पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 13

Police Patil Bharti Practice Question Set - 13


TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्नसंच

🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत .

प्रत्येकाने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल

🌐 आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी तुमच्या ब्राऊझर मध्ये 🔍 सर्च करा - Mpsc Battle Police Patil Bharti GK Questions

टीप :

सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा

पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set

सामान्यज्ञान प्रश्न

GK Question : 1

सन १९२७ च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
▪️ सरदार पटेल
▪️ महात्मा गांधी
▪️ बाबासाहेब आंबेडकर
▪️ विठ्ठलभाई पटेल
Correct Answer : सरदार पटेल
GK Question : 2

लाल सिंधी ही कशाची जात आहे ?
▪️ म्हैस
▪️ गाय
▪️ मेंढी
▪️ शेळी
Correct Answer : गाय
GK Question : 3

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?
▪️ 1 जून
▪️ 10 जून
▪️ 10 जुलै
▪️ 1 जुलै
Correct Answer : 1 जुलै
GK Question : 4

1 गिगाबाइट म्हणजे किती ?
▪️ 10 एम.बी
▪️ 124 एम.बी
▪️ 1024 एम.बी
▪️ 10124 एम.बी
Correct Answer : 1024 एम.बी
GK Question : 5

इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे ........
▪️ हाय ट्रान्सलेट ट्रॅफिक प्रोटोकॉल
▪️ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल
▪️ हेवी ट्रान्झीक्शन टर्मिनल प्रोग्राम
▪️ हायर टेलिफोनिक ट्रान्समिशन प्रोव्हायडर
Correct Answer : हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल
GK Question : 6

गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा निर्माण होते ?
▪️ औष्णिक ऊर्जा
▪️ यांत्रिक ऊर्जा
▪️ गतिज ऊर्जा
▪️ स्थितीज ऊर्जा
Correct Answer : गतिज ऊर्जा
GK Question : 7

गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे ?
▪️ मिथेन
▪️ कार्बन डाय-ऑक्साइड
▪️ नायट्रोजन
▪️ ऑक्सिजन
Correct Answer : मिथेन
GK Question : 8

1 HP ( अश्‍वशक्ती ) म्हणजे किती ?
▪️ 1000 वॅट
▪️ 36 ज्यूल
▪️ 746 ज्यूल
▪️ 746 वॅट
Correct Answer : 746 वॅट
GK Question : 9

संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
▪️ सिक्कीम
▪️ तेलंगणा
▪️ केरळ
▪️ अरुणाचल प्रदेश
Correct Answer : सिक्कीम
GK Question : 10

महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
▪️ नाशिक विभाग
▪️ पुणे विभाग
▪️ औरंगाबाद विभाग
▪️ अमरावती विभाग
Correct Answer : औरंगाबाद विभाग
GK Question : 11

महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?
▪️ 36
▪️ 32
▪️ 29
▪️ 26
Correct Answer : 26
GK Question : 12

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?
▪️ दरकेसा टेकड्या
▪️ गाविलगड टेकड्या
▪️ गाळणा टेकड्या
▪️ गायखुरी टेकड्या
Correct Answer : दरकेसा टेकड्या
GK Question : 13

हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
▪️ घटप्रभा
▪️ मुसी
▪️ तुंगभद्रा
▪️ गोदावरी
Correct Answer : मुसी
GK Question : 14

पीर पांजाळ रांग व धौलधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये होतो ?
▪️ पूर्व हिमालय
▪️ बृहत हिमालय
▪️ लघु हिमालय
▪️ यापैकी नाही
Correct Answer : लघु हिमालय
GK Question : 15

हिमाचल पर्वतरांगांचा गाभा कोणत्या खडकांनी बनलेला आहे ?
▪️ कनाश्म खडक
▪️ पटीताश्म खडक
▪️ दोन्ही
▪️ यापैकी नाही
Correct Answer : कनाश्म खडक
GK Question : 16

भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ?
▪️ पदुच्चरी
▪️ चंदिगड
▪️ लक्षद्वीप
▪️ दादरा नगर हवेली
Correct Answer : लक्षद्वीप
GK Question : 17

पांबम बेट कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे ?
▪️ भारत - बांगलादेश
▪️ भारत - मालदीव
▪️ भारत - म्यानमार
▪️ भारत - श्रीलंका
Correct Answer : भारत - श्रीलंका
GK Question : 18

दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते ?
▪️ अन्नाईमुडी
▪️ दोडाबैट्टा
▪️ कळसुबाई
▪️ धुपगड
Correct Answer : अन्नाईमुडी
GK Question : 19

नद्यांच्या सकल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ?
▪️ भांगर
▪️ भाबर
▪️ खादर
▪️ तराई
Correct Answer : खादर
GK Question : 20

भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाबरोबर आहे ?
▪️ बांगलादेश - नेपाळ
▪️ पाकिस्तान - बांगलादेश
▪️ बांगलादेश - भूतान
▪️ पाकिस्तान - नेपाळ
Correct Answer : पाकिस्तान - बांगलादेश
GK Question : 21

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?
▪️ कनाश्म
▪️ पटीताश्मन
▪️ दोन्ही
▪️ यापैकी नाही
Correct Answer : पटीताश्मन
GK Question : 22

वैज्ञानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता ?
▪️ हिमाचल पर्वतरांग
▪️ गंगेचे मैदान
▪️ द्वीपकल्पीय पठार
▪️ यापैकी नाही
Correct Answer : द्वीपकल्पीय पठार
GK Question : 23

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ?
▪️ शिवसागर
▪️ तानाजीसागर
▪️ वसंतसागर
▪️ लक्ष्मीसागर
Correct Answer : वसंतसागर
GK Question : 24

नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते ?
▪️ नंदुरबार
▪️ धुळे
▪️ जळगाव
▪️ अमरावती
Correct Answer : नंदुरबार
GK Question : 25

राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ सिंधुदुर्ग
▪️ रायगड
▪️ कोल्हापूर
▪️ पुणे
Correct Answer : पुणे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

🏷️ महत्त्वाची सुचना : जर तुम्हाला या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post