बाबा आमटे प्रश्न उत्तर MCQ प्रश्नसंच | Baba Amte Question Answer in Marathi
Baba Amte MCQ Quiz Question Answer In Marathi
भारतातील समाजसेवकांच्या इतिहासात बाबा आमटे (Baba Amte) हे नाव विशेष आदराने घेतले जाते. कुष्ठरोग्यांची सेवा, पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम, आणि वंचित घटकांसाठी केलेले त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे. त्यांनी आयुष्यभर मानवतेची सेवा करण्याला सर्वोच्च ध्येय मानले आणि आनंदवनासारखी प्रेरणादायी चळवळ उभारली
Baba Amte Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही बाबा आमटे यांच्या जीवन कार्यावर आधारित 15+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे . हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा
TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ................
Baba amte question answer in marathi
बाबा आमटे यांच्या जीवनकार्यावर प्रश्न उत्तर
GK Question : 1
मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे) यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 26 डिसेंबर 1913
▪️ 26 डिसेंबर 1914
▪️ 26 डिसेंबर 1915
▪️ 26 डिसेंबर 1916
Correct Answer: 26 डिसेंबर 1914
योग्य उत्तर: पर्याय क्र. 2
GK Question : 2
कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ?
▪️ वरोरा
▪️ भद्रावती
▪️ चिमूर
▪️ ब्रह्मपुरी
Correct Answer: वरोरा
आनंदवन, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले एक सामुदायिक पुनर्वसन केंद्र, महाराष्ट्रामधील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराच्या जवळ आहे. १९४९ मध्ये, बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी एका झाडाखाली हे रुग्णालय सुरू केले होते.
GK Question : 3
बाबा आमटे यांना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठांनी डिलीट (D.Litt.) पदवी बहाल केली होती ?
▪️ नागपूर विद्यापीठ व पुणे विद्यापीठ
▪️ दिल्ली विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ
▪️ बनारस हिंदू विद्यापीठ व अलाहाबाद विद्यापीठ
▪️ कोलकाता विद्यापीठ व मद्रास विद्यापीठ
Correct Answer: नागपूर विद्यापीठ व पुणे विद्यापीठ
GK Question : 4
बाबा आमटे यांनी गढचिरोली जिल्ह्यात हेमलकसा येथे आदिवासी व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी कोणता प्रकल्प सुरू केला ?
▪️ आनंदवन प्रकल्प
▪️ लोकबिरादरी प्रकल्प
▪️ संधीनिकेतन प्रकल्प
▪️ मुक्तिसदन प्रकल्प
Correct Answer: लोकबिरादरी प्रकल्प
लोकबिरादरी प्रकल्प हा एक सामाजिक उपक्रम आहे, जो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी लोकांसाठी चालवला जातो. या प्रकल्पाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केली होती आणि आता त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे हे त्याचा सांभाळ करत आहेत.
GK Question : 5
बाबा आमटे यांनी सुरू केलेले प्रकल्प व त्यांचे ठिकाण यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय ओळखा ?
▪️ आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
▪️ अशोकवन - हिंगणघाट (वर्धा)
▪️ सोमनाथ - मुल (चंद्रपूर)
▪️ लोक बिरादरी प्रकल्प - हेमलकसा (गडचिरोली)
Correct Answer: अशोकवन - हिंगणघाट (वर्धा)
अशोकवन प्रकल्प, महारोगी सेवा समिती, नागपूरद्वारे चालवला जाणारा एक महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आनंदवनच्या जवळ आहे आणि कुष्ठरोग्यांसाठी एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण वसाहत म्हणून उभा आहे.
GK Question : 6
बाबा आमटे यांचा जन्म कुठे झाला ?
▪️ शेणगाव - जि. अमरावती
▪️ सावनेर - जि. नागपूर
▪️ हिंगणघाट - जि. वर्धा
▪️ राजुरा - जि. चंद्रपूर
Correct Answer: हिंगणघाट - जि. वर्धा
GK Question : 7
भारत जोडो अभियान कोणी सुरू केले होते ?
▪️ बाबा आमटे
▪️ विनोबा भावे
▪️ बाबा आढाव
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: बाबा आमटे
GK Question : 8
कुष्ठरोग्यांवर औषधोपचार व पुनर्वसन यासाठी महारोगी सेवा समितीची स्थापना कोणी केली ?
▪️ संत गाडगेबाबा
▪️ बाबा आमटे
▪️ विनोबा भावे
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: बाबा आमटे
महारोगी सेवा समिती, वरोरा (MSS) ही मध्य भारतातील एक ना-नफा, स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था १९ ऑगस्ट १९४९ रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे म्हणून ओळखले जाणारे) आणि त्यांची पत्नी साधना मुरलीधर आमटे (साधनाताई) यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थापन केली.
GK Question : 9
प्रकाशवाटा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
▪️ बाबा आमटे
▪️ डॉ. प्रकाश आमटे
▪️ साधनाताई आमटे
▪️ डॉ. विकास आमटे
Correct Answer: डॉ. प्रकाश आमटे
GK Question : 10
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते ?
▪️ दामोदर गजानन आमटे
▪️ शंकरराव विष्णू आमटे
▪️ विनायक सदाशिव आमटे
▪️ मुरलीधर देविदास आमटे
Correct Answer: मुरलीधर देविदास आमटे
GK Question : 11
आनंदवनाची ज्ञानपेढी म्हणून संबोधलेल्या उत्तरायण या संस्थेची स्थापना बाबा आमटेंनी कोणासाठी केली होती ?
▪️ ज्येष्ठ वृद्धांसाठी
▪️ अनाथ मुलांसाठी
▪️ कुष्ठरोग्यांसाठी
▪️ अपंगांसाठी
Correct Answer: ज्येष्ठ वृद्धांसाठी
GK Question : 12
बाबा आमटेंच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी लिहिलेले 'समिधा' हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
▪️ प्रकाश आमटे
▪️ विकास आमटे
▪️ मुरलीधर आमटे
▪️ देविदास आमटे
Correct Answer: मुरलीधर आमटे
मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे)
GK Question : 13
बाबा आमटे यांनी सुरू केलेले महत्वपूर्ण प्रकल्प व त्यांचा उद्देश यांच्या योग्य जोड्या लावा ?
गट अ - प्रकल्प अ) संधीनिकेतन ब) आनंदवन क) गोकुळ ड) मुक्तीसदन