साने गुरुजी प्रश्न उत्तर | Sane Guruji Mcq Quiz Question in Marathi

sane guruji mcq quiz Question Answer in marathi

Sane Guruji Question Answer In Marathi

साने गुरुजी हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, साहित्यिक आणि राष्ट्रप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, गरीब आणि शोषित घटकांसाठी समर्पित होते. ‘श्रम हेच देव’ आणि ‘मानवतेची सेवा हीच खरी पूजा’ या विचारांनी त्यांनी आपले जीवन घडवले. मराठी साहित्यविश्वात त्यांनी "श्यामची आई", "भावबंधन" यांसारख्या कालजयी साहित्यकृती दिल्या ज्यातून त्यांचे कोमल मन, मातृप्रेम आणि समाजप्रेम व्यक्त झाले.

स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने साने गुरुजींचे जीवन, कार्य, साहित्य आणि सामाजिक योगदान हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे . यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या लेखामध्ये आपण साने गुरुजींच्या जीवनचरित्राविषयी तसेच त्यांच्या कार्यावर आधारित संभाव्य 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत . सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा

TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ................

साने गुरुजी प्रश्न उत्तर, sane guruji prashn Uttar, sane guruji question answer in Marathi, sane guruji MCQ quiz question in Marathi, sane guruji sarav prashn sanch, साने गुरुजी सराव प्रश्नसंच, साने गुरुजी प्रश्नमंजुषा

साने गुरुजी प्रश्न उत्तर

GK Question : 1
साने गुरुजींचा जन्म कधी झाला ?
▪️ 15 जानेवारी 1899
▪️ 24 डिसेंबर 1900
▪️ 24 डिसेंबर 1899
▪️ 26 जानेवारी 1901
Correct Answer: 24 डिसेंबर 1899
GK Question : 2
साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव काय होते ?
▪️ पांडुरंग सदाशिव साने
▪️ दत्तात्रेय रामचंद्र साने
▪️ विनायक दामोदर साने
▪️ नारायण हरि साने
Correct Answer: पांडुरंग सदाशिव साने
GK Question : 3
साने गुरुजींचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 26 जानेवारी 1957
▪️ 11 जून 1950
▪️ 14 मार्च 1960
▪️ 8 डिसेंबर 1948
Correct Answer: 11 जून 1950
GK Question : 4
साने गुरुजी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते ?
▪️ 1857 चा उठाव
▪️ असहकार चळवळ
▪️ भारत छोडो आंदोलन
▪️ सविनय कायदेभंग चळवळ
Correct Answer: भारत छोडो आंदोलन
GK Question : 5
साने गुरुजींचे मूळ गाव कोणते होते ?
▪️ देवरुख, जि.रत्नागिरी
▪️ चिखली, जि.बुलढाणा
▪️ कळमेश्वर, जि.नागपूर
▪️ सिन्नर, जि.नाशिक
Correct Answer: देवरुख, जि.रत्नागिरी
GK Question : 6
साने गुरुजींची आत्मकथनपर प्रसिद्ध कादंबरी कोणती ?
▪️ झेंडूची फुले
▪️ श्यामची आई
▪️ बालशिक्षण
▪️ सत्यशोधक
Correct Answer: श्यामची आई
GK Question : 7
"श्यामची आई" या पुस्तकावर आधारित चित्रपटास कोणता पुरस्कार मिळाला ?
▪️ ऑस्कर
▪️ राष्ट्रीय पुरस्कार
▪️ फिल्मफेअर पुरस्कार
▪️ दादासाहेब फाळके पुरस्कार
Correct Answer: राष्ट्रीय पुरस्कार
"श्यामची आई" या पुस्तकावर आधारित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार १९५४ मध्ये, भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "श्यामची आई" चित्रपटाला मिळाला होता
GK Question : 8
साने गुरुजींचा व्यवसाय काय होता ?
▪️ वकील
▪️ डॉक्टर
▪️ शिक्षक
▪️ समाजसेवक
Correct Answer: शिक्षक
GK Question : 9
साने गुरुजींनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
▪️ डेक्कन सभा
▪️ राष्ट्रसेवा दल
▪️ बॉम्बे असोसिएशन
▪️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन
Correct Answer: राष्ट्रसेवा दल
GK Question : 10
साने गुरुजींनी कोणत्या मासिकाचे संपादन केले ?
▪️ क्रांती
▪️ विद्यार्थ्यांचे मित्र
▪️ आजादी
▪️ साधना
Correct Answer: साधना
GK Question : 11
साने गुरुजीसंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) दैनिक छात्रालय सुरू केले
ब) हंटर कमिशन समोर साक्षी दिली
क) सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान गुरुजींना अटक
ड) धुळे तुरुंगात देशभक्तीवर कविता लिहिल्या
▪️ अ , ड
▪️ अ , ब , क
▪️ अ , क , ड
▪️ वरील सर्व
Correct Answer: अ , क , ड
GK Question : 12
साने गुरुजींच्या वडिलांचे नाव काय होते ?
▪️ सदाशिव साने
▪️ दामोदर साने
▪️ रामचंद्र साने
▪️ नारायण साने
Correct Answer: सदाशिव साने
GK Question : 13
साने गुरुजींनी कोणत्या भावनांना आपल्या साहित्याचा गाभा बनवला ?
▪️ राजकारण
▪️ करुणा व प्रेम
▪️ तंत्रज्ञान
▪️ अर्थकारण
Correct Answer: करुणा व प्रेम
GK Question : 14
साने गुरुजींना कोणत्या कारणासाठी तुरुंगवास झाला होता ?
▪️ खून प्रकरण
▪️ देशद्रोह
▪️ स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग
▪️ पत्रकारिता
Correct Answer: स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग
GK Question : 15
"श्यामची आई" हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
▪️ विनोबा भावे
▪️ आचार्य अत्रे
▪️ साने गुरुजी
▪️ अण्णाभाऊ साठे
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 16
साने गुरुजींच्या "श्यामची आई" या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा कोण आहे ?
▪️ श्याम
▪️ गुरुजी
▪️ नाना
▪️ शिक्षक
Correct Answer: श्याम
GK Question : 17
साने गुरुजींनी 'साधना' मासिकाचा प्रारंभ कधी केला ?
▪️ 16 मार्च 1946
▪️ 28 नोव्हेंबर 1947
▪️ 15 ऑगस्ट 1948
▪️ 26 जानेवारी 1950
Correct Answer: 15 ऑगस्ट 1948
GK Question : 18
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ ) विनायक दामोदर सावरकर यांनी पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले
ब ) पांडुरंग सदाशिव साने यांनी अस्पृश्यतेविरुद्ध सामाजिक चळवळ केली
▪️ फक्त अ
▪️ फक्त ब
▪️ दोन्ही योग्य
▪️ दोन्ही अयोग्य
Correct Answer: फक्त अ
GK Question : 19
श्याम या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
▪️ विनायक नरहर भावे
▪️ पांडुरंग सदाशिव साने
▪️ माणिक बंडोजी इंगळे
▪️ डेबूजी झिंगराजी जानोरकर
Correct Answer: पांडुरंग सदाशिव साने
GK Question : 20
साने गुरुजी यांचा जन्म कुठे झाला ?
▪️ कोल्हापूर
▪️ पालघर
▪️ रत्नागिरी
▪️ सातारा
Correct Answer: रत्नागिरी (पालगड, ता. दापोली)
GK Question : 21
लाहोर अधिवेशनात स्वातंत्र्याचा ठराव झाल्यानंतर कोण नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ महात्मा गांधी
▪️ साने गुरुजी
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 22
"हसरे माझ्या मुला" ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे ?
▪️ वि. वा. शिरवाडकर
▪️ साने गुरुजी
▪️ दत्तात्रय केसकर
▪️ एकनाथ आव्हाड
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 23
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचा 'भारताचा शोध' या नावाने अनुवाद कोणी केला ?
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ साने गुरुजी
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 24
1949 मध्ये पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात 'आंतरभारतीचा' ठराव कोणी मांडला होता ?
▪️ महात्मा गांधी
▪️ साने गुरुजी
▪️ पंडित नेहरू
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 25
14 मे 1949 रोजी पुण्याच्या साहित्य संमेलनात साने गुरुजींचा आंतरभारतीचा ठराव मांडण्यामागचा हेतू काय होता ?
▪️ अखंड भारत - भारतीय एकात्मता
▪️ काँग्रेस मधील सभासदांची संख्या वाढवणे
▪️ भारतात साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणे
▪️ स्वदेशी साहित्याचा वापर करणे
Correct Answer: अखंड भारत - भारतीय एकात्मता
GK Question : 26
"महाराष्ट्राच्या नैतिक व सांस्कृतिक मूल्यांची गुरुजी व त्यांची साधने म्हणजे अखंड वाहणारी भगीरथी होती" असे कोणी गौरविले ?
▪️ विनोबा भावे
▪️ महात्मा गांधी
▪️ रावसाहेब पटवर्धन
▪️ राजा मंगळवेढेकर
Correct Answer: रावसाहेब पटवर्धन
GK Question : 27
पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती ?
साधना
काँग्रेस
विद्यार्थी
▪️ आचार्य अत्रे
▪️ महात्मा गांधी
▪️ साने गुरुजी
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: साने गुरुजी
GK Question : 28
पंडित नेहरूंच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग यांनी लिहिलेल्या 'With No Regrets' या आत्मचरित्राचे 'ना खंत ना खेद' या नावाने भाषांतर कोणी केले ?
▪️ अण्णाभाऊ साठे
▪️ महर्षी शिंदे
▪️ साने गुरुजी
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer: साने गुरुजी

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post