स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न उत्तर | Swatantryaveer Savarkar Quiz Questions in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न उत्तरे, Swatantra Veer Savarkar question answer, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नोत्तर मराठी, Swatantryaveer Savarkar MCQ, Savarkar questions for MPSC, Swatantra Veer Savarkar quiz in Marathi, स्वातंत्र्यवीर सावरकर objective questions, Vinayak Damodar Savarkar questions and answers

Swatantryaveer Savarkar Question Answer In Marathi

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वांत क्रांतिकारी, निर्भय आणि राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ..... अत्यंत लहान वयात त्यांनी देशभक्तीची ज्योत पेटवली आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील अमानुष शिक्षा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने सोसली. "१८५७ चे स्वातंत्र्यसमर", "हिंदुत्व" यांसारखी त्यांची लेखनसंपदा आजही प्रेरणादायी आहे.

MPSC, UPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनकार्य, विचारसरणी आणि योगदान या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास करणे परीक्षार्थींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते

Swatantryaveer Savarkar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित 20+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा

TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ................

स्वातंत्र्यवीर सावरकर MCQ , Quiz आणि प्रश्न उत्तर | Swatantryaveer Savarkar Important Questions in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न उत्तर

GK Question : 1
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ रत्नागिरी
▪️ सिंधुदुर्ग
▪️ नाशिक
▪️ रायगड
Correct Answer: पर्याय क्र. 3
28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला.
GK Question : 2
१ जानेवारी १९०० मध्ये नाशिक येथे 'मित्रमेळा' या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली ?
▪️ रासबिहारी बोस
▪️ सचिंद्रनाथ संन्याल
▪️ चंद्रशेखर आझाद
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: पर्याय क्र. 4
1 जानेवारी 1900 रोजी सावरकरांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' या संघटनेची स्थापना केली. पुढे 10 मे 1904 रोजी 'मित्रमेळा' या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले.
GK Question : 3
'माझी जन्मठेप' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महात्मा फुले
▪️ विनोबा भावे
Correct Answer: पर्याय क्र. 2
'माझी जन्मठेप' हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले आहे.
GK Question : 4
पुढीलपैकी कोणत्या गोष्टी सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या ?
अ) विविध जातींतील स्त्रियांचे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केले.
ब) स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजन कार्यक्रम योजले.
क) आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड) धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.
▪️ अ आणि क
▪️ फक्त ब
▪️ ब, क आणि ड
▪️ वरील सर्व
Correct Answer: पर्याय क्र. 4
वरील सर्व गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाज सुधारण्यासाठी केल्या होत्या.
GK Question : 5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय ?
▪️ बाबाराव दामोदर सावरकर
▪️ तात्याराव दामोदर सावरकर
▪️ विनायक दामोदर सावरकर
▪️ गणेश दामोदर सावरकर
Correct Answer: पर्याय क्र. 3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर आहे.
GK Question : 6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाशिक जिल्ह्यातील जन्मगाव कोणते ?
▪️ सिन्नर
▪️ निफाड
▪️ भगूर
▪️ देवळाली
Correct Answer: पर्याय क्र. 3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला.
GK Question : 7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती ?
▪️ अनुशिलन समिती
▪️ मित्रमेळा
▪️ आझाद हिंद सेना
▪️ गदर पार्टी
Correct Answer: पर्याय क्र. 2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती.
GK Question : 8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
▪️ स्वातंत्र्यसमर
▪️ मेघदूत
▪️ आनंदमठ
▪️ भावार्थ दीपिका
Correct Answer: पर्याय क्र. 1
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' (The Indian War of Independence, 1857) हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी 1857 च्या उठावाला 'शिपाई उठाव' न म्हणता 'स्वातंत्र्यसमर' असे म्हटले आहे.
GK Question : 9
सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी कोणी दिली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
▪️ लोकमान्य टिळक
▪️ साने गुरुजी
Correct Answer: पर्याय क्र. 2
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी दिली.
GK Question : 10
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव सावरकरांवर होता ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ छत्रपती शिवाजी महाराज
▪️ जोसेफ मॅझिनी
▪️ वरील सर्व
Correct Answer: पर्याय क्र. 4
वरील सर्व व्यक्तींचा प्रभाव सावरकरांवर होता.
GK Question : 11
'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महात्मा फुले
▪️ विनोबा भावे
Correct Answer: पर्याय क्र. 2
'माझी जन्मठेप' हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मचरित्र आहे.
GK Question : 12
योग्य जोड्या लावा ?
गट - अ 'आत्मचरित्र'
1) आत्मवृत्त
2) माझ्या आठवणी व अनुभव
3) फुटके नशीब
4) माझी जन्मठेप
गट - ब 'आत्मचरित्रकार'
अ) महर्षी वि.रा. शिंदे
ब) महर्षी कर्वे
क) स्वातंत्र्यवीर सावरकर
ड) गोपाळ गणेश आगरकर
▪️ 1-ड, 2-अ, 3-ब, 4-क
▪️ 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड
▪️ 1-ब, 2-अ, 3-ड, 4-क
▪️ 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड
Correct Answer: पर्याय क्र. 3
योग्य जोड्या:
1-ब (आत्मवृत्त - महर्षी कर्वे)
2-अ (माझ्या आठवणी व अनुभव - महर्षी वि.रा. शिंदे)
3-ड (फुटके नशीब - गोपाळ गणेश आगरकर)
4-क (माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकर)
GK Question : 13
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा ?
विधान 1 - 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
विधान 2 - 1937 मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली
▪️ फक्त 1
▪️ फक्त 2
▪️ 1 आणि 2
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: पर्याय क्र. 3
दोन्ही विधाने योग्य आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर 7 वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनी 1937 ते 1946 पर्यंत या पदावर काम केले.
GK Question : 14
देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती समाजा'ची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली होती ?
▪️ पंडिता रमाबाई
▪️ सावित्रीबाई फुले
▪️ रमाबाई रानडे
▪️ सौ. येसू बाबाराव सावरकर
Correct Answer: पर्याय क्र. 4
देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती समाजा'ची स्थापना नाशिकमध्ये सौ. येसू बाबाराव सावरकर यांनी केली.
GK Question : 15
धर्माचे स्थान हे पोटात नसून मनात आहे. जबरदस्तीने कुणी परधर्मात गेला असेल, पण मनाने तो हिंदूच असेल तर त्याला हिंदू धर्मात घेतलाच पाहिजे . याकरिता घरवापसी (शुद्धी चळवळ) कोणी सुरू केली ?
▪️ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer: पर्याय क्र. 2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घरवापसी (शुद्धी चळवळ) सुरू केली.
GK Question : 16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 7 ऑक्टोबर 1906 रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली, त्यावेळी त्यांच्यासोबत कोण उपस्थित होते ?
▪️ चंद्रशेखर आजाद
▪️ चाफेकर बंधू
▪️ शिवराम पंत परांजपे
▪️ मदनलाल धिंग्रा
Correct Answer: पर्याय क्र. 3
सावरकर यांनी 1906 मध्ये पुण्यात परदेशी कापडाची होळी केली, त्यावेळी त्यांच्यासोबत शिवराम पंत परांजपे उपस्थित होते.
GK Question : 17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 24 फेब्रुवारी 1966
▪️ 25 फेब्रुवारी 1966
▪️ 26 फेब्रुवारी 1966
▪️ 27 फेब्रुवारी 1966
Correct Answer: पर्याय क्र. 3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला.
GK Question : 18
.......... हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य म्हणून ओळखला जातो ?
▪️ रघुनाथ परांजपे
▪️ अनंत लक्ष्मण कान्हेरे
▪️ मदनलाल धिंग्रा
▪️ काशिनाथ आठवले
Correct Answer: पर्याय क्र. 3
मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य म्हणून ओळखला जातो.
GK Question : 19
1857 च्या लढ्याला सावरकरांनी काय नाव दिले ?
▪️ स्वातंत्र्यसमर
▪️ लष्करी उठाव
▪️ सैनिकांचे बंड
▪️ स्वातंत्र्य युद्ध
Correct Answer: पर्याय क्र. 1
सावरकरांनी 1857 च्या लढ्याला 'स्वातंत्र्यसमर' असे नाव दिले.
GK Question : 20
सावरकरांनी लिहिलेले पहिले पुस्तक कोणते होते ?
▪️ हिंदूपदपादशाही
▪️ शिखांचा इतिहास
▪️ काळे पाणी
▪️ 1857 चे स्वातंत्र्य समर
Correct Answer: पर्याय क्र. 4
सावरकरांनी लिहिलेले पहिले पुस्तक '1857 चे स्वातंत्र्य समर' होते.
GK Question : 21
भाषा शुद्ध राखली तरच राष्ट्र जिवंत राहील असे त्यांचे मत होते. 1923 पासून त्यांनी भाषाशुद्धी चळवळ सुरू केली . ते कोण ?
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ दादोबा पांडुरंग तर्खडकर
Correct Answer: पर्याय क्र. 1
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1923 पासून भाषाशुद्धी चळवळ सुरू केली.

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post