Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 28
1 ) म्यूकरमायकोसिस हा आजार कशाने होतो ?
- जिवाणू
- बुरशी
- विषाणू
- प्रोटोझोआ
बुरशी
2 ) महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे , हे मंदिर कोणी बांधले ?
- छत्रपती संभाजी महाराज
- छत्रपती शाहू महाराज
- महाराणी येसूबाई
- छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम महाराज
3 ) सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
- भारत - पाकिस्तान
- भारत - श्रीलंका
- भारत - नेपाल
- भारत - म्यानमार
भारत - पाकिस्तान
4 ) स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ?
- टेरिडोफायटा
- थॅलोफायटा
- ब्रायोफाइटा
- यापैकी नाही
थॅलोफायटा
5 ) भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ?
- लक्षद्वीप
- बॅरन बेट
- इंदिरा पॉईंट
- यापैकी नाही
बॅरन बेट
6 ) अलहिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
- बॅरिस्टर जिना
- लिखायत अली
- मौलाना आझाद
- सर सय्यद अहमद खान
मौलाना आझाद
7 ) राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सातारा
- सांगली
- नाशिक
- कोल्हापूर
कोल्हापूर
8 ) भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
- ओडिशा
- कर्नाटक
- तमिळनाडू
- केरळ
तमिळनाडू
9 ) महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ?
- हत्ती
- शेकरू
- वाघ
- काळवीट
शेकरू
10 ) जीपीआरएस या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा ?
- जनरल पोलार रेडिएशन सर्विस
- गुगल पॅकेट रेडिओ सर्विस
- जनरल प्रायमरी रेडिओ सर्विस
- जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
11 ) सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?
- 448 प्रति चौरस किमी
- 365 प्रति चौरस किमी
- 202 प्रति चौरस किमी
- 799 प्रति चौरस किमी
365 प्रति चौरस किमी
12 ) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
- 20 नोव्हेंबर
- 20 मार्च
- 20 सप्टेंबर
- 20 जानेवारी
20 नोव्हेंबर
13 ) औदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- अहमदनगर
- अमरावती
- नांदेड
- सांगली
सांगली
14 ) ययाती या कादंबरीचे लेखक कोण ?
- पु ल देशपांडे
- अण्णाभाऊ साठे
- वि स खांडेकर
- शिवाजीराव सावंत
वि स खांडेकर
15 ) ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो ?
- उष्ण कटिबंधीय
- आयनोस्कीअर
- समताप मंडल
- मेसोस्फिअर
समताप मंडल
16 ) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
- पद्मभूषण
- भारतरत्न
- पद्मश्री
- पद्मविभूषण
भारतरत्न
17 ) खालीलपैकी कोणता खडक अग्निजन्य खडक दगड आहे ?
- ग्रॅनाईट
- मार्बल
- क्ले
- शेल
ग्रॅनाईट
18 ) भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदांमध्ये विस्तृत आहेत ?
- 13
- 52 अ
- 48
- 51 अ
51 अ
19 ) सिख धर्माची स्थापना कोणी केली ?
- गुरुगोविंद सिंग
- गुरु तेग बहादुर
- गुरुनानक
- गुरु राम दास
गुरुनानक
20 ) लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- त्रिपुरा
- मणिपूर
- मेघालय
- सिक्कीम
मणिपूर
21 ) अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
- अर्थशास्त्र
- क्रीडा
- राजकारण
- साहित्य
अर्थशास्त्र
22 ) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे ?
- मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पुणे
पुणे
23 ) चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- अकोला
- धुळे
- यवतमाळ
- सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
24 ) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण ?
- महात्मा ज्योतिबा फुले
- राजर्षी शाहू महाराज
- कर्मवीर भाऊराव पाटील
- महर्षी कर्वे
कर्मवीर भाऊराव पाटील
25 ) लोकहितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण ?
- गोपाळ कृष्ण गोखले
- गोपाळ हरी देशमुख
- गोपाळ गणेश आगरकर
- गोपाळ बाबा वलंगकर
गोपाळ हरी देशमुख
Nice test
ReplyDeleteशनिदेव आनंदा विभुतवार
ReplyDeleteमो 8975659256