उत्तर : मुंबई
211 ) गुलाबी शहर म्हणून कोणते ओळखले जाते ?
उत्तर : जयपूर
212 ) भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?
उत्तर : भाक्रा नांगल
213 ) भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला ?
उत्तर : तारापूर
214 ) सार्कचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर : काठमांडू, नेपाळ
215 ) अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण ?
उत्तर : युरी गागारीन
216 ) ग्रँड मास्टर ही पदवी कोणत्या खेळात दिली जाते ?
उत्तर : बुद्धिबळ
217 ) डुरॅंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : फुटबॉल
218 ) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 8 मार्च
219 ) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत ?
उत्तर : दादासाहेब फाळके
220 ) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर : भारतरत्न
221 ) 26 जानेवारी का साजरी केली जाते ?
उत्तर : प्रजासत्ताक दिन
222 ) जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 8 सप्टेंबर
223 ) भारतातील पहिली कागद गिरणी कोठे सुरू झाली ?
उत्तर : श्रीरामपूर (पश्चिम बंगाल)
224 ) अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : मध्य प्रदेश
225 ) अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : उत्तर प्रदेश
226 ) ताजमहाल कोठे आहे ?
उत्तर : आग्रा
227 ) स्त्री-पुरुष प्रमाण जास्त असलेले राज्य कोणते आहे ?
उत्तर : केरळ
228 ) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर : गोवा
229 ) भरतपूर पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : राजस्थान
230 ) पहिला पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला ?
उत्तर : जमशेदपूर
231 ) ऊसाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
उत्तर : उत्तर प्रदेश
232 ) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर : कळसुबाई
233 ) पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला ?
उत्तर : चंद्रपूर (हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, कारण भारतातील पहिला पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे आहे. चंद्रपूरमध्ये सिमेंटचे कारखाने आहेत)
234 ) कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमावर वसलेले शहर कोणते ?
उत्तर : कराड
235 ) औरंगाबाद जिल्ह्यातील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर : वैजापूर
236 ) पहिली भूविकास बँक कोठे सुरू झाली ?
उत्तर : पंजाब (झांग, पंजाबमध्ये 1920 साली)
237 ) लीप इयरमध्ये किती दिवस असतात ?
उत्तर : 366
238 ) निरोगी शरीराचे तापमान किती असते ?
उत्तर : 37°C (98.6°F)
239 ) कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वांना देता येते ?
उत्तर : O (O- नकारात्मक हे सार्वत्रिक दाता रक्त गट आहे)
240 ) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
उत्तर : आचार्य विनोबा भावे
241 ) "भावार्थ दीपिका" ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर : संत ज्ञानेश्वर
242 ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : महात्मा फुले
243 ) "सारे जहाँ से अच्छा" गीताचे गीतकार कोण ?
उत्तर : मुहम्मद इक्बाल
244 ) जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
उत्तर : आशिया
245 ) समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
उत्तर : रत्नागिरी (सर्वाधिक लांब किनारपट्टी)
246 ) राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेली संस्था कोणती ?
उत्तर : ब्रह्मो समाज
247 ) लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात ?
उत्तर : गोपाळ हरी देशमुख
248 ) सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
उत्तर : 6000°C
249 ) संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर : न्यूयॉर्क
250 ) डायनामाइट चा शोध कोणी लावला ?
उत्तर : आल्फ्रेड नोबेल
भारतातील पहिल्या व्यक्ती
भारताचे पहिले राष्ट्रपती |
डॉ. राजेंद्र प्रसाद |
भारताचे पहिले उपराष्ट्रपती |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन |
भारताचे पहिले पंतप्रधान |
पं. जवाहरलाल नेहरू |
भारताचे पहिले उपपंतप्रधान |
सरदार वल्लभभाई पटेल |
लोकसभेचे पहिले सभापती |
ग.वा. मावळणकर |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष |
व्योमेशचंद्र बॅनर्जी |
आय.सी.एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय |
सुरेंद्रनाथ बॅनर्जी |
भारतातील पहिले आय.सी.एस अधिकारी |
सत्येंद्रनाथ टागोर |
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय |
रवींद्रनाथ टागोर |
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय |
आचार्य विनोबा भावे |
इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय व्यक्ती |
मिहीर सेन |
एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय व्यक्ती |
तेनसिंग नोर्के |
भारताचा पहिला अंतराळवीर |
राकेश शर्मा |
प्राणवायुशिवाय एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला भारतीय व्यक्ती |
फु - दोरजी |
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्यायमूर्ती |
हिरालाल कानिया |
भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती |
सी. राजगोपालचारी |
भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय |
सी. व्ही. रमण |
अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय |
डॉ.अमर्त्य कुमार सेन |
भारतातील पहिला मोगल सम्राट |
बाबर |
भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल |
वॉरन हेस्टिंग्ज |
भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय |
लॉर्ड कॅनिंग |
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल |
सी. राजगोपालचारी |
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले गव्हर्नर |
सी.डी. देशमुख |
पहिले वैमानिक |
जे.आर.बी.टाटा |
पहिले मुस्लिम राष्ट्रपती |
डॉ. झाकीर हुसेन |
भारताचे पहिले गृहमंत्री |
सरदार पटेल |
भारतातील पहिल्या महिला
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती |
प्रतिभाताई पाटील |
भारतातील पहिल्या महिला लोकसभापती |
मीराकुमार |
भारतातील पहिल्या महिला अतिरिक्त सॉलीसिटर जनरल |
इंदिरा जयसिंह |
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान |
इंदिरा गांधी |
नियोजन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष |
इंदिरा गांधी |
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल |
सरोजिनी नायडू |
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री |
सुचेता कृपलानी |
भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस |
किरण बेदी |
भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री |
राजकुमारी अमृत कौर |
भारताच्या परदेशातील पहिली महिला राजदूत |
सी.बी. मुथाम्मा |
भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव |
चोकीला अय्यर |
भारतातील पहिली महिला अंतराळवीर |
कल्पना चावला |
नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला |
मदर तेरेसा |
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला |
आरती सहा ( गुप्ता ) |
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा |
रोज विल्यम बॅथ्यू |
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा |
ॲनी बेझंट |
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष |
सरोजिनी नायडू |
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश |
न्या. मीरासाहिब फातिमा बीबी |
यूनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला |
विजयालक्ष्मी पंडित |
भारताच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल |
पुनिता अरोरा |
एवरेस्ट शिखर सर करणारी तरुण महिला |
डिकी डोमा |
एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला |
बचेंद्री पाल |
महाराष्ट्रातील पहिल्या महिला
राष्ट्रपतीपद भूषविणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला |
श्रीमती प्रतिभाताई पाटील |
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त |
नीला सत्यनारायण |
महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका |
सावित्रीबाई फुले |
परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन स्त्री डॉक्टर |
आनंदीबाई जोशी |
एवरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला |
कृष्णा पाटील |
साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला |
इंदिरा संत |
दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला |
दुर्गा खोटे |
भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला |
लता मंगेशकर |
महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला |
माणिक वर्मा |
उत्तर ध्रुवावर पॅराशुट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला |
शितल महाजन |
महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री |
यशवंतराव चव्हाण |
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल |
श्री प्रकाश |
महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष |
सयाजीराव सिलम |
महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती |
वी.स.पागे |
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन |
आचार्य विनोबा भावे |
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन |
वि.स. खांडेकर |
साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन |
लक्ष्मण माने |
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन |
पु.ल. देशपांडे |
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन |
महर्षी धों.के. कर्वे |