अंतर व दिशा प्रश्नसंच | Distance & Direction Reasoning Questions with Answers in Marathi
आपण रोजच्या आयुष्यात “डावीकडे वळा”, “उजवीकडे जा”, “सरळ पुढे जा” अशा सूचना ऐकतो आणि त्यानुसार दिशा ठरवतो. हाच रोजचा अनुभव Reasoning मधील अंतर व दिशा (Distance & Direction) प्रश्नांचा पाया आहे . या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एखादी व्यक्ती किंवा वस्तू दिलेल्या दिशांनुसार हालचाल करते आणि शेवटी ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे, हे शोधायचे असते
अंतर व दिशा प्रश्न उमेदवाराची दिशाज्ञान क्षमता, कल्पनाशक्ती आणि तार्किक मांडणी तपासतात. हे प्रश्न MPSC, Talathi, Police Bharti, PSI, SSC, Bank (IBPS, SBI), ZP Bharti अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नियमितपणे विचारले जातात. योग्य पद्धतीने आकृती काढून विचार केल्यास हे प्रश्न सोपे आणि वेगवान ठरतात
या टॉपिकमध्ये उत्तर काढताना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या चार मुख्य दिशांचा तसेच डावी–उजवी वळणे, समोर–मागे दिशा यांचा योग्य विचार करावा लागतो. त्यामुळे उमेदवाराची Spatial Thinking क्षमता विकसित होते .
उदाहरण :
राम पूर्वेकडे 10 मीटर चालतो. नंतर तो उजवीकडे वळून 5 मीटर चालतो. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळून 10 मीटर चालतो.
👉 राम सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ?
या घटकात प्रामुख्याने खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात ;
- डावी–उजवी वळणे आधारित प्रश्न
- सरळ हालचाल व अंतिम दिशा
- अंतर शोधा प्रकारचे प्रश्न
- एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या हालचाली
- मिश्र दिशा व अंतर प्रश्न
या घटकावर खाली दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी तयारी अधिक भक्कम करा
1 ) अजय आपल्या घरापासून उत्तरेकडे 5 किमी चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळून 3 किमी चालला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पूर्व स्पष्टीकरण : उत्तरेकडे (↑) जात असताना उजवीकडे (↱) वळल्यास 'पूर्व' दिशा येते
2 ) एक व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण स्पष्टीकरण : सूर्यास्ताच्या वेळी सूर्य 'पश्चिम' दिशेला असतो. पश्चिमेकडे (←) तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला 'दक्षिण' दिशा येते.
3 ) राम पश्चिमेकडे 10 किमी गेला, त्यानंतर तो डावीकडे वळून 5 किमी चालला. पुन्हा तो डावीकडे वळून 10 किमी चालला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 5 किमी स्पष्टीकरण : हा एक आयत तयार होतो. समोरासमोरील बाजू 10 किमीच्या आहेत, तर उरलेली बाजू 5 किमीची असेल.
4 ) जर आग्नेय दिशा 'उत्तर' झाली, तर 'पश्चिम' दिशा काय होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | आग्नेय
स्पष्टीकरण : 1) मुख्य दिशांचे चक्र लक्षात घेऊया : उत्तर (N), उत्तर-पूर्व (ईशान्य), पूर्व (E), दक्षिण-पूर्व (आग्नेय), दक्षिण (S), दक्षिण-पश्चिम (नैऋत्य), पश्चिम (W), आणि उत्तर-पश्चिम (वायव्य)
2) प्रश्नानुसार, आग्नेय (South-East) दिशा उत्तर झाली आहे. म्हणजे पूर्ण दिशाचक्र 135 अंश (135°) घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (Counter-clockwise) फिरले आहे
3) आता मूळ पश्चिम दिशेच्या जागी कोणती दिशा येईल ते पाहू : पश्चिमेपासून 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजल्यास आपण आग्नेय (South-East) दिशेपर्यंत पोहोचतो
म्हणून, मूळ पश्चिम दिशा आता आग्नेय होईल
5 ) सीमा उत्तरेकडे 4 किमी चालत गेली आणि नंतर उजवीकडे वळून 3 किमी चालली. तर ती मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 5 किमी
स्पष्टीकरण : पायथागोरसच्या प्रमेयानुसार : 4 चा वर्ग + 3 चा वर्ग = 16 + 9 = 25 (25 चे वर्गमूळ = 5 किमी)
6 ) तोंड पूर्वेकडे असताना तुम्ही 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (clockwise) वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण
स्पष्टीकरण : पूर्व दिशेपासून 90 अंश उजवीकडे (घड्याळाच्या दिशेने) वळल्यास 'दक्षिण' दिशा येते
7 ) ईशान्य आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये किती अंशाचा कोन असतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 135 अंश
स्पष्टीकरण : ईशान्य ते उत्तर (45) + उत्तर ते पश्चिम (90) = 135 अंश.
8 ) सुनिता दक्षिणेकडे 7 किमी गेली, मग पूर्वेकडे 5 किमी चालली, पुन्हा उत्तरेकडे 7 किमी गेली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पूर्व
स्पष्टीकरण : ती सुरुवातीला दक्षिणेकडे गेली आणि शेवटी तितकेच अंतर उत्तरेकडे आली, त्यामुळे ती फक्त पूर्वेकडे 5 किमी अंतरावर आहे.
9 ) रांगेचे तोंड उत्तरेकडे आहे. रामच्या उजवीकडे लक्ष्मण उभा आहे, तर लक्ष्मणचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | उत्तर
स्पष्टीकरण : रांगेतील सर्व व्यक्तींचे तोंड एकाच दिशेला (उत्तरेकडे) आहे, मग ते कोणाच्याही उजवीकडे किंवा डावीकडे असले तरी तोंड बदलणार नाही
10 ) वायव्य दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | आग्नेय
स्पष्टीकरण : वायव्य (North-West) च्या बरोबर विरुद्ध दिशा आग्नेय (South-East) असते
11 ) एक मुलगा सायकलवरून दक्षिणेकडे 4 किमी गेला, नंतर डावीकडे वळून 2 किमी गेला आणि पुन्हा डावीकडे वळून 4 किमी गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 2 किमी
स्पष्टीकरण : सुरुवातीचे दक्षिणेकडचे 4 किमी आणि नंतरचे उत्तरेकडचे 4 किमी एकमेकांना रद्द करतात. फक्त मधले पूर्व दिशेचे 2 किमी अंतर उरते.
12 ) जर ईशान्येला 'पश्चिम' म्हटले, तर 'उत्तर' दिशेला काय म्हणावे लागेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | नैऋत्य
स्पष्टीकरण : ईशान्य ते पश्चिम हा प्रवास 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. उत्तर दिशेपासून 135 अंश मागे गेल्यास 'नैऋत्य' दिशा येते
13 ) मनीषचे तोंड उत्तर दिशेला आहे. तो 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | आग्नेय
स्पष्टीकरण : उत्तर + 90 अंश (पूर्व) + 45 अंश = आग्नेय.
14 ) एक व्यक्ती 3 किमी पूर्वेकडे जाते, मग 4 किमी दक्षिणेकडे जाते. तर मूळ ठिकाणापासून तिचे कमीत कमी अंतर किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 5 किमी
स्पष्टीकरण : पायथागोरसच्या सिद्धांतानुसार : 3 चा वर्ग + 4 चा वर्ग = 25 ( 25 चे वर्गमूळ 5 ) म्हणून 5 किमी
15 ) संध्याकाळी 6 वाजता एका व्यक्तीची सावली त्याच्या उजवीकडे पडत असेल, तर त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर
16 ) 'A' हा 'B' च्या पश्चिमेला आहे. 'C' हा 'A' च्या दक्षिणेला आहे. तर 'B' च्या संदर्भात 'C' कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | नैऋत्य
स्पष्टीकरण : B पासून पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली दिशा म्हणजे 'नैऋत्य'.
17 ) एक माणूस घरापासून निघून 10 किमी उत्तरेला गेला, नंतर 6 किमी दक्षिणेला आला आणि पुन्हा 3 किमी पूर्वेला गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती लांब आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 5 किमी
स्पष्टीकरण : उत्तरेकडील निव्वळ अंतर 10 - 6 = 4 किमी. पूर्वेकडील अंतर 3 किमी .
पायथागोरस नुसार : 4 चा वर्ग + 3 चा वर्ग = 25 ( 25 चे वर्गमूळ 5 ) म्हणून = 5 किमी
18 ) तुम्ही उत्तरेकडे तोंड करून उभे आहात, आधी डावीकडे वळलात, मग पुन्हा डावीकडे आणि शेवटी उजवीकडे वळलात. आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | पश्चिम
19 ) आग्नेय दिशेला तोंड करून उभा असलेला मुलगा 180 अंश वळला, तर आता त्याचे तोंड कोठे असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | वायव्य
स्पष्टीकरण : 180 अंश म्हणजे विरुद्ध दिशा. आग्नेयच्या विरुद्ध 'वायव्य' असते
20 ) सूर्योदयाच्या वेळी राधा आणि गिता एकमेकींसमोर उभ्या आहेत. गिताची सावली राधाच्या बरोबर उजवीकडे पडली असेल, तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण
स्पष्टीकरण : सकाळी सावली पश्चिमेला पडते. जर सावली राधाच्या उजवीकडे आहे, तर राधि 'दक्षिण' दिशेला बघत आहे
21 ) एक माणूस 5 km पूर्वेला जातो, त्यानंतर तो दक्षिण दिशेला वळून 12 km चालतो. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून सरळ रेषेत किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 13 km
22 ) जर उत्तर दिशा 'ईशान्य' झाली, तर दक्षिण दिशा कोणती होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | नैऋत्य
स्पष्टीकरण : उत्तर दिशा 45° घड्याळाच्या दिशेने (Clockwise) सरकली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण दिशा 45° घड्याळाच्या दिशेने सरकल्यास 'नैऋत्य' (South-West) होईल.
23 ) सायंकाळी 5 वाजता कविता सूर्याकडे पाठ करून उभी आहे, तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर
स्पष्टीकरण : सायंकाळी सूर्य पश्चिमेला असतो. सूर्याकडे पाठ आहे म्हणजे तिचे तोंड 'पूर्वेला' आहे. पूर्वेकडे तोंड असताना उजव्या हाताला 'दक्षिण' आणि डाव्या हाताला 'उत्तर' दिशा येते
24 ) राहुल घरापासून 8 km पश्चिमेला गेला, नंतर तो उजवीकडे वळून 6 km गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती लांब आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 10 km
25 ) आग्नेय आणि वायव्य या दिशांमध्ये किती अंशाचा कोन असतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 180°
स्पष्टीकरण : आग्नेय आणि वायव्य या एकमेकींच्या अगदी विरुद्ध दिशा आहेत, त्यामुळे त्यांच्यात 180 अंशाचा कोन असतो.
26 ) अंकिताचे तोंड उत्तर दिशेला आहे . ती दोन वेळा उजवीकडे वळली आणि एकदा डावीकडे वळली . तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पूर्व
27 ) एका व्यक्तीने चालायला सुरुवात केली आणि तो 3 km दक्षिणेला गेला. नंतर डावीकडे वळून 4 km चालला. पुन्हा डावीकडे वळून 3 km चालला. तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पूर्व
स्पष्टीकरण : तो 3 km खाली गेला आणि 3 km वर आला, त्यामुळे तो मूळ रेषेत आहे. फक्त 4 km पूर्वेकडे सरकला आहे.
28 ) घड्याळात 9 वाजले आहेत. जर तास काटा 'पश्चिम' दिशा दाखवत असेल, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर
स्पष्टीकरण : 9 वाजता तास काटा 9 वर (पश्चिम) आणि मिनिट काटा 12 वर (उत्तर) असतो
29 ) नैऋत्य दिशेला तोंड करून उभा असलेला मुलगा 90° घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने (Anticlockwise) वळला, तर त्याची नवीन दिशा कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | आग्नेय
स्पष्टीकरण : नैऋत्य (South-West) पासून 90° डावीकडे वळल्यास 'आग्नेय' (South-East) दिशा येते
30 ) सुहास उत्तरेकडे 10 m गेला, त्यानंतर तो पश्चिमेकडे 10 m वळला, पुन्हा दक्षिणेकडे 5 m वळला आणि पूर्वेकडे 10 m वळाला. तर तो मूळ ठिकाणापासून किती लांब आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 5 m
स्पष्टीकरण : पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे 10 m रद्द होतात. उत्तरेकडील 10 m मधून दक्षिणेकडील 5 m वजा केल्यास 5 m उरतात
31 ) जर अग्नेय दिशा 'उत्तर' झाली, तर ईशान्य दिशा कोणती होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | पश्चिम
स्पष्टीकरण : आग्नेय ते उत्तर हा बदल 135° घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. ईशान्य पासून 135° विरुद्ध दिशेने गेल्यावर 'पश्चिम' दिशा मिळते.
32 ) सकाळी सूर्योदयाच्या वेळी राम आणि श्याम एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत. जर रामची सावली श्यामच्या डावीकडे पडत असेल, तर रामचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण
स्पष्टीकरण : सकाळी सावली पश्चिमेला पडते. जर सावली श्यामच्या डावीकडे असेल, तर श्याम 'उत्तरेला' बघत आहे. राम त्याच्या समोर असल्याने राम 'दक्षिणेला' बघत आहे.
33 ) एक मुलगा वायव्येला 5 km गेला आणि पुन्हा नैऋत्येला 5 km गेला. तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | पश्चिम
स्पष्टीकरण : वायव्य आणि नैऋत्य यांच्या प्रवासाचा परिणाम निव्वळ 'पश्चिम' दिशेकडे होतो.
34 ) तुम्ही तुमच्या घरापासून सरळ 4 km उत्तरेला जाता, मग उजवीकडे वळून 3 km जाता. तर घरापासून तुमचे कमीत कमी अंतर किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 5 km
35 ) आग्नेय दिशेच्या संदर्भात वायव्य दिशा किती अंशात आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 180°
स्पष्टीकरण : या दोन दिशा एकमेकींच्या बरोबर उलट आहेत
36 ) एका नकाशात दक्षिण दिशा 'पश्चिम' दाखवली आहे, तर त्या नकाशात 'उत्तर' दिशा कशी दाखवली असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पूर्व
37 ) एक व्यक्ती 10 m सरळ जाते आणि 10 m उजवीकडे वळते. त्यानंतर ती प्रत्येक वेळी डावीकडे वळून अनुक्रमे 5, 15 आणि 15 m जाते. तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 5 m
स्पष्टीकरण : नकाशा रेखाटल्यास लक्षात येईल की ती व्यक्ती मूळ रेषेपासून 5 m अंतरावर आली आहे
38 ) जर मी ईशान्य दिशेला तोंड करून उभा राहिलो आणि 135° डावीकडे वळलो, तर आता माझे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | पश्चिम
39 ) 'P' हे गाव 'Q' च्या दक्षिणेला आहे. 'R' हे गाव 'P' च्या पूर्वेला आहे. तर 'Q' गाव 'R' गावाच्या कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | वायव्य
स्पष्टीकरण : R कडून बघितले असता Q गाव वर आणि डावीकडे (उत्तर-पश्चिम) म्हणजेच 'वायव्य' दिशेला आहे
40 ) एका घड्याळात 6 वाजले आहेत. जर मिनिट काटा 'ईशान्य' दिशा दाखवत असेल, तर तास काटा कोणती दिशा दाखवेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | नैऋत्य
स्पष्टीकरण : 6 वाजता दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध असतात . जर मिनिट काटा ईशान्येला असेल, तर तास काटा त्याच्या विरुद्ध 'नैऋत्य' दिशेला असेल
41 ) एका घड्याळात 4:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल, तर तास काटा कोणती दिशा दाखवेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | ईशान्य
स्पष्टीकरण : 4:30 ला मिनिट काटा 6 वर (दक्षिण) असतो, पण येथे तो पूर्व मानला आहे (90 अंश मागे). तास काटा 4 आणि 5 च्या मध्ये (आग्नेय) असतो, तो 90 अंश मागे नेल्यास 'ईशान्य' दिशा येते
42 ) 'A' हा 'B' च्या दक्षिणेला 40 मीटर आहे. 'C' हा 'B' च्या पूर्वेला 30 मीटर आहे. तर 'A' पासून 'C' कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर-पूर्व (ईशान्य) , 50 मीटर
43 ) एक माणूस शीर्षासन करत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर
स्पष्टीकरण : शीर्षासन करताना दिशा उलट होतात. सामान्य स्थितीत पश्चिमेकडे तोंड असताना उजवा हात उत्तरेला असतो, पण डोके खाली असल्याने हात 'उत्तर' दिशेलाच राहील (फक्त शरीराची बाजू बदलेल)
44 ) राम आपल्या घरापासून 15 किमी उत्तरेला गेला. तिथे तो पश्चिमेकडे वळून 10 किमी गेला. पुन्हा दक्षिणेकडे वळून 5 किमी गेला आणि शेवटी पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. तर तो घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | उत्तर
स्पष्टीकरण : पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे 10 किमी रद्द होतात. उत्तरेकडे 15 गेले आणि दक्षिणेकडे 5 परत आले, म्हणजे अजूनही तो मूळ घरापासून 'उत्तर' दिशेलाच आहे.
45 ) जर 'X' हा 'Y' च्या पूर्वेला आहे, जो 'Z' च्या उत्तरेला आहे. जर 'P' हा 'Z' च्या दक्षिणेला असेल, तर 'X' च्या संदर्भात 'P' कोणत्या दिशेला आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | नैऋत्य
स्पष्टीकरण : मांडणी केल्यास P हा X च्या खाली आणि डावीकडे येतो, म्हणून ती 'नैऋत्य' दिशा आहे.
46 ) एक विमान 500 किमी उत्तरेला उडते, मग 400 किमी पश्चिमेला वळते, नंतर 200 किमी दक्षिणेला येते आणि शेवटी 400 किमी पूर्वेला जाते. विमानाचे मूळ ठिकाणापासूनचे सरळ अंतर किती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 300 किमी
47 ) रात्री 9 वाजता तासाचा काटा दक्षिण दिशा दाखवत असेल, तर मिनिटाचा काटा कोणती दिशा दाखवेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | पूर्व
स्पष्टीकरण : 9 वाजता तास काटा 9 वर (पश्चिम) असतो, जो दक्षिण मानला आहे (90 अंश मागे). मिनिट काटा 12 वर (उत्तर) असतो, तो 90 अंश मागे नेल्यास 'पूर्व' दिशा येते
48 ) दिशांच्या एका चक्रात ईशान्य दिशा 'दक्षिण' झाली, तर 'उत्तर' दिशा काय होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | नैऋत्य
स्पष्टीकरण : ईशान्य ते दक्षिण हा बदल 135 अंश घड्याळाच्या दिशेने आहे. उत्तर + 135 अंश = नैऋत्य
49 ) एक मुलगा घरापासून निघून 20 मीटर पूर्वेला गेला, उजवीकडे वळून 10 मीटर चालला, पुन्हा उजवीकडे वळून 9 मीटर चालला, मग डावीकडे वळून 5 मीटर चालला. आता त्याचे तोंड कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण
स्पष्टीकरण : शेवटचे वळण 'डावीकडे' आहे जेव्हा तो पश्चिमेला जात होता, म्हणून तो आता 'दक्षिण' दिशेला बघत आहे.
50 ) जर तुम्ही वायव्येकडे तोंड करून उभे असाल आणि 225 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळलात, तर आता तुमची दिशा कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | दक्षिण
स्पष्टीकरण : वायव्य + 180 अंश (आग्नेय) + 45 अंश = दक्षिण
