क्रियाविशेषण अव्यय मराठी व्याकरण | kriya visheshan Avyay Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 2

Practice Questions

क्रियाविशेषण अव्यय मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
▪️ क्रियाविशेषण
▪️ क्रियापद
▪️ सर्वनाम
▪️ विशेषण
Correct Answer: क्रियाविशेषण
Question : 2
खाताना सावकाश व चावून खावे - या वाक्यातील 'सावकाश' हे --------------- क्रियाविशेषण आहे
▪️ परिमाणवाचक
▪️ रीतिवाचक
▪️ कालवाचक
▪️ स्थलवाचक
Correct Answer: रीतिवाचक
Question : 3
रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे . या वाक्यातील 'सावकाश व जपून' हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ?
▪️ रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ कालवाचक अव्यय
▪️ गतीदर्शक अव्यय
▪️ स्थितिदर्शक अव्यय
Correct Answer: रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
Question : 4
आपण आता माझे थोडे ऐका - या वाक्यातील थोडे हा शब्द --------------
▪️ रीतिवाचक क्रियाविशेषण
▪️ कालवाचक क्रियाविशेषण
▪️ परिणामदर्शक क्रियाविशेषण
▪️ स्थलवाचक क्रियाविशेषण
Correct Answer: परिणामदर्शक क्रियाविशेषण
Question : 5
क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते ; पण ते विकारी असते . हे विधान --
▪️ सत्य आहे
▪️ असत्य आहे
Correct Answer: सत्य आहे
Question : 6
खालीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा
1. सर्व क्रियाविशेषणे विकारी असतात
2. सर्व क्रियाविशेषण अव्यय अविकारी असतात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
Correct Answer: फक्त 2 बरोबर
सर्व क्रियाविशेषणे विकारी असतात . हे चुकीचे आहे कारण - क्रियाविशेषणे ही प्रामुख्याने अव्यय (अविकारी शब्द) या गटात मोडतात. अव्यय बदलत नाहीत, म्हणजेच ते अविकारी असतात.
काही क्रियाविशेषणे विकारी तर काही अविकारी असतात . त्यामुळे सर्व क्रियाविशेषणे विकारी असतात हे विधान चूक आहे ‌.
सर्व क्रियाविशेषण अव्यय अविकारी असतात हे विधान बरोबर आहे , कारण - क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी शब्द आहेत, म्हणजेच लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार त्यांच्या रूपात बदल होत नाही.
'क्रियाविशेषण' या शब्दाचा अर्थच क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा असा आहे.
'अव्यय' म्हणजे ज्याचा व्यय (बदल) होत नाही, असा शब्द. त्यामुळे, विधान 2, 'सर्व क्रियाविशेषण अव्यय अविकारी असतात', हे बरोबर आहे
Question : 7
खाली दिलेल्या पर्यायातून अचूक विधाने असलेला पर्याय निवडा ?
(i) क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात
(ii) क्रियाविशेषण अव्ययावर लिंग, वचन आणि विभक्तीचा परिणाम होतो
(iii) 'आज' या शब्दाचा प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे
▪️ फक्त (i) आणि (ii)
▪️ फक्त (i) आणि (iii)
▪️ फक्त (ii) आणि (iii)
▪️ वरीलपैकी सर्व
Correct Answer: फक्त (i) आणि (iii)
Question : 8
(i) 'तो खूप जलद चालतो.' या वाक्यात 'खूप' हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे
(ii) 'दररोज', 'सध्या', 'आता' हे शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत
(iii) 'इकडे, तिकडे, कोठे' हे शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत
▪️ फक्त (i) आणि (ii) बरोबर
▪️ फक्त (i) आणि (iii) बरोबर
▪️ फक्त (i) बरोबर
▪️ फक्त (iii) बरोबर
Correct Answer: फक्त (i) आणि (iii) बरोबर
Question : 9
अचूक विधान/ने असलेला पर्याय निवडा
(i) ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून क्रियेची वेळ किंवा काळ कळतो, त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात
(ii) कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार: गतिवाचक आणि स्थितिवाचक
(iii) 'मागे, पुढे, खाली' हे शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत
▪️ फक्त (i)
▪️ फक्त (i) आणि (iii)
▪️ फक्त (ii)
▪️ फक्त (ii) आणि (iii)
Correct Answer: फक्त (i) आणि (iii)
Question : 10
(i) 'तो हसून बोलला.' या वाक्यात 'हसून' हे साधित क्रियाविशेषण अव्यय आहे
(ii) 'तो बाहेर उभा आहे.' या वाक्यात 'बाहेर' हे अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय आहे
(iii) 'आता, सध्या, पूर्वी' हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत
वरीलपैकी योग्य विधान/ने कोणती
▪️ फक्त (i)
▪️ फक्त (i) आणि (iii)
▪️ फक्त (ii) आणि (iii)
▪️ फक्त (i), (ii) आणि (iii)
Correct Answer: फक्त (i), (ii) आणि (iii)
Question : 11
(a) क्रियाविशेषण अव्यय लिंग, वचन, विभक्ती नुसार बदलत नाही
(b) 'भरभर, हळूहळू', 'पटपट' हे शब्द 'क्रियापदाची रीत' दर्शवतात
(c) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार 'प्रकारदर्शक', 'अनुकरणदर्शक' आणि 'निश्चयदर्शक' आहेत
▪️ फक्त (a) योग्य
▪️ फक्त (a) आणि (b) योग्य
▪️ फक्त (b) योग्य
▪️ फक्त (a), (b) आणि (c) योग्य
Correct Answer: फक्त (a), (b) आणि (c) योग्य
Question : 12
(i) 'क्रियाविशेषण अव्यय' हे वाक्यातील क्रियापदाचे विशेषण असते
(ii) 'तो जलद चालतो.' या वाक्यात 'जलद' हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.
(iii) 'आज' हे शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे
▪️ फक्त (i) योग्य
▪️ फक्त (ii) आणि (iii) योग्य
▪️ फक्त (i) आणि (iii) योग्य
▪️ वरीलपैकी सर्व योग्य
Correct Answer: फक्त (ii) आणि (iii) योग्य
Question : 13
1. 'क्रियाविशेषण अव्यय' हे क्रियापदाची व्याप्ती सांगतात.
2. 'भरभर, सावकाश' हे शब्द 'क्रिया घडण्याची रीत' दर्शवतात.
3. 'काल, उद्या' हे शब्द 'क्रिया घडण्याचा काळ' दर्शवतात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ फक्त 1आणि 3 बरोबर
▪️ वरीलपैकी सर्व बरोबर
Correct Answer: वरीलपैकी सर्व बरोबर
Question : 14
पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता ?
▪️ गतीदर्शक
▪️ प्रकारदर्शक
▪️ आवृत्तीदर्शक
▪️ स्थितीदर्शक
Correct Answer: आवृत्तीदर्शक
Question : 15
खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा ?
▪️ पतंग झाडावर अडकला
▪️ सूर्य ढगामागे लपला
▪️ पतंग वर जात होता
▪️ टेबलाखाली पुस्तक पडले
Correct Answer: पतंग वर जात होता
Question : 16
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे
▪️ मागे या ठिकाणी दंगल झाली होती
▪️ मागील दरवाजा बंद होता
▪️ चंद्र ढगामागे लपला
▪️ तुला काय हवे ते माग
Correct Answer: मागे या ठिकाणी दंगल झाली होती
Question : 17
'तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा.
▪️ कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
Correct Answer: रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
Question : 18
क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुनः पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
▪️ कालदर्शक
▪️ सातत्यदर्शक
▪️ आवृत्तीदर्शक
▪️ वारंवारिता
Correct Answer: आवृत्तीदर्शक
Question : 19
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा ?
▪️ अनेकदा
▪️ पूर्वी
▪️ सावकाश
▪️ हळू
Correct Answer: पूर्वी
Question : 20
खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा
▪️ दहा
▪️ परंतु
▪️ इथे
▪️ साठी
Correct Answer: इथे
Question : 21
झटझट , चमचम , खळखळ - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे आहेत
▪️ गतिदर्शक
▪️ स्थिती दर्शक
▪️ प्रकार दर्शक
▪️ अनुकरण दर्शक
Correct Answer: अनुकरण दर्शक
सामान्यपणे ध्वनीची पुनरावृत्ती झालेली क्रियाविशेषण अव्यय या प्रकारात मोडतात . जसे की ; झटझट पटपट चमचम वटवट खळखळ झटकन बदाबद
Question : 22
क्रियेचे स्थळ, काळ, परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात
▪️ क्रियापद
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ संयुक्त क्रियापद
▪️ विशेषण
Correct Answer: क्रियाविशेषण अव्यय
Question : 23
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?
▪️ तुर्त
▪️ नेहमी
▪️ व्यर्थ
▪️ सर्वत्र
Correct Answer: सर्वत्र
Question : 24
'वारंवार' हे दृष्य पहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे
▪️ आवृत्तीवाचक
▪️ कालदर्शक
▪️ सातत्यदर्शक
▪️ स्थितीदर्शक
Correct Answer: आवृत्तीवाचक
Question : 25
झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
▪️ परिमाणवाचक
▪️ निश्चयदर्शक
▪️ अनुकरणदर्शक
▪️ निषेधार्थ
Correct Answer: अनुकरणदर्शक

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post