घड्याळ बुद्धिमत्ता प्रश्न | Clock Reasoning Questions in Marathi - MPSC Battle

घड्याळ बुद्धिमत्ता प्रश्न | Clock Reasoning Questions in Marathi

आपण रोज घड्याळ पाहतो, पण त्याच घड्याळावर आधारित प्रश्न तर्कशुद्ध पद्धतीने सोडवायचे असतील तर मेंदूला थोडा विचार करावा लागतो. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील घड्याळावरील प्रश्न उमेदवाराची वेळेची समज, गणिती तर्कशक्ती आणि निरीक्षण क्षमता तपासतात

Clock Reasoning Question in Marathi : या प्रश्नांमध्ये केवळ वेळ सांगणे महत्त्वाचे नसते, तर दिलेल्या माहितीचा योग्य तर्क लावून अचूक निष्कर्ष काढणे आवश्यक असते MPSC, Talathi, Police Bharti, PSI, SSC, Bank (IBPS, SBI), ZP Bharti अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा घटक हमखास विचारला जातो. सूत्रांची स्पष्ट समज आणि नियमित सराव असल्यास हे प्रश्न सोपे व गुण मिळवून देणारे ठरतात.

उदाहरण :
घड्याळात 3 वाजून 30 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काट्यामधील कोन किती अंशांचा असेल ?

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकात प्रामुख्याने खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात ;

  • काट्यांमधील कोनावर आधारित प्रश्न
  • काटे एकमेकांवर येण्याचे प्रश्न
  • काटे समोरासमोर येण्याचे प्रश्न
  • आरशातील वेळ
  • वेळ वाढवून / कमी करून विचारलेले प्रश्न


या घटकावर खाली दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी तयारी अधिक भक्कम करा

Reasoning question in Marathi,बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच,बुद्धिमत्ता सराव पेपर, Buddhimatta question in marathi,reasoning question answer in marathi

1 ) घड्याळात 3 वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो ?

A) 45°

B) 60°

C) 90°

D) 180°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 90°
स्पष्टीकरण : घड्याळातील प्रत्येक तासामध्ये 30° चा कोन असतो. 3 वाजता : 3 × 30° = 90°.


2 ) दुपारी 12:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?

A) 110°

B) 120°

C) 100°

D) 130°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 110°
स्पष्टीकरण : 12:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन = 110 अंश
सविस्तर स्पष्टीकरण खालील प्रमाणे : दुपारी 12:20 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन काढूया ?
पायरी 1 : मिनिट काट्याचे स्थान निश्चित करणे -
घड्याळाचा संपूर्ण गोल 360° चा असतो . मिनिट काटा 60 मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो .
म्हणजे एका मिनिटात मिनिट काट्याचे होणारे चलन : 360 / 60 = 6°
12:20 वाजता मिनिट काटा '4' वर असतो, म्हणजेच तो 20 मिनिटे चाललेला असतो
मिनिट काट्याचे 12 पासूनचे अंतर : 20 × 6 = 120°
पायरी 2 : तास काट्याचे स्थान निश्चित करणे
तास काटा 12 तासांत 360° पूर्ण करतो. याचा अर्थ तो एका तासात 30° सरकतो आणि एका मिनिटात 0.5° सरकतो
12:20 वाजता तास काटा बरोबर 12 वर नसून थोडा पुढे सरकलेला असतो
20 मिनिटांत तास काट्याचे होणारे चलन : 20 × 0.5 = 10° म्हणून, तास काट्याचे 12 पासूनचे एकूण अंतर : 10°
पायरी 3 : दोन्ही काट्यांमधील कोन काढणे आता आपण मिनिट काट्याच्या अंशातून तास काट्याचे अंश वजा करू :
120° - 10° =110°


3 ) एका दिवसात (24 तासात) घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांवर येतात ?

A) 22

B) 24

C) 44

D) 12

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 22 स्पष्टीकरण : दोन्ही काटे दर 12 तासात 11 वेळा एकमेकांवर येतात, म्हणून 24 तासात 22 वेळा


4 ) एका दिवसात घड्याळाचे काटे किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात ?

A) 22

B) 44

C) 24

D) 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 22 स्पष्टीकरण : विरुद्ध दिशेलाही 24 तासात 22 वेळा येतात


5 ) आरशात पाहिल्यास घड्याळात 9:15 ही वेळ दिसते, तर प्रत्यक्ष वेळ काय असेल ?

A) 3:45

B) 2:45

C) 4:45

D) 3:15

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 2:45 स्पष्टीकरण : आरशातील प्रतिमा आणि प्रत्यक्ष वेळ यांची बेरीज नेहमी 12:00 किंवा 11:60 येते. त्यामुळे प्रत्यक्ष वेळ काढण्यासाठी दिलेली वेळ 11:60 मधून वजा करावी 👉 11:60 - 9:15 = 2:45
काही महत्त्वाचे नियम :
जर दिलेली वेळ 1 ते 11 च्या दरम्यान असेल, तर ती 11:60 मधून वजा करा .:
जर दिलेली वेळ 11 ते 1 च्या दरम्यान असेल (उदा. 12:20), तर ती 23:60 मधून वजा करा


6 ) 5:40 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन होईल ?

A) 70°

B) 200°

C) 90°

D) 120°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 70°
स्पष्टीकरण : 5:40 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात 70° चा कोन असेल .
सविस्तर स्पष्टीकरण :
पायरी 1. मिनिट काट्याचे स्थान :
मिनिट काटा 40 मिनिटांवर आहे (म्हणजेच तो '8' या अंकावर आहे)
एका मिनिटात मिनिट काटा 6° पुढे सरकतो म्हणजे 12 पासूनचे मिनिट काट्याचे अंतर : 40 × 6 = 240°
पायरी 2. तास काट्याचे स्थान :
तास काटा 5 च्या पुढे सरकलेला आहे
तास काटा एका तासात 30° आणि एका मिनिटात 0.5° पुढे सरकतो म्हणजे 5 तासांचे अंतर : 5 × 30 = 150° व 40 मिनिटांमुळे तास काटा आणखी किती सरकला : 40 × 0.5 = 20° 12 पासूनचे तास काट्याचे एकूण अंतर : 150 + 20 = 170° पायरी 3. दोन्ही काट्यांमधील कोन काढण्यासाठी आता आपण मिनिट काट्याच्या अंशातून तास काट्याचे अंश वजा करू :
240° -170° = 70°


7 ) घड्याळाचा मिनिट काटा 1 मिनिटात किती अंश फिरतो ?

A) 1°

B) 5°

C) 6°

D) 0.5°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C |
स्पष्टीकरण : मिनिट काटा 60 मिनिटात 360° फिरतो, म्हणून 1 मिनिटात 360/60 = 6°.


8 ) घड्याळाचा तास काटा 1 मिनिटात किती अंश फिरतो ?

A) 6°

B) 30°

C) 0.5°

D) 1°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 0.5°
स्पष्टीकरण : तास काटा 1 तासात 30° फिरतो, म्हणून 1 मिनिटात 30/60 = 0.5°.


9 ) 7:30 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन असेल ?

A) 30°

B) 45°

C) 60°

D) 315°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 45°
स्पष्टीकरण : प्रश्न क्रमांक 6 चे स्पष्टीकरण पहा


10 ) एका तासात घड्याळाचे काटे किती वेळा एकमेकांशी काटकोन (90°) करतात ?

A) 1

B) 2

C) 22

D) 44

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 2
स्पष्टीकरण : प्रत्येक तासात दोनदा काटकोन होतो


11 ) घड्याळाचे दोन्ही काटे एका तासात किती वेळा एकमेकांवर येतात ?

A) 2 वेळा

B) 1 वेळ

C) 22 वेळा

D) 0 वेळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 1 वेळ
स्पष्टीकरण : प्रत्येक तासात दोन्ही काटे एकदा एकमेकांवर येतात.


12 ) एका दिवसात (24 तासात) घड्याळात किती वेळा काटकोन (90°) तयार होतो ?

A) 22 वेळा

B) 44 वेळा

C) 48 वेळा

D) 24 वेळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 44 वेळा
स्पष्टीकरण : 12 तासात 22 वेळा आणि 24 तासात 44 वेळा होतो
एका तासात घड्याळाचे काटे दोन वेळा एकमेकांशी काटकोन (90°) करतात . मात्र, यामध्ये काही अपवाद आहेत ज्यामुळे 12 आणि 24 तासांच्या हिशोबात ही संख्या थोडी बदलते . त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :
◾ 1 तासात : साधारणपणे 2 वेळा
◾ 12 तासांत : 22 वेळा (24 वेळा नाही)
◾ 24 तासांत म्हणजे एका दिवसात : 44 वेळा (48 वेळा नाही)
तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर तासाला दोनदा काटकोन होतो, तर 12 तासात 24 वेळा आणि 24 तासांत 48 वेळा का होत नाही ? याचे कारण खालील दोन वेळांमध्ये दडलेले आहे :
👉 2 ते 2 च्या दरम्यान : या 2 तासांत एकूण 4 वेळा काटकोन होण्याऐवजी फक्त 3 वेळा होतो (कारण बरोबर 3 वाजता होणारा काटकोन दोन्ही तासांसाठी सामायिक असतो)
👉 8 ते 10 च्या दरम्यान : या 2 तासांतही 4 वेळा काटकोन होण्याऐवजी फक्त 3 वेळा होतो (कारण बरोबर 9 वाजता होणारा काटकोन सामायिक असतो)
काटकोन होण्याच्या स्थितीची वैशिष्ट्ये :
◾ जेव्हा दोन्ही काट्यांमध्ये 15 मिनिटांचे अंतर असते, तेव्हा 90° चा कोन होतो
तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील काटकोन शोधण्यासाठी (30H - 5.5M = 90) किंवा (5.5M - 30H = 90) या सूत्राचा वापर केला जातो
लक्षात ठेवा :
जसे काटकोन दिवसातून 44 वेळा होतो, तसेच दोन्ही काटे एकमेकांवर येणे (0°) आणि एकमेकांच्या विरुद्ध जाणे (180°) या क्रिया दिवसातून प्रत्येकी 22 वेळा होतात


13 ) 8:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?

A) 120°

B) 130°

C) 140°

D) 100°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 130°
स्पष्टीकरण : प्रश्न क्रमांक 6 चे स्पष्टीकरण पहा


14 ) घड्याळात 10:10 वाजले असताना दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?

A) 245°

B) 115°

C) 105°

D) 115.5°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 115°
स्पष्टीकरण : घड्याळात 10:10 वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 115° चा कोन असेल .
याचे सविस्तर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे :
1. मिनिट काट्याचे स्थान (12 पासून) : ▪️ मिनिट काटा 10 मिनिटांवर आहे
▪️ एका मिनिटात मिनिट काटा 6° सरकतो म्हणजे 10×6 = 60
2. तास काट्याचे स्थान (12 पासून) :
▪️ तास काटा 10 च्या थोडा पुढे सरकला आहे
▪️ 10 तासांचे अंतर : 10 × 30° = 300°
▪️ 10 मिनिटांमुळे तास काटा आणखी किती सरकला : 10 × 0.5° = 5°
▪️ तास काट्याचे एकूण अंतर : 300° + 5° = 305°
3. दोन्ही काट्यांमधील कोन :
👉 टीप : जेव्हा हा कोन 180° पेक्षा जास्त येतो, तेव्हा आपण तो 'रिफ्लेक्स कोन' (Reflex Angle) मानतो . आतील लघुकोन काढण्यासाठी आपल्याला हे उत्तर 360° मधून वजा करावे लागते
म्हणून लघुकोन = 360° - 245° = 115°


15 ) आरशात पाहिले असता घड्याळात 4:20 वेळ दिसते, तर खरी वेळ किती ?

A) 8:40

B) 7:40

C) 8:20

D) 7:20

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 7:40
स्पष्टीकरण : 11:60 - 4:20 = 7:40.


16 ) पाण्याची प्रतिमा (Water Image) काढताना घड्याळातील 8:20 ही वेळ कशी दिसेल ?

A) 10:10

B) 9:10

C) 10:40

D) 9:40

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 10:10
स्पष्टीकरण : घड्याळातील वेळेची पाण्यातील प्रतिमा (Water Image) काढण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरली जाते . 8:20 या वेळेची पाण्याची प्रतिमा 10:10 अशी दिसेल
याचे स्पष्टीकरण आणि पद्धत खालीलप्रमाणे आहे :
पाण्यातील प्रतिमा काढण्याची पद्धत (Short Trick) :
पाण्यातील प्रतिमा काढताना दिलेली वेळ 18:30 मधून किंवा 17:90 मधून वजा करावी लागते
◾ जर मिनिटे 30 पेक्षा कमी असतील : तर दिलेली वेळ 18:30 मधून वजा करा
◾ जर मिनिटे 30 पेक्षा जास्त असतील : तर दिलेली वेळ 17:90 मधून वजा करा
8:20 साठी गणना अशी करा :
येथे मिनिटे (20) ही 30 पेक्षा कमी आहेत, म्हणून आपण 18:30 वापरू :
▪️ तासामधून तास वजा : 18 - 8 = 10
▪️मिनीटांमधून मिनिटे वजा : 30 - 20 = 10
मिळालेली वेळ 10:10 येते
👉 लक्षात ठेवा - एक महत्त्वाचा नियम (Correction Factor) :
घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेमध्ये तासाचा काटा कधीकधी पूर्णपणे अचूक नसतो. त्यामुळे जर पर्यायांमध्ये 10:10 नसेल, तर त्यातून 1 तास वजा करावा लागतो
▪️ अचूक उत्तर : घड्याळाच्या डायलनुसार पाहिल्यास 8:20 ची सर्वात जवळची आणि अचूक पाण्याची प्रतिमा 9:10 ही असते पाण्यातील प्रतिमेचे वैशिष्ट्य :
👉 पाण्यातील प्रतिमेत वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर दिसते
👉 परंतु, डावी आणि उजवी बाजू बदलत नाही (जी आरशातील प्रतिमेत बदलते)


17 ) 2:30 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन असेल ?

A) 90°

B) 105°

C) 75°

D) 60°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 105°
स्पष्टीकरण : प्रश्न क्रमांक 6 चे स्पष्टीकरण पहा


18 ) दुपारी 12 पासून संध्याकाळी 5:10 पर्यंत तास काटा किती अंशातून फिरला असेल ?

A) 150°

B) 155°

C) 160°

D) 145°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 155°
स्पष्टीकरण : 5 तास 10 मिनिटे = 310 मिनिटे. 310 × 0.5 = 155°.


19 ) घड्याळात 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल याप्रमाणे टोल पडत असल्यास, 24 तासात एकूण किती टोल पडतील ?

A) 78

B) 156

C) 144

D) 300

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 156
स्पष्टीकरण : 12 तासातील टोल = 78. 24 तासातील टोल = 78 × 2 = 156.


20 ) मिनिट काटा 50 मिनिटात किती अंशाचा कोन पार करतो ?

A) 300°

B) 250°

C) 270°

D) 320°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 300°
स्पष्टीकरण : 50 × 6 = 300°.


21 ) 3 आणि 4 च्या दरम्यान दोन्ही काटे एकमेकांवर कधी येतील ?

A) 3 वाजून 15 मिनिटांनी

B) 3 वाजून 16 4/11 मिनिटांनी

C) 3 वाजून 18 मिनिटांनी

D) 3 वाजून 20 मिनिटांनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 3:16 4/11


22 ) घड्याळाचा सेकंद काटा 1 सेकंदात किती अंश फिरतो ?

A) 1°

B) 6°

C) 30°

D) 360°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B |
स्पष्टीकरण : 60 सेकंदात 360°. 1 सेकंदात 6°.


23 ) सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत घड्याळाचे काटे किती वेळा सरळ रेषेत येतात ?

A) 11

B) 22

C) 12

D) 24

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 22
स्पष्टीकरण : 11 (0°) + 11 (180°) = 22 वेळा.


24 ) 9:30 वाजता तास काट्याची दिशा कोणती असेल ? (जर 12 वर उत्तर दिशा मानली)

A) उत्तर-पुर्व

B) दक्षिण-पश्चिम

C) उत्तर-पश्चिम

D) दक्षिण-पुर्व

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | उत्तर-पश्चिम
स्पष्टीकरण : 9 आणि 10 च्या मध्ये वायव्य (North-West) दिशा असते.


25 ) एका घड्याळ दर तासाला 5 सेकंद वेळ पुढे जाते. मंगळवारी सकाळी 8 वाजता ती काय वेळ दाखवेल (सोमवार सकाळी 8 पासून) ?

A) 8:02:00

B) 8:01:20

C) 8:05:00

D) 8:01:00

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 8:02:00
स्पष्टीकरण : 👉 एकूण वेळ काढणे : सोमवार सकाळी 8:00 ते मंगळवार सकाळी 8:00 पर्यंत एकूण किती तास होतात ते पाहू
सोमवार सकाळी 8 ते मंगळवार सकाळी 8 = 24 तास
👉 घड्याळ एकूण किती पुढे गेले ते काढणे :
दिलेली माहिती : घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते म्हणजे
1 तासात = 5 सेकंद
24 तासांत = 24 × 5 = 120 सेकंद
👉 सेकंदाचे मिनिटात रूपांतर करणे :
60 सेकंद = 1 मिनिट
120 सेकंद = 120 / 60 = 2 मिनिटे
👉 प्रत्यक्ष वेळ आणि घड्याळातील वेळ :
प्रत्यक्ष वेळ : सकाळी 8:00
घड्याळ पुढे गेल्यामुळे दाखवलेली वेळ : 8:00 + 2 मिनिटे = 8:02
मंगळवारी सकाळी 8 वाजता ते घड्याळ 8 वाजून 2 मिनिटे (8:02 AM) ही वेळ दाखवेल


26 ) 6:15 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन असेल ?

A) 90°

B) 97.5°

C) 100°

D) 82.5°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 97.5°


27 ) 15 मिनिटांत तास काटा किती अंशातून फिरतो ?

A) 90°

B) 15°

C) 7.5°

D) 30°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 7.5°
स्पष्टीकरण : 15 × 0.5 = 7.5°.


28 ) घड्याळात 11:20 वाजले आहेत. पाण्याचे प्रतिबिंब काय वेळ दाखवेल ?

A) 7:10

B) 6:10

C) 7:40

D) 6:40

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 7:10
स्पष्टीकरण : 18:30 - 11:20 = 7:10.


29 ) दुपारी 3:00 वाजल्यापासून रात्री 9:00 वाजेपर्यंत घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांवर येतील ?

A) 6

B) 5

C) 7

D) 4

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 6
स्पष्टीकरण : 6 तासात 6 वेळा.


30 ) जर मिनिट काटा 12 वरून 2 वर गेला, तर त्याने किती अंशाचा कोन पार केला ?

A) 30°

B) 60°

C) 15°

D) 10°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 60°
स्पष्टीकरण : 10 मिनिटे × 6° = 60°.


31 ) 4:40 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन असेल ?

A) 100°

B) 110°

C) 80°

D) 120°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 100°
स्पष्टीकरण : |30(4) - 5.5(40)| = 100°.


32 ) दर 60 मिनिटांत मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटे जास्त अंतर पार करतो ?

A) 60

B) 55

C) 5

D) 50

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 55
स्पष्टीकरण : मिनिट काटा 60 खुणा, तास काटा 5 खुणा. फरक = 55.


33 ) सकाळी 8:00 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात बाह्यकोन (Reflex angle) किती असेल ?

A) 120°

B) 240°

C) 300°

D) 250°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 240°
स्पष्टीकरण : 8 × 30 = 240°.


34 ) घड्याळात 7:35 वाजले असताना आरशातील प्रतिमा काय वेळ दाखवेल ?

A) 4:25

B) 5:25

C) 4:35

D) 5:35

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 4:25
स्पष्टीकरण : 11:60 - 7:35 = 4:25.


35 ) 5 आणि 6 च्या दरम्यान घड्याळाचे काटे सरळ रेषेत पण विरुद्ध दिशेला कधी येतील ?

A) 5:05

B) 6:00

C) 5:60

D) 5:54

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 6:00
स्पष्टीकरण : 5 ते 6 मध्ये बरोबर 6 वाजता विरुद्ध दिशा होते.


36 ) एका घड्याळाचा मिनिट काटा तासाला 4 मिनिटे मागे पडतो. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ते कोणती वेळ दाखवेल ?

A) 1:50

B) 1:44

C) 2:16

D) 1:56

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 1:44
स्पष्टीकरण : 4 तास × 4 मिनिटे = 16 मिनिटे मागे.


37 ) 1:10 वाजता घड्याळातील दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?

A) 30°

B) 25°

C) 20°

D) 35°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 25°
स्पष्टीकरण : |30(1) - 5.5(10)| = 25°.


38 ) घड्याळाचा तास काटा 40 मिनिटांत किती अंश फिरतो ?

A) 20°

B) 40°

C) 10°

D) 80°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 20°
स्पष्टीकरण : 40 × 0.5 = 20°.


39 ) 2 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील बाह्यकोन किती ?

A) 160°

B) 200°

C) 180°

D) 210°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 200°
स्पष्टीकरण : 360 - 160 = 200°.


40 ) 9 वाजून 10 मिनिटांनी घड्याळात आरशातील प्रतिमा काय वेळ दाखवेल ?

A) 3:50

B) 2:50

C) 2:10

D) 3:10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 2:50
स्पष्टीकरण : 11:60 - 9:10 = 2:50.


41 ) एका तासात घड्याळाचा मिनिट काटा सेकंद काट्यापेक्षा किती पटीने वेगात फिरतो ?

A) 12 पट

B) 60 पट

C) 360 पट

D) 5 पट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 60 पट
स्पष्टीकरण : सेकंद काटा मिनिटाला एक फेरी, मिनिट काटा तासाला एक फेरी.


42 ) 5:45 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?

A) 90°

B) 97.5°

C) 100°

D) 95.5°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 97.5°
स्पष्टीकरण : |30(5) - 5.5(45)| = 97.5°.


43 ) 9 आणि 10 च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाचे काटे काटकोनात असतील ?

A) 9:32 8/11

B) 9:30

C) 9:35

D) 9:40

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 9:32 8/11


44 ) रात्री 10:00 वाजल्यापासून सकाळी 10:00 वाजेपर्यंत काटे किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात ?

A) 10

B) 11

C) 12

D) 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 11
स्पष्टीकरण : 12 तासात 11 वेळा.


45 ) मिनिट काटा तासाला किती अंश फिरतो ?

A) 60°

B) 180°

C) 360°

D) 5°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 360°
स्पष्टीकरण : मिनिट काटा तासाला पूर्ण फेरी मारतो.


46 ) घड्याळात 10:30 वाजले आहेत, तर पाण्याची प्रतिमा काय असेल ?

A) 7:30

B) 8:00

C) 7:00

D) 8:30

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 8:00
स्पष्टीकरण : 18:30 - 10:30 = 8:00.


47 ) घड्याळाचा तास काटा तासाला किती अंश फिरतो ?

A) 30°

B) 60°

C) 15°

D) 45°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 30°
स्पष्टीकरण : 12 तासात 360°, म्हणून 1 तासात 30°.


48 ) 12:30 वाजता घड्याळात किती अंशाचा कोन असेल ?

A) 180°

B) 165°

C) 150°

D) 175°

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 165°
स्पष्टीकरण : 195° चा लहान कोन 165° आहे.


49 ) घड्याळात 8:45 वेळ झाली असल्यास मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल ?

A) पश्चिम

B) उत्तर

C) पूर्व

D) दक्षिण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | पश्चिम
स्पष्टीकरण : 45 मिनिटाला काटा 9 वर असतो.


50 ) एका दिवसात घड्याळाचे काटे किती वेळा सरळ रेषेत येतात ?

A) 22

B) 44

C) 48

D) 24

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 44 वेळा
स्पष्टीकरण : 22 (एकमेकांवर) + 22 (विरुद्ध).


Post a Comment

Previous Post Next Post